Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंट्रेस्टींग पोस्ट पर्णीका >>
इंट्रेस्टींग पोस्ट पर्णीका >>> +१. थोडं मोठं झाल्यावर ऋग्वेद वगैरे लक्षात आलं गं. पण तेव्हा लहान असताना हे सगळं कुठलं माहिती असायला
थॅंक्यु अस्मिता, तुमचा
थॅंक्यु अस्मिता, तुमचा लेखाबद्दल उत्सुकता वाटतेय, लगेच वाचते.
रमड, सॉरी तु ह्या अर्थाने म्हणत होतीस हे लक्षातच आले नाही मघाशी. त्या संदर्भात बोलायचे तर मी खरं म्हणजे भारत एक खोज बघितलीच नाहीये. त्याच कारण ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह. जवळपास प्रत्येक ऐतिहासिक थीम मध्ये हेच दोघे असायचे मालिकेत. म्हणजे रामायण कालात पण हेच आणि शिवाजी महाराजांच्या काळात पण. मला फार वैताग यायचा या गोष्टीचा. त्यामुळे ते कॅची टायटल साँग आणि नेहरुंच स्वगत झाले की (हमखास) ओम पुरी चा चेहरा दिसायचा आणि मी वैतागून टीव्ही त्याग करायचे. त्यामुळे हम-तुम एक ही नावं के प्रवासी:).
DD's comedy show : Non stop
DD's comedy show : Non stop nonsense बघतोय पुन्हा एकदा.
हिंदी डब्ड बघू नका. कुणीfunction at() { [native code] }अरी अपलोड केलेत. तेच सर्च मधे वर येतात.
ओरिजिनल दहा भाग आहेत.
पुन्हा चार कि पाच भागाची मिनी सिरीज आली होती,ते सापडत नाहीत भाग.
तुम्ही वाचलेला आहे आणि
तुम्ही वाचलेला आहे आणि तुम्हाला आवडल्याचा अभिप्रायही आहे पर्णीका. सहज आठवले आणि लिहिले. पण उत्सुकता दाखविल्याबद्दल धन्यवाद.
म्हणजे रामायण कालात पण हेच आणि शिवाजी महाराजांच्या काळात पण. मला फार वैताग यायचा या गोष्टीचा.>>> हो.
अस्मिता सॉरी मला वाटले तुम्ही
अस्मिता सॉरी मला वाटले तुम्ही अजुन एक लिहीलाय. हा विषय आणि तुमचे लिखाण दोन्ही आवडते त्यामुळे सहसा वाचला नाही असे होत नाही. पण एकंदर आज माझा दिवस नाही हेच खरे. माझा डिस्ने कार्टुन मधला गुफी झालाय :).
रामायण कालात पण हेच आणि
रामायण कालात पण हेच आणि शिवाजी महाराजांच्या काळात पण >>>
हम-तुम एक ही नावं के प्रवासी >>> अगदी अगदी!
असू द्या पर्णीका, हाकानाका.
असू द्या पर्णीका, हाकानाका.
विषय आणि तुमचे लिखाण दोन्ही आवडते त्यामुळे सहसा वाचला नाही असे होत नाही. >>> धन्यवाद. मलाही तुमचे प्रतिसाद आवडतात, अभ्यासपूर्ण असतात.
भारत एक।खोज टायटल सॉंग मलाही
भारत एक।खोज टायटल सॉंग मलाही आवडते फार
त्यासाठी एपिसोड संपूर्ण बघायचो , अर्थात हे रिपीट टेलिकास्ट एका वर्षी झालेले तेव्हा. सगळे एपिसोड नाही पाहिलेत.
भारत एक खोजमधले के के रैना,
भारत एक खोजमधले के के रैना, अंजन श्रीवास्तव , अनंग देसाई, पल्लवी जोशी हे जास्त लक्षात आहेत. ओम पुरी आणि नसीर माहितीचे होतेच. आता श्रेयनामावली पाहिली तर इर्फान खान, पीयुष मिश्रा अशीही नावं दिसताहेत. बहुतेक सगळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकलेले. पुन्हा एकदा पहावीशी वाटली मालिका.
अ टीचर - हॉटस्टार (भारतात). -
अ टीचर - हॉटस्टार (भारतात). - बरंचसं कथानकच लिहितोय - त्यामुळे बरेच स्पॉयलर्स.
अमेरिकेतल्या एका गावातल्या एका शाळेत क्लेअर विल्सन ही नवी इंग्लिश टीचर येते. एरिक वॉकर आणि त्याचे मित्र तिला पाहतात आणि क्या माल है टाइप कमेंट करतात. एरिक वॉकर युनिव्हर्सिटी अॅडमिशनच्या एंट्रन्स टेस्टची तयारी करत असतो. त्याची आई सिंगल पॅरंट. दोन धाकटे , , बरेच लहान भाऊ. आईला हातभार म्हणून तो एका डायनरमध्ये (रेस्टॉरंट?) काम करून पैसे कमवत असतो. आपल्या परिस्थितीची त्याला जाण आहे , असं तो दाखवतो. क्लेअरशी बोलणं काढतो आणि तिला फुकटात ट्युशन द्यायला राजी करतो. तीही चटकन राजी होतेच.
पहिल्याच एपिसोड मध्ये क्लेअर एका दुकानातून लिपस्टिक वा तत्सम वस्तू ढापते. आणि नवर्याला सुद्धा सांगते. त्यात सहजपणा असतो, गिल्ट नसतो. म्हणजे मी काही रोज चोर्या करत नाही. तर अशा प्रकारे ती लूझ कॅरॅक्टरची आहे, हे आपल्याला सांगितलं जातं. नवरा थकून घरी आला तरी त्याच्याकडून शारीरिक भूक भागवून घेते. फेसबुक / इन्स्टावर वा तत्सम साइटवर एरिकचा मेसेज पाहून त्याच्याबद्दल फँटसाइझ करते.
एरिकही धुतल्या तांदळासारखा नसतोच. ड्रग्ज घेतो. मैत्रिणीसोबत मजा करतो. दारू पिताना पकडला जातो. पोलिस क्लेअरचा भाऊ आहे हे लक्षात आल्यावर तिला फोन करून मला सोडव म्हणून सांगतो. आणि तीही सोडवते. शाळेत एरिक क्लेअरचं चुंबन घेतो. ती त्याला झापते. मग हा हार्ड टु गेट असल्यासारखा दाखवून तिला जवळ खेचत राहतो. आणि व्हायचं ते किंवा होऊ नये ते होतं. त्याच्या वाढदिवसाला म्हणून ती त्याला दोन दिवस बाहेर फिरायला घेऊन जाते. आता हा तिच्या प्रेमात पडलाय म्हणतो. परत आल्यावर तिच्या चेहर्यावर प्रेमाचे रंग बघून शाळेतली मैत्रीण तिला खोदून खोदून विचारते आणि ही सांगून टाकते. मैत्रीण शॉक्स. स्टुडंट सोबत संबंध? तो १८ वर्षांचा आहे, कन्सेन्ट दिली होती, पहिलं पाऊल त्यानेच उचललं यातलं तिला काही पटत नाही. ती ऑथोरिटीजना रिपोर्ट करते. दुसर्या दिवशी सकाळी एरिकच्या घरी पोलिस. आम्हांला सगळं माहीत आहे, असं त्यांनी सांगितल्यावर हाही सांगतो. तोवर तिलाही आपण हे काय करून बसलो, असं झालेलं असतं, म्हणून ती आपल्या नवर्याला सगळं सांगून टाकते. तो हिच्या भावाला बोलवतो.
एरिकची आर्ची झालेली असते. तो त्याच्या परश्याला म्हणजे क्लेअरला म्हणतो, आपण पळून जाऊ. आणि हे दोघे एका मोटेलमध्ये रात्रीचे थांबतात. पण सकाळी टाळकं ठिकाणावर आल्यावर तिला न सांगता घरी परततो. दरम्यान क्लेअरचा नवरा तिला फोनवर सांगतो - पोलिस म्हणतील तू आता किडनॅपिंग केलंस. क्लेअर सरळ सरेंडर करते आणि तुरुंगात जाते.
एरिकला युनिव्हर्सिटी की कॉलेज कुठे ती अॅडमिशन मिळते. क्लेअर शिक्षा भोगून बाहेर येते. भाऊ आपल्या घरी नेतो. कारण तिच्या नवर्याला आता डायव्होर्स हवा असतो. क्लेअरची वहिनी तिची पाहुणी चित्रपटातली आशा काळे करते. मग ही बापाकडे येते. याच्या मद्यपानाच्या व्यसनामुळे तिचं बालपण असुरक्षित गेलं हे बोल ण्यातून कळतं. तिला जॉब मिळणं कठीण. शिवाय पोलिसांत रिपोर्टिंग करा, ट्रॅकर घाला. तरी टिंडरवर डेट शोधते. क्लेअर आणि एरिक -दोघांची कीर्ती दिगंतात पसरलेली असते. त्यांना डेट करणारे आपण टीचर स्टुंडट संबंध ठेवणार्यांना डेट करतोय, यातून किक घेतात. आता बाईंना पश्चात्ताप होऊ लागतो. तिकडे एरिकचं घरंगळणं सुरू होतं. आणि तो कॉलेज सोडून घरी येतो. मला मदतीची गरज आहे, असं आईला सांगतो. आई अर्थात क्षमाशील आणि समजूतदार.
इथे मला क्लेअर बिचारी वाटायला लागली होती. आणि एरिकही तिच्याइतकाच दोषी. त्यालाही तसंच वाटत असतं. तिच्या वाताहतीला आपणसुद्धा जबाबदार .
मग सरळ दहा वर्षांची लीप आणि शेवटचा एपिसोड.
क्लेअर आपला नवरा आणि दोन मुलींसोबत वडिलांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसासाठी गावात परत येते. एरिक त्याच्या शाळेच्या बॅचच्या रियुनियनसाठी म्हणून परत येतो. जुन्या मित्रांना भेटतो. हे याच्यासारखे घरंगळलेले नसावेत.
दरम्यान तो इथे नसतो. दहा वर्षांत आपले भाऊ केवढे मोठे झाले म्हणतो. दोघे एका सु परमार्केटमध्ये भेटतात. हा अवघडून बाहेर पडतो. ती याला मेसेज करते - अजून हा तुझाच नंबर असेल तर मला तुला भेटायचंय.
बाई विद्यार्ध्याची माफी मागतात. माझं वैवाहिक जीवन धड नव्हतं. त्यातून असं घडलं. मी असं वागायला नको होतं. तिचा भूतकाळ माहीत असूनही तिला स्वीकारणारा नवरा तिला मिळालाय . (हे तिचेच शब्द). पण तिला नोकरी मिळू शकत नाही.
विद्यार्थी आता बिथरलाय. तूच मला जाळ्यात अडकवलंस. एकेक उदाहरण देतो. तुझ्यामुळे माझं आयुष्य वाया गेलं. इ.इ. माफ करत नाही. त्याचे भाऊ आता त्याच्या तेव्हाच्या वयाचे झालेत. त्यांना बघून म्हणे त्याला वाटतं की आपण तेव्हा किती साधेभोळे, अजाण असू.
बरेच प्रश्न आणि गुंडाळलेला शेवट. नक्की काय सांगायचंय याबाबत गोंधळ.
उगाच गूढ वगैरे पण वाटायचं.
उगाच गूढ वगैरे पण वाटायचं. मला उगाचच त्या सिरीजमधे कधीतरी युनिव्हर्स कसे निर्माण झाले वगैरे दाखवतील असं वाटायचं. पण काहीतरी भलतंच दाखवत राहिले ते शेवटपर्यंत
>>>> मलाही ते गूढ वाटायचे आणि सीरिअल समजण्याइतकी अक्कल नव्हती. नेहरू सेंटर मध्ये कायमस्वरूपी भारत एक खोज चे प्रदर्शन (सीरिअल नव्हे) असते. ते एकदा निवांत बघायचे आहे.
भारत एक खोज ही मालिका
भारत एक खोज ही मालिका नेहरूंच्या डिस्कवह्री ऑफ इंडीया या पुस्तकावर बेतलेली आहे.
इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनीअर्स मधे भरलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात सवलतीत घेतले होते. पुढे वाचून एका वाचनालयाला भेट दिले.
'कसा पिसारा फुलला' >> हे
'कसा पिसारा फुलला' >> हे पिक्चरचे नाव आहे? >>> नाही नाही. भरपूर पिसं काढता येणारी मालिका आहे - म्हणून पिसारा
माधव, समान्थाची ना. >>> अस्मिता, हो तीच ती.
DD's comedy show : Non stop
DD's comedy show : Non stop nonsense कुठे बघताय?
पुढे वाचून एका वाचनालयाला भेट
पुढे वाचून एका वाचनालयाला भेट दिले
क्या बात, पुस्तके अशी सहजासहजी हातावेगळी होत नाहीत, सोडवत ही नाहीत. तुमचे अभिनंदन.
मा़झ्या एका वरीष्ठांनी
मा़झ्या एका वरीष्ठांनी त्यांच्या गावाला गरीब मुलांना युपीएससी / एमपीएससी परीक्षेची तयारी करता यावी म्हणून वाचनालय सुरू केलं होतं. जवळपास सर्व पुस्तकं त्यांनीच विकत घेतली होती. हे समजल्यावर मी माझ्याकडची जीकेची आणि अशी विशेष पुस्तकं देऊन टाकली.
र आ मस्तच, तुमचे वरिष्ठही
र आ मस्तच, तुमचे वरिष्ठही ग्रेट.
भारत एक खोज गाजलेली मालिका, त्या वेळी आवर्जून बघितलेली आहे. परत बघायला हवी.
डिप्लोमॅटचा सीझन-२ आलाय.
डिप्लोमॅटचा सीझन-२ आलाय.
अमेरिका ब्रिटन डिप्लोमसी ड्रामा. पहिल्या सीझन सारखाच रतीब आहे. पण हल्ली गेल्या एक दोन महिन्यात काहीच क्लिक होत न्हवतं ते हा शो बरा आहे. दोन एपिसोड बघितले. बघणेबल.
DD's comedy show : Non stop
DD's comedy show : Non stop nonsense कुठे बघताय? >> youtube
२०२१ मध्ये Special ops 1.5
२०२१ मध्ये Special ops 1.5 आली होती. मी सिझन 1 बघून एकदम फॅन झाले होते. काही अर्धवट बघण्यापेक्षा पुढे सिझन 2 आला की बिंज करू असे म्हणून पेंडींग ठेवली होती.
पण आता २०२५ येऊ घातलं तरी पुढच्या सिझनचा पत्ता नाही म्हणून आज सिझन 1.5 बींज केले मी.
१. जुने काही म्हणजे काहीच आठवत नव्हते तरी आवडली.
२. केके चे डोळे असे वेगळ्या रंगाचे होते का आठवत नाही. पण या सीझनला कलर्ड लेन्सेस फार खटकल्या.
३. अर्धाच सिझन असल्यामुळे चारच एपिसोड असल्याने अर्थातच समाधान झाले नाही.
४. करिश्मा अगदीच मख्ख वाटत होती. तिच्या डोळ्यांमुळे की कश्यामुळे ते सांगता येणार नाही.
५. मनिंदर ने सहज शक्य असताना विजय सोबत हिम्मत ला का उडवले नाही ते कळलं नाही.
६. मनींदर ची स्टोरी अर्थातच अर्धवट राहिली.
७. हनी ट्रॅप करणे / होणे इतके सोपे आहे का? इतक्या लोकांना बॅक टू बॅक सहज हनी ट्रॅप केलेलं दाखवलं. इंटेलिजन्स वाल्यांकडे हा ट्रॅप टाळण्यासाठी काही उपाय नाहीत का?
८. हनी ट्रॅप वाले लोक आत्महत्या करताना दाखवले आहे. निदान त्या लंडन मधल्या माणसाने तरी हिम्मत वर विश्वास ठेवायला हवा होता.
९. अनिताचे लखनऊ आणि लंडन हे मी सुद्धा पकडले. इन्फॅक्ट.. हिम्मत आणि अनिता एकत्र असताना वाजलेली सिग्नेचर शिट्टी सुद्धा मनिंदरची होती. त्याचे पण पुढे काहितरी यायला हवे होते.
१०. अनिताला उडवायचेच होते तर सेफ हाऊस मध्ये ठेवले कश्याला?
मला फ्रीलांसर सीझन दोन बघायचा
मला फ्रीलांसर सीझन दोन बघायचा आहे, मुहूर्त मिळत नाहीये. बघेन लवकरच, होप सो.
Magpie Murders ( सिझन १ - ६
Magpie Murders ( सिझन १ - ६ एपिसोड्स्). Moonflower Murders (सिझन २ - ६ एपिसोड्स)
भारत - सोनी लिव, अमेरिका - अॅमेझॉन प्राईम
ही एक फारच छान ब्रिटिश सिरीज पाहिली. नावावरून लक्षात येईलच की ही मर्डर मिस्ट्री आहे. पहिला सिझन आहे Magpie Murders. तो बघून झाला माझा. आता Moonflower Murders बघायला घेतलाय.
प्लॉट : एका ख्यातनाम लेखकानं - Alan Conway - नुकतीच एक मर्डर मिस्ट्री लिहिली आहे आणि त्याचं हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. यासाठी त्यानं कथेचा मसुदा त्याच्या नेहमीच्या पब्लिशर्सना पाठवला आहे. त्याच्या एडिटरकडे - Susan Ryeland - ते प्रिंट आउटचं बाड आल्यावर जेव्हा ती गोष्ट वाचायला घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्यातला शेवटचा चॅप्टर ज्यात खुनी कोण हे समजतं ते गहाळ आहे. मग तिचा शोध सुरू होतो आणि यात तिला मदत करत असतो तो लेखकाचा फेमस मानसपुत्र डिटेक्टिव्ह Atticus Pünd.
त्याचबरोबर एकीकडे अॅलनच्या या भावी पुस्तकातल्या स्टोरीचा प्लॉटही सुरू आहे कारण तिथेही खून झाले आहेत. त्यामुळे भूतकाळातले मर्डर्स आणि आताचा मर्डर यांची शोधकाहाणी आलटून पालटून येत राहते. हे फारच छान गुंफलं आहे. भरीत भर म्हणून लेखकानं त्याच्या जीवनातल्या ज्या लोकांवर पुस्तकातली पात्रं बेतली आहेत, त्या दोन्ही भुमिका वठवणारे अॅक्टर्स तेच आहेत त्यामुळे ती एक गंमत आहे.
सुरेख बांधीव कथामांडणी, गुणी कलाकार, नेत्रसुखद ब्रिटिश व्हिलेज यामुळे ही सिरीज नक्की बघा असं सुचवेन. रहस्य फार काही धक्कादायक वगैरे नाही पण एकूणात योग्य वळणं, वळसे घेऊनच ते कळतं आणि नीट लक्ष दिलं तर आधीच कळतं. मला एका प्लॉटमधला खुनी चौथ्या एपिसोडमध्ये कळला.
मामी , thanks for recco .
मामी , thanks for recco . आताच बघायला सुरवात केलीय. तिसर्या भागापर्यंत येऊन पोहोचले.
भूतकाळातले मर्डर्स आणि आताचा मर्डर यांची शोधकाहाणी आलटून पालटून येत राहते. हे फारच छान गुंफलं आहे.
सुरेख बांधीव कथामांडणी, गुणी कलाकार, नेत्रसुखद ब्रिटिश व्हिलेज >>>>>> +100000.
"द मॅडनेस" - नेफि. नवीन
"द मॅडनेस" - नेफि. नवीन लिमिटेड सिरीज आली आहे. लिमिटेड सिरीज म्हणजे एकच सीझन व ७-८ भाग असे काहीतरी असावे. मधे दोन तीन अशाच पाहिल्या होत्या.
चांगली वाटते. एंगेजिंग आहे. कोलमन डोमिंगो मला "फिअर द वॉकिंग डेड" मधे माहीत आहे. त्याचे इतर काही काम आहे का माहीत नाही. इतर कोणी कलाकार ओळखीचे नाहीत. सीएनएन मधला एक पार्ट टाइम रिपोर्टर एक पुस्तक लिहीण्याच्या प्रयत्नात असताना बहुधा एकांत हवा म्हणून जंगलातील एका केबिन मधे राहायला जातो. तेथे एका व्हाइट सुप्रीमसिस्टचा खून होतो. तो याने केलेला नाही हे सुरूवातीलाच दाखवले आहे. पण तो स्वतः आफ्रिकन-अमेरिकन असणे, त्याची व याच्या वडिलांची हिस्टरी, त्याने नेटवर्क वर बोलताना केलेली वक्तव्ये - वगैरे सगळे पोलिस व इतरांना त्याच्याबद्दलच संशय निर्माण करते. पहिला भाग साधारण इथपर्यंत आला आहे. व्हाइट सुप्रीमसिस्ट लोक, ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ,अॅण्टिफा आणि मिडिया याबद्दल वरवर ढोबळ न दाखवता त्यातले राजकारणही यात दिसेल अशी चुणूक पहिला भाग बघताना दिसली. पुढे त्यात किती सखोल जातील माहीत नाही.
नेफी वर FISK बघितली . छान आहे
नेफी वर FISK बघितली . छान आहे . witty कॉमेडी आहे . दोन सीजन. बिंज केली .
Netflix वरच , Man on the
Netflix वरच , Man on the inside - light comedy , detective type series आहे. डोक्याला फारसा ताण न देता बघण्यासाठी. सगळे characters and actors एकदम lovable आहेत.
फिस्क चे एक दोन भाग बघितले
फिस्क चे एक दोन भाग बघितले होते. मजेदार आहे. ऑस्ट्रेलियन आहे ना?
Man on the inside - light comedy , detective type series आहे >>> नेफि सारखी जाहिरात दाखवत आहे. बघायला पाहिजे.
द मॅडनेस - पुढे चांगला वेग पकडला आहे. मस्त आहे. पहिल्या भागात इतर कोणी ओळखीचे दिसले नव्हते. आता ब्रॅडली व्हिटफोर्डही दिसला (वेस्ट विंग मधला "जॉश")
स्पेशल ऑप्स 1.5 बघितली.
स्पेशल ऑप्स 1.5 बघितली.
मस्त आहे. काहीकाही लूप होल्स आहेतच अर्थात.
मणिन्दर यांचा दुश्मन का होतो? त्याला तर केके ने. वाचवले असते ना?
आणि खरेच हनी ट्रॅपिंग फारच ओबव्हियस दाखवले आहे...
पण द्रोण शूटिंग फार मस्त आहे.. कीव्ह वगैरेचे
एवढ्यात Netflix ने रेको
एवढ्यात Netflix ने रेको केल्याने Bollywood Wives - Fabulous Lives की काय आहे त्या सिरिजच्या दुसऱ्या सिझनचे काही भाग बघितले.
नक्की त्यातलं मला (किंवा इतर प्रेक्षकांना) काय आवडतंय हे कळलं नाही पण बऱ्यापैकी खिळवून ठेवतात बरेच भाग.
हे लोक समोर कॅमेरा लावलेला असताना आपला घरातला आपल्याच लोकांसोबत असलेला वावर सहज कसा ठेवत असतील याचे आश्चर्य वाटले. हेही सगळे scripted आहे / असेल का? एनी आयडिया? एक प्रकारचे बिग बॉसच आहे हे. फार फरक नाही.
द मॅडनेस बघून झाली. नक्कीच
द मॅडनेस बघून झाली. नक्कीच "रेको" आहे. एंगेजिंग आहे एकदम शेवटपर्यंत.
फक्त शेवट जसा केला आहे त्यातील एक कथाभाग मला नीट समजला नाही. बर्याच जणांचे बघून झाले की बोलू. कारण त्याचा उल्लेख मोठा स्पॉईलर होईल.
ब्रॅडली व्हिटफोर्डला अगदीच थोडा रोल आहे. त्याचे द वेस्ट विंग मधे कायम बघितलेले काही मॅनरिजम्स इथेही ओळखू येतात. त्या कॅरेक्टरचाच इफेक्ट म्हणून इथेही तो सहृदय वगैरे असेल असेच वाटत राहते तो बहुधा ब्रूकलिन ९११ मधेही होता. ती मी अगदी तुकड्यातुकड्यात पाहिली आहे. पण तो अचानक पुन्हा गेल्या २-३ वर्षांत दिसू लागला आहे असे वाटते. मधली १०-१५ वर्षे काय करत होता कोणास ठाउक. फ्रेण्ड्स व वेस्ट विंग संपल्यावर त्याला आणि मॅथ्यू पेरीला घेऊन अॅरॉन सॉरकिननेच "Studio 60 on Sunset Strip" नावाची एक सिरीज सुरू केली होती. ती बहुधा एकच सीझन टिकली. तिच्याबद्दल मिक्स्ड रिव्यूज वाचले आहेत.
Pages