Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फॅमिली मॅन 5 एपिसोडस झाले,
फॅमिली मॅन 5 एपिसोडस झाले, मुसा रोल टोटली चेंजड, भारीच.
स्पॉयलर अलर्ट
स्पॉयलर अलर्ट
सहा भाग बघितले, काही रक्तरंजित सीन्स पुढे ढकलले. जयला फार क्रूरपणे मारलं. पाशाबद्दलही वाईट वाटलं. मुसा आत असताना सिक्युरिटी काढून घ्यायचा मूर्खपणा का करतात. काहीका असेना इसिसमधला असतो ना तो.
Btw मुसाचा संशय पहिल्या सीनलाच आलेला, अति साधा भोळा वगैरे दाखवला म्हणून उलट जास्त आलेला. इतका मेन असेल असं वाटलं नव्हतं पण क्रूर असणारच नक्की, वाटलेलं.
गुल पनाग एन्ट्री भारी, मला तिच्या खळ्या आणि स्माईल आवडतं. तिचा नवरा हे गुढ असल्यासारखं का ठेवलंय. शरद केळकर (ह्याची मुलगी दाखवली आहे, बायको नाही) आणि मुसा नावं डोक्यात आली पटकन. पाशा नसावा तो काही मुख्य chara नव्हता.
घरचे कोणीच मिस करत नाहीत हिरोला, मस्त एन्जॉय करतायेत. तळपदे रोल वाल्याने काम छान केलंय. शाबीर हाश्मी नाव आहे बहुतेक.
जनरली वेबसिरीजमधले बहुतेक सर्वच कलाकार उत्तम अभिनय करतात अगदी छोट्यातला छोटा रोल असला तरी, त्यामुळे मुख्य कलाकार आणि बाकी सर्वांनीच चांगला अभिनय केलाय.
ईथे Blue Bood कोणीच पाहिली
ईथे Blue Bood कोणीच पाहिली नाही का? I am currently glued to it . ४ सीजन्स बघून झाले .
मला रेगन फॅमिली फार आवडली . प्रत्येक पात्राची निवड एकदम चोख आहे .
देवाला मानणारे , दर रविवारी चर्च नंतर एकत्र जेवण करणारे आणि तेव्हा कुठल्याही विषयावर मनमोकळी चर्चा करणारे .
सगळ्यात धाकटा भाउ मला ईतका आवडला नाही पण बाकी दोन भावंडं , अगदी त्यांची मुलं ही छान आहे .
निकी सुरुवातीला एक्दम बिघडलेली टीनएजर वाटते , पण हळू हळू ती एक हुशार , स्वतंत्र विचार करणारी मुलगी म्हणून आवडायला लागते .
बरेचसे संवाद खुसखुशीत आहे , विशेशतं डॅनीचे .
आणखी एक पात्र आवडलं ते म्हणजे कमिशनर ची सेक्रेटरी अॅबेगिल . तिचे संवाद फार कमी आहेत , पण तिचा वावर एकदम सही आहे .
काही काही कंटाळवाणे भाग पुढे ढकलून पाहिले , पण एकंदरीतच सिरिज आवडली .
रच्याकने , बॉशचा पुढचा भाग कधी येतोय ?
नेफ्लि. कोहरा पाहुन झाली.
नेफ्लि. कोहरा पाहुन झाली. वेगवान आणि थरारक आहे. सर्व पात्रांची कामं आवडली. समलंगिक शिवाय आता सिरीज होणार नाहीत असं काही आहे का काय अशी शंका यावी इतका कॉमन दाखवतात हे.
त्याहून मला पाताल लोक मधला मेन लीड प्रचंड आवडला होता. अहलुवालिया का कोण.
बरं ड्रग पंजाबात इतके खरंच कॉमन आहेत का?
पोलिस तपास छान दाखवलाय. आपण पात्रांशी कसे हळू हळू समरसून जातो, आपले आपल्यालाच कळत नाही. बरून सोबति असूर१ पासूनच आवडतो. निरागस चेहरा, तळमळीने काम करणारा पोलिस, बलबीर बद्दल जिव्हाळा असलेला जाम आवडला.
सुरुवातीला त्याच्यात आणि वहिनीत संबंध असतात का? नीट कळाले नाही, वहिनी लग्ना च्या विरुद्ध का असते, दिरा वर प्रेम म्हणून का जमिनीत हिस्सा नको म्हणून? आणि बरून च्या मोठ्या भावाला राग येत नाही माहित असून?
बलबीर च्या अभिनयाची खूप प्रशंसा झालिये..पण मला फारसा नाही आवडला.. बॉडी लँगवेज बरोब्बर घेतलिये,
ह्याला बहुधा अंडरअॅक्टींग म्हणत असावेत. मला मख्खं वाटला
नक्कीच न चुकवण्या सारखी मालिका- कोहरा. दहाड नंतर पाहीलेली अजून १ जबरदस्त मालिका.
नाईट मॅनेजर जरा फिल्मी आहे. कोहरा सत्याच्या जवळ. क्राईम पॅट्रोल फील आला.
अमा सुचवल्या बद्दल थँक्स!
अमा सुचवल्या बद्दल थँक्स!
बरून सोबति असूर१ पासूनच आवडतो
बरून सोबति असूर१ पासूनच आवडतो. निरागस चेहरा, तळमळीने काम करणारा पोलिस, बलबीर बद्दल जिव्हाळा असलेला जाम आवडला. >>> मी त्याला इथेच पहिल्यांदा पाहिला (असावा. असुर पाहिलेली नाही). मस्त काम केले आहे त्याने. मेन लीड पेक्षा सेकंड लीड भाव खाउन गेला आहे.
दिरा वर प्रेम म्हणून का जमिनीत हिस्सा नको म्हणून >>> दोन्ही असावे असे वाटते.
कोहरा मधे शेवटी एक लूपहोल आहे. लोकांची बघून होऊ दे. मग बोलू. रेचेल शेली चा संवाद आहे त्याबद्दल.
Finding Ola नेफ्ली वर. मस्त
Finding Ola नेफ्ली वर. मस्त आहे टी पी. मी पाहिलेली पहिली इजिप्शियन सिरीज. अरेबिक मध्ये आहे, सबटायटल आवश्यक. एका मध्यमवयीन बाईला तिचा नवरा काही विशेष कारण नसताना सोडतो, त्यानंतरची स्टोरी आहे. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. एकदम हलकी फुलकी आहे. सहाच एपी आहेत. काही काही संवाद छान घेतलेत. कैरो शहर, वाळवंट एकदम नवीन पहायला मिळाले बरेच काही. आवडली, दुसरा सीजन येत आहे.
इथे प्राईम वरची अधुरा कोणी
इथे प्राईम वरची अधुरा कोणी पाहिली नाही का? छान हॉरर आहे. सुपरनॅचरल हॉरर. कथा निवांत उलगडत जाते. शेवटचा ट्विस्ट चांगला आहे. उटीचा अंधारा बॅकड्रॉप गुढतेत भर टाकत राहतो. मला ही सिरीज आवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे हॉरर सांगून शेवटी psychological thriller केली नाहीये. खरोखरच भूत आहे त्यात.
प्राईम वर असेल तर बघेन.
प्राईम वर असेल तर बघेन. सध्या फॅमिली मॅन बघतेय, ती संपवल्यावर बघेन. थँक्स rmd.
बघितली मी अधुरा. लहान मुलाचं
बघितली मी अधुरा. लहान मुलाचं काम आवडलं. वातावरण निर्मिती पण मस्त जमली आहे.
बघितली अधुरा.
बघितली अधुरा.
मुन्ना त्रिपाठीच्या सावत्र आईचं काम सोडलं तर कोणालाच धड काम करता येतय असं वाटलं नाही.
आताच कोहरा संपवली. मस्त आहे,
आताच कोहरा संपवली. मस्त आहे, engaging आहे, सगळ्यांची कामं उत्तम.
कोहरा मधे शेवटी एक लूपहोल आहे. लोकांची बघून होऊ दे. मग बोलू. रेचेल शेली चा संवाद आहे त्याबद्दल. >>
@फारेंड, कुठला लूप होल आहे सांगा ना स्पोईलर अलर्ट देऊन.
फॅमिली मॅन फर्स्ट सिझन बघून
फॅमिली मॅन फर्स्ट सिझन बघून झाला. शेवट आवडला नाही, मिन्स मुसासाठी नाही, त्याचा शेवट योग्य झाला. मिलिंद आणि त्या मुलीला परत लवकर मदत का मिळत नाही, एकदा निघून गेलेली पोलीस फोर्स येत का नाही लवकर. बरं ते कॉम्प्युटर सुरू आहेत हे आधी मिलिंद आणि तिच्या डोक्यात का येत नाही.
लूपहोल्स खूप आहेत. मुसा हॉस्पिटलमधून पळतो, तेव्हाच का नाही त्याचे फोटो देशभर पाठवून तो अतिरेकी आहे सांगत. तो आरामात दिल्लीत रहात असतो. तो साजिद रक्तबंबाळ होऊनही जगतो.
आता दुसऱ्या सिझनमध्ये करिम gf चा रोल असेल काहीतरी, साजिद आहेच.
शरद केळकरला काही विशेष काम नव्हतं, का केला त्याने असला रोल.
कोहरा:
कोहरा:
स्पॉइलर अॅलर्ट
ती क्लॅरा शेवटी बलबीरला त्या लियाम ने तिला मोबाईलवर मेसेज ठेवला होता असे सांगते. तेव्हा ती फ्लाइट मधे असते म्हणून तिला तो मेसेज नंतर मिळतो. मग तिची सुरूवातीची एण्ट्री आहे त्यात इतकी ती आदित्य चोप्रा/करण जोहरच्या पिक्चर्समधले नातेवाईक लग्नाच्या सीन मधे येतात तशी कशी काय येते? काहीतरी संशय यायला हवा. इतकेच नाही, तर दोघांकडे मोबाईल आहे. तो मेसेज मिळाल्यावर लियामला तिने उतरल्यावर फोन तरी केला असेल. तो लागला नाही/उचलत नाही वगैरे वरून किंचितही काळजी तिच्या चेहर्यावर दिसत नाही. प्रत्यक्षात जे घडते ते तिला सगळे तेव्हाच कळेल असे नाही पण तो मेसेज व नंतर लियामला फोन न लागणे यातून थोडीतरी काळजी/शंका यायला हवी होती.
स्पॉइलर अॅलर्ट
हो क्लाराच्या काही गोष्टींचा
हो क्लाराच्या काही गोष्टींचा ताळमेळ बसत नव्हता..
कोहरा:
कोहरा:
स्पॉइलर अॅलर्ट
लियाम आई ला कुठंवर पोहचलीस असं विचारायला म्हणुन कॉल करत असावा असं क्लॅरा ला वाटल्याने तिने एयरपोर्ट ते पॉल चं घर तो मेसेज इग्नोर केला असावा म्हणुन करण जोहर टाईप लग्न घरात एंट्री
असा मी समज करून घेतला.
पण खून, मिसींग चं कळाल्या वर तिने तो मेसेज ऐकून त्यात क्रुशल माहिती होती ती लपवली कारण आपल्या मुला वर पॉल खुनाचं बालंट नको असावं.
लियाम पण मेलाय हे तिला माहित नसतं अजून.
पॉल चा बाबा खूप चांगला अ
पॉल चा बाबा खूप चांगला अॅक्टर आहे, भडक डोक्या भुमिका चांगल्या करतो तो
मला तो रॉकेट सींग मधल्या बॉस भुमिकेत आवडला होता. श्रूड एकदम!
अन्जू, करेक्ट. लूप होल्स
अन्जू, करेक्ट. लूप होल्स आहेतच. मुसा ची सीक्युरीटी का काढतात तेच कमाल वाटली आधी. आणि त्या सिस्टर चं त्याच्या वर इतका विश्वास ठेऊन अॅक्सेस कार्ड देणं..काहीच शंका येत नाही तिला? ते दोन्ही अ तिरेकी आहेत ही माहिती असून देखिल.
डीझायरेबल दिसलाय

केळकरला काही विशेष काम नव्हतं, का केला त्याने असला रोल>>> त्याला वेबसीरीज मधे चमकायचे असेल. जो काय रोल आहे तो चांगला केलाय की त्याने
द नाइट मॅनेजर बघतेय सध्या.
द नाइट मॅनेजर बघतेय सध्या. आदित्य रॉ क आवडतो. अनिल कपूर तर काय बोलायचंच नाही.
तरी मला जरा कंटाळा आलाय.
यापेक्षा मूळ इंग्रजी नाईट मॅनेजर चांगली आहे, असं मुलगा म्हणाला. प्राइमवर आहे. तीच बघावी म्हणते.
जॉन ल कॅरे या स्पायस्टोरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे असं वाचलं.
त्यामुळे ती कादंबरीच वाचावी असं वाटायला लागलं.
कोहरा : स्पॉयलर अलर्ट
कोहरा : स्पॉयलर अलर्ट
लियाम ने व्हॉइस मेसेज मध्ये जवळ जव्ळ खुनाची कबुलीच दिली आहे. असा मेसेज ती आपण हून पोलिस ला का देइल. ती त्यांची धावपळ बघत अस्ते. व केस अॅक्सि डेंट म्हणोन क्लोज झाल्यावरच इन्स्पेक्टर ला सांगते.
कॅट व कोहरा दोन्ही ही सिरीज
कॅट व कोहरा दोन्ही ही सिरीज बघितल्या छान आहेत कोहरा मधला बलबीर कॅट मध्ये पण पोलीस अधिकारी आहे पुन्हा बॅकग्राउंड सुद्धा पंजाबच त्यामुळे बघणार्याला दोन्ही सिरीज एकच आहेत की काय असे वाटू लागते बहुधा दोन्ही सिरीज चा दिग्दर्शक एकच असावा असो दोन्ही सिरीज मध्ये पंजाब चे चित्रीकरण मस्त केलं आहे दोन्ही सिरीज अवश्य बघा..
कोहरा
कोहरा
बरोबर, क्लारा चं वागणं पटत नाही. एक फ्लॅशबॅक छा सीन होता ज्यात स्टीव्ह पॉल ला क्लारा च्या घरातून बाहेर काढतो भरपूर बदडतो. मला तेव्हाच त्यांच्या relationship ची कल्पना आल्यामुळे मारलं असं वाटलं. पण त्याला याबाबत शेवटी कळतं.
आणखी तो जो सेकंड इन्स्पेक्टर आहे त्याने सिलेंडर स्फोटाबद्दल वहिनीला अटक करायला हवी होती. त्याचा भाऊ साक्षीदार होता.
मिलिंद आणि त्या मुलीला परत
मिलिंद आणि त्या मुलीला परत लवकर मदत का मिळत नाही >>> वाईट वाटते पण टेक्निकली हे बरोबर आहे ना? आपल्याला बॉण्ड पट आणि इतरही फील गुड चित्रपटातून शेवटी चांगल्याचा वाईटावर विजय मिळतो याची सवय असते. पण खरोखर असे नसते ना
तिचे वय फार कमी आहे आणि घरापासून लांब असतात या मुली शिकायला/नोकरीला. तिच्या मानासिक एकटेपणाचा नि साधेपणाचा फायदा घेताना दाखवला आहे तो मुसा.
केळकरला काही विशेष काम नव्हतं >>> त्याला आहे ना सेकण्ड सिझन मध्ये मिटी रोल आणि तो दिसलायही खासच
सेकंड इन्स्पेक्टर आहे त्याने
सेकंड इन्स्पेक्टर आहे त्याने सिलेंडर स्फोटाबद्दल वहिनीला अटक करायला हवी होती >>> ते याचे लग्न ठरेपर्यंत एकमेकांच्या प्रेमात दाखवले आहेत ना? त्यामुळेच तर ती वहिनी तसे करते. म्हणून अटक वगैरेपर्यंत जात नसेल.
असा मेसेज ती आपण हून पोलिस ला का देइल. ती त्यांची धावपळ बघत अस्ते. व केस अॅक्सि डेंट म्हणोन क्लोज झाल्यावरच इन्स्पेक्टर ला सांगते. >>> तिने तो मेसेज पोलिसांना द्यायला हवा होता असे मी म्हणत नाही. पण तिची सिरीज मधली एण्ट्री ते माहीतच नसल्यासारखी आहे.
लियाम आई ला कुठंवर पोहचलीस असं विचारायला म्हणुन कॉल करत असावा असं क्लॅरा ला वाटल्याने तिने एयरपोर्ट ते पॉल चं घर तो मेसेज इग्नोर केला असावा म्हणुन करण जोहर टाईप लग्न घरात एंट्री >>> हो ही शक्यता plausible आहे
केळकर मला आवडतोच, सेकंड
केळकर मला आवडतोच, सेकंड सीझनमध्ये आहे का रोल, तो सिझन आज रात्रीपासून बघायला सुरुवात करेन. केळकर ला गुल पनागचा नवरा म्हणून बघायला आवडलं असतं
काही सीन्सची गरज नव्हती पण ott वर पुढे नेता येतं त्यामुळे बरं आहे पण कधी कधी अति पुढे जातं मग परत थोडं मागे घ्या.
सेकंड सिझनला सुरुवात केली.
सेकंड सिझनला सुरुवात केली. सुब्बू ओळखीचा वाटतो, दाढी नसताना पहिल्या सीनमध्ये जास्त ओळखीचा वाटला. सीमा विश्वास मस्तच, खूप दिवसांनी बघितलं तिला. बाकी मिलिंदला बघून बरं वाटलं.
हे कुठलेही अतिरेकी, बागी वगैरे सहज लंडन, स्वित्झर्लंड वगैरे जातात
शरद केळकर नव्हता पहिल्या एपिसोडमध्ये, बघायला उत्सुक.
केळकर ला गुल पनागचा नवरा
केळकर ला गुल पनागचा नवरा म्हणून बघायला आवडलं असतं>> डोकं गरगरलं..
काय हे अन्जू!
सी२ सी १ पेक्षा जास्त थरारक & उत्तम आहे. सी३ चिन च्या जैविक युद्धा बद्दल आहे असं वाटतं.
कोहरा बघून मला पंजाबी
कोहरा बघून मला पंजाबी बायकांबद्दल एकदम काळजी वाटली. नको ते तसले जिणे असे वाटले. सर्व पुरुष एकदम हाणामारीला तयार. किती तो डोमेस्टिक व्हायलन्स.
कोहरा बघितला.
कोहरा बघितला.
नावाला साजेसा आहे.. सुरवातील सगळं धुक्यासारखं अस्पष्ट पण शेवटी सगळ्या लिंक्स नीट जुळवल्यात. वीरा आणि साकार ला पण व्यवस्थित क्लोजर दिलंय.
पंजाब चं चित्रण आवडलं. सरसो के खेत वगैरे.
सुरवातीला मला पॉल चे वडील आणि चाचा यातला फरक कळतच नव्हता. बलवीर सतत पोलिस युनिफॉर्म मधे म्हणुन तो नीट ओळखु येत होता.
गरुंडी मस्तच..
हलके फुलके जोक्स टाकलेत अधेमधे ते आवडलं. माचुपिचु
ती लेडी इन्स्पेक्टर पण मस्त. पिज्जा चे टॉपिंग समजावुन सांगत असते तो सिन आणि साकार चं रॅप वाचून दाखवत असते तो सिन भारी हसले मी.
कोहरा बघून मला पंजाबी बायकांबद्दल एकदम काळजी वाटली > +१
फॅमिली मॅन दुसरा सीझन जबरदस्त
फॅमिली मॅन दुसरा सीझन जबरदस्त आहे. विशेषतः संमंथा. वरवर फारच टिपीकल वाटणारी पण अखंड सावध असणारी. मनात आपले शेवट ऊद्दिष्ट काय आहे याची आठवण ठेवणारी, त्यासाठी थलेवरे च्या आदेशाची वाट बघणारी.
तिसर्या सिझन ची फार ऊत्सुकता आहे
Pages