वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही संथ वाटली दुपहिया. पूर्ण फोकस राहात नाही बघताना.

डाअ‍ॅ सिरीज संपली तेव्हा लॉजिकल एण्ड वाटला होता. तेथून पुढे वाढवणार आहेत की त्यावर पुढे जे दोन पिक्चर्स आले त्या सिरीज मधला आणखी एक येतोय? त्यातला पहिला पाहिला आहे आणि तो ही छान होता. दुसरा अजून पाहिला नाही.

दुपहिया संथ आहे पण आवडली बघायला.

इथे कार्टेल मध्ये शबाना च्या 'बा' वरुन कोणी तरी निना गुप्ताचा 'अचारी बा' बद्दल लिहिलेलं. ती सिरियल होती का सिनेमा माहित नाही पण बघायला चालू केला. बरा वाटत होता, पण त्यात ते कुत्रं आलं आणि आता डॉग हेटरला अब्युज करुन डॉग लव्हर बनवणार का काय वाटू लागल्याने उत्साह मावळला आणि बंद केला टिव्ही.
मला स्वतःला कुत्र्यांबद्दल जराही प्रेम नाही, आणि एखाद्याला नाही आवडत तर गळ्यात टाकण्याबद्दल तिटकारा आहे. त्यात १० वर्षे काही संबंध न ठेवलेल्या आईला केवळ डॉग सिटिंग करायला ८ दिवसांसाठी बोलावणे यात काय गंमत असेल ती असो. मला काही झेपलंच नाही.

ओह अशी स्टोरी आहे का ? मला आचारी बा नावावरून लोणचे करणारी आणि राधिका मसाले टाइप श्रीमंत होणारी बाई अशी स्टोरी असेल असे वाटले.

निना गुप्ताचा 'अचारी बा' बद्दल >>> मीच लिहिलं होतं Happy मला प्रोमो पाहूनच पटलं नव्हतं तिच्या गळ्यात कुत्रं टाकणं. आता तुझ्या पोस्ट्मुळे खात्रीच पटली की बंडल असणार प्रकरण.

अचारी बा अगदी अ‍ॅव्हरेज आहे. तिला काहीही माहिती न देता तिच्या गळ्यात कुत्रं टाकून गेले फिरायला. तिचा मुलगा तर इतका विचित्र दाखवला आहे.

Netflix वर Adolescence बघायला सुरू केली आहे. प
अजून कोणी ही सिरिज बघतय का?
Submitted by अनघा_पुणे on 17 March, 2025 - 04:16

मीही उत्सुकतेने बघायला सुरवात केली . पण पहिल्याच सीननंतर तो मुलगा अस्वस्थपणे रडत असतो ते पाहिल्यावरच नको नको झाले . पुढे काय असणार हे साधारण माहित आहे , एक शॉटचे कॅमेरा वर्क ही ग्रेट आहे . पण मला अशा टीनएज मुलांच्या जीवनातले संघर्ष/त्यांचे होणारे बुलींग पाहणे नको वाटते . पूर्वी एक 'थर्टीन रिझन्स व्हाय' पाहिलेली ती पण प्रचंड डिस्टर्ब करून गेली होती . शेवटच्या भागात त्या मुलीची आत्महत्या आणि नंतर आईवडिलांचा शोक पाहून मलाही रडू आलेलं होतं . adolscence आताशी पहिली १५ मिनीटावरच आहे . बघू कि नको हा विचार चालू आहे .

त्यात १० वर्षे काही संबंध न ठेवलेल्या आईला केवळ डॉग सिटिंग करायला ८ दिवसांसाठी बोलावणे यात काय गंमत असेल ती असो.>>> ओह्ह असं आहे का ते!

ह्या उलट, पाहिलय खर्या जिवनात. आई गंभीर आजारी असताना मुलगा परदेशातून मायदेशी परत जायला काकू करतो(कुत्राला कोण सांभाळेल? त्याला केयर हाऊस ला सोडणे जिवावर येते वगैरे..)
अजून १ दुसरी केस- मुलगी परदेशात बाळंत झाली आणि आई ला परदेशात बोलवले मदतीसाठी. तर आई : भारतात माझ्याशिवाय घरी कुत्र्याचे हाल होतील, मुलीचे बाबा माझ्या इतकं चांगलं नाही सांभाळू शकत, तो (कुत्रा) माझ्याच हातचे खातो. तू कसं पण मॅनेज कर. मला नाही येता येणार.

खरंच ऐकावे ते नवल.

Adolescence >>> मी टाळते हल्ली असल्या गोष्टी. फार डिस्टर्ब व्हायला होतं. विकतचं दुखणं मागे लावून घेतल्यासारखं वाटतं मग.

YOU - नेफ्लि वर आहे. इथे चर्चा झाली होती का पूर्वी ?
थ्रिलर्स आवडत असतील आणि व्हायलन्स झेपत असेल तर पहा.
जो गोल्डबर्ग नावाचा स्मार्ट, चार्मिंग, सभ्य भासणारा माणूस. पुस्तकांचं , त्यात पण क्लासिक्स, रेअर बुक्स चं त्याला प्रेम आहे, पुस्तकांच्या दुकानातच काम करतो. प्रचंड वाचन आहे, साहित्यातले उतारे च्या उतारे लेखकांच्या नावासकट त्याला पाठ आहेत आणि संभाषणात चतुरपणे ते तो सहगत्या पेरून कोणालाही इम्प्रेस करतो. बहुतेकांना तो जेन्युइन, सभ्य, केअरिंग वाटतो पण त्याचा खरा चेहरा वेगळाच अहे. जोच्या ट्रबल्ड चाइलडहूड मुळे आणि नंतरही भेटलेल्या विकृत लोकांमुळे तो ऑब्सेसिव स्टॉकर आणि सिरियल किलर झालेला आहे. ज्यांच्यावर तो प्रेम(?) करतो त्यांना "प्रोटेक्ट" करण्याच्या त्याच्या डिल्यूजनल कल्पनांमुळे त्या व्यक्तींना आणि त्याच्या खर्‍या चेहर्‍याच्या जवळपास जाणार्‍या इतर लोकांना भयाण प्रकारे मरावं लागतं. त्यांना मारताना आणि बॉडी ची विल्हेवाट लावताना त्याला कसलीच अपराधीपणाची भावना वाटत नाही , पण स्वतःला सतत आता मी चांगला माणूस होणार आहे , कुणाला हर्ट करणार नाही असे सांगत असतो. अधून मधून खरोखर काही व्यक्तींना जेनुइन मदतही करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.
४ सीझन्स आहेत, शेवटचा ५ वा सीझन पुढच्या महिन्यात रीलीज होणार आहे . अ‍ॅक्टिंग उत्तम आणि एकूण स्टोरीटेलिंग खूप एंगेजिंग आहे. जो सिरियल किलर आहे, माणसे मरणार हे माहित होऊनही गोष्ट प्रेडिक्टेबल अजिबात होत नाही. ( भरपूर थ्रिलर्स ना सोकावलेल्या मला ही )

** भरपूर क्रीपी, डिस्टर्बिंग आणि वायोलन्ट कन्टेन्ट - कमकुवत मनाच्या लोकांनी वाट्याला न गेलेले बरे Happy ***

मी पण बघ्तेय YOU, प्रचंड खिळवून ठेवणारी, अंगावर काटा आणणारी , ३ सिझन झाले तरी सायको किलरचा थरार कायम.. !
उत्कृष्ट अभिनय , स्टोरी आणि डिरेक्शन !

थँक्स मै! कितीतरी दिवस ही सिरीज नेफिवर दिसत आहे. त्यात एक लायब्ररी पोस्टरही आहे. पण कशी आहे कल्पना नव्हती.

थोडासा दहाड मधल्या विजय वर्माच्या रोलचा भास झाला हे वर्णन वाचून. अर्थात तेथे तो जिला पटवतो तिलाच मारत असतो.

हो मी ही बरेच दिवस पोस्टर पहात होते पण एका कलीग ने रेको दिला म्हणून पहायला घेतली. बरोबर आहे, विजय वर्मा हा रोल पर्फेक्ट करेल .

यू बर्याच आधी पाहिलीये. थरारक आहे. तो लग्न करून मुल झाल्या वर ही हा खेळ सुरूच ठेवतो ते बघितल्या नंतर चा सिजन मग मी नाही पाहिला. मानसिक रित्या थकले. अभिनय, स्टोरी डीटेलींग उत्तम आहे.

बीहांइंड हर आईज बद्दल ही मी लिहिले होते. नेटफ्लिक्स वर खूप आवडलेल्या पैकी ही १. तशी दुसरी सिरीज मला सापडली नाही. तिचा सीजन २ आला का? नेट्फ्लिक्स नाहीये आता.

Adolescent - a young person who is developing into an adult
पौगंडावस्था / किशोरावस्था

कालच आतापर्यंतचे पूर्ण ४ भाग बघितले, पहिल्या भागात १३ वर्षीय जेमी नावाच्या मुलाला पोलीस, आदल्या रात्री घडलेल्या एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करून जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन जातात. त्याला त्याच्या सगळ्या कायदेशीर अधिकारांची माहिती देऊन संमतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. मुलाचे आई (Manda) आणि वडील (Eddie) तोपर्यंत पोलीस सेंटर मध्ये आलेले असतात. एडी जेमीचा appropriate adult असण्यास आणि त्याची तपासणी आणि चौकशी करताना त्याच्यासोबत राहण्यासाठी सहमती देतो. एडी जेमीला एकांतात विचारतो की त्याने गुन्हा केला आहे का आणि त्याच्या नकारावर विश्वास ठेवतो.

तीन दिवसानंतर पोलीस अधिकारी, जेमी (आरोपी) आणि केट (गुन्ह्याची बळी) यांच्या शाळेत पुढील तपासासाठी जातात. त्याच शाळेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगाही शिकत असतो. त्याच्याकडून पोलिसांना जी माहिती मिळते त्यामुळे तपासाची दिशा वेगळ्या वळणावर जाते.

तिसऱ्या भागात मनोचिकित्सक आणि जेमी यांच्यातील प्रसंग अतिशय सुंदररित्या चित्रित केला आहे. जेमीचा मैत्रीपूर्ण, वेड, आक्रमक आणि धमकी देणारा अभिनय योग्यरित्या झाला आहे.

कॅमेरा वर्क एकसलग असून कुठेही खंड नाही. अशाप्रकारे चित्रीकरण करणे खरंच अवघड आहे.

ही वेबसिरीज बरेच काही विचार करायला भाग पाडते. मुला मुलींचा वयात येण्याचा कालावधी बराच कमी झालाय, आणि त्यांना आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करतांना येणाऱ्या अडचणी आणि त्याचा निचरा योग्य पद्धतीने न होता न्यूनगंड, आक्रमकता वाढीस लागते. इंटरनेट, मोबाईल आणि सामाजिक माध्यमे यामुळे आभासी जगतात रममाण होणारी भावी पिढी, त्यालाच पूर्णसत्य मानून अधिकाधिक गुरफटत जात आहे. पालकांनी कितीही डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याचे ठरविले तरी ते अशक्य आहे. विभक्त कुटुंब आणि आई-वडील दोघांच्या कार्यबाहुलतेमुळे अपत्यांकडे द्यायला वेळ कमी पडतो.
दुसऱ्या भागात शाळेत विद्यार्थ्यांमध्ये असणारा शिस्तीचा अभाव आणि अगतिक हतबल शिक्षक व प्रशासन, wokism चा अतिरेकी प्रभाव दाखवतो.
आधुनिकतेच्या नावाखाली आपण किती वाहवत जायचे हे ज्याने त्याने, ज्याच्या त्याच्या समग्र विचारांती ठरवायचे आहे.

Behind her eyes मलाही आवडलेली.

Dead to me बदल मी मागे लिहीलं होतं. Dark humour आहे. मला ही देखील फार आवडली होती.

सध्या The Gift बघायला सुरुवात केली आहे. Gobekli Tepe च्या पार्श्वभूमीवर एक thriller fantasy mystery आहे असं दिसतंय. तुर्कस्तानात बायका मस्त फॅशनेबल राहतात हे समजलं आणि बरं वाटलं.

नेटफ्लिक्स वर The Residence नावाची एक whodunit मालिका आली आहे. आम्हाला खूप आवडली. इतकी की वीकेंडमधे बिंज करून संपवूनच टाकली Proud ही मालिका थ्रिलर पेक्षा ड्रामा जास्त आहे. व्हाईट हाऊसमधली डिपार्टमेंट्स, त्यातली माणसं, त्यांचे इश्यूज, त्यांची कशी कामं चालतात ते सगळं रंजक पद्धतीने मांडलं आहे.
व्हाईट हाऊसमधे चीफ अशरचा खून होतो. ही मिस्टरी सोडवायला एका बेस्ट डिटेक्टिव्हला बोलावलं जातं. तिचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्या अनुषंगाने उलगडणारी व्हाईट हाऊसमधल्या लोकांची - स्टाफ आणि खुद्द प्रेसिडेंटची फॅमिली - इक्वेशन्स याबद्दलची ही मालिका. ती डिटेक्टिव्ह इतकी अफाट आहे! तिची बोलण्याची पद्धत फार आवडली - मोजकं आणि अचूक बोलणं. त्याशिवाय किमान शब्दात कमाल अपमान हा तिचा अप्रोच प्रचंड आवडला Lol ती एक बर्डवॉचर दाखवली आहे. बर्डिंग मधल्या कन्सेप्ट्स ती केस सोडवताना कश्या वापरते ही गोष्ट वेगळी वाटली.

मी पण काल या सीरीज चा पहिला भाग पाहिला. इंटरेस्टिंग वाटला. एक्सेन्ट्रिक डिटेक्टिव हा whodunit मधला यशस्वी फॉर्म्युला आहे. व्हाइट हाउस च्या इस्ट विंग मधले जग बघायला छान वाटतेय.

Adolescent बघितली.
पण मला फारशी आवडली नाही.
मात्र जेमी आणि त्याच्या वडिलांची अ‍ॅक्टींग खूप नॅचरल आहे. बहुतेक वेळेला बॅकग्राऊंड म्युझिक पण नाहीये त्यामुळे वेगळंच वाटत होतं. सायकोलॉजिस्ट आणि जेमीमधला सिन सगळीकडे लिहिलंय हायलाईट आहे पण मला तर नाही कळलं नीट. खूप जास्त संवाद होते, अर्धे समजले पण नाही नक्की तिला काय जाणून घ्यायचंय.
फक्त शेवटी जेव्हा तो मी स्टेटमेंट बदलणार म्हणतो तेव्हा पॅरेंट्साठी फार वाईट वाटलं.

rmdला मोदक. मलापण आवडली the residence.
समोरच्या माणसाला बोलतं करण्यासाठी ती जो लुक देते तो भारी आहे एकदम.

मेडिकल ड्रामा आवडत असतील तर the pitt बघा. खूप छान आहे. हॉटस्टारवर आहे. दर शुक्रवारी नवा एपिसोड येतो.

हॉटस्टारवरच paradise पण चांगली आहे.

मागे एकदा इथला रेको वाचून Big Little Lies नोंदवून ठेवली होती, ती नुकतीच बघितली. (हॉटस्टार)
चांगला सस्पेन्स होता शेवटपर्यंत,
पण मध्ये काही एपिसोड्स जरा बोअर झाली. ७ ऐवजी ४/५ एपिसोड्समध्ये संपवता आली असती.
तरी शेवटचा एपिसोड खूप उत्कंठावर्धक निघाला. स्टोरीत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटना आहेत. त्यातल्या एकातला कलप्रिट कोण असेल याचा माझा अंदाज बरोबर आला. बाकीचे २ गेस करता आले नाहीत. त्यामुळे शेवटच्या भागात जरा मजा आली.
कलाकार चांगले आहेत.
रीस विदरस्पून मला आवडत नाही हे पुन्हा एकदा जाणवलं.

टायटल साँग आवडलं.

दुसरा सीझन सुद्धा आहे. पण तो बघावासा नाही वाटला.

लले, रीस विदरस्पून book lover आहे. तिचं insta account आहे पुस्तकांकरता. आता तुला ती कदाचित आवडू लागेल.

Pages