जवान - शाहरूख खान - सव्वा हजार कोटींचा चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56

हो,
तो परत येतोय...

एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.

एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.

एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.

आणि आता तो पुन्हा आलाय...

हजाराचे सव्वा हजार करायला...

पठाण आता जवान बनून आलाय

सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..

राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..

थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या

https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवान असताना करायला हवा होता "जवान"
.>>>>>>
आहेच तो. वयाच्या आकड्यावर जाऊ नका. त्याच्यातील एनर्जी आणि सळसळता उत्साह बघा.

म्हणजे आता इतका काळा पैसा ओतून बनवलेला फालतू कथा, फालतू व्ही एफ एक्स इत्यादी इत्यादी चा भडीमार असणारा फालतू चित्रपट चालावा म्हणून एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी येणार लवकरच.

पठाण सारखाच ( दर्जा काहीही असला तरी ) हाही चित्रपट भरपूर कमाई करणार आहे.
पठाण चे 1000 कोटी कसे झालेत हे जाणकार लोकांना माहिती. Happy
दमदार स्टोरी, घट्ट पटकथा आणि योग्य दिग्दर्शन पाहिजे हे बॉलिवूड ला कधी कळणार.

पठाणला कुठली आलेली?>>
आता अगदी आठवण करून द्यायला पाहिजे का? आठवा ती भगवी बिकिनी.

अरे यार !
धाग्याचे हेडिंग बघून वाटलं की सारुक चा नवीन सिनेमा सव्वा हजार कोटींच्या बजेट मधला आहे , असा कोणी दावा केला की काय ?
पण रूनमेश ने कलेक्शन चा भावी आकडा सांगितलाय !

पूर्वी ते लभलक्ष्मी लॉटरी वाले पंटर लोकं पण असेच सांगायचे आज सत्या येणारच Happy

मला शाहरुखचा नवा सिनेमा केव्हापासुन पहायचाय पण असला नाही. Sad

मारामारीशिवाय एखादा, ज्यात कथा, अभिनय आहे असा त्याचा सिनेमा आला की कळवा, लगेच पळतपळत जाऊन पहाणार.

मारामारीशिवाय एखादा, ज्यात कथा, अभिनय आहे असा त्याचा सिनेमा आला की कळवा, लगेच पळतपळत जाऊन पहाणार. >>>

या वर्षाअखेरीस राजू हिराणीचा नवा सिनेमा, डूनकि, येईल तेव्हा पहा.

सिनेमाच्या नावावरून आठवलं. आम्ही दहावीत असताना मराठीच्या पेपरात निबंधाचा एक विषय होता - 'जवान-पत्नीचे आत्मवृत्त लिहा'. तिथे सीमेवर गेलेल्या जवानाची पत्नी अपेक्षित आहे. पण लोकांनी पेपरात जे काही तारे तोडलेत!!!!

Pages