..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्रं 8/६१
भारताचं पहिलंवहिलं Manned Space Mission उड्डाणासाठी सज्ज झालेलं असतं. यानात स्क्वॉड्रन लीडर अभिषेक कुमार आणि फ्लाईंग ऑफिसर गौरी नटराजन हे दोघे अंतराळवीर बसलेले असतात. त्यांचं मिशन असतं चंद्राच्या पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं. कारण तिथे अनऑबटेनियम या धातूचे साठे असल्याची शंका शास्त्रज्ञांना असते. ते दोघे फार भावविवश झालेले असतात. कारण ते नुसतेच सह-अंतराळवीर नसतात तर मिशन ट्रेनिंगच्या दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. ग्राउंड कंट्रोल फायनल काउंटडाऊन सुरु करतो. तेव्हा ते हातात हात घेऊन हे गाणं म्हणतात.

मानव, करेक्ट.
अभिषेक: चलो दिलदार चलो चांद के पार चलो
गौरी: हम है तय्यार चलो...

एक आई तिच्या लहान मुलाला संडासात बसवून आपल्या कामांना निघून जाते. बराच वेळ झाला तरी आतून 'धुण्याची' ऑर्डर निघत नाही. तर ती कुठलं गाणं म्हणेल?

कौन नहीं है बंद यहाँ
धुआं धुआं

अशी सुरुवात असलेलं एक तमिळ गाणं सापडलं

माझेपण एक सोपे- हिरो आणि हिरोईन समोरासमोर संडास करायला कमोड वर बसले आहेत... शी होतेय का विचारण्यासाठी हिरो कोणते गाणे म्हणेल...

सुनो, कहो,
कहा, सुना
कुछ हुआ क्या
अभी तो नहीं
कुछ भी नहीं

८/६४
"सायंकाळी डिंक (दिल्यास) कुणाच्या तरी पार्श्वभागावर लत्ता प्रहार करा, आम्ही (आधीच) डिंकमय आहोत." हे सांगायला तो गाणे म्हणेल?

बरोबर वावे.
शाम-ए-गम kick some ass गमगी है हम.

बापरे ! Lol
तलत च्या गोड गाण्याचा पार लत्ता प्रहारच केला!!
Happy

मानव... Lol

मला ती दुसरी ओळ 'आज गम ही है गम' आहे असं वाटत होतं. आज कळलं.

@ मामी,
सुटलं ना.
एक आई तिच्या लहान मुलाला संडासात बसवून आपल्या कामांना निघून जाते. बराच वेळ झाला तरी आतून 'धुण्याची' ऑर्डर निघत नाही. तर ती कुठलं गाणं म्हणेल?

आई - सुनो,
मूल - कहो,
आई - कहा,
मूल - सुना
आई - कुछ "हुआ" क्या
मूल - अभी तो नहीं
कुछ भी नहीं

Submitted by MazeMan on 7 July, 2023 - 10:04

कोडं क्र. ८/६५

अमावस्येची रात्र. कबरस्तानातील पिंपळावरून हडळ आणि मुंजा खाली उतरले. काही तासांपूर्वीच पुरलेले ते प्रेत त्यांना खुणावत होते. हडळीला मानवी हृदय खायचे डोहाळे लागले होते आणि केव्हा एकदा ते हृदय खातोय असं तिला झालेलं. साधारण हृदय कुठे असेल याचा अंदाज घेऊन तिनं खणायला सुरवात केली. तिच्यामागे उभा राहून मुंजा कोणी मानव तर येत नाही ना यावर लक्ष ठेऊन होता. हडळही खणता खणता सारखी मागे बघून चाहूल घेत होती. यामुळे तिला उलट जास्त वेळ लागत होता. हे लक्षात येताच मुंजानं तिला ' टाईमपास न करता कामात कॉन्सन्ट्रेट कर' असं गाऊन सांगितलं.

मंडळी, ओळखा की.

हिंट : लग्नप्रसंगाचं गाणं आहे. ही ओळ गाण्यात कोरस म्हणून येते.

येस्स्स्स्स्स झिलमिल. शाब्बास!

कोडं क्र. ८/६५

अमावस्येची रात्र. कबरस्तानातील पिंपळावरून हडळ आणि मुंजा खाली उतरले. काही तासांपूर्वीच पुरलेले ते प्रेत त्यांना खुणावत होते. हडळीला मानवी हृदय खायचे डोहाळे लागले होते आणि केव्हा एकदा ते हृदय खातोय असं तिला झालेलं. साधारण हृदय कुठे असेल याचा अंदाज घेऊन तिनं खणायला सुरवात केली. तिच्यामागे उभा राहून मुंजा कोणी मानव तर येत नाही ना यावर लक्ष ठेऊन होता. हडळही खणता खणता सारखी मागे बघून चाहूल घेत होती. यामुळे तिला उलट जास्त वेळ लागत होता. हे लक्षात येताच मुंजानं तिला ' टाईमपास न करता कामात कॉन्सन्ट्रेट कर' असं गाऊन सांगितलं.

उत्तर : झिलमिल

मुड़ के ना देखो. दिल बरो (burrow = dig)!!!! (आटपा पटापट!)

8/66
एका महाविद्यालयात काही टारगट भाऊ शिकत असतात. एक दिवस ते कॉलेजात येतात तेव्हा समोरून एक प्राध्यापक आणि एक प्राध्यापिका येत असतात. भावांपैकी दोघे प्राध्यापकाचे हात धरून ठेवतात आणि तिसरा त्याच्या मागे जाऊन त्याची गर्दन धरून त्याला जबरदस्ती कमरेत वाकवतो. चौथा भाऊ प्राध्यापिकेला नम्रपणे अभिवादन करून तिची ख्यालीखुशाली विचारतो. मग ते सगळे निघून जातात. थोड्याच वेळात सगळ्या भावांची वरात प्रिन्सिपॉलच्या ऑफिसात नेली जाते. प्रिन्सिपॉल त्यांना असं का केलंत विचारतात तेव्हा भाऊ म्हणतात, आम्हाला आमच्या घरच्या एका व्यक्तीने असं करायला सांगितलं होतं. तर त्या व्यक्तीने कोणतं गाणं म्हटलं होतं?

हे कोणतं गाणं आहे? Happy
मानव, तुम्हाला इतक्या लवकर आलं....!!!!
मला तर माहितीही नाही ..

८/६७
धागा वर काढायला:
मला आधी वाटले की ती आपले नाव आणि मग पूर्ण नाव सांगतेय. मग लक्षात आले की ती आपले सांगुन पुढे वयाच्या अवस्थेबद्दल बोलतेय. तर मी कुठले गाणे ऐकत होतो?

Pages