Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अशा हट्टाने स्क्रीनप्ले
अशा हट्टाने स्क्रीनप्ले लिहील्यासारखा वाटतो.
>>
अनुभव सिन्हा २.० ची खासियत आहे ती...
Hunger, थाई, इंग्रजी,
१.Hunger, थाई, इंग्रजी, नेटफ्लिक्सवर.
एक छोट्या टपरीवजा हॉटेलमध्ये नुडल्स बनवणारी म्हत्वाकांक्षी नायिका, तीला एका फेमस शेफकडून जॉब ऑफर मिळते आणि तीचे लाईफ अप एन्ड डाऊन्स ने बदलून जाते..विचार करायला लावणारा सिनेमा, मस्त आहे..आवडला.
२.चोर निकल के भागा, हिंदी, नेटफ्लिक्सवर.
एक ऐअरहोस्टेस आणि तीचा बॉयफ्रेंड मिळून फ्लाईट मधे हिरेचोरी करायचा प्लान करतात पण ऐनवेळी फ्लाईट हायजॅक होते आणि सगळा प्लान फिस्कटतो आणि वेगळीच गडबड होते...ठिक आहे सिनेमा.
इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ
इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी. बघितला २ डी आय मॅक्स मध्ये. सुरुवाती पासून शेव ट परेन्त अॅक्षन पट आहे. बाकी इंडी मसाला नेहमीचा आहेच. मी पहिला रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क पण थेट्रात बघितला आहे. , टेंपल ऑफ डू म आला तेव्हा भारतात बॅन होता. लास्ट क्रुसेड पण थेट्रात बघितलेला आहे. रेडर्स व लास्ट क्रुसेड ऑल टाइम फे वरिट वॉच लिस्ट मध्ये आहेत. पुढे ज्यु धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्या आर्क व ते येहो वा/ याहवे चे महत्व कळले. हॅरिसन फोर्ड हे ही चित्रपट बघायचे मेन कारण आहे. ह्या चित्रपटात पहिले वीस मिनिटे जो अॅक्षन पार्ट आहे त्यात त्याला डि एज केले आहे. मी त्याला हान सोलो रुपा पासून बघितले आहे त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद. भरपूरच सेट अॅक्षन पीस आहेत.
मेन थीम थोडी लारा क्रॉफट टुंब रेडर सिनेमातल्या सारखीच आहे. पण नाझी फोडणी दिलेली आहे. मेन नाझी व्हिलन आहे तो अॅक्टर ह्याने कसीनो रॉयल मध्ये व्हिलन ल शिफ्र ची भूमिका केलेली आहे. चेहरा ओळखी चा वाटत राहतो. वरील चित्रपट पाहिले असतील त्यांना भरपूर
इस्टर एग्ज सापडतील. जॉज - पहिला ओरिजिनल - ह्याला पण होमेज आहे. अंडर वॉटर सीन्स मध्ये. भरपूर करमणूक मजा आली.
"बाईपण भारी देवा" पाहिला.
"बाईपण भारी देवा" पाहिला. आवडला.
अगदीच टिपिकल/ प्रेडीक्टेबल आहे तरीही एकदा बघायला हरकत नाही.
घोस्ट (हिंदी) ठीक ठाक. महेश
घोस्ट (हिंदी) ठीक ठाक. महेश भट्ट हॉरर सिरीज सारखा वाटला. शेवट फुसका.
किसी का भाई , किसी कि जान हा सर्वांग सुंदर चित्रपट पाहिला. सलमानी दगडी अभिनयाने नटलेला न भूतो न भविष्यति असा हा चित्रपट चुकवू नये. यामागे मी पाहिला, आता तुम्ही ही भोगा अशी भावना नाही. हिरॉईन पूजा हेगडे होती हे नंतर समजले. चिरंजीवीला वयाच्या ६२ व्या वर्षी कितीतरी हालचाली करून हाणामारीचे सीन्स द्यावे लागतात. सलमानला ६० व्या वर्षी सूक्ष्म हालचाल करूनही विध्वंस करता येतो. यातच त्याचे महानपण आहे. जितका अभिनय सूक्ष्म तितकेच अॅक्शन आणि डान्स मूव्हमेंट्स सुद्धा.
चिरंजीवी नव्हे, वेंकटेश
चिरंजीवी नव्हे, वेंकटेश
मुझे तो सारे साउथ वालों कि
मुझे तो सारे साउथ वालों कि सूरते एक जैसी दिखती है.
परफेक्ट र आ.
परफेक्ट र आ.
मी आधी पंधरा मिनटं पाहिला, दुसऱ्या दिवशी पंधरा मिनटं.. एकूण अर्धा तास पाहिला..
भाई चा एन्ट्री सीन तर जबरदस्त एकदम..
सगळेच पकाऊ नाहीत अजिबात.
"गरज नसताना" मुळे विचारतोय >>
"गरज नसताना" मुळे विचारतोय >> असह्य नाही होत नक्की पण प्रेडीक्टेबल होतो.
प्राईमवरचा टॉम हँक्सचा “सली”
प्राईमवरचा टॉम हँक्सचा “सली” सिनेमा फारफार भारी आहे इतकं लिहुन प्रतिसाद आवरता घेते. कसा काय राहिला पहायचा कोण जाणे.
"बाईपण भारी देवा" पाहिला.
"बाईपण भारी देवा" पाहिला. चांगला घेतला आहे. आवडला. सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत. मध्यंतरानंतर थोडा लांबतो पण तरी गुंतवून ठेवतो. आणि शब्दबंबाळ वगैरे केला नाहीये. व्यक्तिरेखेच्या प्रमाणे कपडेपट पण योग्य आहे(लक्षात येण्याइतके होते)
प्राइमवर 'सॅल्युट' पाहिला.
सोनी-लिव्हवर 'सॅल्युट' पाहिला. Dulquer Salmaan (अरे यार, याचा उच्चार सांगा कुणीतरी
)
स्टोरी मस्त आहे. खुनाच्या आरोपाखाली एका रिक्षा ड्रायव्हरला अटक आणि शिक्षा होते. D.S. पोलीस अधिकारी असतो. त्याला वाटत असतं की रिक्षावाला खुनी नाही. वास्तविक तपासकामात D.S. सुद्धा सहभागी असतोच. त्याचे सहकारी, वरिष्ठ कुणीच त्याचं म्हणणं मान्य करत नाहीत. मग तो आपल्या पद्धतीने इतर पुरावे गोळा करायला लागतो. 'आपल्या पद्धतीने' म्हणजे हाणामारी नव्हे, खरोखरच शांतपणे एक एक माग काढत जातो.
त्यातून त्याच्या हाती काय काय लागतं, त्याला वाटत असतं त्यात कितपत तथ्य असतं, हे सगळं पुढे येतं. सिनेमाचा वेग संथ आहे. त्या संथपणामुळेच आणि D.S. चा तपास, सस्पेन्स यामुळे बघायला मजा येते. शेवट अनपेक्षित आहे.
D.S. चं काम आवडलं.
मूळ मल्याळम, मी हिंदी ड्ब्ड व्हर्जन पाहिलं. डबिंग चक्क चांगलं केलं आहे!
बहुतेक 'दिलेकर सलमान' ललि. तो
बहुतेक 'दिलेकर सलमान' ललि. तो काम जबरदस्त करतो. त्याचे द झोया फॅक्टर, कारवॉं, सीता रामन् मधलं काम खूप आवडलं. तो आवडतो. संयत अभिनय करतो ,शिवाय बुद्धीची झाक दिसते चेहऱ्यावर.
डुलकर
डुलकर
त्याचे द झोया फॅक्टर, कारवॉं,
त्याचे द झोया फॅक्टर, कारवॉं, सीता रामन् मधलं काम खूप आवडलं. तो आवडतो. संयत अभिनय करतो ,शिवाय बुद्धीची झाक दिसते चेहऱ्यावर.
>>>
+786
मस्त आहे तो. सहज अभिनय करतो आणि आपल्यातला हिरो वाटतो.
त्याचा तो सायको थ्रिलर होता त्यातही काम छान होते.
मराठीत डुलकर सलमान नाव आहे त्याचे
ते "बाईपण भारी "नाही वाटले
ते "बाईपण भारी "नाही वाटले बुवा मला अगदीच . फार बोअर वाटला. मला काही कुणाच्या समस्या रीलेटच करता येईनात. ६ सख्ख्या बहिणी, प्रत्येकीला एखाद्या बहिणीबद्दल २५-३० वर्षापूर्वीचे जुने इश्यूज आहेत. ते पण कसे अगदी वन टु वन, म्हणाजे क्ष ला य बद्दल , अ चे ब बद्दल असे. ते इश्यूज पण काही आयुष्यभर जिव्हारी लागून उराशी बाळगण्यासारखे आहेत का तर नाही, फालतूच आहेत. बर हिच्याशी तिचा प्रॉब्लेम आहे ना मग बाकीच्यांनी काय घोडे मारले? कुणाच बहिणीचे एकमेकीशी बाँडींग नाही!नंतर मग काय तर एका मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात अन त्यानिमित्ताने सग़यांचे सगळे प्रॉब्लेम्स (मराठी सिनेमात चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवण्यची परंपराच असल्यामुळे) बरेचसे बिनालॉजिकच सुटतात.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सगळ्याच एक से एक चांगल्या कलाकार आहेत, पण त्यांच्यात बहिणी वाटण्यासारखी केमिस्ट्रीच दिसली नाही. सिनेमाचे बरेच पॉझिटिव रिव्यू वाचले , पण झेपला नाही मला अजिबात.
बाईपणबद्दल मलाही थोडा
बाईपणबद्दल मलाही थोडा भ्रमनिरास झाला. रोहिणी सगळ्या बहिणींची आई असेल - इति एक प्रेक्षक. मैत्रीयीसारखंच मत झालं. बऱ्याच बेसिक गोष्टीत फसलाय असं वाटलं. अगंबाई सारखा भारी असेल चित्रपट अशी अपेक्षा होती पण अगदीच सरधोपट निघाला. कपडे आणि दागिने आवडले. सुकन्या सगळ्यात उत्तम वाटली. पुढे मला पडलेले प्रश्न आहेत
१) सगळा साग्रसंगीत स्वयंपाक वं गु एवढ्या झटपट करून लेकीला डबा द्यायला जाते - कशी
२) जो मुलगा शिल्पाला बघायला आलेला असतो तो बांदेकर बाईला पसंत करतो. असे प्रत्यक्षात घडलेले बघितले आहे. हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा आहे. तर शेवटी तो बांदेकर बाईला सोडूनच देतो. मग यात शिल्पाला समाधान वाटायला हवे ना की असा लंपट आपल्या वाट्याला नाही आला. ती राग मनात ठेवून का असते.
३) शिल्पा स्वतःच्या कार्डवर मोबाईल घेताना दाखवली आहे - कुठून आले पैसे तिच्याकडे.
४) चिनूचा हॉस्पिटल भरतीचा एकूण प्रसंग अ आणि अ वाटला.
५) बक्षीसाच्या रकमेपेक्षा या बहिणींनी सगळ्या तयारीवर जास्त खर्च केला असे वाटले.
६) त्या ट्रेनर बरोबर या बहिणी व्यायाम करताना दिसतच नाहीत, मग व्यायामाचे कपडे विकत घेण्याचा प्रसंग फक्त हे दाखवण्यासाठी की बायका वर्षानुवर्षे एकच साईझ वापरतात.
ओटीटी किंवा टीव्हीवर आल्यावर बघितला तरी चालेल. दीपा परब त्या मालिकेपेक्ष इथे बारीक आणि छान दिसली आहे.
ह्या सगळ्या नट्या घिस्या
ह्या सगळ्या नट्या घिस्या पिट्या आहेत तेच तेच साचेबद्ध करतात. वंदना गुप्ते पूर्वी मंगळा गौरीचे खेळ घेत असे तेच व्हिडो जोडुन दाखवायचे ना. पैसे बच जाते. नन ऑ फ दी ज इज मेरिल स्ट्रीप लेव्हल अॅक्ट्रेस. चाकोरीबाहेर रिस्क घेत नाहीत. वर गोड गोड मुलाखती. वैताग निव्वळ.
बाईपण चे रेव्यु वाचत नाही
बाईपण चे रेव्यु वाचत नाही सध्या. इथे १५ ला लागणार आहे, तिकीट काढले आहे..मूड जायचा उगाच. पण तरी..ओळ भर वाचल्या पैकी....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मैत्रेयी, बहिणी बहिणींमधे केमिस्ट्री असेलच असे नाही..२ जणींतही नसते कधी कधी..तर ४/५ ची काय बात घ्या
शेरू वेड्स टिकू पाहिला. तद्दन
शेरू वेड्स टिकू पाहिला. तद्दन घटिया बेकार मुव्ही आहे. नवाजुद्दीन म्हणुन बघायला घेतलेला..
बाईपण भारी अशक्य बकवास आहे.
बाईपण भारी अशक्य बकवास आहे. कथाच ढिसाळ आहे, पटकथा, संवाद, अभिनय या फार पुढच्या गोष्टी.
सहा बहिणी. इतक्या कोडग्या आणि कोरड्या? कुणाला कुणाबद्दल काहीच चांगलं वाटत नाही? इतक्या खालच्या थराला जाऊन अचकट विचकट बोलतात का कुणी? बरं आता ठरवलंय इतक्या कटू भावना असलेल्या हाडवैरी बेअरिंग तर मग तसं ठेवा ना? तर नाही! शेवटी सगळ्या गळ्यात गळे घालून सगळे प्रश्न मिटवून दारू पित बसल्या पाहिजेत हा शेवट फिक्स्ड आहे.
आता हाडवैरी ते दुसर्याची बाजू समजून घेऊन त्यांना सामावणार्या हा आलेख पूर्ण करण्याचा तर छान चित्रपट होईल की! आता हा किल्ला सर करायला चांगली कथा पटकथा म्हणजे काय तर सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेत आपपल्या कारणांसाठी भाग घेतात. विजेत्याला बक्षिस आहे २५ लाख.
एक बँकेत मॅनेजर आहे. तिचा नवरा उधळ्या आणि ऐतखाऊ आहे. त्याने कर्ज करुन ठेवलं आहे. जे ती ह्या २५ लाखातून फेडणार आहे. आता २५ भागिले सहा = ४ लाख. त्यातील ३०% करामध्ये जाणार. बँक मॅनेजर हायेस्ट ब्रॅकेट मध्येच असणार ना. आता उरले किती? तर पावणे तीन लाख? त्यात ते कर्ज फिटणार आहे. आता इतक्याश्या कर्जासाठी बँक मॅनेजरला अनदर सोर्स ऑफ इनकम म्हणून काय खुणावते? तर हाडवैरी बहिणींना एका मोटेत बांधून मंगळागौर स्पर्धेत एंट्री. आणि त्यात मिळू शकणारं बक्षिस! पार्ट टाईम उबर ड्रायव्हर किंवा अॅमेझॉन डिलिव्हरी जास्त रिलायबल असेल! पण ते असो.
दुसरी बहिण . (सु.कु) या नंबर एक बॅंक मॅनेजरच्या हाताखाली. तिने बॅलन्स शीट मध्ये चुका केलेल्या आहेत. तर मॅनेजर सांगते तू मंगळागौरीत गाणं म्हण मी तुझ्या बॅलन्सशीट चुका माफ करते. दॅट्स हर मोटिव्हेशन! ही होती बाल-लता. पण हेकट सासर्याच्या जाचात हिचं गाणं बंद झालं. तिला सूर सापडत नाही (त्यात जीवनाचा सूर वगैरे रुपकं/ झपताल वगैरे नाही हे आपलं नशिब!) - ते सापडतो असा प्रवास दाखवायचा आहे. इथे कथा फुलवायला चांगला वाव अहे. पण नाही. घिसपिटं सोप्पं दाखवायचं आहे. मग जयदेवी मंगळागौरी ती कसंतरी म्हणत बसते. अरे आवाज गेलाय म्हणजे नरड्यातून येत नाही असं नसतं रे. तो बेसूर लागतो, फिरत नाही, सूर दिसतात पण आवाज जात नाही इ. इ. होतं. त्यावर इलाज फक्त सराव असतो. तर ते नाही. ही हापिसात बॅलन्सशीट टॅली करायच्या ऐवजी जिन्यात जाऊन मंगळागौरी मंगळागौरी मंगळागौरी गाते आणि झटकन काय रियाझ वगैरे न करता आवाज येतो. मग आनंदाश्रूना पारावार. चला बॅलन्सशीट टॅली करायला नको!
तिसरी (वंगु). तिची मुलगी तिच्या सासूला (म्हणजे वंगुच्या विहीण बाईंना) आई म्हणून हाक मारते. आणि वंगुला ती तिच्या सासूच्या जवळ आहे आणि आपल्या नाही हे खुपते. मग तिची सासू मंगौ स्पर्धेत भाग घेणार म्हणून वंगु भाग घेते. कारण मंगौ स्पर्धा जिंकली की तिची मुलगी सासू पासून दूर जाऊन वंगुच्या जवळ येणार असते! आवरा!!!!!
चौथी कोल्हापूरला नवर्याच्या पैशावर उड्या मारते. असं तिचा नवरा म्हणतो. मी नाही. तर ती आयफोन हरवते म्हणून नवरा म्हणतो अगं वर्षांत हा चौथा फोन हरवलास. तर आता तुम्ही ओळखलंच असेल हिचा मंगौ भाग घ्यायचा मोटिव्ह! आयफोन आपल्या पैशात घ्यायचा. हिचा मोटिव्ह त्यातल्या त्यात अचिव्हेबल आणि लॉजिकल आहे. कारण मंगौ शिवाय तिला बाकी काही उत्पन्नाचं साधन मिळणं तिच्या एकुणच स्वभाव इ. मुळे केवळ अशक्य आहे.
पाचवी (सौ. होम मिनिस्टर) ही सगळ्यात लॉजिकल असावी. कारण तिला मंगौ खेळायचं काही विशेष असं मोटिवेशन नाही. कनेक्टिंग विथ सिस्टर्स शिवाय.
सहावी (रो.ह) आणि तिसरी एकाच वेळी गरोदर होत्या. इतकं सांगितल्यावर ता वरुन ताकभात लॉजिक लावुन मुलींची अदलाबदल असणार हे मी आपलं मानून चाललो. त्यात एकीची मुलगी जन्मतःच गेलेली. पण नसावं तसं काही. बाकी ठाम/ खमकी/ खडूस असुनही मुलीच्या जाण्याचं दु:ख का नं. तीनच्या मुलीच्या जगात रहाण्याचं दु:ख ... काही अजुन मिटलेलं नसतं. ती सतत कसल्या तरी वह्या किंवा पेपर तपासत असते किंवा वर्तुळ/ स्पायरल काढत असते. हे अनुक्रमे शिक्षिका असल्याचं आणि मनाचा गुंता झाल्याचं लक्षण समजावे असं सबटायटलही येऊन जातं मला वाटतं. कारण हा एकमेव डोकं वापरायचा पॉईंट चित्रपटांत आहे, तो ही मिस होऊ नये हा उद्देश.
अशा सहा व्यंग्यचित्रात्मक पात्रांना, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या सद्य परिस्थितीला आणि अण्णांना मंगळागौर पावते तशी तुम्हा आम्हा पावो. ही साठा उत्तराची कहानी सहा सिस्टरी सुफळ संप्रुण!
याच्या तुलनेत झिम्मा मास्टरपीस होता असं दहा वेळा लिहुन काढलं काल. यात तर निर्मिती सावंत ही नाही.
>>> याच्या तुलनेत झिम्मा
>>> याच्या तुलनेत झिम्मा मास्टरपीस होता![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अरारारारारा!
मी तर आधीच म्हणलं होतं झिम्मा
मी तर आधीच म्हणलं होतं झिम्मा 'तसा' चांगला आहे, तसंच पाहिजे.
अरेरे ! भारतात दाखवलेला
अरेरे ! भारतात दाखवलेला 'बाईपण' आणी इथे दाखवलेला हे दोन वेगळे सिनेमे आहेत का?
भारतातील नातेवाईकाना तर फारच आवड्ला आहे !
>>> वंगुला ती तिच्या सासूच्या
>>> वंगुला ती तिच्या सासूच्या जवळ आहे आणि आपल्या नाही हे खुपते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणजे 'क्लोज' आहे म्हणतो आहेस का? काय रे हे मराठी, अमित?! सासूशी मेथकूट म्हणावं, गूळपीठ म्हणावं, किमानपक्षी जवळीक म्हणावं!
आता मराठी भाषा आणि संस्कृती आपण यन्नारायांनीच जपायला नको का?!'मेथ'कूट? बाई, ममव
'मेथ'कूट? बाई, ममव सासूसुनांना ब्रेबॅ करायला लावताय की काय....
ओक्के! जवळिकता जास्त आहे
ओक्के! जवळिकता जास्त आहे म्हणतो.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण खरं आहे. मराठी शाळेत शिकल्याने मराठी वाक्य तयार करुन इंग्रजी आणि आता इथे राहिल्याने इंग्रजी वाक्य आपोआप सुचुन त्याचं मराठी बोटातून बाहेर पडू लागलंय. तर अशी दोन्ही भाषांची वाट लागली आहे दिसतंय.
प्रत्यक्ष बोलताना मला वाटतं 'कोड स्विचिंग' होऊन कमी गचाळ बोलत असेन
असं मलाच वाटतं, किंवा वाटावसं वाटतं.
अस्मिता
मी पण मेतकूट ना? म्हणणार होतो. पण ब्रेब्रॅ सुचला नाही वेळेवर! चटकन जोक सुचू नये! तेही मेथ जोक्स!
>>> ममव सासूसुनांना ब्रेबॅ
>>> ममव सासूसुनांना ब्रेबॅ
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मेथीचं म्हणून मेथकूट हाच योग्य शब्द आहे, मेतकूट हा अपभ्रंश. कुटाऐवजी क्रिस्टल करून दाखवलेत तर ब्रेबॅ म्हणू.
>>> जवळिकता
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तिला सूर सापडत नाही (त्यात
तिला सूर सापडत नाही (त्यात जीवनाचा सूर वगैरे रुपकं/ झपताल वगैरे नाही हे आपलं नशिब!) >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे आवाज गेलाय म्हणजे नरड्यातून येत नाही असं नसतं रे. >>>
टोटल फुटलो अमित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पंचवीस लाख फक्त? उदारीकरणाच्या आधी सुद्धा इव्हन महाराष्ट्र राज्य लॉटरी ११ लाखापर्यंत पोहोचली होती. इथे टीव्ही सिरीज मधले घरगुती उद्योगसुद्धा वीसेक हजार कोटी चे कॉन्ग्लोमोरेट असतात.
का कोणास ठाऊक हा मला झिम्माचाच भाग २ वाटतो जाहिरातीवरून. त्याच क्राउडकरता बनवलेला.
अमित ग्रेमा!
अमित
ग्रेमा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेथकूट >>> ! अरे बाप रे हे नव्हते लक्षात आले कधी !
Pages