क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

82.5
Root to Cummins, SIX, another big shot, another six! Target down to 37!
नवा चेंडू घ्यायचा का नाही! मिलिअन डॉलर चा प्रश्न.

true grit!!
राजा, असंं असतंं क्रिकेट!

मॅन ऑफ द मॅच कमिन्स !!! He absorbed all the pressure towards tail end of the inning to guide Aussies for a win. England probably left wondering if choosing Anderson and Broad both was a mistake on this pitch. Of course not having Leach did not help at all. I wonder why did England not use short ball tactics for longer duration and from the start against Lyon.

Any afterthoughts on first inning (premature or cavalier) declaration ? All that did was to bump up chances for Aussie win.

१५ ओव्हर्स राहिलेल्या असताना तिन्हीपैकी कोणताही निकाल शक्य होता! ५१ रन्स आणि २ विकेट्स. आधीच्या ओव्हरमधे विकेट पडल्याने इंग्लंडचे पारडे जड होते पण कमिन्सने लगेच दोन लागोपाठ सिक्सेस मारल्या आणि झटक्यात टार्गेट ३७ वर. आता ते रिचेबल वाटते. तेव्हढ्यात एक अशक्यप्राय कॅच घ्यायचा स्टोक्सचा अफलातून प्रयत्न पण तो पूर्ण पोहोचू शकला नाही.

खतरनाक ड्रामा! आपण फुल कॅप्टिव्ह.

अशा वेळेस "एन्फोर्सर" बोलर लागतो. अक्रम सारखा. दोन यॉर्कर्स वर टीमला पॅकअप करून टाकतो. अर्थात त्याचाही दिवस असावा लागतो. नाहीतर ५/१४७ वरून दुसरी टीम साडेतीनशे मारू शकते. गिलख्रिस्ट आणि लँगरने १९९९ मधे केले तसे.

त्या कमिन्सच्या दोन सिक्सेसची व्हॅल्यू किती असेल! परवा परवाच कोणत्याही फालतून सिक्सला "मॅग्निफिसंट" वगैरे कौतुके ऐकली आहेत आयपीएलमधे. तेथे खरोखरच मॅग्निफिसंट शॉट्सही होते पण ही कौतुके फार डायल्यूट केली गेली होती. हा आज जो दिसला तो वेगळ्याच दर्जाचा ड्रामा आहे.

काल मस्त मजा आली मॅच पहायला. आपली नव्हती म्हणून जास्ती एन्जॉय केली.
अलीला झालेली जखम, स्टोक्सने कमी घेतलेली बोलिंग आणि सोडलेले झेल (बेयर्स्टो, स्टोक्स, रूट) इंग्लंडला महागात पडले.

बाय द वे. मित्रांनो मी पहिले दोन दिवस आपली मॅच ओव्हलला पाहिली. गावसकर भेटले होते पहिल्या दिवशी, काही सेकंद.

पहिले दोन दिवस आपली मॅच ओव्हलला पाहिली. गावसकर भेटले होते पहिल्या दिवशी, काही सेकंद.

>>
Great

मी पहिले दोन दिवस आपली मॅच ओव्हलला पाहिली. गावसकर भेटले होते पहिल्या दिवशी, काही सेकंद. >> जबरदस्त !

बाय द वे. मित्रांनो मी पहिले दोन दिवस आपली मॅच ओव्हलला पाहिली. गावसकर भेटले होते पहिल्या दिवशी, काही सेकंद. >> रिस्पेक्ट!

त्याला सांगितले का की तुम्ही व धाकटे साहेब खेळत असताना आम्ही खुर्चीवरून हलत नव्हतो? Happy

गावसकर भेटले होते पहिल्या दिवशी, काही सेकंद. >>> अरे वाह भारीच.. माझा भेटायचा योग थोडक्यात हुकलेला. आणि भेटून आलेला मित्र फोटो दाखवून जळवत होता. डाऊन टू अर्थ माणूस त्यामुळे छान गप्पाही मारल्या म्हणून...

त्याला सांगितले का की तुम्ही व धाकटे साहेब खेळत असताना आम्ही खुर्चीवरून हलत नव्हतो? Happy >> Happy
त्यांना हेही सांगायला पाहिजे होते तुमच्या नाबाद २२१ चा कानमंत्र द्या रोहित, कोहलीला. Happy

On this day 1996, the 2nd Test match between India and England began at Lord's Cricket Ground in London. This match marked the final Test appearance of renowned umpire Dickie Bird, who had a highly respected career in officiating international cricket matches.

In addition to Bird's farewell, this Test match witnessed the debut of two Indian cricketing legends, Sourav Ganguly and Rahul Dravid. Sourav Ganguly had an exceptional start to his Test career by scoring a magnificent century (131 runs) in his very first innings. Ganguly's century on debut made a significant impact and showcased his talent and potential as a future star in Indian cricket.

Rahul Dravid also had an impressive debut in the same Test match. Dravid scored 95 runs, narrowly missing out on a century in his first innings. Despite falling short of the milestone, Dravid's innings demonstrated his skill and determination at the crease, foreshadowing the remarkable career he would have in the years to come.

This Test match was memorable not only for the contributions of Ganguly and Dravid but also for being the final chapter in Dickie Bird's illustrious umpiring career.

पहा पुजाराला काढून टाकले. कोहली आणि वडापावला नाही. खरतर त्यांनाही काढायला पहिजे होतंं.
असच असत. जिनका कोईभी नही होता उनको खुदाभी नही होता.

असच असत. जिनका कोईभी नही होता उनको खुदाभी नही होता. >>>

मान्य, पण पुजारा ने हि गेल्या दोन वर्षात एखादा अपवाद वगळता चयनसमिती ला विश्वास दाखवता येईल अशी काही कामगिरी दाखवली नाहीये.

रोहित ला काढा या स्टेटमेंट शी सहमत नाहीये, आपल्या कसोटी फलंदाजांमध्ये तोच एकटा थोड्या फार धावा करतोय.

कोहली बाबत बोलायचं झालं तर "आज फॉर्म मे आएगा , आज नही तो कल आएगा" - या फिलॉसॉफी वर गेली तीन वर्ष चालली आहेत.
अजून दोन वर्षं हि ह्याच आशेवर त्याला कसोटीत खेळवत राहिले तर नवल वाटणार नाही.

रहाणे ची निवड पाहता वर्ल्ड कप नंतर द आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून त्याची नेमणूक झाली तर मला नवल वाटणार नाही.

रोहित ला काढा या स्टेटमेंट शी सहमत नाहीये, आपल्या कसोटी फलंदाजांमध्ये तोच एकटा थोड्या फार धावा करतोय.
>>
रोहित नी टेस्ट टेंपरामेंट खूप कमी दाखवलं आहे. खूप वेळा तो चांगली सुरुवात करतो पण ४०-४५ रन झाल्या की मग टी२० टाईप शॉट्स खेळायची खुमखुमी त्याला मोहात पाडते अन् तो आऊट जातो.
यामुळे धावांची सरासरी बघायला गेलं तर कागदावर ठीक दिसते, पण ओपनिंग करताना जे बॉल ची ग्लेझ घालवायचं काम असतं ते होत नाही, अन् मधल्या फळीला पण त्याचा फटका बसतो.

जसा माईंडसेट मुळे पुजारा टी२० मधे फिट होत नाही, तसाच रोहित पण माईंडसेट मुळे टेस्ट मधे फिट होत नाही.

विंडीज मधे गायकवाड अन् जयस्वाल ला ओपन करू द्यावं, गिल ला वन डाऊन आणावं असं मला वाटतं.

अक
उडदामाजी काळे गोरे. तिघेही एकाच लेवल् चे आहेत.

विंडीजमधे रोहित किंवा कोहली ह्यापैकी एकालाच न्यायला हवे होते असे माझे मत आहे. इथे नवीन प्लेयर्स ट्राय करणार नाहि तर कुठे करणार अजून ? रोहित नॉन स्टोप खेळलाय - त्याला वर्ल्ड कपच्या आधी फ्रेश होता आले असते. राहाणे कप्तान म्हणून ऑप्शन होताच .

ईश्वरन नि सर्फराज बद्दल वाईट वाटले. त्यांचे डोमेस्टीक चेकॉर्ड जास्त कालावधीसाठी गायकवाड नि जयस्वाल पेक्षा चांगले आहेत. आयपील चा फायदा ह्या दोघांना ईश्वरन नि सर्फराज लीप्फ्रॉग करायला झाला आहे . हि दुर्दैवाची बाब आहे. किमान ईश्वरन नि सर्फराज मधल्या एकाला तरी संधी द्यायला हवी होती. गायकवाड नि जैस्वाल ह्यांचे स्विंग बॉलिंग विरुद्ध टेक्निक बाकीच्या दोघांपेक्षा उजवे आहे असे मला वाटत नाही.

सिराज चा वर्कलोड बघता त्यालाही आरम द्यायला हवा होता.

विंडीज मधे गायकवाड अन् जयस्वाल ला ओपन करू द्यावं, गिल ला वन डाऊन आणावं असं मला वाटतं. >> +१. गिल ला खाली आणणे जरुरी आहे.

वाचो. शर्मा आणि कोहली समर्थक हो, वाचो
While Kohli made 932 runs from 17 matches at an average of 32, Pujara scored 928 runs from the same number of matches -- with both hitting a century each.

Captain Rohit, who missed quite a few games during the WTC cycle 2021-2023, scored 758 runs from 11 games at an average of 42 with two centuries and as many fifties.

So it was not surprising that batting great Sunil Gavaskar slammed the selectors for making Pujara the 'scapegoat' for India's disastrous showing in the WTC final.
अगदी हेच मी म्हणतोय.
संपूर्ण लेख इथे आहे.
https://www.rediff.com/cricket/report/indias-tour-of-west-indies-why-has...

मला असं वाटतं की आपल्या ओपनर्स नी त्यांचा जॉब नीट केला नाहीये अन् त्यामुळे फारशा फॉर्म मधे नसलेल्या मधल्या फळीला ग्लेझ न गेलेल्या स्विंग होणाऱ्या बॉल ला एक्सपोज होऊन जास्तीचं काम करून फॉर्म परत मिळवण्यासठी झगडावं लागतं आहे.
डोमेस्टिक खेळले असते तर कदाचित चांगल्या ओपनिंग नंतर जुन्या बॉल वर धावा जमवून कॉन्फिडन्स परत मिळवून कम बॅक करता आला असता (रहाणे नी हेच केलं. डोमेस्टिक मधे शॉ ओपनिंग सांभाळत होता, सर्फराज मधली फळी, ज्यानी रहाणे ला नैसर्गिक खेळून फॉर्म परत मिळवता आला. आयपीएल मधे ही त्याच्यावर लोड नसल्याचं फ्लेमिंग म्हणाला)
पुजारा नी इंग्लंड मध्ये चांगला सीझन खेळला, पण नेमक्या वन ऑफ टेस्ट मधे तो त्याचा फायदा उचलू शकला नाही. ऑस्ट्रेलियन सिरीज मधे तो त्याच चुका करत होता ज्या तो आधी ही करायचा. हे सुधारण्यासाठी कोच कडून जास्ती एफर्ट ची गरज आहे.
कोहली ना डोमेस्टिक खेळला ना काउंटी, पण त्यानी लिमिटेड ओव्हर गेम मधे तरी फॉर्म परत मिळवला आहे. टेस्ट मधे लाँग इनिंग खेळायची प्रॅक्टिस कमी पडली.
शर्मा चा फॉर्म ना गेल्या काही टेस्ट सिरीज मधे दिसला ना लिमिटेड ओव्हर गेम मध्ये ना आयपीएल मधे.

या वर्षी वन डे वर्ल्डकप आहे. त्याच्या तयारी साठी शर्मा अन् कोहली नी विंडीज दौरा स्किप करणं गरजेचं होतं. पण ते ही होत नाहीये.
अवघड आहे वर्ल्डकप चं...

हनुमा विहारी नी इंडिया ए कडून नंबर 3 वर बॅटिंग केली आहे. त्याला पण ट्राय करता आलं असतं. ऑस्ट्रेलयाविरुद्ध ओपन करायला जेंव्हा शर्मा ची फाटली होती तेंव्हा विहारी ला त्याच्या दुसऱ्याच टूर मधे ओपन करायला पाठवलं होतं.
त्यानी ए टीम चा कॅप्टन म्हणून पण बरं परफॉर्म केलं होतं. त्या दृष्टीने पण ट्राय करता आलं असतं. टॉप ऑर्डर मधे थोडीफार बोलिंग करू शकणारा प्लेअर आला असता...

पण बहुतेक आयपीएल स्टार्स च्या चमक मधे सिलेक्टर विसरले त्याला.

पण बहुतेक आयपीएल स्टार्स च्या चमक मधे सिलेक्टर विसरले त्याला. >> हो , सर्फराज, ईस्वरन नि विहारी ! परत संघ निवड जाहीर करताना मिडिया काँफरन्स घेत नाही त्यामूळे लॉजिक (?) काय ते कोणालाच माहित नसते, दोन नवीन वेस्ट मधले बस झाले पासून, मुसलमान कशाला किंवा नाणेफेक - काहीही असू शकेल. रोहित नि द्रविड ह्यांच्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा धूळीला मिळाल्या आहेत Sad

“ संघ निवड जाहीर करताना मिडिया काँफरन्स घेत नाही” - ती पद्धत तर केव्हाच बंद झाली. मध्यंतरी सुनंदन लेलेंच्या एका लेखात ‘बीसीसीआय ला प्रश्न विचारणारे पत्रकार आणि खेळाडू आवडत नाहीत. त्यांना पद्धतशीरपणे बाजूला/इग्नोर करण्यात येतं‘ असं वाचलं होतं.

सर्फराझ, इश्वरन, विहारी बद्दल सहमत.

संघ निवड जाहीर करताना मिडिया काँफरन्स घेत नाही >>>

ती पद्धत 2019 पासून (चेतन शर्मा निवड समिती अध्यक्ष झाला तेव्हा) कोविड चे कारण सांगून बंद करण्यात आली.

गेल्या सहा महिन्यांपासून सध्या तर निवड समिती ला अध्यक्षच नाहीये, त्यामुळे संघ निवडीत फायनल व्हेटो कोणाकडे आहे, रोहित कि द्रविड कि लक्ष्मण कि इतर कोणी, हेच माहिती नाहीये.

Pages