क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुमराह आणि प्रसिध ला लय सापडण्याचा हेतू पूर्ण झाला >> हो दोघेही एकदम ताजेतवाने वाटतात. बुमरा पेक्षाही प्रसिध लयीत असणॅ जास्त जरुरी होते. मधल्या ओव्हर मधे तो एकच एन्फोर्सर आहे.

लॉर्ड रिंकू एकदम मॅच्युअर इनिंग खेळलाय. त्याला अजून नक्की अधिक संध्या दिल्या गेल्या पाहिजेत.

उगाच एका प्रॉमिसिंग करियरची माती व्हायची. >> प्रामाणिकपणे गायकवाड ला नक्की कुठे खेळवणार ह्याबद्दल मला अनिश्चितत्ता वाटते. म्हणजे रोहित आहे नि जयस्वाल /गिल/किशन हे पेकिंग ऑर्डर मधे पुढे आहेत. तरी राहुल ला मी धरत नाहीये. तळ्यात ना मळ्यात स्थिती आहे गायकवाडची

राहुल नसल्यामूळॅ गिल तीन वर नि कोहली चार वर खेळणार कि कोहली तीन नि तिलक वर्मा पाच-सहा वर खेळणार एव्हढीच उत्सुकता आहे. उगाच प्रयोग करण्यापेक्षा वर्मा ला फिनिशर म्हणून ठेवावा असे वाटते. लाँग टर्म म्हणून गिल १-२-३ मधेच खेळणार आहे. तो तिथे नाही येऊ शकला तर नकोच .

माझा अंदाज आहे कि तिलक पहिल्या मॅचमधे तरी बाहेर बसेल.

किशन, शर्मा, कोहली, गिल, अय्यर, हार्दिक, जडेजा, कुलदिप, शामी, बुमराह आणि प्रसिध अशी टीम असेल. राहूल आल्यावर किशनच्या जागी तो खेळेल पण बॅटिंगला खाली येईल. तसंही ओपनिंग आणि किपींग ह्या दोन्ही जवाबदार्या ५० ओव्हर्सच्या एका मोठ्या टूर्नामेंटमधे सातत्यानं संभाळणं कठीण आहे.

राहूल आल्यावर किशनच्या जागी तो खेळेल पण बॅटिंगला खाली येईल. तसंही ओपनिंग आणि किपींग ह्या दोन्ही जवाबदार्या ५० ओव्हर्सच्या एका मोठ्या टूर्नामेंटमधे सातत्यानं संभाळणं कठीण आहे.
>>
याच कारणामुळे शर्मा अन् गिल ओपन करतील असं वाटतं.
गेल्या काही वर्षांमध्ये अय्यर अन् राहुल ४-५ वर चांगले खेळले आहेत. त्यांचा क्रमांक बदलू नये. किशन पण ५ वर असलेला बरा.
केवळ लेफ्ट - राईट ओपनिंग साठी किशन ला वर घेतलं तर उगाच नंतर ची ऑर्डर डिस्टर्ब होईल. राहुल आला की तो बाकी कुणाला न हलवता ५ वर किशनला रीप्लेस करू शकेल...

तसंही ओपनिंग आणि किपींग ह्या दोन्ही जवाबदार्या ५० ओव्हर्सच्या एका मोठ्या टूर्नामेंटमधे सातत्यानं संभाळणं कठीण आहे. >> रोहित नि द्रविड ने क्लीयरली ते राहुलला ओपनर म्हणून बघत नसल्याचे म्हटले आहे. त्यात बदल होईल असे वाटत नाही रे.

किशन च्या मुंबई किंवा भारतासाठी असलेल्या सगळ्या मोठ्या इनिंग्स १-३ मधे झाल्या आहेत. स्पिनर नि सॉफ्ट बॉल वर तो चाचपडतो. त्यामूळॅ त्याला खाली आणण्यापेक्षा तिथे तिलक (लेफ्टी हवा तर) योग्य ठरेल.

ओपनिंग काँबो लेफ्टी राईटी असावा असे मला वाटते. आठवा, धवन- रोहित दोन वर्ल्ड कप मधे कसे खेळले होते नि त्याचा इंपॅक्ट. नेमका धवन इंजर्ड होणे नि ओपनिंग बोंबलणे एकाच वेळेस झाले होते.

सिराजचा सध्याचा नि भारतामधला फॉर्म बघता शमीच्या जागी त्याला प्रीफरन्स दिला जाण्च्याची शक्यता किती वाटते ?

“ रोहित नि द्रविड ने क्लीयरली ते राहुलला ओपनर म्हणून बघत नसल्याचे म्हटले आहे. त्यात बदल होईल असे वाटत नाही रे.” - मी किशन च्या संदर्भात लिहीलं होतं ते.

आलं लक्षात - किशन असताना राहूलला किपिंग करायला संगतील असे वाटत नाही. गिलख्रिस्ट , संगा, बटलर, डी कॉक अशी मोठी लिस्ट आहे दोन्ही करणार्‍यांची. किशन तर तरूण आहे .

सिराजचा सध्याचा नि भारतामधला फॉर्म बघता शमीच्या जागी त्याला प्रीफरन्स दिला जाण्च्याची शक्यता किती वाटते ? >>>
सिराज ला प्रेफरन्स दिला तर पाहिजे पण देतील असं वाटत नाही, सुरुवातीला तरी शमी ला अनुभवी असल्या कारणाने खेळवतील.

आलं लक्षात - किशन असताना राहूलला किपिंग करायला संगतील असे वाटत नाही. >>>
किशनला खेळवायचं तर त्याचा पूर्णपणे उपयोग करायला रोहित सोडल्यास सगळ्यांची बॅटिंग पोझिशन हलवायला लागते. मधल्या फळीत किशन चा रेकॉर्ड चांगला नाही.
त्यामुळे जर राहुल पूर्णपणे फिट नाही तर सॅमसन खेळला हवा होता.

“ किशन असताना राहूलला किपिंग करायला संगतील असे वाटत नाही.” - मला वाटतं राहूल हा फर्स्ट चॉइस विकेटकीपर आहे. त्याच्यामुळे टीम बॅलन्स सुद्धा जास्त चांगला साधला जातो (मिडल ऑर्डर बॅट्समन). पण त्याच्या इंज्युरीमुळे किशन (बॅकप) संधी मिळेल पहिल्या १-२ मॅचेस तरी. राहूल फिट नाहीच झाला तर संजू (ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह) टीममधे येईल, पण त्या केसमधे किशन फर्स्ट चॉइस कीपर असेल.

किशनला खेळवायचं तर त्याचा पूर्णपणे उपयोग करायला रोहित सोडल्यास सगळ्यांची बॅटिंग पोझिशन हलवायला लागते. >> आपण किमान दोन मॅचेस तरी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहोत (वर्ल्ड कप धरून) . आफ्रिदीचा उजव्या फलंदाजांविरुद्ध चा रेकॉर्ड बघता लेफ्टी ओपनर असणे जरुरी आहे असे मला वाटते. त्यासाठी मग पूर्ण ऑर्डर बदलत बसण्यापेक्षा गिल ला बसवणे जास्त योग्य वाटते. त्याला ५-६ वर खेळवणे जुगार आहेणेनि लाँङ टर्म फायदा काहीछ नाही. तिथे राहुल नसेल तर तिलक किंवा संजू ह्याच ऑर्डर मधे असले तर बरे ( तिला लेफ्टी असल्याचा फायदा होतो - मिडल ओव्हर्स मधे लेग स्पिनर विरुद्ध वापरता येउ शकते) असे वाटते. थोडक्यात वर्ल्ड कप संपेतो, रोहित, कोहली, किशन, अय्यर (नि राहुल) ह्यांच्या बॅटींग पोझिशन मधे चेंज करू नये अशी इच्छा आहे.

किशन नी आजाच्या खेलीनी राहुल, अय्यर अन् गिल ला पाचर मारून ठेवली आहे...
बाकी २६७ चं टार्गेट पुरे पडतं की नाही ते बघूच...

किशन अन् पांद्या दोघांच्या सेंच्युरी व्हायला हव्या होत्या

पहिल्या पाच ओव्हर्समधे सुटलेले तिनही कॅचेस गलथान होते. गेल्या दोन मॅचेसमधे तरी ही टीम वर्ल्डकपसाठी तयार वाटत नाहीये. खूप underprepared वाटतेय.

२००३ वर्ल्डकपच्या पहिल्या पराभवानंतर आणि नेदरलॅड्सविरूद्धच्या अडखळत मिळवलेल्या विजयानंतर जसा सूर गवसला होता, तसा गवसावा (लवकरात लवकर) ही आशा.

आज गुरखा लोकांनी यांना दिवसाढवळ्या असा काय फटकवला की विचारू नका. रात्रपाळी देणाऱ्या गुरख्याचा आवाज ऐकला की यांना झोप नाय लगाची दोन चार महिने.

पावसामुळे वन डे ची टी२३ झाली, जी आपल्या टीम नी कचकून जिंकली.
वन डे वर्ल्डकप दृष्टीनं या इनिंग चं महत्त्व फारसं नाही.
बोलिंग मधे ही नेपाळ २३० पर्यंत गेलं, त्यातही सुरवातीला आपल्या पेसर ना फोडून काढलं हे ही चिंताजनक आहे.

आज सगळीकडे चिंता व्यक्त करणे चालू आहे.
पण मला वाटते परफॉर्मन्स वर खाली होत राहतो.
वन डे वर्ल्डकपदृष्टीनं माझ्यामते फक्त एकच गोष्ट सर्वाधिक चिंतेची आहे...
आपल्याला नॉकआऊट सामन्याचे प्रेशर हॅण्डल करता येत नाही Sad

सध्याची टीम बघून वाटत आहे की आपण वर्ल्ड कप नेक्स्ट स्टेज जरी qualify झालो तरी बस. वर्ल्ड कप साठी ही सर्वात वाईट टीम आहे.
राहुल and शर्माजी का लाडका , तुमसे ना हा पायेगा.

वन डे वर्ल्डकपदृष्टीनं माझ्यामते फक्त एकच गोष्ट सर्वाधिक चिंतेची आहे...
>>
शाहीन अफ्रिदीनी रोहितला गिऱ्हाईक करून ठेवलं आहे.

सध्याची इंडिया टीम ही बंच ऑफ इंडिविजुअल प्लेअर्स आहे.
बड्या धेंडांनी मनाला येईल तेंव्हा सुट्ट्या मारून अन् भलत्या फिटनेस ट्रेनिंग पाई नसत्या इंज्युरी मागे लावून घेऊन सिंक मधे खेळायचं वाटोळं करून ठेवलं आहे.
वर्ल्डकप च्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणारी आपली प्लेईंग 11, त्या आधी किती सामने एकत्र खेळली आहे हे बघणं रोचक असणार आहे.
इंडिविजुअल परफॉर्मन्स वर आपण पुढे जाऊ अन् ऐन वेळी ठराविक खेळाडूंनी परफॉर्म नाही केलं की नॉक् आऊट मधे माती खाऊ. गेल्या 2 वन डे वर्ल्डकप आणि अनेक इतर स्पर्धांमध्ये हेच झालं आहे.
2003 प्रमाणे कंप्लीट चेंज ऑफ अप्रोच होणं मला तरी अवघड वाटतं आहे. आगे आगे देखो होता है क्या...

Pages