वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिन्कन लॉयर सि २ पार्ट १ - चांगला टाईमपास आहे .
शेवटाचा अंदाज येतोय . दूसर्या पार्ट चा ट्रेलर जास्त थरारक वाटतोय .

मिकी या भागात जास्त फिट दिसतोय , बारीक झालायं.. त्याची स्माईल मस्त आहे .
काही काही सीन्स एक्दम मजेशीर आहेत .
उदा : कोर्टातली पहिली पेशी . "in the famous words of Beyoncé " move , move , move , move""

लिस , लॉर्ना आणि ईझी नेहमीप्रमाणे सहज . ती अन्ड्रीआ आणि मॅगी मात्र आवडल्या नाहीत फारश्या .
ती अन्ड्रीआ भारीच अकड दाखवते . एक्दम स्टीफ बॉडी .

कोहरा नेटफ्लिक्स नक्की बघा. पंजाबीतच आहे पण इंग्रजी सबटायटल्स आहेत. कामे , लेखन, दिग्दर्शन फर्स्ट क्लास. लास्ट एपिसो ड आज रात्री बघायला ठेवला आहे.

क्रिमिनल जस्टिस चे पहिले दोन भाग बघितले. एकदम ग्रिपिंग आहे. पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, तो पोलिस इन्स्पेक्टर यांची कामे भारी आहेत. संवादही मस्त लिहीलेत.

द ब्लॅकलिस्ट सिरीज कोण बघत होत का ? मागील आठवड्यात सिरीज फिनाले होता. रेमंड इज नो मोअर..
एकंदरीत क्राईम वरची छान सिरीज होती. सगळ्यांना बघता येईल अशी. जेम्स स्पेदर च काम चांगल होत. त्यांचे काहीं कोट्स एपिक असायचे.

ब्लॅकलिस्ट सिरीज ]]] हो आम्ही पण बघायचो.
रेमंड बद्दल एकदम वाईट वाटल..
आणि तो क्रिमिनल असूनसुध्दा असं वाटलं त्यामुळे स्वतःचच आश्चर्य देखील वाटलं
त्याचे डायलॉग्ज, कोटस एकदम भारी असायचे.

कोहरा नेटफ्लिक्स नक्की बघा. पंजाबीतच आहे पण इंग्रजी सबटायटल्स आहेत >>>>> हिंदी option आहे की. मी चौथा episode पहात आहे. सगळ्या कलाकारांनी कामे चांगली केली आहेत. Police investigation कथा आहे. Netflix ला साजेशी भरपूर sex scenes, शिव्या, रक्त, LGBTQ relationship, पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्याच्या उपकथा इ इ

ब्लॅकलिस्ट बघत होतो, पण मध्येच ते animated सुरू झालं आणि इंटरेस्ट च गेला.. किती एपिसोड्स आहेत ते अनिमटेड वाले?

नाईट मॅनॅजर संपवली. थरारक आणि वेगवान आहे. कथा तशी फार वेगळी नाही.. देशासाठी वाट्टेल ते..व्हिलन विदेशी कारवाया, वगैरे.
सिद्धार्थ मस्त दिसतो एकदम, अनिल कपूर जब्बरदस्त ..खत्रा व्हिलन उभा केलाय, डोळ्यांनी इंटेरोगेट करतो तेंव्हा भयंकर वाटतो.. त्याचा तो डायलॉग भारी..मुझे बुरा इस बात का लगा..के तुम्हे डर उनसे लगा, मुझसे नही Happy
शोभिता अभिनय छान करते, फिगर मस्त, दिसायला मला फारशी आवडत नाही..विचित्र चेहरा आहे.
लिपिका चे काम मस्त झालेय (प्रेग असताना ह्या बायका सटासट फायटिंग करतात Uhoh ) अ आणि अ.
कहानी मधला इन्शुरन्स वाला बंगाली खुनशी किलर पण आहे..

ट्रायल बघितली. ठीक आहे पण मध्येच काजोल चिरकते ते अंनोइंग होतं. प्लस नेपोकिड्स प्रमाणे हिलापण एकदम सगळंच पटापट छान काम मिळत जातं ते जरा जास्त वाटलं. नवरा पण अगदी पटकीनी सुटतो. थोडक्यात सगळा मसाला भरला आहे.
रच्याकने ते काजोल डिवोर्स प्रकरण हे अतिशय चीप PRचं लक्षण आहे हि सिरीज आली आणि ती न्यूज पण. काहीही. शिवाय ह्याचं प्रॉडकशन अजय देवगण ने केलं आहे.

वेब सिरीजाच्या नादाला जास्त लागत नाही पण आजारपणाचा फायदा उचलत फॅमिली मेनचे दोन्ही सीजन उरकले. भारीच आहे. यापुढे मनोज वाजपेयी म्हटले की फॅमिली मेनच आठवावा..

क्रिमिनल जस्टिसचा पहिला सीझन पूर्ण पाहिला. काय जबरदस्त ग्रिपिंग आहे सिरीज! लोकांची कामे तर भारी आहेतच पण पटकथा संवाद वगैरे जबरदस्त आहेत. पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, जॅकी श्रॉफ आणि अनुप्रिया गोएंका पूर्ण एंगेज करतात. तसेच तो पोलिस इन्स्पेक्टर सुद्धा. त्या "लायक" चे काम केलेला दिब्येंदू भट्टाचार्य - खतरनाक आहे तो. या आधी त्याला मिर्झापूर च्या दुसर्‍या सीझन मधे पाहिला होता. पंकज त्रिपाठी व तो - दोघांचे रोल्स मिर्झापूरच्या पूर्ण विरूद्ध टाइपचे आहेत यात.

जॅकीचा बम्बैय्या "मुस्तफा" ही एकदम मेमोरेबल आहे.

हो त्या लायक ने भारी काम केलेय. ती फर्जी सीरीज आली तेव्हा तो विजय सेतुपती म्हणजे मला हा लायक (दिब्येन्दू) वाटला होता फॉर सम रीझन Happy

अखेरीस फॅमिली मॅन बघायला मुहुर्त मिळाला.

स्पोयलर्स असतील माझ्या पोस्ट्समध्ये, त्याशिवाय मला लिहिताच येत नाही.

मनोज तिवारी मला फार आवडतो, जरा एजेड वाटतो यात, मिन्स जरा यंग दाखवायला हरकत नव्हती. दुसरा आवडता कलाकार शरद केळकर आहे, त्याला बघितल्यावर समथिंग फिशी वाटलं मिन्स हाच अतरंगी हस्तक असावा. मुसा कोण कलाकार समजलं नाही, त्याचं नावच आलं नाही, चांगला वाटला. बॉम्ब डिफ्युज करायला आलेला आधी मला पुष्कराज चिरपुटकर वाटला पण नंतर वेगळा वाटला म्हणून नाव बघितलं करण का केवल कोप्पीकर होतं नाव.

सिझन वनचा पहिला भाग पुर्ण आणि दुसरा थोडा बघितला.

पुढे बघ अंजु.इंटरेस्टिंग होत जाईल.मुसा नीरज माधव नावाचा कलाकार, डान्सर, सिंगर वगैरे आहे.त्याच्या एशियन पेंटस च्या तामिळ जाहिराती आहेत बऱ्याच.

हो समजलं आत्ता नीट नाव, तो हॉस्पिटलमधला सीन आहे ना, त्यात समजलं.

मला ती नवीन जॉबला लागलेली पोरगी त्यांनी पेरलेली वाटते. एनिवे दुसरा भाग अर्धा बघितला.

माझे मन , नक्की कसला सीझन २ ????
वर स्क्रोल करून बघितलं , पण ...
नाईट मॅनेजर , फॅमिली मॅन , क्रिमिनल जस्टीस , फ्रॉम , लिन्कन लॉयर Wink

क्रिमिनल जस्टीस सीजन तीन, अधुरा सच, हॉटस्टार. पंकज त्रिपाठीसाठी तिन्ही सीजन बघितले. पहिले दोन चांगले आहेत, हा थोडा बोर आहे. शेवट अगदीच गुंडाळलाय. इतका की मधला एखादा भाग बघायचा राहून तर नाही गेला हे बघायला मी मागचे एक दोन भाग चेक केले. त्रिपाठी आणि त्यांची बायको, त्यांच्यातले संवाद फारच गोड आहेत. यात त्यांच्या बायकोचा भाउही दाखवलाय. ती अवंतिका म्हणजेच स्वस्तिका मुखर्जी नेहमी अशीच बोलते का हळू हळू. आदिनाथ कोठारे, कल्याणी मुळे आणि उपेंद्र लिमये हे ओळखीचे मराठी चेहरे आहेत.

मला क्रिमिनल जस्टिसचा पहिला सीझनच जरा बोअर झाला - विशेषत: ते जेलमधले ड्रामे. जॅकी श्रॉफपण बोअर झाला. बाकी दोन ओके होते.
आणि मला ती पंकज त्रिपाठी आणि त्याच्या बायकोची साइडस्टोरी चीड आणणारी वाटली. त्याला काही कोणी फोर्स केलं नव्हतं लग्न करायला. बायकोकडे दुर्लक्ष करत राहण्यात काय पुरुषार्थ होता आणि त्यात विनोदी काय?!
पण पंकज त्रिपाठी आवडतो, त्याने नेहमीप्रमाणेच उत्तम काम केलं आहे.

पंकज त्रिपाठीची बायको म्हणजे दुसरा सीझन ना? होपफुली तो व ती निखत (अनुप्रिया गोएंका) लग्न करत नाहीत. सिरीज मधे मस्त जमलेली केमिस्ट्री तशीच राहावी पण यांनी एकत्र येऊ नये असे वाटणार्‍या पेअर्स असतात तसे पहिल्या सीझन मधे ते दोघे होते Happy

बाय द वे, अनुप्रिया गोएंका नाव वाचले की एखाद्या कंपनीची सीईओ किंवा बोर्डवर जायचे सोडून चुकून फिल्म्/टीव्ही लाइन मधे आली असे वाटते Happy

फॅमिली मॅनमध्ये सूट घालून बॉम्ब diffuse करणारा आपला पुष्कराजच आहे.

कोपीकर म्हणजे त्याला वॉकीवर सूचना देणारा चष्मीश.. बहुतेक तो ad पण आहे सिरीजचा

Pages