क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ ' डार्क हॉर्स ' कोण असू शकतं हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं” - न्यूझिलंड (विशेषतः विल्यमसन परतला तर)?

डार्क हॉर्स - मला वाटतं, भारत ! कारणं -
1.- उपखंडातलं हवामान व खेळपट्ट्या, त्याही एकदिवसीय सामन्यांसाठी परंपरेने फलंदाजीला अनुकूल बनवलेल्या;
2. शर्मा व कोहली हे मोठ्या स्पर्धेत बहरात येणारे भारतीय फलंदाज आहेत. सध्या ते फॉर्ममध्ये नसल्यासारखे वाटले, तरीही ते विश्वचषक स्पर्धेत आपला ठसा उमटवतील ही दाट शक्यता;
3. प्रेक्षकांचा प्रचंड पाठींबा.

डार्क हॉर्स किवीज असतील असे मला वाटते. त्यांची फलंदाजि चांगली आहे नि बहुतेक जण भारतीय पिचेस्वर उत्तम सरावलेले आहेत. बॉलिंग बॅलंस्ड आहे नि गेल्या कप चे मिस होणे लागलेले असल्यामूळॅ अधिक चिवटपणे खेळतील असे वाटते.

श्रीलंका - विशेषतः त्यांची फलंदाजी भारतीय पिचेस वर (उपखंडातया नाही) गंडातेय मागच्या काहि वर्षांमधे.

इंग्लंड ने २०१५ नंतर २०१९ साठी जी मोर्चे बांधणी केली होती तशी कोणीच केलेली दिसत नाहीये यंदा. तरीही एकंडर त्यांछी स्ट्रॅटेजी तीच वाटते आहेत. बटलर, रूट ला लोअर मधल्या फळीत आणणे की की मूव्ह ठरू शकतील. ८-९ पर्यंत बॅटींग असणे भारतीय पिचेस वर जबरदस्त फायद्याचे ठरेल.

आपला पॉवर ऑव्हर्स मधला रन रेट अगदीच बेकार आहे - जे नडू शकते.

तरीही ते विश्वचषक स्पर्धेत आपला ठसा उमटवतील ही दाट शक्यता; >> आमेन भाऊ !

डार्क हॉर्स म्हणजे ज्यात क्षमता आहे जिंकायची पण त्यावर कोणाचे लक्ष नाही म्हणून त्याचे जिंकणे अनपेक्षित वाटणे. डार्क शब्दामागे हा अर्थ आहे.
भारत कसा डार्क हॉर्स ठरेल? घरात खेळत असल्याने त्यावर फोकस असणे स्वाभाविक आहे.

डार्क हॉर्स म्हणजे ज्यात क्षमता आहे जिंकायची पण त्यावर कोणाचे लक्ष नाही म्हणून त्याचे जिंकणे अनपेक्षित वाटणे. >> नाही. भाऊंनी दिलेला अर्थ बरोबर आहे. A dark horse in sports is a team with unknown strengths that goes on to surprise people by winning or doing better than everyone expected. आता ह्यावर तू त्याचाच अर्थ क्षमता आहे पण कोणाचे लक्ष नाही वगैरे म्हणशील हे ही मी आधीच लिहून ठेवतो Wink मागच्या दोन पानांमधे ज्यांनी दिलेल्या लिस्ट मधे भारत नाहिये त्यांच्यासाठी भारत जिंकला तर तो (त्यांच्यासाठी) डार्क हॉर्स ठरणार

A dark horse in sports is an unknown team, or a team with unknown strengths that goes on to surprise people by winning or doing better than everyone expected.

Underdogs are the people in society that nobody expects to be successful.

आता आपापल्या आकलनानुसार अर्थ काढा.

पण भारताचा संघ हा
unknown team, or a team with unknown strengths that goes on to surprise people
असा आहे हे काही मला पटत नाही Happy

अय्यर ला ऐन वेळी बॅक स्पॅझम झाल्यानी राहुल अन् किशन दोघांना खेळवता येईल.
बुमरा परात आलाय, पण शमी असायला हवा होता...

१०३/०, १३ ओव्हर मधे
गिल ५२(३९)*
रोहित ४४(४१)*

मस्त खेळताहेत

१४७/२, २४ ओव्हर मधे
गिल ५८(५२)
रोहित ५६(४९)
कोहली ८(१६)*
राहुल १७(२८)*

भयानक पाऊस

आता 20 ओवरमध्ये १८० टार्गेट आहे. कोहली राहुल जरा फास्ट खेळले असते तर २००+ गेला असता. पण आऊट व्हायची भीती दोघांना. आपले रन झाले पाहिजे संघ हरला तरी चालेल.

इंग्लंडचा सद्ध्याचा बॅटिंग लाईन-अप मला २०११ च्या वर्ल्डकपमधल्या भारतीय टीमसारखा वाटतो. सॉलिड डेप्थ आहे.

पुन्हा पाऊस
आता सामना बहुधा उद्याच
आहे तिथून सुरू करतील
आणि पुन्हा आपली फलंदाजी पूर्ण होऊन पाऊस पडेल

पण आऊट व्हायची भीती दोघांना. आपले रन झाले पाहिजे संघ हरला तरी चालेल.
>>
सुमारे ३० बॉल मधे १० रन असा स्कोअर असताना, मेडन ओव्हर खेळून काढणाऱ्या शर्मा बद्दल पण तुमचं हेच मत असेल ना

इग्नोर नाही करत. माझे कमेंट बाकीच्यांना दिसणार नाही अशी सेटिंग admin यांनी केले. तुम्हाला ते दिसतात कारण तुम्हीच ते admin आहात Uhoh रंगे हाथ पकडला charps तुम्हाला आज मी.

आयपीएल ने भारतीय चाहत्यांना शर्मा-कोहली-धोनी यांचे चाहते असे विभागले आहे.
म्हणजे आधीही दादा द्रविड सचिन यांचे चाहते होतेच. पण एकमेकांच्या आवडीच्या खेळाडूंना टार्गेट करणे हा प्रकार नव्हता..

मारनस लाबूशेन आणि कॉनकशन सब्स्टीट्युट एक विचित्र रिलेशनशिप बनत चाललंय.

कसोटी क्रिकेट मध्ये आधी अति सामान्य पदार्पण झालं होतं. पण ऍशेस मध्ये स्टीव्ह स्मिथ चा कॉनकशन सब्स्टीट्युट म्हणून चान्स मिळाल्यावर अशी बॅटिंग केली कि ते जगातला 1 नंबर कसोटी फलंदाज असा प्रवास झाला .

आता वर्ल्ड कप मध्ये वाईट फॉर्म मुले जागा बनणार नाही हे जवळपास पक्कं झालं होतं.
पण परवा पहिल्या ODI मध्ये कॅम ग्रीन चं रबाडा ने डोकं फोडल्यावर परत कॉनकशन सब्स्टीट्युट म्हणून चान्स मिळाला.
रिझल्ट म्हणजे त्या सामन्यात 80 नाबाद ची मॅच विनिंग खेळी आणि मग दुसऱ्या ODI मध्ये दणदणीत शतक.

लबुशेन ऑस्ट्रेलियाचा प्रोफेशनल कन्कशन सब असावा. टीम निवडताना, कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, विकेट कीपर प्रमाणे लबुशेनला कन्कशन सब म्हणून निवडत असावे.

व्हाडाप्ले!!! किंग कोहली इज ब्याक!! काय सॉलिड इनिंग कन्स्ट्रक्ट केलीय. एखादी टेंप्लेट फॉलो केल्याप्रमाणे सेंच्युरी मारतो हा माणूस!!

राहूल ने पण जबरदस्त कमबॅक केला. आता बुमराह अँड को. काय करतात ह्याची उत्सुकता आहे.

अरे काय चाललय काय?
खत्तरनाक स्विंग! बुमराहचे तर कैच्या कै होत होते आणि आता पंड्यानी घेतला आझम ला.
येवढा नव्हता स्विंग होत आपल्या बॅटिंगच्या वेळी.

आत्ता दुसरा एल बिचा रिव्यु हारलो आपण, दोन्ही वेळेस बॉल आउट्साईड द लाईन होता. टप्पा पडल्यावर वळतोय किती!!

एक पाकिस्तानी चॅनल आहे. इंडियाच्या बाजूने बोलतात आणि पाकिस्तानला फुल्ल शिव्या देतात. मस्त मजा येते यांचे व्हिडिओ बघायला.
https://www.youtube.com/live/4h0UNeGsrGo?si=hHTrdX6-2h3ph4T5

टॉप 4 मस्त खेळले

पहिल्या ओव्हर मधली शर्मा ची सिक्स, शेवटच्या ओव्हर मधे विराट चा फ्लिक आणि लास्ट बॉल सिक्स कमाल होते

शेवटच्या ओव्हर मधे विराट चा फ्लिक आणि लास्ट बॉल सिक्स कमाल होते>>>> व्हय व्हय! त्या रोल शॉट मध्ये काय एनवेळेस चेंज केला त्यानी! सिक्स तर अत्यंत देखणा!

पहिल्या ओव्हर मधली शर्मा ची सिक्स, शेवटच्या ओव्हर मधे विराट चा फ्लिक आणि लास्ट बॉल सिक्स कमाल होते >> काहीच्या काही होते ते !

एखादी टेंप्लेट फॉलो केल्याप्रमाणे सेंच्युरी मारतो हा माणूस!! >> जुना कोहली आठवला एकदम. कोहली नि राहुल असेच खेळले तर आपण फव्ह मधे जाऊ थेट. आफ्रिदी नि नसीम शाह एवह्ढे तरुण आहेत पण किती इंजरी प्रोन आहेत ?

“ शेवटच्या ओव्हर मधे विराट चा फ्लिक आणि लास्ट बॉल सिक्स कमाल होते” - पहिला एकदम चिकी आणि दुसरा एकदम क्लासी!!

“ कोहली नि राहुल असेच खेळले तर आपण फव्ह मधे जाऊ थेट” - तुम्हारें मुँह में घीं शक्कर (किंवा तुझं फेव्हरिट ड्रिंक आणि स्नॅक Happy )

Pages