हो,
तो परत येतोय...
एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.
एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.
एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.
आणि आता तो पुन्हा आलाय...
हजाराचे सव्वा हजार करायला...
पठाण आता जवान बनून आलाय
सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..
राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..
ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK
---------------------------------------------------
विकेंडचे प्लान शुक्रवारी रात्रीच ठरवले जातात.
बायको सहज विचारते, "ब्रह्मास्त्र बघायची ईच्छा आहे का?"
आपण तर्जनी कपाळावर लाऊन विचारमग्न होतो. जणू ध्यान लाऊन संपुर्ण ब्रह्मांडाचा विचार करत आहोत.
पण आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात गेले आठवडाभर वाचलेले रिव्यूज. ज्याचे ठळक हायलाईट्स खालीलप्रमाणे असतात,
![10aca9e74d68d5343a68e44e40ba5923[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u57680/10aca9e74d68d5343a68e44e40ba5923%5B1%5D.jpg)
शाहरूख खान पहाटे उठून मंत्र वगैरे म्हणत असतो. मग शुचिर्भूत होऊन देवाची पूजा अर्चा करतच असतो , इतक्यात काजोलने अंगण लक्ख झाडून स्वच्छ केल्याचे पाहून तो समाधानाने हसतो. आता प्रवचनाची वेळ होणारच असते तोपर्यंत काजोलशी बोलावे म्हणून तो ओल्या सोवळ्यानिशी तिच्याकडे जातो आणि विचारतो " मी प्रसन्न आहे, माग काय मागायचे ते :
यावर ती लाजते आणि म्हणते
" बाजीरावसारखा पती हवा "