जवान - शाहरूख खान - सव्वा हजार कोटींचा चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56

हो,
तो परत येतोय...

एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.

एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.

एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.

आणि आता तो पुन्हा आलाय...

हजाराचे सव्वा हजार करायला...

पठाण आता जवान बनून आलाय

सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..

राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..

थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या

https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गब्बर नावाचा चित्रपट होता ### अक्षय होता त्यात, स्पेशल लोकं पाहतात ते चित्रपट. बाकी शाहरुख लिहायला काय प्रॉब्लेम असेल बरं??

गोरखपूर इस्पितळ - ऑक्सिजन अभावी तान्ह्या बाळांचा मृत्यू. धावपळ करून मुलांचे प्राण वाचवणार्‍या डॉक्टरवरच ठपका ठेवून त्याला त्रास देणं या घटनाक्रमाची ठसठशीत आठवण करून देणारा एक ट्रॅक जवानमध्ये आहे, असं वाचलं.

जवान बघितला ..फूल टिपी पिक्चर आहे . सौदिडीयन भडक मसाला , अचाट अतर्क्य योगायोग , चिमटे काढणारे संवाद , शारूख खानची ऍक्टींग, बॉलिवूड स्पूफ , थोडे ज्ञान , सटल पॉलिटिकल स्टेटमेंट ( दक्षिणेची कृपा ) , वगैरे एलिमेंट ठासून भरलेले आहेत. नयनतारा मस्त दिसते .

पॉपकॉर्न खात डोके बाजूला ठेवून एंजॉय करा

आजच्या सकाळ मध्ये जवान ची परीक्षण मध्ये सारूक ची रेवडी उडवली आहे , सोसण्यापलिकडचा सोशल डोस या शब्दात ...
तुफान चाललेल्या त्या केजीफ ने देखील असाच वैताग आणला होता .
बाकी ते ठस ठसने इतर धाग्यांवर Happy

पिक्चर धमाल असावा असे वाटतेय एकंदरीत. टाईमपास मसाला मूवी.

तसेच ज्यांना टीकाच करायची आहे त्यांना काहीही बिनडोकपणा दाखवलाय असे म्हणायला सुद्धा पुरेपूर वाव असणार.

थोडक्यात चर्चा जोरदार रंगणार..

थिएटर मधून बाहेर पडणारी पब्लिक खुश आहे यातच चित्रपटाचे सार आहे..
एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट

लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड कमाई.
शाहरुख खानचा हा चित्रपट देखिल सुपर हिट होत आहे.

अरे फुल्ल टाईमपास आहे. चित्रपट बघताना डोके बाजूला ठेवायचे. काही अतर्क्य सीन आहेत. पण चालतंय. सबकुछ शाहरुख खान. सुपर स्टार पॉवर काय असते ते बघताना जाणवते. आमचे थिएटर फुल्ल नव्हते पण लोकांनी शाहरुखच्या एन्ट्री ला आणि चित्रपट संपल्यावर टाळ्या वगैरे वाजवल्या. लव्ह यु srk वगैरे पण ओरडले.
नयनतारा आवडली. गिरीजा ओक पण आहे यात. सुनील ग्रोव्हरला तर मी ओळखलेच नाही.नंतर कास्ट बघताना लक्षात आले.

लोकांनी शाहरुखच्या एन्ट्री ला आणि चित्रपट संपल्यावर टाळ्या वगैरे वाजवल्या. लव्ह यु srk वगैरे पण ओरडले.
>>>

अरे यार हे वाचून माझा विकेंड प्लान मी वेगळा का बनवला असे झाले.. आता बघूया कधी योग येतो.. लेकीला घेऊन जातो नाहीतर वीक डे.. रात्रीचा शो

पठाणला सारुक ने स्वतःच थियेटर ची बुकिंग करून सिनेमा हिट दाखवला होता . जवान चे पण असेच होईल का ?
विकेंड असल्यामुळे सध्या थियेटर फुल्ल आहेत , खरी कमाई सोमवार पासून दिसेल .
अमीर चा दंगल चीन मध्ये कोणत्याही परिस्थितीत चालण्या सारखा नव्हता आणि चीन चा डेटा कोणीही व्हेरीफाय करू शकत नसल्यामुळे दंगल ला चीन मध्ये सुपर हिट दाखवण्यात आले होते .
बॉलीवुड मधील खान गँग सिनेमा सुपर हिट करण्यासाठी काय काय क्लृप्त्या करतील कोणास ठाऊक ?

मला आताच शाहरूखचा फोन आला...
या धाग्यावर येणाऱ्या एका प्रतिसादाचे हजार रुपये देतो म्हणाला..
मी तुम्हाला त्यातले पाचशे देतो..
येऊ द्या प्रतिसाद...

पाहिला जवान फायनली...
टोटल बारा चा क्राउड जाणार होता मात्र निघताना आणखी दोन फॅमिली ऍड झाल्या.... रात्री चा शो..डोक्याला बँडेड बांधून सगळे निघालो.. दोन कट्टर शाहरुख प्रेमी तर टक्कल करून आले होते...
आधी शाहरुख चा फोटो असणारा केक कापून सर्वानी तोंड गोड केले... नंतर बस मध्ये शाहरुख च्या गाण्याची अंताक्षरी आणि शाहरुख चे डायलॉग्स असा कार्यक्रम झाला...
थेटर मध्ये वातावरण शाहरुखमय झाले होते आधीच... नवीन चित्रपटाचे ट्रेलर सुरु झाले मात्र पब्लिक नुसतं शाहरुख शाहरुख शाहरुख असे ओरडत होते... हजार वेळा तरी शाहरुख चा जप झाला...
चित्रपट पैसा वसूल आहे हे सांगायला नकोच... अमिताभ बच्चन एके काळी एकटाच दहा बारा जणांना लोळवायचा.. ते पब्लिक के एक्सेप्ट केले तर इथले एक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही...
नयनतारा कडक दिसली आहे आणि अभिनयात शाहरुखपेक्षा किंचित जास्तच..... उगाच साऊथ लेडी सुपरस्टार नाही म्हणत तिला...
लार्गर ज्ञान लाईफ चित्रपट आहे...मिस नका करू... आपल्याला चार पाच वेळा बघून सगळे रेकॉर्ड ब्रेक करायचे आहेत...

रूनमेश दादा !
जरा थोडासा वेळ घेत जा हो , नाही तर दोन्ही आयडी चा मालक एकच असल्याची शक्यता अजून बळावेल Happy

नाही तर दोन्ही आयडी चा मालक एकच असल्याची शक्यता अजून बळावेल
>>>

मला वाटते मी आणि ते एकच आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यात शक्यता कसली?

मला वाटते मी आणि ते एकच आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यात शक्यता कसली?

घ्या.. आयडी बदलून पण लिहिले... अजून काही पुरावा हवाय का Happy

आता स्वताहून कबूल केले तर लोकं आपण दोघे वेगळे आहोत हे दाखवायला धडपडतील...
कुठून येतो इतका वेळ मायबोलीवर खर्च करायला..
आपले ठिक आहे. आपण तर admin च आहोत Happy

येनी वेज,
कधी पुढचा आठवडा सुरू होतो आणि जवान बघतोय असे झालेय ...

मी आधीच म्हटले होते की जवान चा धंदा केवळ भारतात दोन हजार कोटी चा होईल, पण आता त्याला मिळणारा प्रतिसाद बघता 2500 कोटी सुद्धा होऊ शकेल

सुनील ग्रोव्हरला तर मी ओळखलेच नाही.नंतर कास्ट बघताना लक्षात आले.
Submitted by आ_रती on 9 September, 2023 - 11:50

म्हणजे २/२ सारुक ? नक्की नीट बघितला ना सिनेमा? नाहीतर सगळे सुनील ग्रोव्हरलाच खरा सारुक समजले असणार , नवा सुपरस्टार सुनील सारुक
आपण तर फॅन आहोत सुनील ग्रोव्हरचे

Pages