Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैद्यनाथ च्यवनप्राश>>>>
वैद्यनाथ च्यवनप्राश>>>> आमच्या इथे मेथ /MMDA युक्त च्यवनप्राश बनवून मिळेल
>>> उद्या वैद्यनाथ
>>> उद्या वैद्यनाथ च्यवनप्राशकडेही संशयाने बघतील.

मला ते चवन उगाचच यवनसारखं ऐकू येतं (बहुतेक छावा इफेक्ट!), त्यामुळे चवनास यमसदनास धाडिले वगैरे उल्लेख यायची वाट पाहिली जाते.
उद्या वैद्यनाथ
उद्या वैद्यनाथ च्यवनप्राशकडेही संशयाने बघतील. >>>

चवनास यमसदनास धाडिले >>>>
फाइण्डिंग नीमो मधे डोरी त्याला कधी एल्मो, कधी फाबिओ, बिंगो वगैरे म्हणते ते लेजेण्ड लेव्हल असले, तरी हे च्यवन किमान अॅडल्ट लेव्हल आहे
हो पण तिला निदान विसराळू-विनोदी दाखवले तरी आहे. येथे नक्की काय आहे?? सरळच दाखवू नये ना की "आम्ही 'ईन जनरलच' मंद आहोत." 
>>>
घ्या अजून एक .... अक्का....
घ्या अजून एक .... अक्का....
https://youtu.be/rh5JiVWvTrM?feature=shared
>>> अक्का
>>> अक्का
Whoa!!
बा, राजी, अक्का, विचार करा पक्का!
मला अजिबातच आवडली नाही डब्बा
मला अजिबातच आवडली नाही डब्बा कार्टेल. इतके असंख्य लोक सहजपणे रोजच्यारोज डब्यातून ड्रग्ज घेत-मिळवत असतात - सप्लाय-डिमांड चेन इतकी कॉमन असल्यासारखी दाखवलीय कैच्याकैच. आणि ती राजी अगदी सुरुवातीपासूनच डब्यांमधून फ्रेश माल पुरवत होतीच असे दाखवलेय (तो हिरवागार पाला :)) त्यामुळे कशी मी बिचारी अडकले, जर्मनीसाठी काय काय करावं लागतंय -टाईप भाव घेऊन का फिरत असते... आणि तो तिचा नवरा त्याच्या फार्मा कंपनीमार्फत जर्मनीला जाणार असतो ना? तर मग ही कशाला एवढी पैशांची जमवाजमव करत असते? ऑनसाईट जाणारे जातात की कुटुंबाला घेऊन, फारतर तो आधी पुढे गेला असता मग सेविंगकरुन बायको-आईला बोलावलं असतं की
शबानाने बोटॉक्स केले असावे, सुजलेल्या चेहर्यावर फारसे भाव उमटताना दिसतच नाहीत. एकंदरीत काहीही वाटली. लेस्बो चेकमार्कही आहेच. माझा पास. पुढच्या सिझनवर वेळ वाया घालवणार नाही.
आश्रम चा नवीन सीझन आला आहे.
आश्रम चा नवीन सीझन आला आहे.
फारच उत्तान दृश्ये दाखवली आहेत.
बाकी छान आहे.
चवनास यमसदनास धाडिले >>>
चवनास यमसदनास धाडिले >>>
अक्का पण पाहिली
"वूमन किंग" ची आठवण झाली - त्याचाही फक्त ट्रेलरच पाहिला आहे.
पाहिला शेवटचा भागही डब्बा कार्टेलचा. लेटडाउन वाटला. नाट्य चांगले रंगवत आणले होते शेवटाला पण शेवट परिणामकारक नाही. कोणाला तरी मारायला हवे म्हणून मारले आहे. घोड्याचा सीनही बळंच आहे - जरी तो प्रतिकात्मक्/पुढच्या सीनची नांदी असला, तरी. गजराज राव आणि सई मधले सीन्स, त्यांची जमत चाललेली केमिस्ट्री मस्त आहे.
तिला निदान विसराळू-विनोदी दाखवले तरी आहे. येथे नक्की काय आहे?? >>> येथे दर एपिसोडला चव्हाणचा उच्चार इव्हॉल्व झालेला दिसतो आणि मागे जाउन आधीच्या एपिसोड्समधले उच्चार बदललेले दिसत नाहीत
शाहिदा इतकी टाळाटाळ करत असते तिला विचारताना तरी सईचा "पोलिस सेन्स" काही जागा होत नाही. धूम धाम मधला प्रतीक गांधी "तुम्ही कसले सीआयडी, साधे पोलिसही तुमच्या पुढे दहा पावले आहेत" म्हणतो ते आठवले
वर्षाच्या पोस्ट मधले जर्मनी करता पैसा, सहजपणे विक्री चालणे वगैरे सहमत. बघतानाही हे प्रश्न पडले होते पण सिरीज वेगवान असल्याने दुर्लक्ष झाले.
मला कंटाळवाणी वाटतेय ही सिरीज
मला कंटाळवाणी वाटतेय ही सिरीज. अधूनमधून पाहात होते, पण आता ते ही बंद केलं.
आश्रमचा नवीन सिझन पाहिला का
आश्रमचा नवीन सिझन पाहिला का विचारणार होतो पण त्यावर वर प्रतिक्रिया आली आहे.
Suzhal - The Vortex - Season
Suzhal - The Vortex - Season 2 प्राईम वर आला आहे, मला आवडला . सगळ्यांचीच ऍक्टिंग खूप नॅचरल वाटते. रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवले आहे.
आश्रम फायनल सिझन बघितला . तिसरा सिझन बोअरिंग होता . फॉरवर्ड करून बघितलेला . आताच सिझन Season 3 Part 2 असा आला आहे. चांगला वाटला . शेवट कसा करतात हि उत्सुकता होतीच . जपनाम _/\_
आश्रम सिझन ३ पार्ट २
आश्रम सिझन ३ पार्ट २
शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. अधिक फुलवायला पाहिजे होता. पण एंगेजिंग आहे.
आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बाबा/ हिंदू देवतेची नालस्ती नाही. जपनाम हा शब्दही कुणाचेच नाव नाही..हे विशेष वाटले.
जपनाम!!
बा वरुन तरी ती गुजराथिच असेल
बा वरुन तरी ती गुजराथिच असेल असा समज असतो पण तरी सिरिज मधे कुठेही गुजराथी लकबी गुज्जू मिश्रित हिन्दी दिसत नाही
मराठी मुलिच नाव राजी हे राजश्रीचा अपभ्रश असेल का? राजी हे काही मराठी नाव वाटत नाही..
शबाना साडीही गुज्जू पद्धतीनेच नेसते की! आणि बोलणं, ते गळ्यावरचं गोंदण वगैरेही टिपिकल दाखवलंय.>>> महाराष्ट्रियन लोकामधे काही जातित उलट्या पदराची साडी नेसतात...माझ्या मित्राची आइ नेसायची...गोन्दण वैगरेही होत चेहर्यावर मात्र त्याच्याकडे नाक टोचत नाहित..
शबानाचं काम ओके ओके. काय बोटॉक्स वगैरे झालंय का? सुजलेली वाटलेली, जबडा पण फार उघडत नाही.>>> अगदी अगदी मलाही तेच वाटलेल..हळुहळू अस तोन्डातल्या तोन्डात बोलत राहते..काहिच प्रभाव पडत नाही..त्या रॉकी आणी राणी मधे पण अशिच अवघडलेली वाटत राहते..
बाकी सिरिज बोअर होत नाही पण तरी अजुन चान्गली करता आली असती...
अरे ती राजी असते मराठी, शबाजा
अरे ती राजी असते मराठी, शबाजा गुज्जुच असते, या सिरीज मधे ती गरीबांची सुप्रिया पाठक वाटते,( धुम पळणारी बाहुली
)
गोलीयोंकी रासलीला रामलीला मधल्या दीपुच्या आईवरून इन्स्पायर झालेलं वाटलं शबानाचं कॅरॅक्टर, तो राजीचा नवराही टिपिकल गुज्जुच आहे.
मला ओक्केच वाटली सिरीज, अॅक्टिंग सगळ्यांचं चांगलय, राजी आणि ग्रेट इंडियन माला जास्तं आवडल्या.
मला आत्ता आठवलं, तो राजीचा
मला आत्ता आठवलं, तो राजीचा नवरा जरासा निखिल बने सारखा दिसतो
मला राजीच्या नवऱ्यात जरा
मला राजीच्या नवऱ्यात जरा गोऱ्या दिसायला बऱ्या विजय वर्माचा भास होत होता. बोटॉक्स झाली की बोलताना जबड्याची जी अनैसर्गिक हालचाल होते त्याने अर्धवटराव आठवतो.
हल्ली गोड, बोलके चेहरे, बोलके डोळे वगैरेंची वानवा आहे, वय काहीही असो. सुंदर असूनही गोडवा नसतो. रत्ना पाठक शहा वगैरे चटपटीत वाटतात शबानापेक्षा, ईव्हन सुप्रियातही (किंवा नीना गुप्तातही) गोडवा आहे. शबाना जड वाटते मला नेहमीच, जड रिॲक्शन देते. सौंदर्य काही आपल्या हातात नसतं पण तरूणपणीही उत्फुल्ल वगैरे वाटली नाही. दोन-तीन प्रकारांतच 'इमोट' करता येते तिला.
मलाही काही फार इम्प्रेसिव्ह वाटली नाही सिरीज, पण कधी नव्हे ते या धाग्याची फ्रिक्वेंसी मॅच झाली म्हणून लिहीत सुटले.
'मिठाई' का काय ते मला नावासहित जरा क्रिंज वाटलं सगळं. शेवट तर फा म्हणतो तसा 'लेट डाऊन'च झाला आहे, मारून टाकलं असतं तर चाकोला..श्शा.
शबानाला मागच्या पिढीतले नेपो
शबानाला मागच्या पिढीतले नेपो-चाइल्ड म्हणावे का?
गरीबांची सुप्रिया पाठक >>>>>>
गरीबांची सुप्रिया पाठक >>>>>> हाहा...
शेवटी फक्त 'ने' म्हटलं की गुजराथी ... काय तो शबानाच्या (गुज्जू) कॅरेक्टरचा अभ्यास.
हरी = निखिल बने.. करेक्ट! तसाच दिसतो.
@अस्मिता,
@अस्मिता,

शबाना बद्दल +१
मारून टाकलं असतं तर चाकोला >>> +११ मी फक्त शेवट नीट पाहिला खरंतर. पहिली गोष्ट हीच डोक्यात आली की मुली तुझ्या हातात पिस्तुल आहे तर घाल गोळ्या चाकोलाच. हे काम खरंतर सो कॉल्ड डॉन दाखवलेल्या शबानानेच करायला हवं होतं असं धनिचं मत पडलं.
शबाना मलाही कधी फार आवडली
शबाना मलाही कधी फार आवडली वगैरे नाही. तिची पडद्यावरची बॉडी लँग्वेज नेहमी आता नवर्याला डायव्होर्स देउ की नको विचार करत असल्यासारखी आहे. एकेकाळी तिच्यात आणि स्मिता पाटीलमधे आर्ट सर्कल मधे स्पर्धा असावी. पण स्मिता 'नमक हलाल' सारख्या रोल मधे होती तेव्हा पंजाबी ग्लॅमर नसला तरी तिचा वावर खटकला नाही. शबाना खटकली असती.
कालच डब्बा कार्टेल बघून
कालच डब्बा कार्टेल बघून संपवली. सिरिज ओव्हरऑल आवडली. शेवटचा भाग ‘अरे, काहीपण काय म्हणजे?‘ होता. चाको एकदमच बावळा.
सगळ्यांची कामं तशी चांगली होती वरुणा वगळता. तिच्या कॅरेक्टर, अॅक्टिंग कशातच दम नव्हता. माला एकदमच मस्त. ब्रेकिंग बॅड पाहिलेलं असल्यामुळे विषयात नाविन्य नसलं तरी बायका ड्रग्ज सप्लाय करतायत वगैरे बघायला मजा आली. हिरव्या मिठाईत केवडा इसेन्स घातला होता बहुतेक.
काम खरंतर सो कॉल्ड डॉन
काम खरंतर सो कॉल्ड डॉन दाखवलेल्या शबानानेच करायला हवं होतं असं धनिचं मत पडलं.
शेवटी 'सास मी कभी माफिया थी' होते येथे लिटरली. कुणीही मारा पण मारा एकदाचे.
>>> मलाही पटलं हे.
आता नवर्याला डायव्होर्स देउ की नको विचार करत असल्यासारखी आहे. >>>
ती प्रेमही करतेय असं वाटत नाही त्यामुळे नवऱ्याने दिलाच दगा तरी बॅग तयारच असते 'गगन सदन तेजोमय' करायला असं वाटतं खरं. स्मिता पाटीलचे कन्व्हिक्शन उत्कट वाटते, त्यामुळे तिचं दुःख जास्त पोचतं आणि खरं वाटतं. स्मिता पाटील मला आवडते, नमक हलाल मधेही आवडली. तिच्यासाठी खूप सोपे काम वाटत होतं पण बघताना. शिवाय तिच्यात जो (कुठल्याही भूमिकेत) एफर्टलेसनेस/ सहजता आहे ती शबानात नव्हती कधीच.
आता नवर्याला डायव्होर्स देउ
आता नवर्याला डायव्होर्स देउ की नको विचार करत असल्यासारखी >>>
एकेकाळी तिच्यात आणि स्मिता पाटीलमधे आर्ट सर्कल मधे स्पर्धा असावी >>> अर्थ पिक्चर आठवला. त्यात या दोघी आहेत. ( फॉर अ चेंज, यात नवरा शबानाला डिव्होर्स देतो
)
सास मी कभी माफिया थी >>>
सास मी कभी माफिया थी >>>
बॅग तयारच असते 'गगन सदन तेजोमय' करायला >>>
स्मिता पाटीलबद्दल सहमत.
फॉर अ चेंज, यात नवरा शबानाला डिव्होर्स देतो >>> मला त्यात नक्की कोण कोणाला डायव्होर्स देतो सस्पेन्स होताच. पिक्चर पाहिलेला नाही.
डब्बा कार्टेलमुळे आणि त्या
डब्बा कार्टेलमुळे आणि त्या डिंपलच्या सास-बहू सिरीजमुळे आता गळ्यावर गोंदण केलेली बाई दिसली की "हिचा ड्रगचा धंदा तर नाहीये न?" हा विचार नक्की डोकावणार आहे.
रच्याकने, तरुण काशीच्या गळ्यावर मोजकेच ठिपके होते तर बाच्या गळ्यावर ठिपक्यांची माळच होती. प्रत्येक वाढदिवसाला ती एक ठिपका गोंदवून घेत असावी.
माधव, सही पकडे है. पण हे
माधव, सही पकडे है. पण हे तुम्ही लिहिल्यावर माझ्या लक्षात आले.
प्रत्येक वाढदिवसाला ती एक
प्रत्येक वाढदिवसाला ती एक ठिपका गोंदवून घेत असावी. >>
किंवा झाडांच्या खोडावर दर काही वर्षांनी ती एक लेयर येते तसे 
थोडा विषय बदलून - नेफिवर Running Point नावाची नवीन सिरीज आली आहे. मस्त वाटत आहे. दोन भाग पाहिले काल. सध्यातरी रेको आहे.
इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण
इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण घेणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीचे नाव राजी खटकले नाही की काय ?
हो, तेही ऑड आहे, पण ती निदान नवीन पिढीतली आहे, असेल काहीतरी मॉडर्न नाव असं वाटलं.
<<<<<<
मॉडर्न कसलं आलंय?
कामापुरता मामा, ताकापुरती आजी
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी
हे मराठी गाण्यात कधीच लिहून ठेवले आहे.
असली रत्न फक्त श्र मातेलाच
असली रत्न फक्त श्र मातेलाच हुकमी सापडू शकतात..
त्या डब्बा कारटेल मध्ये
त्या डब्बा कारटेल मध्ये डब्बाच नाही, नुसते लोणचे भरले आहे. काय भरताड केली आहे विषयाची. इतकी बोर सिरियल बरेच दिवसांत पाहिली नव्हती. एक गजराज राव सोडून सगळा आनंदच आहे. फॉरवर्ड करत करत संपवली कशी बशी. इतका चांगला विषय असताना विषयाला सोडून बाकी सगळीकडे लक्ष दिले की कशी सिरियलची माती होते ते यात दिसते.
त्यापेक्षा ती रनिंग पॉईंट मस्त होती. आपल्या सिरियलचा विषय काय आहे ते मेन दिसते. प्रत्येक एपिसोड टीम आणि बास्केटबॉलशी रिलेटेड होता. इतर पाणी घातले तरी बास्केटबॉल मुख्य होता. माफक कॉमेडी पण चांगली जमली आहे. केट हडसन मात्र एकदम खूप वय झाल्यासारखी वाटली. तिचा सगळ्यांत लहान भाऊ मस्त आहे. (स्पॉयलर लिहित नाही.
)
Pages