क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालपासून फेसबूकवर / सोशल मिडियावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया बघतोय,

१) ईंग्लंडने कसोटी फॉर्मेट रंगतदार केलाय. ऑस्ट्रेलियासोबतही त्यांना यश मिळायला हवे.
२) ईंग्लंड खूप शहाणी बनतेय. ओवर कॉन्फिडन्स मध्ये डिक्लेअर केलेय. हा डाव त्यांच्या अंगाशी आला पाहिजे.

माझे मत चांगले क्रिकेट बघायला मिळावे असे असले तरी हलकेसे १ ला झुकणारे आहे.
एकेकाळी असे धाडसी डिक्लेरेशन ऑस्ट्रेलिया करायची. आज ईंग्लंड करतेय. हे असे क्रिकेट आपली टीम खेळत असती तर बघायला किती मजा आली असती विचार करा...

रोहित शर्मा कप्तान असताना असं धाडस होऊच शकत नाही.‌ गेम कंट्रोल करायची त्याच्यात क्षमता नाही आणि 'हे असंच खेळायचं' असं टीममेट्सना ठणकावून सांगेल आणि तेही त्याचं ऐकतील, अश्या त्याच्या अचिव्हमेंट्सही नाहीत.

आपल्या टीममध्ये संघभावना नावाचा प्रकार शिल्लकच नाहीये सध्या असे वाटते..
चहाते तर सगळे आयपीएल पासून वाटले गेले आहेत
कोणालाही कप्तान करा आता. आयसीसी ट्रॉफीला नॉक आऊट स्टेजला आपण मातीच खाणार.. असे झालेय.

चाहते वाटले बिटले काही गेले नाहीत. सगळे भारतीय संघालाच सपोर्ट करत आहेत. सद्या आपण कोणतीही महत्वाची टूर्नामेंट जिंकेल अशी आशा वाटत नाही. याची भरपूर करणे असतील त्यापैकी शर्माची captiancy एक असू शकेल. यासाठी पांड्या आणि गीलला ट्राय करायला पाहिजे.

ENG v AUS, 1st Test
AUS 37-2
ENG 393-8 d
Usman Khawaja*: 21 (39)
Steven Smith: 4 (5)
James Anderson 3.4-1-15-0
Day 2: 1st Session - Australia trail by 356 runs

BAN v AFG, Only Test
AFG 115 & 146
BAN 425-4 d & 382

Bangladesh won by 546 runs

चहाते तर सगळे आयपीएल पासून वाटले गेले आहेत >> शर्मावर टीका झाली म्हणून का ?

भा अचिव्हमेंट्स बद्दल नाही पण तू म्हणतोस तसा बेदरकारपणा नाही ह्याबद्दल अनुमोदन. तो तसा दादा, धोनी, कोहली ह्यांच्यामधे होता. My way or highway म्हणायला तशी पर्सनॅलिटी लागते.

आता शर्मा, कोहली, पुजारा यांना सन्मानाने नारळ द्यायची वेळ आली आहे. गेल्या अठरा टेस्ट मध्ये त्यांची सरासरी ३० च्या आसपास आहे. कप्तानपदी बसण्यास डॉक्टर रहाणेच लायक आहेत. पण तो मराठी माणूस आहे. त्याला पुनश्च चान्स मिळाला यातच समाधान माना.

“ आता शर्मा, कोहली, पुजारा यांना सन्मानाने नारळ द्यायची वेळ आली आहे.” - ही वेळ कधीतरी येणारच आहे. ती आत्ता आहे का अजून काही काळानंतर हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण कळीचा मुद्दा हा आहे की डोमेस्टिक क्रिकेटमधे दुसरी फळी तयार आहे का. मयंक आगरवाल (ट्राईड अँड टेस्टेड), अर्पित वसवडा, अनुष्टुप मजुमदार, ध्रुव शौरी, सचिन बेबी हे यंदाचे रणजीमधले टॉप ५ बॅट्समेन आहेत. त्यातल्या त्यात इश्वरन ला थोडंफार ग्रूम केलंय. पण बाकी नावं फारशी चर्चेत नाहीत.

शर्मावर टीका झाली म्हणून का? >>> छे, शर्माचे काय घेऊन बसलात. ज्याला सचिन नंतर बघितले गेले त्या कोहलीवर किती टिका होते ते बघा. भारताला सर्वाधिक मानसन्मान मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी ज्याला जग एक उत्तम कर्णधार आणि लीडर मानते, ज्याची फिनिशर म्हणून १०० ची सरासरी आहे आणि पलक झपकतेही किपिंग करायचे कौशल्य ज्याच्या ठायी आहे तो सुद्धा ट्रोलरपासून सुटला नाही. उलट हे शर्मा, कोहली, धोनी हेच एकमेकांच्या चाहत्यांच्या निशाण्यावर असतात. आणि हे खेळाडू सुद्धा सोमिवर काय चालते हे बघत असतीलच की. तसेच कर्णधारपदाचे राजकारण काय कमी शिजतेय का आपल्याकडे... एकूणच जी परिस्थिती आहे ती योग्य संघभावना राखण्यास पोषक नाहीये. जोपर्यंत हे बदलत नाही तोपर्यंत धोनीच भारताचा आयसीसी चषक जिंकणारा अखेरचा कर्णधार राहणार.. आणि गं म त म्हणजे काही अंध धोनी भक्तांना असेच व्हाव्से असेही वाटते Happy

आणि गं म त म्हणजे काही अंध धोनी भक्तांना असेच व्हाव्से असेही वाटते Happy
>>
म्हणजे थोडक्यात धोनीप्रेमामुळे भारत जिंकू नये असं वाटतं आहे तर... Get well soon...

बरं, हे आयपीएल च्या आधीपासून (२००७) वाटतं की नंतर (२००८ पासून) की वर्ल्डकप नंतर (२०११) का चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) नंतर?
२०१५ वर्ल्डकप मधे धोनी कॅप्टन असताना काय वाटायचं काही आठवतं आहे का?

ते अंधभक्तांबद्दल म्हटले आहे.
शर्मा सुद्धा माझा आवडता प्लेअर आहे हे लक्षात नाही का आले अजून Happy
काही शर्माचे अंध द्वेष्टेही आहेत ज्यांना शर्मा पर्यायाने भारत हरावा असे वाटत असेल
फेसबूकवर उघड उघड लोकं अश्या ईच्छा बोलून दखवत असतात.

ते अंधभक्तांबद्दल म्हटले आहे.
शर्मा सुद्धा माझा आवडता प्लेअर आहे हे लक्षात नाही का आले अजून Happy
काही शर्माचे अंध द्वेष्टेही आहेत ज्यांना शर्मा पर्यायाने भारत हरावा असे वाटत असेल
फेसबूकवर उघड उघड लोकं अश्या ईच्छा बोलून दखवत असतात.

शर्माचे काय घेऊन बसलात. ज्याला सचिन नंतर बघितले गेले त्या कोहलीवर किती टिका होते ते बघा >> टीका केली म्हणजे टीका करणार्‍याला तो खेळाडू आवडतच नाही, त्याचा द्वेष करतो वगैर इयत्ता पहिली ड च्या धारणा कधी सोडणार ?

देवाची कृपा. अशी कि उस्मानचाचा आपल्या विरुद्ध खेळला नाही. आस्ट्रेलिया हळू हळू जवळ येत आहेत.

टीका केली म्हणजे टीका करणार्‍याला तो खेळाडू आवडतच नाही,
>>>>

अहो हिणकस आणि बेसलेस टिका असते ओ... फुल्ल ट्रोलिंग
नॉर्मल टिका मी सुद्धा करतोच की. अगदी आवड्त्या प्लेअरवर सुद्धा करतो.

शर्मा, कोहली, धोनी हे पैसे घेऊन IPL फिक्सिंग करतात ह्या पेक्षा हिणकस टीका काय असू शकते.

हंगर्गेकरने काहीतरी भारी कामगिरी केली ना‌ महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये काल? उडत उडत वाचलं होतं‌ काहीतरी.

रात्रीचे चांदणे, आयपीएल पैश्याचाच खेळ आहे. तिथे कोणी काही करो. मला फरक पडत नाही. देशासाठी खेळताना कोणी फिक्सिंग केली तर जसे अझर जडेजा यांची मला तोंडेही बघवत नाहीत.

असो, संपली आयपीएल. सोडा तो विषय

कसोटी क्रिकेट एंजॉय करा.
ईंग्लंड ऑस्ट्रेलिया मालिकेला यकायक Bazball विरुद्ध पारंपारीक कसोटी क्रिकेट असे स्वरुप आले आहे.
पारंपारीक क्रिकेटच्या बाजूने आजवर सर्वात चांगले सकारात्मक क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ऑस्ट्रेलिया मैदानात उतरली आहे.
त्यामुळे या मालिकेची एक वेगळीच क्रेझ दिसत आहे. आणि सामनाही काल अगदी रोचक स्थितीत आला आहे.

जेव्हा ईंग्लंड भारताच्या आखाड्यांवर खेळायला येणार तेव्हा पुन्हा एकदा अशीच चर्चा रंगणार आहे.

पाऊस नेमका घोळ घालून गेलाय. हेड अजून थोडा वेळ टिकला असता तर मजा आली असती बाझबॉल चे नक्की काय होते ते बघायला. इंग्लंड हरावे नि उरलेल्या टेस्ट मधे बाझबॉलचा खरा कस लागावा अशी इच्छा आहे. चांगल्या बॅटींग टीम समोर बाझबॉल किती इफेक्टीव्ह ठरेल ह्याबद्दल उत्तर मिळून जाईल.

गेला ग्रीन
सहावी विकेट

पॉझिटिव्ह क्रिकेट खेळण्यात सध्या इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या सुद्धा पुढे आहे.. बॅटिंगलाच नाही तर बॉलिंगलाही ते तुटून पडणार

Pages