क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐय्यर परत पण आला का? राहुल ला फॉर्म गवसलाय थोडा.

खरच इवनली पॉईज्ड आहे. ८४ मध्ये ८५ करायचे आहेत. २च विकेट.

बोकलत, आमची नि तुमची क्रिकेटची समज वेगळी आहे हो , सो असू दे. आम्हाला इग्नोर करा.

बुवा हॅरिस चा कॅच बघितला का ? धमाल होता. पाकिस्तान फिल्डींगमूळे जिंकले हे लिहायला एकदम ऑड वाटते.

नाही बघितला. हायलाईट्स बघतो आता.
त्यांची इनिंग्स ४२ ओवर मध्ये का थांबवली? मी ३७ पर्यंत अधून मधून फॉलो करत होतो आणि नंतर अचानक लंके वाले आले बॅटिंगला. खाली डि एल एस नी २५२ पाहिजे असं दाखवत होते. काय पाऊसाचा फोरकास्ट होता म्हणून की पाऊस आला म्हणून आवरली इनिंग.? काही कळालच नाही मला.

"त्यांची इनिंग्स ४२ ओवर मध्ये का थांबवली?" - पावसामुळे. आधी पाऊस पडल्यामुळे ४५ ओव्हर्सची झाली. मधे परत पाऊस आल्यामुळे ४२ ओव्हर्सची झाली.

ओक ओके. धन्यवाद फेफ.

उद्याच्या मॅच करता मेन पब्लिक बसवायला हरकत नाही पण खरंतर खेळले तरी चालेल. फ्लो राहिल. फायनल ला एक दिवस आहे मध्ये.
कोहली पोस्ट मॅच मध्ये मांजरेकरला मी खुप थकलोय म्हणाला Happy बरोबर आहे. ह्युमिडिटी खुप जास्त आहे.

आयला या अशिया कपमधे एक मॅच धड झाली नाही. सतत पाऊस! टीव्ही लावला रे लावला की पाउस!
आता भारत-श्रीलंका सोमवारी.

"वर्माची विकेट पाहिली का?" - ऑफ स्टंप कुठे आहे हे टोटा विसरल्यासारखा खेळला वर्मा. आता हे दोघं चांगली इनिंग बिल्ड करतायत. पण भारतीय टीमची एकंदर देहबोली, फायनलच्या आधी एक बिनमहत्वाची मॅच खेळतोय, अशीच वाटतीय.

आफ्रिका ४१६

लास्ट ९ ओवर १६५ मारले... बे क्का र

शर्मा लवकर गेला तिथेच अवघड झाले..
वर्मा आणि सूर्या हे २०-२० चे प्लेअर. नंतर प्रेशर फार हँडल ना करता येणारा राहुल..
जडेजा हल्ली सूर गेलाय त्याचा.. शार्दुल तर बिनकामाचा फलंदाज आहे..
एकूण फलंदाजी गंडलेलीच जरा..
गिल जबरदस्त खेळल्याने क्लोज गेलो. अक्षर ऐन मोक्याला बाद झाला नसता तर जिंकलो असतो..
पण बरे झाले हरलो.. जिंकले की चुका झाकल्या जातात

पण भारतीय टीमची एकंदर देहबोली, फायनलच्या आधी एक बिनमहत्वाची मॅच खेळतोय, अशीच वाटतीय. >> +१ बॉलिंग च्या वेळीसच जाणवले होते

शर्मा लवकर गेला तिथेच अवघड झाले..
>>
किती चाटणार
असं आहे का की शर्मा लवकर बाद झाल्यावर कधीच जिंकलो नाही?

बॉलिंग च्या वेळीसच जाणवले होते
>>
येस
५९/४ वरून १००+ ची भागीदारी होऊ दिली तिथेच मॅच हातातून निसटायाला लागली

पाक विरुद्धची एक मॅच सोडली तर आपण ५० ओव्हर पूर्ण खेळल्याच नाही आहेत या सिरीज मधे

असं आहे का की शर्मा लवकर बाद झाल्यावर कधीच जिंकलो नाही?
>>>

पूर्ण पोस्ट नाही वाचली का?
मागची फलंदाजी आज कमजोर होती.. म्हणून तसे म्हटले. आज शर्मा गिलची ओपनिंग जास्त महत्त्वाची होती.

एके काळी जेव्हा भारत एकखांबी तंबू होता तेव्हा सचिन लवकर बाद झाला की असेच अवघड व्हायचे...

मग धोनी आला !

एके काळी जेव्हा भारत एकखांबी तंबू होता तेव्हा सचिन लवकर बाद झाला की असेच अवघड व्हायचे...
>>
मग दादा, द्रविड, युवराज, सेहवाग आले
टीम स्टेबल झाली, परदेशात टूर्नामेंट जिंकायला लागली
वर्ल्डकप फायनल पर्यंत गेली
>>
मग धोनी आला !
>>
गंभीर, रैना, पठाण बंधू पण आले
अन् नंतरही दादा, द्रविड, सचिन, युवराज, सेहवाग पण बराच काळ होते

मागची फलंदाजी आज कमजोर होती
>>
तिलक, सूर्या, राहुल हे कमजोर का?
यातले दोघं आहेत वर्ल्डकप टीम मधे.

अनुभव कमी / कमबॅक करणारे म्हणजे कमजोर नाही रे

चान्स मिळाला तर क्लासेन च्या इनिंग चे हायलाईट नक्की पहा.

लयीत आल्यावर स्पिनर ना इतक्या निर्दयपणे चोपणारे फलंदाज आत्ताच्या काळात माझ्या मते फक्त तो आणि रोहित आहेत.

Pages