जवान - शाहरूख खान - सव्वा हजार कोटींचा चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56

हो,
तो परत येतोय...

एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.

एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.

एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.

आणि आता तो पुन्हा आलाय...

हजाराचे सव्वा हजार करायला...

पठाण आता जवान बनून आलाय

सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..

राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..

थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या

https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.esakal.com/manoranjan/salman-khan-tiger-3-pre-release-record...

टायगर का मेसेज.
चोप्राज चा सिनेमा ढांसू असो नसो, त्यांचं मार्केटिंग फाडू आहे. हा मेसेज असा डिझाईन केलाय कि आपोआप बॉयकॉट गँग तुटून पडेल.
देशभक्त कि गद्दार ही उकसवणारी लाईन आहे.

चुंबन सम्राट इम्रान हाश्मी चा नवा पिक्चर येतोय. त्याच्या साठी एक धागा काढा.
बिचारा दहा वर्षे एका हिट साठी झुरतोय. आता पिक्चर येतोय तर नेमका टायगर 3 रिलीज करताहेत.

सर,
इम्रान हाश्मी चा सिनेमा चालावा म्हणून टायगर 3 वर धागा काढाच.

इम्रान हाश्मी खरंतर गुणी अभिनेता आहे.किमान खऱ्या आयुष्यात कुटुंबवत्सल माणूस तरी आहे सलमान खान बद्दल न बोललेलंच बरं.

Pages