Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिकी कोणती सिरीज?
मिकी कोणती सिरीज?
लिंकन लॉयर असावी. आणि तो मिकी
लिंकन लॉयर असावी. आणि तो मिकी तुम्हा लोकांना आवडतो! का??? कसला बोर आहे तो. कामही धड जमतं नाही त्याला.
कोहरा स्पॉइलरः
कोहरा स्पॉइलरः
बलबीरच्या बायकोला काय आजार असतो, कसली औषधं घेत असते आणि नंतर आत्महत्या का करते.>>> ती बहुधा मानसिक रुग्ण असते, ती औषधं घेत असावी. अशा लोकांना नैराश्य येतं, पोस्ट डिलेव्हरी डिप्रेशन अॅट लेटर स्टेज असू शकतं.. त्या वेळी मुलगी प्राथमिक शाळेत दिसली.
स्पॉयलर अलर्ट
स्पॉयलर अलर्ट
त्या पांढर्या हवेलीत बॉडीबिल्डर टाईप्स दाखवलेला, गच्चीवर तेलमालिश करत दाखवलेला रणवीर तो कोण असतो? >>> निम्रतच्या प्रियकराच्या आजोबांचा पाळलेला कुख्यात गुंड.
पॉलचं घड्याळ चोरतो तेव्हा त्याच्या तिथे येण्याच्या वेळची आणि लियमच्या मरण्याच्या वेळेची पण संगती लागली नाही. >>> लियाम पॉलला मारतो आणि तिथून निघतो. तो निघाल्यावर तो ड्रगीस्ट पॉलचे घड्याळ चोरायला येतो. पॉल तेंव्हा पूर्ण मेलेला नसतो, तो प्रतिकार करतो. तेंव्हा कल्ली त्याला पूर्णपणे मारतो. (त्याने नसते मारले तरी पॉल मेलाच असता रक्तस्त्रावाने असे फॉरेन्सीक वाल्याचे म्हणणे असते). दुसरीकडे लीयम शेतातून बाहेर पडून रस्त्याला लागतो. दु:खामुळे आणि नशेमुळे त्याला भान रहात नाही आणि तो ट्रकखाली येतो.
स्पॉयलर अलर्ट
स्पॉयलर अलर्ट
सगळ्यांनी सालं सोलून दिल्याबद्दल धन्यवाद!
कल्लीचा ट्विस्ट चांगला वापरलाय.
एक सीनची गंमत वाटली. तो साकार एका क्षणी म्हणतो की मी विराशिवाय राहू शकत नाही, तेव्हाची त्याची करंट मैत्रीण कानाखाली मारते, तिचा पॉईंट एकदम बरोबरे वाटून गेलं...लोल .. प्यार एकदम xxx@x$xx चीज है!
फायनली फॅमिली मॅन सीझन दोन
फायनली फॅमिली मॅन सीझन दोन बघून झाला. जबरदस्त होता पण सर्वात हीरो खरंतर चेल्लम होता. वेळोवेळी त्याने दिलेल्या माहीतीमुळेच फोर्स हे सर्व करु शकली.
अनेक लुपहोल्स पण ठीक आहे, सर्व चेकपोस्टवर सेल्वा आणि राजीचे फोटो का पाठवत नाहीत.
मुलीला सोडवताना जिन्यात किती वेळ चर्चा. तोपर्यंत साजिद यांची वाट पहात बसणार का.
सॉलिड थरारक होती. एकंदरीत फर्जी नंतर एक चांगली वेबसिरिज बघितली. मागच्यावेळी मिलिंद वाचला, हायसं वाटलं तर मारलं यावेळी. यावेळी जेके वाचला पुढच्या सीझनला मारू नका त्याला. सर्वांनी कामं छान केली आहेत. राजीची मिशनच्या आधीच्या रात्रीची घालमेल तिने फार सुंदर दाखवली.
अंजु, आता एकदा समंथाचे फोटो
अंजु, आता एकदा समंथाचे फोटो बघ गुगल करून.
हाहाहा, हो बघेन.
हाहाहा, हो बघेन.
फ्लेष सिरीज संपवली .
फ्लेष सिरीज संपवली .
स्वरा भास्कर ,अमित साद व इतर कलाकारांनी जमेल तेवढा हिंसा आणि अभिवय केला आहे .
बरेचसे प्रसंग अंगावर येतात , पण लहान मूल / मुली मिसिंग केस investigation मस्त दाखवले आहे .
फॅमिली बरोबर पाहू शकत नाही.......
ऑपरेशन ककून तर ककुन म्हणजे
ऑपरेशन ककून तर ककुन म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरांत रूपांतर होण्याआधी अळी ज्या रेशमी कोशात जाते तो रेशमी कोश म्हणजे ककुन. दिसायला अगदी नाजूक असणारी पणं नव्या आयुष्याला सुरुवात करणारी गोष्ट...18 ऑक्टोबर 2004 च्या रात्री एका ककून वर नजर लावून बसले होते तामिळनाडू टास्क फोर्स चे अधिकारी. कारण त्या रात्री त्यातून बाहेर येणार होता तो विरप्पन. नुसत नाव ऐकले तरी अंगावर शहारे उभे राहतात. डोळ्यासमोर उभी राहते ती लुकडी व काटक बॉडी. डोळ्यात मग्रुरी आणि खांद्यावर असणारी बंदूक. जंगल म्हणजे जणू काय आपले पुर्ण साम्राज्य च असा त्याचा समज होता. जवळ जवळ 30 वर्ष त्याने 3 राज्यांच्या पोलिसांना जेरीस आणले होते.
कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या 3 राज्यात त्याने धुमाकूळ घातला होता. तर विरप्पन चा क्रूरुकर्मा विरप्पन कसा झाला.? त्याचा आतंक व तीन दशके त्यांने तिन्ही राज्याच्या पोलीसांना कस झुलवत ठेवले ?व शेवटी कसा त्याचा अंत कसा झाला? हे सर्व नेटफिल्क्स च्या " द हंट फाॅर विरप्पन" ह्या सीरीज मध्ये दाखवले आहे. प्रत्येक गोष्टीचे बारीकसारीक डिटेल सोबत त्या त्या वेळीचे ओरिजनल फोटो, मुलाखती चित्रीत केलं आहे त्यामुळे सीरीज रंजक होत जाते व बघणार्याला खिळवून ठेवते....Must watch
काजोलची Trial पहाण्याचा
काजोलची Trial पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
एवढी हाय प्रोफाइल केस pro-bono ?? जुहीकडे वकीलाला द्यायला पैसे नाहीत हे पटत नाही.
राजीव सेनगुप्ता , पीटर फ्लोरिकपुढे एकदमच अळणी आहे.
विशाल चा आवाज , संवाद फेक एकदम प्रभावी आहे.
मेड इन हेवन २ रा सिझन आलाय
मेड इन हेवन २ रा सिझन आलाय प्राईमवर
10 तारखेला यायचा होता ना?
10 तारखेला यायचा होता ना?(आता शनिवार पर्यंत स्वतःला संयम घालावा लागेल
)
म्हणजे पहिले दोन बघणेबल आहेत
म्हणजे पहिला सीझन बघणेबल आहे असे समजतोय. कित्येक वेळा स्किप करून गेलोय नेफिवर (की प्राइमवर) त्याच्यावरून.
मेड इन हेवन पहिला सिझन आवडला
मेड इन हेवन पहिला सिझन आवडला आहे.नक्की बघा.
मेड इन हेवन झोया अख्तर/ रीमा
मेड इन हेवन झोया अख्तर/ रीमा कागतीची निर्मिती आहे. मला पण पहिला सीझन आवडला , पण नॉट एवरीबडीज कप्पा टी
एलीट वेडिंग प्लानर्स एजन्सी, मग त्या लग्नांमधे आणि एजन्सी पारटनर्स च्या प्रायव्हेट लाइफ मधे होणारे ड्रामे असा विषय. सिनॉप्सिस आणि प्रोमो बघून ठरव फा.
ओके धन्यवाद मी_अनु, मै. सध्या
ओके धन्यवाद मी_अनु, मै. सध्या काहीतरी शोधतच होतो. यू ट्यूबवर रॅण्डम क्लिप्स कितीवेळ बघणार
त्यातून अशा क्लिप्स फक्त पहिल्या क्लिप्स पुरत्या रॅण्डम असतात. मग त्यांचे अल्गॉरिदम, ए आय वगैरे खडबडून जागे होतात आणि आपल्याला काय आवडते ते हट्टाने सांगू लागतात. दुसर्या दिवशी सगळ्या क्लिप्स त्याच एका विषयावर 
युट्यूबतर्फे मला Unदेखी अशा
युट्यूबतर्फे मला Unदेखी अशा नावाची सीरीज सजेस्ट होते आहे सध्या
प्रोमो वरून चांगली वाटली. तो क्रि. ज. -१ मधला लायक - दिब्येन्दू भट्टाचार्य आहे त्यात मुख्य भूमिकेत.
बघावी असे म्हणातेय.
नेटफ्लिक्सवर विरप्पनची
नेटफ्लिक्सवर विरप्पनची डॉक्युमेंटरी आली आहे. कोणी बघितली का?
चांगली आहे ऐकलंय. बघणार आहे.
चांगली आहे ऐकलंय. बघणार आहे.
फारएंड मेड इन हेवन टाकाऊ
फारएंड मेड इन हेवन टाकाऊ प्रकार आहे... डोण्ट ट्राय .. you will thank me later…
मेड इन हेवन चा पहिला भाग
मेड इन हेवन चा पहिला भाग कसाबसा पाहिला होता. दुसरा अर्ध्यावर सोडला व बंद केली. माझ्या टाईपची नाही म्हणुन नाही भावली.
मला तरी आवडली बा.बऱ्याच
मला तरी आवडली बा.बऱ्याच वेगवेगळ्या केसेस दाखवल्या आहेत.शिवाय मुख्य पात्रं आणि जवळपास चे, शिवानी, जॅझ, कबीर,त्यांची वेगवेगळी आयुष्यं, विजय राज, जिम सर्भ चा अभिनय सगळंच आवडलं.खूपच श्रीमंत लोकांचे प्रश्न आहेत हे खरं, पण रिलेट झाली.(एकच दुःख आहे: सर्व बिग फॅट वेडिंग सलढाणा मल्होत्रा यादव अश्या उत्तर भारतीय किंवा पंजाबी नावांची होती.एकही पाटील कुलकर्णी शहा साखरे काटे भोरे जवळकर वगैरे मराठी किंवा गुजराती आडनाव कुटुंब नव्हतं. या 2ऱ्या सिझन ला जरा तीही व्हरायटी असेल अशी आशा.)
मेड इन हेवन १ खूप आवडली होती.
मेड इन हेवन १ खूप आवडली होती. २ पण बघणार. मेन लिड ने खूप संयत अभिनय केलाय. जवळपास सगळ्यां मधे कशी ग्रे शेड असते आणि संधी मिळताच ती कशी बाहेर येते, अचूक एकदम.
फा. तुम्हाला आवडेल..
शिवानी, जॅझ, कबीर,त्यांची
शिवानी, जॅझ, कबीर,त्यांची वेगवेगळी आयुष्यं, >>> अनू तुला बरंच आठवतय की. मला तो लग्नात मुलगी हुंडा न देता माना ने निघून जाते तो सिन काळजा वर कोरलाय. बाकी इतर कॅरॅक्टर विसरायला झाले जरा. बराच आधी पाहिलाय.
ट्रायल वीकांताला पाहिली. काजोल चा अभिनय उत्तम वाटला. ती खरंच मेहनती वाटते जीव ओतून काम करते. तिचे अन मुलींचे सीन्स मस्त. नवर्या वरचा राग, परत देऊ केलेली संधी , तिचा परत ग्रँटेड घेतले गेल्या नंतर चे एक्ष्प्रेशन्स तर निव्वळ कमाल. ह्यापुढे तर माधुरी ची ती लीड सिरीज होती त्यातला अभिनय अ ती नाटकी वाटायला लागला
तिच्या फीमेल सहकारी, विशाल , मालिनी ह्यांची कामं पण मस्तं (मला वाटून गेलं की दोन्ही लॉयर्स जर इतकी मेहनती आहेत आणि आहुजा ४/५ एम्प्लॉयीज ना आधीच घेऊन गेलाय तर १ ऐवजी २ व्हेकन्सी क्रीयेट करणं काही कठीण नव्हतं. उगाच स्पर्धा..
एका केस दरम्यान १ गवाह (काय शब्द ह्याला मराठीत?) बोलत असताना जर्रा ट्रीकी प्रश्न विचारताच त्याने तोंड उघडून हीरोचे /हिरोईन चे केस जिंकणे शिक्कामोर्तब वगैरे भाबडे प्रकार ही आहेतच. जाडी कातडी वाले लोक ब्र ही फुटू देत नाहीत कोर्टात ..असो.
डर्टी माईंड एवढी एंगेजिंग कोर्ट केस नसली तरी चांगली आहे.
देवगन प्रॉडक्शन असूनही काजोल ने चेकाळल्या सारखा अभिनय केलेला नाहिये हे पाहून छान वाटले.
गवाह (काय शब्द ह्याला मराठीत?
गवाह (काय शब्द ह्याला मराठीत?)>>साक्षीदार
मी मेड इन हेवन सिझन 2 वेळा,
मी मेड इन हेवन सिझन 2 वेळा, मग जॅबि कोए रिऍक्शन, अवर स्टुपीड रिऍक्शन्स बरोबर अजून एक एक वेळा पाहिलाय
त्यामुळे phd आहे
पाहिला पहिला भाग थोडा वेळ (*)
पाहिला पहिला भाग थोडा वेळ (*). फार ग्रिपिंग वाटत नाही कारण लीड कॅरेक्टर्स आपल्याला लगेच एंगेज करत नाहीत (याउलट बॅण्ड बाजा बारात पिक्चर - याच विषयावर वाटतो - पण तेथे अनुष्का रणवीर आपल्याला दहा मिनीटांत खिशात टाकतात). कंटेण्ट इंटरेस्टिंग आहे. पण ते दोघे बोअर वाटले. अर्थात हे पहिली ३०-४० मि. पाहिल्यावरून. अजून थोडा नेटाने ट्राय मारणार आहे.
* इथे च्रप्स अँथनी सारखे "आपुन तेरे को बोला मत देख मत देख, पन तू अपुन की सुन्ताईच किधर है" म्हणताना इमॅजिन केले
आशु काजोल खरंच चांगली
आशु काजोल खरंच चांगली अभिनेत्री आहे, फार सहज करते, मला ती पहिल्यापासून आवडते, वरची सिरीज बघितली नाहीये किंवा तिची एकही वेबसिरीज बघितली नाहीये, पूर्वीचे काही पिक्चर्स बघून माझं हे मत आहे.
मेड ईन हेवन आज एक भाग तरी
मेड ईन हेवन आज एक भाग तरी बघणार. पहिला सीजन खूप आवडला होता. पहिला सीजन दिल्लीमध्ये घडतो त्यामुळे मराठी आणि गुजराती आडनावे आली नसतील. त्या नायकाची प्रेमप्रकरणे फार लांबण लावली आहे पण बाकी सगळं आवडलं होतं. मीही पहिले चार भाग परत बघितले होते त्यामुळे बऱ्यापैकी लक्षात आहे.
Pages