Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशु दोघे आवडतात म्हणून जोडी
आशु29 दोघे आवडतात म्हणून जोडी लावली, बाकी काही नाही
समंथा म्हणजे पहिल्या श्रीलंकेच्या काही सीन्समध्ये एक शांतपणे वावरणारी जीपमध्ये एकटीच मुलगी असणारी ती का.
अंजु, तू म्हणतेयस ती बहुधा
अंजु, तू म्हणतेयस ती बहुधा शहीद झालीय(स्पॉयलर)
सामंथा दुसऱ्या एपीसोड पासून येईल.
अच्छा, ती एकदम शांत पण
अच्छा, ती एकदम शांत पण impressive वाटली होती म्हणून मला तिला अजून काम असेल पुढे असं वाटलं. थँक्स अनु.
कोहरा बघेन आता इथे वाचून
कोहरा बघेन आता इथे वाचून इंट्रेस्टिंग वाटत आहे.
कोहराचे डायलॉग्ज इंग्लिश आहेत
कोहराचे डायलॉग्ज इंग्लिश आहेत की हिंदी?
हिंदी.
हिंदी.
ओके. मला सेटींग चेंज करायला
ओके. मला सेटींग चेंज करायला हवं मग.
तो फॅमिली मॅन माझ्याकडे आधी
तो फॅमिली मॅन माझ्याकडे आधी इंग्लिशमधून लागला, मग मला सेटिंग्ज चेंज करून हिंदी करावं लागलं.
दुसरा भाग बघितल्यावर मला मी
अनु, दुसरा भाग बघितल्यावर मला मी म्हणते तीच वाटली समंथा. अर्थात चेक करायला मी पहिला भाग बघायला गेले नाही, जबरदस्त काम केलंय तिने.
ह्या लोकांकडे एखादी गुप्त यंत्रणा नसते का, ज्याने सुब्बूला मारायची योजना केली त्याच्याच गळ्यात त्याचा भाऊ पडतो, धन्य आहेत, काहीच माहिती नाही.
फॅमिली मॅन 2 मध्ये राजी फार
फॅमिली मॅन 2 मध्ये राजी फार जबरदस्त charactaer आहे.
बॉसच्या खुनाचा तपास सुरू
बॉसच्या खुनाचा तपास सुरू झाल्याबरोबर राजी पळून का जात नाही. लेडी इन्स्पेक्टर राजीला गारबेज बॅग उघडून दाखव का म्हणत नाही.
राजी विमान चालवत असते बघून भारी वाटलं.
मध्येच govt मधली नोकरी सोडून कॉर्पोरेटमध्ये जाता येतं आणि तिथून हवं तेव्हा मूळ नोकरीत येता येतं.
एनिवे हे सर्व असलं तरी सिरीज मस्त आहे. दुसरा सिझन, तीन भाग बघून झाले.
बॉसच्या खुनाचा तपास सुरू
बॉसच्या खुनाचा तपास सुरू झाल्याबरोबर राजी पळून का जात नाही. लेडी इन्स्पेक्टर राजीला गारबेज बॅग उघडून दाखव का म्हणत नाही.
राजी विमान चालवत असते बघून भारी वाटलं.
मध्येच govt मधली नोकरी सोडून कॉर्पोरेटमध्ये जाता येतं आणि तिथून हवं तेव्हा मूळ नोकरीत येता येतं.
एनिवे हे सर्व असलं तरी सिरीज मस्त आहे. दुसरा सिझन, तीन भाग बघून झाले.
हो ते कायच्याकाय आहेच.
हो ते कायच्याकाय आहेच.
क्रिमिनल जस्टीस सिजन 3 अधुरा
क्रिमिनल जस्टीस सिजन 3 अधुरा सच
बघून झाली.
सुरवात ते मध्यंतरापर्यंत छान वाटली.
शेवटी उलगडा झाला तो काही फार पटला नाही.
वकिलाच्या आयुष्यातील काही प्रसंग हे तितके ब्लेंड नाही झालेत. तुकडे जोडल्यासारखं वाटलं ते.
पहिला सिजन बेस्ट होता.
आता वकील साहेबांना जगात भारी दाखवण्याचा प्रयत्न होतोय की काय असेही वाटले.
मर्सिडीज मधून येणारी सरकारी वकील, तिच्या बाबाचा आणि तिचा संवाद, तिला टोमणे मारणे / तिच्या मागे बोलणे हे क्लिशेड वाटले.
पंकज त्रिपाठी बाप ऍक्टर आहे.
काय चेहरा बोलतो त्याचा.
कोहरा बघून मला पंजाबी
कोहरा बघून मला पंजाबी बायकांबद्दल एकदम काळजी वाटली>>> पंजाबी बायका ज्या ही पाहिल्यात त्या परिस्थितीने कणखर झाल्या आहेत. त्या पण हाणा मारी करतात प्रसंगी. दिल्लीत राहयचे तर टफ बनून रहावेच लागणार.
जसं ते म्हणतात, त्यांची कौम च टफ असते. पॉल च्या आई सारख्या खूप कमी.
फॅमिली मॅन दोनच भाग राहिलेत
फॅमिली मॅन दोनच भाग राहिलेत बघायचे.
धृती किडनॅप होते, त्यात दोष तिचाच जास्त वाटतो कारण तिला दोन तीनदा तरी कल्याणच्या बाबतीत संशय यावा अशी सिच्युएशन समोर आलेली, आईच्या बाबतीत इतकी जागृत असते, tont मारते पण इथे एकदम झापड. तो अथर्व सांगून सांगून थकतो तिचा bf आहे, त्याला कोणी सिरीयसली घेतच नाही.
धृती वयाने तशी फार लहान आहे म्हणजे दिसते तरी, तशी फार गोड आणि स्मार्ट आहे पण जिने हे chara केलंय तिच्या parents नी काही सीन्स करायला परवानगी कशी दिली, असा विचार मनात आला.
याच्या आधीचा भाग अतिशय थरारक होता, विशेषतः राजी बाबतचा, मिलिंदसाठी वाईट वाटलं.
वेबसिरीजमध्ये काम करायचं तर भसाभासा स्मोकिंग, सतत ड्रिंकिंग आणि घाण शिव्या मस्ट, जास्त करून जेन्ट्स chara दाखवतात, अपवाद महिलाही. मलाच अजून बघायची सवय झाली नाही
यात शरद केळकर विरळा दाखवला आहे.
धृती किडनॅप होते, त्यात दोष
धृती किडनॅप होते, त्यात दोष तिचाच जास्त वाटतो>>> तिचाच असतो. खूपच दिडशहाणी दाखवलिये. बॉफ्रे कोणत्या कॉलेज ला आहे..काय करतो काही माहित नाही.. दाढी वाल्या मुस्लिम दिसणार्या १ माणसाला माझा काका म्हणुन सांगतो. आणि त्याचं नाव कल्याण. तरी मंद च.
कोणीतरी दुकानदार सलमान म्हणून
कोणीतरी दुकानदार सलमान म्हणून बोलावतो, तेव्हा त्याला विचारतेही, तो म्हणतो तो सगळ्यांना सलमान हाक मारतो तर तिचा विश्वास बसतो लगेच. हीच गळेपडू दाखवली आहे.
क्लिकबेट - नेटफ्लिक्स
क्लिकबेट - नेटफ्लिक्स
एक रहस्य मालिकाच आहे पण नक्की बघावी अशी. रहस्य असल्यामुळे खूप काही लिहीत नाही इथे पण अनेक पात्रांवर संशयाची सुई फिरत रहाते आणि खरा गुन्हेगार अणि त्याहीपेक्षा गुन्ह्याचे कारण चांगलाच धक्का देऊन जाते.
तपासादरम्यान उलगडत जाणार्या परस्पर विरोधी फॅक्ट्स आणि त्यानुसार बदलत जाणार्या पात्रांच्या एकमेकांबद्दलच्या वागणूकी जबरदस्त साकारल्या आहेत.
धृती किडनॅप होते, त्यात दोष
धृती किडनॅप होते, त्यात दोष तिचाच जास्त वाटतो >>>>
मला वाटते धृतीच्या वयानुरूप तिचे कॅरॅक्टर दाखवले आहे. मुलांना फार बांधून घालता येत नाही या वयात आणि सगळे धोके समजण्याची अक्कलही नसते. आजकाल शाळकरी मुलं-मुलींवर पीअर प्रेशर असते बीएफ/जीएफ असण्याचे. त्यातून ती जरा पॅम्पर्ड दाखवली आहे. ते प्रकरण बघून भीतीच वाटली होती कि हे कोणत्याही घरात होऊ शकते मेट्रोजमध्ये.
कालकूट .. विजय वर्मा इज
कालकूट .. विजय वर्मा इज नेक्स्ट नवाज....
कोहरा संपवली. आवडली.
कोहरा संपवली. आवडली.
आहेत काही लूप होल्स. विषयही घिसापिटा आहे तरीही आवडलीच.
पंजाबमधली घरं, कपडे, तिथलं राहणींमान वगैरे एकूणच चित्रिकरण अॅप्ट वाटलं.
बलबीर - एकच भाव दिसले चेहेर्यावर पूर्ण सिरीजभर,सगळ्या परिस्थितीत बिचाराच वाटत राहिला. बॉडी लँग्वेज उदास वाटत राहिली. पण तरी चांगलं केलंय काम.
गारूंडी - गारुडच केलंय याने तर माझ्यावर. असूर मधे पण आवडला होता. या सिरीजमधे त्याचा पंजाबी अॅक्सेंट भयंकर क्यूट वाटला
बोलताना शेवटचा शब्द एक विशिष्ट हेल काढून म्हणतो ते आवडलं. बलबीरला कायम साथ देणारा, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक इन्स्पेक्टर छान दाखवलाय त्याचा . प्रेमात पडल्यावरचा भावी नवरा पण. गालावर खरचट्ल्यावर अर्रे आज रोका है मेरा, फेस बिगाड दिया म्हटल्यावर फुटलेच.
बाकी सगळे दाढीवाले काका, पाजी सगळे सेमच दिसतात. स्टिव्ह, पॉल ही पंजाबी लोकांमधे असतात का नावं?
स्पॉयलर/न कळलेल्या गोष्टी
बलबीरच्या बायकोला काय आजार असतो, कसली औषधं घेत असते आणि नंतर आत्महत्या का करते.
त्या पांढर्या हवेलीत बॉडीबिल्डर टाईप्स दाखवलेला, गच्चीवर तेलमालिश करत दाखवलेला रणवीर तो कोण असतो? जो नंतर गोळी लागून मरतो. त्याचं नाव ऐकून एवढ्या त्वेषाने गारुंडी तिकडे जायला निघतो.
तो ड्रग विकणारा कल्ली पॉल आणि लियामचा पाठलाग करतो पैशांसाठी पण नंतर खून झालेला पाहून फक्त पॉलचं घड्याळ चोरतो तेव्हा त्याच्या तिथे येण्याच्या वेळची आणि लियमच्या मरण्याच्या वेळेची पण संगती लागली नाही.
फॅमिली मॅन मध्ये डोंबिवली
फॅमिली मॅन मध्ये डोंबिवली बघून धन्य झाले
मिकी परत आलाय. लाभ घ्या.
मिकी परत आलाय. लाभ घ्या.
अरे मिकी बघते आज रात्री.
अरे मिकी बघते आज रात्री.
सुश्मिता सेन ची ताली ही
सुश्मिता सेन ची ताली ही वेबमालिका आहे कि वेबसिनेमा ?
स्टिव्ह, पॉल ही पंजाबी
स्टिव्ह, पॉल ही पंजाबी लोकांमधे असतात का नावं? >> टोपणनावं असतात. स्टीव्ह म्हणजे सतविंदर नाव दाखवले आहे. एकूणच टोपणनावांचे प्रस्थ बरेच आहे पंजाबी लोकांच्यात. बहुतांश मूळ नावातील काही अक्षरे वापरून बनवलेले शॉर्ट नाव असते (हरभजनसिंग = भाजी) पण कधी कधी एकदम वेगळेही असते. ते "पॉल" तसेच असावे.
पॉल आडनाव आहे. पालचे केलेले.
पॉल आडनाव आहे. पालचे केलेले.
खेत्रपाल आडनावाचे पॉल केलेले
खेत्रपाल (क्षेत्रपाल चा अपभ्रंश बहुदा) आडनावाचे पॉल केलेले मला माहीत आहेत पंजाबी.
मिकी परत आलाय. लाभ घ्या. >>>
मिकी परत आलाय. लाभ घ्या. >>>
.. सुरुवात केलीय.
ती judge धमाल आहे.
Pages