Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> म्हणून इथेही तो सहृदय
>>> म्हणून इथेही तो सहृदय वगैरे असेल असेच वाटत राहते
हा छुपा स्पॉइलर आहे का?
'हॅन्डमेड्स टेल'मध्ये दिसला होता ब्रॅडली व्हिटफर्ड.
हा छुपा स्पॉइलर आहे का? >>
हा छुपा स्पॉइलर आहे का? >> मी थोडा विचार करत होतो स्पॉईलर होईल का, पण अगदी थोडा रोल आहे त्याचा आणि ही माहिती डोक्यात ठेवून तुम्ही सिरीज पाहिलीत तरी काही फरक पडणार नाही
एकूण राजकारणातील गुंतागुंत फार मस्त घेतली आहे. यातले राजकारण म्हणजे व्हाइट हाउस किंवा काँग्रेस किंवा इव्हन राज्य/स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधींचे राजकारण नव्हे. ज्यांच्या हातात आर्थिक नाड्या आहेत ते इतरांचा कसा केवळ फायदा करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना वापरतात त्यांचे राजकारण, त्यातील प्यादी म्हणजे "चांगल्या किंवा वाईट हेतूने प्रेरित असलेले पण त्या मर्यादित अर्थाने सच्चे" लोक - तो भाग थोडा क्लिष्ट आहे, पण मस्त आहे.
हॅण्डमेण्ड्स टेल सुरू केली होती. मधेच सोडून दिली.
magpie murders सीजन १ बघून
magpie murders सीजन १ बघून संपवला . दूसरा चालू केला . "total reco"
अरे ही तर आजच्या कथेत दिसणारी लोकच पुस्तकाच्या कथेत दिसतायेत . थोड्या वेगळ्या रोलमध्ये . असं वाटत असतानाच , हळूहळू असं का ते कळतं . Brent the gardener बघून फुटलेच मी . त्या अगोदर किती वेळ विचार करत होते हा माणूस सध्याच्या जगात कोण आहे ..
शेवट थोडा फिल्मी वाटला . Anagram ची उकल पण far stretched वाटली .
पण एकंदरीत बघायला मजा आली . त्या गावात जाउन रहायला आवडेल काही दिवस .
कपिल शर्मा शो वर प्रमोशन
कपिल शर्मा शो वर प्रमोशन बघितल्याने सहज बॉलिवूड वाईव्ज vs फॅब्युलस लाईव्ज सिझन ३ चे थोडे एपिसोड्स बघितले.
काहीही म्हणजे काहीही आहे.
देल्ही vs बॉम्बे (हा त्यांचा शब्द आहे) एवढी हेट, मग ओजी वाईव्ज आणि नवीन आलेल्या तिघी यांची जुगलबंदी.
शालिनी पस्सी हि बाई ठार वेडी आहे असं वाटतं. खूप पैसै असूनही ते लपत नाहीये. तिचा नवरा फार म्हणजे फार सहनशील असावा असं जाणवलं.
पेज ३ लाईफ टीपी म्हणून बघायला ठीक होते आधीचे २ सिझन त्यातल्या त्यात. आता तिसरा सिझन मात्र ओढून ताणून अश्लील, घाण, उगाचच लाईम लाईट मध्ये राहण्यासाठी वाद, खोटे अश्रू ढाळणे असे काहीही बटबटीत आहे. शालिनी नावाची व्यक्ती जास्त वेळ स्क्रीन वर बघणे फार इरीटेटिंग आहे.
या सगळ्यामुळे त्यांची मॉरीशस ट्रीप होती तिथपर्यंत कसेतरी बघून सोडून दिली.
अजून कोणी बघतं का?
मी हे असले रिअॅलिटी शो‘ज
मी हे असले रिअॅलिटी शो‘ज बघणं इमॅजिनही करु शकत नाही. काहीच खरं नाही. सगळा खोटेपणा, शॉ ऑफ जो सहन होत नाही.
बघतो मॅडनेस. हल्ली एकदम पोकळी
बघतो मॅडनेस. हल्ली एकदम पोकळी आहे, काहीच बघावसं वाटून स्टिक होत नाहीये. काही तरी हवंच आहे.
नेफ्लि वर डिप्लोमॅट चा दुसरा
नेफ्लि वर डिप्लोमॅट चा दुसरा सिजन बघितला. मनोरंजनाच्या मीटर मध्ये पास होणारी सिरिज आहे. पुढे काय होईल ह्याची उत्सुकता वाटल्याने पूर्ण बघितली जाते. तिसरा सिजनही काढता येईल अशा प्रकारे संपवली आहे.
त्यानंतर वेळ न दवडता सुचवलेली ' द ब्लॅकलिस्ट ' सुरू केली. एफ बी आय, सी आय ए, के जी बी, मोसाद आणि व्हॉट नॉट मंडळींनी ओतप्रोत भरलेली सिरिज आहे. एकंदर कथानक आणि सिजन्स ची संख्या (१०) पाहता एकच एपिसोड बघूया, म्हणून सुरू केली तर आतापर्यंत तीन सिझन संपले. श्रेय अर्थात मुख्य पात्र - रेमन ' रेड ' रेडींग्टन, म्हणजेच जेम्स स्पेडर!
माजी अमेरिकन नौदल अधिकारी असलेल्या रेडींग्टनला गुन्हेगार म्हणून फरारी घोषित केलेलं असतं. तो अचानक एके दिवशी एफ बी आय समोर प्रकट होऊन आपल्याकडे जगातील कुख्यात आणि डेंजर लोकांची यादी आहे असे सांगतो. त्यांचा खातमा करायला मदत करायची तयारी दर्शवतो, अट फक्त एकच - एलिझाबेथ कीन - लिझ नावाच्या मोबाईल इमर्जन्सी साईक एजंटलाच माहिती सांगेन.
आता हे असच का असा प्रश्न आपल्यासकट एलिझाबेथ आणि एफ बी आय ला पडतो. मग एकामागून एक गुन्हेगारांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खातमा. त्यात एफ बी आय, सी आय ए, के जी बी आणि व्हॉट नॉटच्या नेटवर्क ला लाजवेल असं रेडींग्टन चं नेटवर्क असतं.
एपिसोड गणिक रेडींग्टन आणि लिझचं नातं उलगडत जातं.
जास्त डोकं न लावता सिरिज बघावी. तसंही आपल्याला ( मिथुन आणि मं चे) हिंदी सिनेमे बघायची सवय आहे. इथे प्रत्येक वेळी नवा क्रिमिनल आणि नवी मज्जा!
अजून एक म्हणजे, कोबेन च्या हिरो चा धाकटा भाऊ शोभावा असा कीन चा नवरा घेतलाय.
मॅडनेस चालू केली काल. आवडते
मॅडनेस चालू केली काल. आवडते आहे.
मॅडनेस चालू केली काल. आवडते
मॅडनेस चालू केली काल. आवडते आहे-+१
ब्लॅकलिस्टचे एक दोन सीझन
ब्लॅकलिस्टचे एक दोन सीझन पाहिल्याचे आठवते. पुढे का बघितली नाही लक्षात नाही. जेम्स स्पेडर "बॉस्टन लीगल" मधे खूप आवडायचा. ती बघितली नसेल तर बघा. मस्त आहे.
हुलू वर "हाय पोटेन्शियल" नावाची सिरीज आहे. वरती कोणीतरी लिहीले होते. एक भाग बघितला. मस्त आहे. पुढे कळेल की किती एंगेजिंग आहे. Psych सारखाच गुन्ह्यातील डिटेल्स मधून इतरांना न दिसलेल्या खाचाखोचा शोधून तो सोडवणे हा मुख्य भाग आहे. फक्त "साइक" मधे तो वरकरणी "सायकिक" कौशल्ये आहेत असे दाखवत असतो तसे इथे नाही. तिची कौशल्ये ती स्वतःच उघडपणे सांगते.
"दीवार" मधला "उफ्फ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श" संवाद बहुतेकांना माहीत असेल. त्याची एक विनोदी व्हर्जन यात ऐकली.
"These are not technicalities. These are laws, principles that I have devoted my life to protecting"
"Jesus, I thought my life was sad"
ब्लॅकलिस्ट बघायला सुरूवात
ब्लॅकलिस्ट बघायला सुरूवात केली. हाणामारी, पकडापकडी आवडत असल्याने आत्तापर्यंतचे एपिसोडस् आवडते.
जेम्स स्पेडर "बॉस्टन लीगल"
जेम्स स्पेडर "बॉस्टन लीगल" मधे खूप आवडायचा. ती बघितली नसेल तर बघा. मस्त आहे >> नोटेड.
जेम्स स्पेडर चं डिक्शन छान आहे, त्यामुळे लीगल ड्रामा मध्ये नक्कीच धमाल केली असेल.
जेम्स स्पेडरचं काम आणि
जेम्स स्पेडरचं काम आणि कीनच्या नवऱ्याचं जे काही रहस्य आहे ते चांगलं आहे. बाकी त्या एजंट कीन व रेसलरनेच प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी प्रिपेअर न करता जाणं, व्हिलनशी लंबी चौडी फिलॉसॉफिकल डिस्कशन्स, आम्हाला जी शंका २-३ एपिसोडमध्ये आली तो प्रकाश कीनच्या डोक्यात १० एपिसोड झाले तरी न पडणं, एफबीआय एजंटने केस मोकळे सोडून पाठलाग करणं, कुठल्याही मोठ्या संकटातून वाचली तरी फक्त डाव्या भुवईच्या वर सौंदर्याला मारक न ठरता पुरक ठरणारी एकमेव जखम असणं, स्पेडरने सांगितलेल्या बेसिक गोष्टी एफबीआयला माहिती नसणे, इंडस्ट्रीअल एरीआत पाठलाग करायला जाताना ठाक ठाक वाजत लांबून व्हिलनला वर्दी देतील असे शुज घातलेले असणं (रबरी सोलचे शुज वगैरे ऐकलंच नसावं का एफबीआयने?) वगैरे वगैरे पाहून जुना हिंदी पिक्चर पाहिल्याचा फील येतोय. तरी वेगवान व एपिसोडवाईज कथा असल्याने अजून तरी बोअर होत नाहीये.
अगदी अगदी. त्यातील एफ बी आय
अगदी अगदी. त्यातील एफ बी आय ची कामाची एकंदरीत पद्धत बघता एफ बी आय ला मराठीत 'वराती मागून घोडे ' म्हणत असावेत असं एखाद्याला वाटेल. सगळीकडे उशीरा पोहोचतात.
जेम्स स्पेडर चं डिक्शन छान
जेम्स स्पेडर चं डिक्शन छान आहे, त्यामुळे लीगल ड्रामा मध्ये नक्कीच धमाल केली असेल. >>> हो तसेच आहे. ती सिरीज कॉमेडी नव्हे पण याने त्यात मजा आणली आहे. कॉमिक आणि सिरीयस दोन्ही टाइपच्या सीन्स मधे.
"हाय पोटेन्शियल" चांगली आहे. फार डीप कथानक, गुंतागुंतीचा ड्रामा वगैरे नको असेल, लाइट क्राइम सिरीज, थोडी कॉमिक हवी असेल तर आवडेल. संवाद मस्त आहेत. कधीकधी एकदम खुसखुशीत आहेत.
माझेमन पुन्हा थोडी बघायला पाहिजे.
अनु, आश्रम चा पुढचा सिझन आला
.
आश्रम चा पुढचा सिझन आला आहे!
आश्रम चा पुढचा सिझन आला आहे!
>> खरंच????????????????????
कुठे? कधी? MX Player ॲप वरच का?
मी एवढ्यात चेक केलं होतं तेव्हा २०२२ नंतर काहीही भाग आले नव्हते. पण त्यांनी कुठे कुठे जाहिरात करायला सुरुवात केली आहे ज्याने नवीन सिझन आला की काय असे वाटते आहे.
नवीन सिझन आला तर इकडे नक्की सांगा लोकहो.
MX Player ॲप वरच का? >> आता
MX Player ॲप वरच का? >> आता अमेझॉन प्राइम वर पण MX प्लेयरचे कार्यक्रम दिसतात. तिथे तर तीनच सीझन आहेत.
सॉरी लोकहो.
सॉरी लोकहो.
मलाही ती जाहिरात सारखी येत होती..आणि वेगळे बॅनर/ चित्र होते...सो मला वाटले नवीन सिझन आलाय.
Ohhh छल्ला, अमेझॉन वरची
Ohhh छल्ला, अमेझॉन वरची जाहिरात बघून सगळ्यांचाच गोंधळ होतो आहे. It's ok.
मध्यंतरी बरेच हॉरर, थ्रिलर
मध्यंतरी बरेच हॉरर, थ्रिलर सिनेमे/ मालिका पाहिल्या म्हणुन नेटफ्लिक्स व प्राईम दुसरं काही सुचवेचना. किलर नॅनी, मर्डरर स्टेपफादर, सायको गर्लफ्रेण्ड असलेच सगळे दाखवायला लागले दोन्हीकडे. म्हटलं टीव्ही पहाणे बंद करवतात की काय दोन्हीही. मग कॉमेडी शोधायला सुरुवात केली पण ते इतके बंडल निघाले की काय बोलावं! शेवटी खूप पुर्वी पाहिलेलेच ‘मॉल कॉप’ दोनही भाग पाहिले, तेव्हा जरा बर्या सुचवण्या येऊ लागल्या. तेव्हाच नेटफ्लिकवर जुनी मालिका ‘अगली बेट्टी‘ दिसली. ट्रेलर भलताच आवडला व पहायला सुरु केली व इतकी आवडली की बास!!! सध्या दुसरं काहीच पहात नाहीये. अजुनही नसेल पाहिली तर पहा.
अगली बेटी मी टीव्हीवर पाहिलीय
अगली बेटी मी टीव्हीवर पाहिलीय. मस्त आहे. त्याची आवृत्ती आपल्याकडे निघाली होती - जस्सी जैसी कोई नही. पुढे नेहमीच्या वळणावर गेली.
Black doves बघययं का कोणी ???
Black doves बघययं का कोणी ???
जस्सी जैसी कोई नही. पुढे
जस्सी जैसी कोई नही. पुढे नेहमीच्या वळणावर गेली. >> मग काय तर.
अग्ली बेटी छान आहे सिरीज. मला
अग्ली बेटी छान आहे सिरीज. मला आवडली होती. ड्रामा, ह्यूमर वगैरे कॉम्बिनेशन चांगले होते.
लॉ अँड ऑर्डर-SVU ही माझी खूप
लॉ अँड ऑर्डर-SVU ही माझी खूप वर्षांपासूनची आवडती सिरीज आहे. त्यांचे भरपूर सीझन्स पण आहेत. पण. काहै वर्षांपासून त्यांनी पर एपिसोड चार्ज करायला सुरुवात केल्यापासून बघणं बंद केलं. आता आयपी टिव्हीवर दिसतेय तेव्हा आता सुट्टीत जमेल तितकं बघणं आलं.
मला एक प्रश्न पडलेला आहे...
मला एक प्रश्न पडलेला आहे...
आजकाल या सगळ्या वेब सिरीज ह्या जवळपास ८०% इंग्लिश मध्येच असतात. फारच कमी हिंदी संवाद.
सुरुवातीला येणारी हिंदी रंगीन पाटी तर आता इतिहासजमा झालेली आहे
नेटफ्लिक्स वर parenthood
नेटफ्लिक्स वर parenthood पहायला सुरु केली आहे. ज्यान्ना modern family टाइप्स बघायला आवडते , त्यान्ना आवडेल.
इथे कोणी युट्युबवर इंडीयाज
इथे कोणी युट्युबवर इंडीयाज गॉट लेटेन्ट पाहत नाही का? शिव्या भरपूर आहे पण समय रेनाचे काहीकाही जोक्स आवडतायेत.
लॉ अँड ऑर्डर-SVU ही माझी खूप
लॉ अँड ऑर्डर-SVU ही माझी खूप वर्षांपासूनची आवडती सिरीज आहे. त्यांचे भरपूर सीझन्स पण आहेत.
>> +१२३
मला हि सिरीज कुठे दिसते ते सुद्धा माहित नाही . पण फेसबुक व्हिडीओज मध्ये यातल्या एपिसोड्स चे एडिटिंग करून बऱ्याच जणांनी बऱ्याच पेजेस वर अपलोड केले आहे. कधीतरी एखादा एपिसोड समोर आल्यावर लाईक केला गेला आणि मग अल्गोरिदम नुसार एकामागोमाग एक बरेच रॅन्डम एपिसोड्स दिसत गेले. मला अजूनही मूळ सिरीज कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर आहे ते माहित नाही आणि माझे नक्कीच बरेच एपिसोड्स बघायचे शिल्लक आहेत पण मूळ एपिसोड्स बरेच मोठे (फेसबुकवर व्हिडीओ टाकलेले असतात त्यापेक्षा) आणि संथ असतात असे लक्षात आले आहे. एकवेळ एकदम ऍडिक्ट झाले. आणि मुलगा (वय वर्ष ७) सारखे "मला पण काय बघतेस ते एक्सप्लेन कर" म्हणू लागला जे अश्या सिरीज मध्ये अजिबात शक्य नव्हते . त्यामुळे आपोआप ते बंद पडले.
सेम मला 'ग्रे'ज ऍनॉटॉमी' , ' द घोस्ट व्हिस्परर' आणि 'कॉल द मिडवाईफ' सिरीज विषयी झाले. मूळ सिरीज कुठे बघायला मिळेल माहित नाही. फेसबुकवर बघणे सोपे पडते आणि वेळ वाचतो . त्याहून मी एन्जॉय करते ते फेसबुकवर व्हिडीओ असतात तेव्हा कमेंट्स सेक्शन मध्ये त्या त्या एपिसोड्स वर लोकांनी मजेमजेच्या, कधी गंभीर अश्या कमेंट्स आणि चर्चा केलेल्या असतात. तिकडे बोलायला मजा येते . शिवाय एकाच गोष्टीकडे जगभरातील वेगवेगळे लोक किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात हे वाचून आपलाही विचारांचा परीघ विस्तारतो .
फेसबुकवर या सिरीज बघण्यातला एकमेव तोटा म्हणजे बरेचदा काही काही पेजेस वर अपलोड केलेल्या व्हिडीओज मध्ये कॉपीराईटचा भंग होऊ नये म्हणून ऑडिओमध्ये काहीतरी एडिटिंग करून ठेवलेले असते ज्यामुळे सारी पात्रे हेलियम वायू तोंडात धरून बोलत आहेत असा कार्टून टाईप आवाज येतो त्यांचा. आणि मूळ सिरीजमध्ये जे टेक्स्ट असते तेही मिरर इमेज दिसते (हे लॉ अँड ऑर्डर-SVU मध्ये खूप जाणवते कारण त्यात मध्ये मध्ये स्थळांची नावे टेक्स्ट मध्ये असतात ) .
Pages