वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं ग्लोरिफाय केलंय कि तो गुप्ताचा मेंटॉर वाटावा..>>>> तेही खरंय .गुंडांना ग्लोरिफाय करणं वेबसेरिज मध्ये नॉर्मल आहे .scam 2003तेलगी मध्येही तेलगी लाही ग्लोरिफाय केलंच होतं.चुकीच्या ठिकाणी आपली टॅलेंट बुध्दी वापरली की काय होते यांचं उत्तम उदाहरणं आहेत हे तेलगी चालज् शोभराज .शेवटी काय योग्य काय अयोग्य हे समजत नसेल तर अश्या वेबसेरीज च्या वाटेला जाऊ नये.
मला शोबराज बद्दल बऱ्याच गोष्टी फक्त ऐकून माहीत होत्या त्याविषयी कुतूहल होतं बस इतकच
बेदी म्हणजे किरण बेदी का?

American Primeval - Netflix

जबरदस्त ग्रिपिंग सिरीज आहे. दोन भाग पाहिले. फुल रेको! १८५७ च्या काळात युटाह टेरिटरीमधे ही बरीचशी कथा घडते - निदान पहिले दोन भाग तरी.

Virgin River, Manny, Finding Ola (Netflix) नवीन season आले आहेत, छान आहेत. कुणी बघतय का?

>>ही पाहिली का कुणी?"<<
चांगली आहे., अवश्य बघा. घातपाताच्या सूत्रातील गिल्टि-इनसंट-गिल्टि-इनसंट असे ट्विस्ट आहेत. जिम स्वायरला मानलं बाबा, अतिशय गस्टि माणुस. सत्याच्या शोधात स्वतःला झोकुन देणारी, प्रसंगी जीव धोक्यात घालणारी माणसं विरळाच..

>>बेदी म्हणजे किरण बेदी का?<<
हो.

शोभराजचं ग्लोरिफिकेशन झालंय असं मी म्हणालो कारण सिरीज त्याच्यावर नाहि, तो त्या काळात तिहार जेलमधे होता, एव्हडंच. कदाचित त्याचा गुप्तावर इंन्फ्ल्युअंस झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाहि, पण ते टाळलं असतं तरी विशेष फरक पडला नसता. हे माझं मत...

नेटफ्लिक्सवर One hundred years of Solitude पूर्ण केली.

आवडली नाही. तुटकतुटक मांडणी आहे. सगळे 'लूज एन्ड्स' सोडले आहेत. जे दाखवलेय तेही भरीव वाटले नाही. कादंबरी न वाचता समजूच नये अशी व्यवस्था केली असेल तर कल्पना नाही. किंवा एक मोठी 'तुंबाडचे खोत' टाईप 'मकांडोचे आर्काडिओ' असेल जे सिरीज मधे मावलेले नाही अशीही शक्यता आहे.

सुरवातीचे तीन-चार भाग बऱ्यापैकी इंट्रेस्टींग होते, नंतर कुठल्याकुठे गेली आहे. स्टिमी रोमान्स शब्दशः रेनफॉरेस्ट मधल्या आर्द्रतेने घामेजलेला वाटावा इतका 'श्टिमी' आहे. ज्याने ते नदीकाठचे शहर वसवले तो आर्काडिओ, त्याचा मुलगा आर्काडिओ व त्याचा नातूही आर्काडिओ आहे. त्यामुळे हे नाव सतत कानावर पडत राहते. जप होऊन जातो. मूळ पुरुष आर्काडिओ वेडा होतो व त्याला मरेपर्यंत चेस्टनटच्या झाडाला बांधून टाकतात. फक्त बरळण्यासाठी एवढी मोठी शिक्षा. अर्सुला उगाच कॅन्ड्या करत , पोरींना धाक दाखवत फिरते. दत्तक मुलगी आपल्या भावाशीच लग्न करते. एक मुलगी शब्दशः माती खात असते. माणसं पटापट मरून जातात.

नंतर अचानक क्रांतीचे वारे वाहते व दोन आर्काडिओ मरतात. काही बाही बरेच आहे पण कशाचा पायपोस कशाला नाही. सगळं मकांडोत अराजक माजते पण 'व्होर हाऊस' चालू राहते. एकाच बाईपासून दोन भावांना अनौरस मुलं होतात. त्यातला एक आईवरच हात टाकतो. दुसरा आपल्या आत्यावर. नंतर स्थैर्य आल्यासारखे वाटताच अजून एक क्रांती होऊन पूर्ण मकांडो बेचिराख होते. अतिशय विस्कळीत व तुटक आहे. उपकथांना इमोशनल क्लिफहॅन्गरवर सोडून दिले आहे. धड किमया नाही, नातेसंबंध नाही, भावना नाही, संवाद डब्ड बघितल्याने मातीत गेले. फक्त स्पॅनिश वातावरण, घरं, बागा हा नवीन प्रकार आहे. कुठलीच गोष्ट तडीस न गेलेली गोष्ट वाटली.

सिझन २ येणार असेल तर कल्पना नाही.

झी५ वर "ग्यारह ग्यारह" बघत आहे. एकदम थरारक. आत्तापर्यंत सहा एपिसोड पाहून झाले आहेत.

या सिरीज वर आधी कधी उल्लेख आला होता का या धाग्यावर?

Virgin River मी पाहतेय पाच पाहिलेत सहावा नवीन सिजन चे 2 नच भाग पाहिलेत मेल आणि जॅक ची लग्नाची तयारी सुरू आहे .मेल या सिजन मध्ये अजून सुंदर दिसतेय मेकप ही सुधारलाय जॅक तर मस्त दिसतोच .या भागात मेल च्या फुटबॉलर वडिलांची आणि आईची स्टोरी म्हणजे लव्हस्टोरी दाखवत आहेत यंग पणीचे दोघेही सुंदर आहेत आणि लव्हस्टोरी पण.
पिचर ची केस सुरू आहे अजून पुढचे एपिसोड बघायचेत .फक्त होप ला ठीक झालेले बघायचंय .मला आवडते ती, भोचक असली तरी तडफदार , सपोर्टिव्ह ,तितकीच प्रेमळ आहे आणि चांगली मेयर व लीडर. डॉक् च्या डोळ्यांनाही काही होऊ नये असं वाटतं . जॅक च्या बहिणीचा आधीचा बॉयफ्रेंड(जॅक चा मित्र जो गुन्हाचं रॅकेट उध्वस्त करायचा प्रयत्न करतोय तो )हिरो छान होता त्याला व्हीलनी फसवतेय आताचा पोलिसवाला ही छान दिसतो बहुतेक दोघांपैकी एकाचे मरण्याचे चान्सेस जास्त आहेत टीपीकल बॉलीवूड स्टाइल ने स्टोरी फिरली तर.

अ‍ॅपल प्लसवर टेड लासो ही सिरीज पाहिली. फार सुंदर आहे. फुटबॉल विशेष आवडत नसल्याने पहावी की नको असा संभ्रम होता. सो हार्टवॉर्मिंग!

टेड लासो अफाट मस्त आहे सिरीज! त्यातला एक "डार्ट सीन" अफलातून आहे.

अमेरिकन प्राइमीइव्हल - पाच एपिसोड्स पाहिले (सहाच आहेत). जबरदस्त खिळवून ठेवते. नेफि.

पाताल लोक बघत आहे. जाम ईंटरेस्टींग. ४थ्या भागावर आहे, ह्यात तिलोतमा शोम आहे.
१ साईड पण आवडणारं कॅरॅक्टर मरतं, मनाची तयारी ठेवा Sad
जयदीप अभिनयात बाप माणूस आहे. त्याच्या डोळ्यांत जेंव्हा पाणी तरळतं, तेंव्हा आपोआप दर्शकांच्याही ते येतं. तो त्याची ढेरी सांभाळून पाण्याच्या टाकी वर चढायच्या सीन मधे कमाल केली आहे. मुलाच्या बड्डे सीन मधेही डोळ्यातलं नैराश्य कमालीने दाखवतो.

मला ती अस्मिता ची कॉमेंट आठवत होती, जयदीप मधे से* अपील अस्ल्याची. Happy

पाताल लोक २ अमेझिंग आहे.
जयदीप अहलावत बेस्ट!! तोड नाही.
आणि स्क्रिप्ट रायटर कोण आहे? मला जाणून घ्यायचं आहे.
फार सुंदर, गुंतागुंतीचे पण खिळवून ठेवणारे कथानक आहे.
त्याला सर्वांचीच उत्तम अभिनयाची जोड.
प्रत्येक जण त्या त्या भूमिकेत अगदी चपखल बसलं आहे...
अगदी तो हाथी राम ला फिरविणारा ड्रायव्हर असो, की रूबेन असो...की अर्नेला की आणखी कुणी..
परफेक्ट पात्र योजना!!! उत्तम आऊट डोअर सीन्स, उत्तम फोटोग्राफी...
हॅट्स ऑफ निर्मात्याच्या मेहनतीला.

पाताल लोक बद्दल सहमत. जबरदस्त ग्रिपिंग आहे. कामे अफलातून आहेत सर्वांची. हाथी राम हे अलिकडच्या काळातील सर्वात भन्नाट कॅरेक्टर असेल Happy सहसा दबून गप्प राहणारा हा माणूस अधूनमधून एकदम "एक्स्प्लोड" होतो (पहिल्या सीझन मधे त्याच्या मुलाशी व एका गन शी संबंधित सीन मधे ते दिसले होते). त्याच्या बुजर्‍या व्यक्तिमत्त्वात हिशेबीपणा एरव्ही जाणवत नाही पण तपासाच्या कामात तो असा काही उफाळून येतो की आपण बघत राहतो. समोरचा कुरघोडी करतोय असे वाटेपर्यंत हा त्याच्या वरताण काहीतरी करून जातो, आणि त्यातून तपासाबद्दल, त्यातील संशयितांबद्दल व होणार्‍या गोष्टींच्या परिणामाबद्दल त्याला किती माहिती आहे ते दिसते. कधीकधी महत्त्वाच्या वेळी कोणाचीही तमा न बाळगता बेधडक "घर मे घुसके" टाइप जो कोठेही शिरतो ते स्तिमित करणारे आणि थोडेफार मजेदारही वाटते.

ज्या सिच्युएशन्स मधे तो अन्सारी किंवा ती मेघना बरूआ "दमानं" टाइप जात असतात तेथे हा एकदम धडाक्यात काहीतरी करतो ते पाहून पूर्वी मॅचेसमधे द्रविड, सचिन वगैरे एका रेटने खेळताना त्याच खेळपट्टीवर सेहवाग जो काही धमाका उडवे त्याची आठवण झाली.

त्याच्या जुन्या बॉसला - त्या "विर्क"ला - या सीनमधे जरा अजून वेगळा टच दिला आहे ते एक आवडले.

"सर, ये पाताल लोक है. जरा संभलके..."
"तू चिंता मत कर. मै पाताल लोकका पर्मनंट निवासी हूँ" Happy

'पाताल लोक' बघेन. 'बंदिश बॅन्डिट्स' संपवली की ही सुरू करेन. मला या धाग्याची फ्रिक्वेंसी मॅचच करता येत नाही.

आशु - Happy हो, त्याच्या डोळ्यात 'सेक्स अपील आहे' हे मी 'महाराज' चित्रपटावरचा रिव्यू लिहिला तेव्हा लिहिले होते चिकवावर. त्याला सगळ्याच भावना नजरेतून व्यक्त करता येतात बहुतेक.

त्याला सगळ्याच भावना नजरेतून व्यक्त करता येतात बहुतेक. >>> इतर पद्धतीनेही बर्‍याच भावना व्यक्त करतो तो. त्याच्याकडून मार खाणारे सांगतील Happy तू पहिला सीझनही पाहिलेला नाहीस का?

नाही, नाही. पाताळात गेलेच नाही कधी. पहिल्यापासून सुरू करतेय/ करेन कदाचित.
इतर पद्धतीनेही बर्‍याच भावना व्यक्त करतो तो. त्याच्याकडून मार खाणारे सांगतील >>> Lol
तिकडच्या 'श्रॉडिंगरच्या जलव्या'वर मनातल्या मनात हसून येथे आले आहे.

Happy Happy पाहा नक्कीच. रेकोची सर्वोच्च पातळी आहे Happy

आणि स्क्रिप्ट रायटर कोण आहे? मला जाणून घ्यायचं आहे.
फार सुंदर, गुंतागुंतीचे पण खिळवून ठेवणारे कथानक आहे. >>> खरे आहे. त्यामुळे पुन्हा पाहताना सुद्धा आधी काहीतरी निसटलेले जाणवते. मी पहिला सीझन पूर्ण परत पाहिला आहे काही दिवसांपूर्वी.

पाताललोक दुसरा भाग बघितला, त्या छोट्या मुलाने कसलं सुरेख काम केलंय, त्याची केविलवाणी नजर बघून जीव गलबलून येतो.

त्याच्याकडून मार खाणारे सांगतील >>> Lol
शेवटी जेव्हा हाथीराम ची बायको त्याला विचारते, की सिद्धार्थ की गर्लफ्रेंड का नाम क्या था...?
तर अगदी सहजपणे, अनन्या असे उत्तर देतो. तेव्हा ती म्हणते, एकदम हाथी जैसी याददाश्त है! तो सीन खूप आवडला .
फा, पहिल्या सिझन चे कथानक पण खूपच भारी होते. म्हणजे ॲक्च्युअली न घडलेल्या गुन्ह्याची कथा....!!!

"सर, ये पाताल लोक है. जरा संभलके..."
"तू चिंता मत कर. मै पाताल लोकका पर्मनंट निवासी हूँ" >>> जबरा. तो पंटर पहिली ओळ म्हणत असताना दर्शाकांच्या मनात बिलकुल हेच आणि हेच येते Lol

जसे फॅमिली मॅन मधे मवा च्या नजरेवरून त्याच्या वायफळ बडबड बॉस ला ऑफिसात तो आता चोप देणार ही आयडीया येत्तेच Lol

फा काय मस्त लिहिलेस Happy ह्या डायलॉग ला तर मी मनात जोरदार शीळ घातली. जब्बरदस्स्स्स्स्त!

पाताललोक जबरदस्त आहे सगळ्यांची काम चांगली झाली आहेत अगदी ड्रायव्हर चां रोल असुदे की धर्मांध शार्प शूटर प्रशांत तमांग किंवा लेडी ऑफिसर तिलोत्तमा शोम.सर्वात जबरी काम केलय ते हाथिराम झालेल्या जयदीप अहलावत ने शेवटच्या हॉस्पिटलच्या थरारात आपणही त्याला काय होऊ नये याची मनोमन प्रार्थना करतो. हा माणूस मला अक्षयच्या टीचकुले वाल्या चित्रपटा पासूनच आवडत होता .जबरदस्त ॲक्टर आहे. रोल पण चांगला लिहीलाय त्याचा मग तो अन्सारीच्या पर्सनल गोष्टीवर भाष्य करतानाचा पोलीस असो घरात बायकोच्या भावाशी बोलतानाचा वैतागलेला पोलीस , पोराची स्पेस जपणारा पण तितकाच त्याच्या गर्लफ्रेंड च नाव लक्षात ठेवणारा पोलिसी स्वभावाचा बाप स्वभावाचे पैलू छान दाखवलेत.

तू चिंता मत कर मै पाताल लोकका पर्मनंट निवासी हूँ+१ डायलॉग मस्तच आहेत पण तेही कथेशी समर्पक आहेत ते उगाच येत नाहीत.जस की "हम गल्ली क्रिकेट के लोंडे है चौधरी और यहा वर्ल्ड कप चल रहा हैं".

द ब्लॅकलिस्टमध्ये आता धक्कादायक वळण आलंय. त्यांनतरचा एपिसोड फार वेगळा व सुंदर होता. जेम्स स्पेडरने देहबोलीच बदललीय.

पाताललोक जबरदस्त... बिंज वॉच करुन एका दिवसात सगळे एपिसोड पाहिले...
जयदीप अवलावत काय अप्रतिम काम करतो...
पाताललोक का पर्मनंट निवासी वाक्याला जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या...
रेस का घोडा वाला डायलॉग आणि तो संपूर्ण सीन अप्रतिम...
****************************************************************************************
*********************************स्पॉईलर *********************************************
अन्सारी चं कॉफिन ताब्यात घ्यायला एअरपोर्ट वर आलेला असताना... हाथीराम चे डोळे आणि त्यात भरलेलं पाणी...... कसला जिवंत आहे त्याचा चेहेरा.. रेष न रेष बोलते...
जोगी कडे रेड टाकतो तेव्हा गच्चीत झोपलेल्या कामगारांना टाकीत लपवतो.. आणि पोलीसांच्या हाती सापडायचं नसेल तर उद्या सकाळपर्यंत इथेच बसुन रहा म्हणतो....\अशा लहान लहान प्रसंगातुन त्याचं सहृदय मन दाखवलं आहे.. २ करोड रुपयांवर पाणी सोडणारा हाथीराम कशाचा बनलेला असेल असं वाटतं.. फारच भारी लिहिलंय त्याचं कॅरॅक्टर...

माझे मन , ब्लॅकलिस्ट सिरीजचा कोणता भाग बघत आहात ? एलिझाबेथची आई रशियन आहे हे तिला कळते तो का ?
मी पूर्ण सिरीज बघितली आहे . पूर्ण पॅकेज सिरीज आहे

Pages