Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा, संदेश कुलकर्णी म्हणजे
जाई. - धन्यवाद. आठवले पिक्चरचे नाव.
फा, संदेश कुलकर्णी म्हणजे गरीबांचा टूको सालामान्का वाटला की नाही? >>>
हो
बाय द वे तो "संतोष" नुकताच पाताल लोक मधेही होता ना? हाथीरामला तेथे तो लोकल ड्रायव्हर व खबर्या टाइप मिळतो तो? प्रतीक पचौरी नाव दिसते त्याचे.
मी पण पाहिली डब्बा कार्टल.
मी पण पाहिली डब्बा कार्टल. दोन दिवसांत पूर्ण केली. सई च्या डब्यात चवळी बघून उसळही करून झाली. सुरवातीला खूप वेळ लागतो पकड घ्यायला, शिवाय गजराज रावचे पात्र लवकर एस्टॅब्लिश होत नाही. सईची एनर्जी पण लो वाटली आधी. त्यामानाने माला, राजी, शाहिदा आवडल्या. ज्योतिकाचे काम हल्ली माधवनच्या 'शैतान' मधेही आवडले होते. इथेही आवडले. जिशू सेनगुप्ता ( विद्या बालन सोबत 'शकुंतला देवी, कंगणा सोबत 'क्वीन ऑफ झांसी' व 'टाईपरायटर' नावाच्या हॉरर सिरीज मधे होता. ) मला एकदम देखणा बंगाली नट वाटतो.यातही टॉक्सिक कंट्रोलिंग आणि प्रत्यक्ष असुरक्षित नवरा म्हणून आवडला. शबाना आझमी काही रेग्युलर बा नसणार हे आधीच लक्षात आले होते. त्यात फरहानचे प्रॉडक्शन आहे.
राजी आधी 'महाराज' आणि रणवीर सिंह सोबत 'जयेशभाई जोरदार' मधे होती. खूपच गोड चेहरा आहे तिचा त्यामुळे तिने मेथ कुटून तयार केलेली आवडली. इतका गोड माफिया आधी पाहिला नव्हता. लिलियट दुबे छोट्या रोलमधे मस्त. सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा सोबत बघून इथेही कधीही कॉमेडी करेल वाटायचे.
**** स्पॉइलर ****
शेवटी मात्र राजी लिलियटला मारण्याऐवजी चाकोला मारू शकली असती असे वाटले. अनभिषिक्त वगैरे होण्यासाठी. मी फक्त सगळ्या स्त्रिया प्रोटॅगनिस्ट दिसताहेत, तेही एकदम वेगवेगळ्या वयाच्या आणि पार्श्वभूमीच्या, शिवाय या आता ड्रग माफिया होणार म्हटल्यावर काय वेगळं आहे बघावे म्हणून सुरू केली. चुलीवरचे कोकेन किंवा करा घरच्याघरी फेंटनिल वगैरे.
>>> शेवटी मात्र राजी लिलियटला
**** स्पॉइलर ****
>>> शेवटी मात्र राजी लिलियटला मारण्याऐवजी चाकोला मारू शकली असती असे वाटले.
हो हो - आदित्य तेच म्हणत होता! त्यालाच का नाही मारलं! बहुधा तिचा तेवढा क्रिमिनल प्रेझेन्स ऑफ माइंड तयार झाला नसावा अजून - कदाचित बंदूक मालाच्या हातात असती तर तिने तो चान्स घेतला असता.
माला जरा संयत कमी आहे.
माला जरा संयत कमी आहे. राजीकडे शांतपणे विचारपूर्वक खून पाडायला लागणारे जिगर आहे. माला शूर आहे, दूरदृष्टी नाही. ती ही आहे त्यामुळे मला पर्सनली आवडलं असतं तिनं अनभिषिक्त वगैरे होण्यासाठी तो आणि त्याचा पंटर दोघांनाही उडवलेले बघायला. महत्त्वाकांक्षा बघायला आवडली असती. दुसऱ्या सिझनला दुसरा लूजर आणताच आला असता यांना स्पर्धा म्हणून. याने जरा 'किकॲस पीक' मिळाले असते.
राजी फुलटाइम क्रिमिनल व्हायला
राजी फुलटाइम क्रिमिनल व्हायला राजी नाही फक्त.
आपण मात्र रेड्डी आहोत
राजी फुलटाइम क्रिमिनल व्हायला
राजी फुलटाइम क्रिमिनल व्हायला राजी नाही फक्त >>>
"रेड्डी"चा सिरीजशी काही संबंध आहे का? की फक्त लो-कॉण्टेक्स्ट फाको?
अरे तुम्ही स्पॉईलर दिलात. माझा शेवटचा भाग बघून व्हायचा आहे. पण यात कोणीतरी कोणालातरी मारणार हे उघड आहे. मला गेले २-३ भाग बा त्या "च्यव्हाण" ला उडवेल असे वाटत होते
बाकी मराठी कॅरेक्टर्स मराठी उच्चार इतके भीषण करतात हे पाहून मालिका अगदीच रिअलिस्टिक वाटली
त्यापेक्षा रणवीर सिंग पाहा. त्याचा "बाजीराव" मधेच जे मराठी बोलतो ते अस्सल/सहज वाटते. इव्हन त्याचे त्या पिक्चरमधले हिंदी मराठी अॅक्सेण्ट वाले वाटते.
सई च्या डब्यात चवळी बघून >>> मला अंधुक लक्षात आहे की ती सुद्धा "च्यवळी/च्यवली" असे काहीतरी म्हणते. इथे तर कॅरेक्टरच काय, इव्हन अॅक्ट्रेसही मराठी आहे.
>>> अरे तुम्ही स्पॉईलर दिलात.
>>> अरे तुम्ही स्पॉईलर दिलात.
मी नाही दिला, आधी अस्मिताने दिला.
>>> मराठी कॅरेक्टर्स मराठी उच्चार इतके भीषण करतात हे पाहून मालिका अगदीच रिअलिस्टिक वाटली... ती सुद्धा "च्यवळी/च्यवली" असे काहीतरी म्हणते. इथे तर कॅरेक्टरच काय, इव्हन अॅक्ट्रेसही मराठी आहे
चवळी मराठी नसेल.
मला शबाना जगताप असून गुज्जू कशी असा प्रश्न पडला - जगताप गुज्जूही असतात का?
रेड्डी"चा सिरीजशी काही संबंध
*स्पॉयलर अलर्ट दिले.
रेड्डी"चा सिरीजशी काही संबंध आहे का? की फक्त लो-कॉण्टेक्स्ट फाको?
मी पण राजी लिहून जोकची री ओढू शकले असते पण च्यवळी खाल्ल्याने की काय आता सुचले. 
>>> काही संबंध नाही, फाको सुद्धा नाही.
च्यव्हाण" ला उडवेल असे वाटत होते >>>
मला त्या उच्चाराने लवकर उडवले तर बरे वाटले. च्यवळी परवडली यापुढे. शबाना च्यव्हाणला, 'तुझ्या पोराच्या डब्यातल्या वडापाव मधे ड्रग आहे' असे सांगत धमकावते ते आवडले. सतत स्त्रियांना पोरांसाठी पुरुषांपुढे अगतिक होताना पाहिल्याने हा बदल एकदम 'फ्रेश' वाटला.
मला शबाना जगताप असून गुज्जू कशी असा प्रश्न पडला - जगताप गुज्जूही असतात का?
>>> इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण घेणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीचे नाव राजी खटकले नाही की काय ? आता लग्नानंतर बदलले असेल म्हणणार असाल तर शबानालाही डिस्काउंट द्यावा लागेल. तसाही तिचा ह्या दोन नंबरच्या धंद्याला सोडण्यासाठी आयडेंटिटी बदलण्याचा उल्लेख आहे. तेच यावेळी लिलियटला करायचे असते पण ती अडकते. तेव्हा चाको म्हणतो, अंडरवर्ल्ड मधे फक्त यायचा रस्ता आहे, परत जायचा नाही. मी मनात म्हटलं 'हो, हो. माबोवरही असंच आहे साधारण.'
मी बाजीराव मस्तानी पाहिला नाही फा.
पण असेल.
सिरीजचा वेग युनिफॉर्म नाही. सुरवातीला संथ, मधे कधी संथ- कधी वेगवान आणि शेवटी वेगवान झाली आहे. गजराज रावला नेहमी विचित्र, एक्स्सिंट्रिक भूमिका व विचित्र केस का देतात काय माहीत. कामाकडे लक्ष जायचे सोडून केसांकडे जाते. जेनिफर ॲनिस्टनच्या कॅरेक्टरचीही फ्रेंड्सच्यावेळी बदललेल्या केसांचीच चर्चा अभिनयापेक्षा जास्त व्हायची. ही आपली 'रेचल' आहे.
इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण
इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण घेणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीचे नाव राजी खटकले नाही की काय ? >>>
ही आपली 'रेचल' आहे >>>
"बा" बद्दल - मराठी कुटुंबातही अशी ऑड संबोधने असतात बर्याचदा. माझ्या आईच्या आईला सगळेच 'मा' म्हणत. माँ चे मराठीत "मा" झाले होते. आम्ही नातवंडेही मा च म्हणायचो. त्यामुळे ते "बा" संबोधन स्पेसिफिकली खटकले नाही. शबानाचे बाकी वागणे, उच्चार अजिबात मराठी वाटत नाहीत. राजीचेही. पण शबानाचे कॅरेक्टर मूळचे मराठी नसेल अशी एक पळवाट आहे.
>>> कामाकडे लक्ष जायचे सोडून
>>> इथे डोहाळजेवणाला धनुष्यबाण घेणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीचे नाव राजी खटकले नाही की काय ?
हो, तेही ऑड आहे, पण ती निदान नवीन पिढीतली आहे, असेल काहीतरी मॉडर्न नाव असं वाटलं.
>>> कामाकडे लक्ष जायचे सोडून केसांकडे जाते.

मी त्या रोलमध्ये पंकज त्रिपाठीही कल्पून पाहिला. पण असले रोल केलेत त्याने आधीही. आणि गजराजनेही चांगलं केलं आहे काम.
तो जिशू 'क्रिमिनल जस्टिस'मध्येही होता आणि काजोलबरोबर 'द ट्रायल'मध्येही - तो लबाड नवर्याच्या रोलमध्ये टाइपकास्ट झाला म्हणायचा आता.
नाही, शबाना साडीही गुज्जू पद्धतीनेच नेसते की! आणि बोलणं, ते गळ्यावरचं गोंदण वगैरेही टिपिकल दाखवलंय.
नाहीतर मराठी बा म्हणायला माझ्या बाचं काय जातंय!
मी चालू केली पण एंगेजिंग न
मी चालू केली पण एंगेजिंग न वाटल्याने उत्साह मावळला आणि सोडून दिली.
तो लबाड नवर्याच्या रोलमध्ये
तो लबाड नवर्याच्या रोलमध्ये टाइपकास्ट झाला म्हणायचा आता.
>>> होऊदे, होऊदे. असेना का लबाड फारच देखणा आहे तो. बंगाली लोक म्हटलं की मी आधीच क्रश होऊन जाते.
नाहीतर मराठी बा म्हणायला माझ्या बाचं काय जातंय!
आई गुजराती आणि वडील मराठी करून दोघांना मिळून 'बा-बा ब्लॅकशीप' म्हणता येईल. काही सांगता येत नाही. आपण आपलं तयार राहावं.
>>>>
फा, शबानाचेच कशाला इथे सईचेही उच्चार धड नाहीत. तेथे तर पळवाटही नाही.
ओके, मग फरहानच्या लाइनमधून
ओके, मग फरहानच्या लाइनमधून बाहेर पड.
>>> सईचेही उच्चार धड नाहीत. तेथे तर पळवाटही नाही
ती सई ताम्हनकर आहे हीच पळवाट नाही का?
मुंबईत नीट उच्चार करनारी लास
मुंबईत नीट उच्चार करनारी लास मराठी व्यक्ती बघुन किती दिवस झाले? आमच्या मराठीच्या बाईपन धड उच्चार करत नसत. काही पन अपेक्षा तुमच्या.
मग फरहानच्या लाइनमधून बाहेर
मग फरहानच्या लाइनमधून बाहेर पड. >>>
ते विसरून जा. एकावेळी अनेक लाईन्सचा फास्ट पास ठेवलाय. येथे काय नांदायचं थोडीच्चे. 
सहमत आहे अमित.
>>> मुंबईत नीट उच्चार करनारी
>>> मुंबईत नीट उच्चार करनारी लास मराठी व्यक्ती बघुन किती दिवस झाले?
काहीही हं अमित!
ती सई ताम्हनकर आहे हीच पळवाट
ती सई ताम्हनकर आहे हीच पळवाट नाही का? >>> म्हणजे "ताम्हणकर" असायला पाहिजे अशा अर्थाने का? पण तिचेही उच्चार धड नाहीत हे बरोबर. आपण एखाद्या अमराठी व्यक्तीशी बोलताना कधीकधी मराठी शब्दांचे उच्चार उगाचच हिंद्याळलेले करतो तसे ती पूर्ण सिरीजभर बोलते.
मग फरहानच्या लाइनमधून बाहेर पड >>> क्लेव्हर
ते धनुष्यबाणाचे लॉजिक काय होते? बदाम शेप मधून बाण वगैरे म्हणावे तर मदनबाण आधीच सुटलेत त्याचे प्रूफ ऑलरेडी मिळाले आहे. त्याकरताच हा समारंभ आहे
आणखी कसले बाण सोडतायत आता?
काहीही हं अमित! >>> अशा
काहीही हं अमित! >>> अशा व्यक्ती आता मुंबईत नाहीत अशा अर्थाने म्हणायचे असेल त्याला
डब्बा कार्टेल झाली बघून. मला
डब्बा कार्टेल झाली बघून. मला आवडली बघायला. पुढच्या सीजनला अजून चांगली होण्याचे पोटेन्शियल आहे.
मला पण वाटले, राजीने चाको ला का नाही उडवले! पलिकडच्या कुरियर वाल्याला गोळीचा आवाज आलाच असता. टुको चव्हाण ला बा ठोकेल असेही मला वाटले
मला माला फार आवडली! मस्त काम केलेय. शाहिदा , सई चे काम पण चांगले आहे.
बघणे लिस्टीत टाकली डब्बा
बघणे लिस्टीत टाकली डब्बा कार्टेल.
कुणी जिद्दी गर्ल्स पाहिलीत का? पहिले २ एपि फेमिनिजम च्या नावाखाली मुक्त से.. & थोबाडाला येईल ते बोलणे अशी फिलिंग येत होती. एपि ४ पासून जरा पकड घेते मालिका. रेवती & नंदिता दास बर्याच काळाने दिसल्यात.
सिमरन कंविंसिंग वाटली रोल मधे. ती त्रिशा कॅरॅक्टर डोक्यात जात होती वाया गेलेली मुलगी. मजा मारायला वेगळ्याच मुलाला (बॉयफ्रेंड दुसराच असून) सरळ घरीच बोलवते आई घरात असून. फार आश्चर्य वाटले. आया इतक्या बेफिकीर असतात का? कॉलेज ला न जाता घरी विडिओ गेम वर पडीक असते..
पाताल लोक सिजन 2 पाहिला.
पाताल लोक सिजन 2 पाहिला.
मस्त , क्रिस्प एकदम.
स्टोरी, सस्पेन्स चांगला.
काही ठिकाणी लूप होल वाटले पण ठीकच. फार मोठे नाही.
सगळ्यांनी अभिनय उत्तम केलाय.
हाथिराम तर भूमिका जगतोय हा ऍक्टर.
संवाद देखील चुरचुरीत.
मला डाय हार्ड आठवला काही संवादावेळी.
"बिना चौड का चौधरी देखा है"
"हम गली क्रिकेट के लोंढे है, वहापे बडा IPL चल रहा है, संभलंके"
अन्सारी आणि त्याचे गाडी थांबवून बोललेले संवाद ज्यात त्याला अन्सारी च्या love angle बद्दल कळालेले असते, त्याला तर मी फार हसलो. विनोदी नाहीये पण ती परिस्थिती आणि हाथीराम चे एकूण character अशी ती मजा.
बिंज watch काल केले.
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
डब्बा कार्टेल.. बर्याच
डब्बा कार्टेल.. बर्याच दिवसांनी बिंज वॉच केलं काहीतरी.

ते ड्रग पिऊन बघणं वगैरे जरा उगीच वाटलं. पण मालाचं हसणं
आणि तिचे काही काही पंचेस... जबरी!
इंगेजिंग वाटली मस्त.. वर लिहिलेल्यासारखंच वाटलं राजीने चाकोला का नाही मारलं??? आपल्या सगळ्यांची डोकी कशी एकसारखीच चालतात
राजी म्हणजे मला आधी राजश्री, राजेश्वरी असं काहीतरी असेल वाटलेलं.
ते धनुष्यबाणाचे लॉजिक काय होते? >>>>>>>>>धनुष्यबाण असतोच की डोजे मधे. लॉजिक नाय माहित त्यामागचं पण सगळ्या फोटूत बघितलाय. नव्या जुन्या.
संदेश कुलकर्णी = गरीबांचा टूको
तो सिनिअर सोकुलचा कोणी आहे का? दोघांचे आवाज सेम सर्दटलेले, बद्द येतात. भाऊ-बहिण असावे.
शबाना सुरूवातीला त्याला चवन चवन म्हणते, मग कधीतरी चवान म्हणते, कधी चव्हन!
ज्योतिकाचे डोळे एकदम विझलेले आहेत. बाकी बर्याच वेळा तिच्यामधे मला मृकु चा भास झाला.
शाहिदा आणि माला एनर्जीच्या बाबतीत सारख्याला बारक्या
शबानाचं काम ओके ओके. काय बोटॉक्स वगैरे झालंय का? सुजलेली वाटलेली, जबडा पण फार उघडत नाही.
गजराज सर रॉक्स अॅज ऑल्वेज!
सई पण ठिकच. ती सोसायटी चेअरमन तिजोरी म्हणजे ती मिठाच्या जाहिरातीतली ना? फ्री फ्लो नमक वाली. ते एक्स्प्रेशन्स भारी होते तेव्हाचे. तिचं काम थोडं असलं तरी चांगलंय.
बाकी ब्रेबॅची आठवण येणं अपरिहार्यच !
>>> तो सिनिअर सोकुलचा कोणी
>>> तो सिनिअर सोकुलचा कोणी आहे का?

हो, सख्खा भाऊच.
आणि अमृता सुभाष त्याची सख्खी बायको.
तिजोरी - सुश्मिता मुकर्जी
तिजोरी - सुश्मिता मुकर्जी किटी फ्रॉम करमचंद. अनॉयिंग चांगली वाटते ती.
धनुष्यबाणाचं लॉजिक ठोकून देत आहे. बहुतेक ते बाळ शूरवीर व्हावे रामासारखे वगैरे म्हणून, शिवाय चांदण्यातले डोहाळजेवण असलं की हेच चंद्रावर बसवून बासुंदी ओरपतात. त्याने काय बाळ ॲस्ट्रॉनॉट होते की काय माहीत नाही. पण मदनबाण मात्र विसरूनच जा 'स्त्री ही क्षणाची पत्नी अनंतकाळची ई.... ' वगैरे संस्कृतीत फक्त बाळासाठीच असतं नंतर सगळं. प्रतिकंही तशीच असणार ना मग.
हो, ज्योतिकाचे डोळे डिप्रेस्ड वाटतात. त्यामुळे ती काळजीतच दिसते कायम. ते आपोआपच सूट होते येथे.
>>> तिजोरी - सुश्मिता मुकर्जी
>>> तिजोरी - सुश्मिता मुकर्जी किटी फ्रॉम करमचंद.
हो, सर्वात रीसेन्टली 'आजा नचले'मध्ये बघितल्याचं आठवतंय तिला.
>>> बहुतेक ते बाळ शूरवीर व्हावे
हो. पण एक होडीतलंही करतात. एक बागेतलंही. एकूण बाळाच्या करिअरच्या दृष्टीने शक्य तितके बेसेस कव्हर करायचा उद्योग वाटतो.
हो, सख्खा भाऊच. Happy >>>
हो, सख्खा भाऊच. Happy >>> तरीच
आणि अमृता सुभाष त्याची सख्खी बायको.>>>>>>>> तरीच (हे आपलं असंच :हाहा:)
धनुष्यबाणाचं लॉजिक ठोकून देत आहे. बहुतेक ते बाळ शूरवीर व्हावे रामासारखे वगैरे म्हणून, शिवाय चांदण्यातले डोहाळजेवण असलं की हेच चंद्रावर बसवून बासुंदी ओरपतात. त्याने काय बाळ ॲस्ट्रॉनॉट होते की काय माहीत नाही.>>>>>>>>>> या लॉजिकने नावेतले डोजे, बागेतले डोजे आठवले
राजीचे डोहाळे भलतेच म्हणायचे! काय होईल तिच्या बाळाचं.. धनुष्य कसलं हिने डायरेक बंदूकच चालवली
मदनबाण मात्र विसरूनच जा
मदनबाण मात्र विसरूनच जा 'स्त्री ही क्षणाची पत्नी अनंतकाळची ई.... ' वगैरे संस्कृतीत फक्त बाळासाठीच असतं नंतर सगळं >>>
शबाना सुरूवातीला त्याला चवन चवन म्हणते, मग कधीतरी चवान म्हणते, कधी चव्हन! >>>
मलाही असेच वाटले. इव्हन इतर पात्रेही याचे कोणतेही व्हेरिएशन वापरतात आणि नेहमी तेच म्हणतात असेही नाही. अशाने उद्या वैद्यनाथ च्यवनप्राशकडेही संशयाने बघतील.
फाइण्डिंग नीमो मधे डोरी त्याला कधी एल्मो, कधी फाबिओ, बिंगो वगैरे म्हणते ते लेजेण्ड लेव्हल असले, तरी हे च्यवन किमान अॅडल्ट लेव्हल आहे
बाळाच्या करिअरच्या दृष्टीने
बाळाच्या करिअरच्या दृष्टीने शक्य तितके बेसेस कव्हर करायचा उद्योग वाटतो. Proud>>>>>>>>> राम, नावाडी, अॅस्ट्रोनॉट आणि माळी
Pages