चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नवा लागलेला 'ब्लॅकनिंग' काही अपेक्षा नसुन थिएटरमधे पाहिला परवा. हॉरर कॉमेडी आहे, मला आवडला.

द केरला स्टोरी.. पाहिला..सुन्न झालं एकदम.
ख र असे होत असेल तर ह्या मूवी च्या निमीत्ताने नक्की काही तरी फरक पडेल असं वाटतंय..!
ह्या मुवी चा वेगळा धागा आहे. पण हे पान पहायची परवानगी नाही असं येतंय..

Extraction २ नेटफिल्क्स वर आला आहे.. ऍक्शन एके ऍक्शन.. बाकी काही नाही.. मजा आली पाहताना...

पार्ट-१ पाहिला. त्यातला अ‍ॅक्शन पार्ट जोवर होता तोवर मजा येत होती. मग सेंटी चालू झालं आणि बंद केला.

Kerala story ह्या मूवी चा वेगळा धागा आहे ना?
कुणी तरी सांगा ना.. कोणत्या ग्रुप मध्ये आहे.
हे पान पहायची परवानगी नाही असं का येतंय.?

Extraction १ बघितला होता. नुसता रक्तपात आहे. दोन बघू.

जेनिफर लोपेझचा The Mother नेटफ्लिक्सवर बघितला, खूप आवडला. भयंकर मारामारी आहे. जेलो स्वतः च एक प्रोफेशनल किलर /एक्स FBI Agent आहे. तिचे काही गुंडांशी संबंध येऊन तिला एक मुलगी होते. ती तिला दत्तक देऊन टाकावी लागते. त्या मुलीला ओलीस धरून ठेवून तिला मारायच्या वेगवेगळ्या योजना ती उध्वस्त करत लेकीला तिच्या आईबाबापर्यंत कशी पोचवणे याची वेगवान कथा आहे.

Guardian of the Galaxy बघितला थिएटरमध्ये. मला अजिबात आवडला नाही. Raccoon ची गोष्ट आहे. हा सतत रडत होता, कथानक मधूनच याच्या लहानपणात उडी घेत होतं. ते तर फार कंटाळवाणं झालं. काही विनोद बरे आहेत पण बहुतेक ओढूनताणून वाटतात. ही टीम अभिनयात weak आहे. दुसरे ग्रह व त्यावरले प्राणी व सगळे व्हिज्युअल्स यांमध्ये सौंदर्यदृष्टीचा ठणठणाट आहे. त्यांच्या ग्रहाचा पृष्ठभाग बघताना स्क्रीनवर पिठलं सांडल्यासारखं वाटत होतं. Proud Marvels needs to reinvent...! फार बोअर झालं. सिनेमाचे नाव 'रडके रॅकून' हवे होते.

स्क्रीनवर पिठलं सांडल्यासारखं वाटत होतं. >> Rofl अगदी डोळ्यासमोर आलं ह्या सुपरहिरो मूव्हींचे मल्टीव्हर्सेस आणि ओकणारी आग.

त्यांच्या ग्रहाचा पृष्ठभाग बघताना स्क्रीनवर पिठलं सांडल्यासारखं वाटत होतं. >>> Lol

मी फार प्रयत्न केले या पिक्चर्स मधे इंटरेस्ट घेण्याचे. पण कंटाळा येतोच.

अ‍ॅक्शन चित्रपटात वायलंस असतोच, आता तो कथेत बेमालुम कसा घोळायचा हे दिग्दर्शकाचं कौशल्य. एक्स्ट्रॅक्शन, एक्स्ट्रॅक्शन२ याला अपवाद नाहि. याच पठडित "किल चेन" हा क्राइम थ्रिलर आहे, एच्बिओवर बहुतेक; किंवा नेफिवर (प्लॅटफॉर्म इतके झालेत कि साला ट्रॅक ठेवणं कठिण झालं आहे). टेरंटिनोचे चित्रपट आवडत असतील तर हा नक्कि बघा, तशीच ट्रीटमेंट आहे. निकलस केज तर अफलातुन...

एक्स्ट्राक्शन २ टाईमपास आहे.
गॅलक्सीत माझा पेशल ईफेक्टमुळे व आयमॅ़क्समधे पाहिल्यामुळे चांगला टाईमपास झाला होता बहुतेक. वेगवान होता.

निकलस केज तर अफलातुन...>. हो हो. मी पण निक केज फॅन. माझ्या वयाचाच आहे तो. व कॉन एअर मध्ये क्या मस्कलां दिकरे. वा वा. व बायकोवर प्रेम मुलीवर प्रेम हाय हाय.( सिनेमात हो.) बदाम डोळ्यात मटेरिअल होता. कॉन एअर माझा फेवरैट आहे.

The swarm( French) इंग्रजीत Netflix
एक आई आणि तीची दोन मुले, लॉक्ट्स किटकांची लागवड करून विकत असतात. प्रोटीनयुक्त फुड.एके दिवशी त्या स्त्रीच्या लक्षात येते कि रक्त-मांस हे खाद्य दिलं कि किटकांची वाढ भराभर होते आणि पुढे काय होतं पहा सिनेमात पण भंगार आहे सिनेमा, नका बघू.

पुढे काय होतं पहा सिनेमात पण भंगार आहे सिनेमा, नका बघू >>>> हे भारी आहे Wink
कादर खानचा काहीतरी एका डायलॉग होता तो आठवला..
भगवान तुम्हारा भला करे.. मगर करेगा नही

मिसेस अंडरकव्हर मनोरंजक आहे. रहस्य, थरार पेक्षा खुसखुशीत मांडणी मस्त वाटली.
या चित्रपटातून शिकायला मिळालं. कुठलीही गृहीणी काहीही करू शकते, बस्स फक्त साडीच्या आत काळ्या रंगाचा बॉडी सूट हवा.

something from tiffany's पाहतेय.
अशा प्रकारचे न्यूयॉर्क सिटीचे चित्रिकरण/पार्श्वभूमी असलेले फील गुड मूव्हीज सुचवा.

वर्षा - फील गुड movies मध्ये - woody Allen che बरेचसे चित्रपट न्यू यॉर्क मधे चित्रित झालेत किंव्वा न्यू यॉर्क itself is a character in the movie.

Tom hanks चा Big, Meg Ryan cha when harry met Sally

Seinfeld न्यू यॉर्क च्या पार्श्वभूमीवर आहे पण झालेय चित्रित LA मध्ये.

मला ही न्यू यॉर्क city खूपच आवडते (मुंबई खालोखाल Happy

>>> न्यूयॉर्क सिटीचे चित्रिकरण/पार्श्वभूमी असलेले फील गुड मूव्हीज
वन फाइन डे

Silence...Can You Hear It? >>> मनोज वाजपेयी करता पाहिला. पण डोंगर पोखरून उंदीर सारखी गत झाली.
पूर्वी आपण येडे होतो तेव्हां काय भारी पिक्चर म्हणून डोक्यावर घेतला असता. आता असे आव आणलेले सिनेमे प्रयत्न करूनही आवडून घेता येत नाहीत. गेल्या काही दशकात पोलिसांचं कार्यालय कॉर्पोरेट प्रमाणे दाखवतात. तलाश मधलं आमीरचं पोलीस स्टेशन हे खरं खुरं वाटत होतं. अमेरिकन सिनेमा ढापताना वातावरणात जरा तरी बदल करत चला.

Prime वर टिकू वेड्स शेरू पाहिला.
का? नवाजुद्दीन आहे म्हणून.
कसा आहे? भंपक, बकवास
का बरे ? कथा पटकथा character उभे करणे एडिटिंग दिग्दर्शन सगळ्या क्षेत्रात माती खाल्ली आहे म्हणून
बघूच नका.

उतारा म्हणून गोदावरी पाहिला.
स्लो आहे. कथेचा जीव छोटाच आहे. पण मला आवडला.
जितू जोशीची तडफड , त्रागा, जगावर वैतागलेला असणे वै सर्व चांगले घेतले आहे.

वर्षा, असे बरेच असतील, पण ‘You’ve got mail’ आणि ‘Miracle on the 34th street’ हे दोन लगेच डोक्यात आले. मिरॅकल १९४७ चा नाही तर १९९४ चा.

Blood red sky इंग्रजी नेहमीसारखा झोंबीपट
जरा इमोशनल टच. नेटफ्लिक्सवर.
झोंबीपट आवडत असतील तर बघू शकता.

म्सायो, स्वाती, मनमोहन धन्यवाद. . यापैकी एकही पाहिलेला नाही, आता शोधून बघते.

अजून काही सिरीज आठवल्या न्यूयॉर्क च्या पार्श्वभूमीवर -
Sex and the city, gossip girl - दोघा मधील कपडेपट अप्रतिम. आणि timepass chick flick स्टोरी लाइन

किसी का भाई किसी कि जान..चुकून पण बघू नये..अर्धा तास बघितला..पूजा हेगडे सोडून सगळे पकाऊ अभिनय करताहेत.
उतारा म्हणून तेलुगू कटमरायडू लावला, पवन कल्याण श्रुती हसनचा, युट्यूब वर हिंदी डब्ब..(ओरिजिनल तमिळ आहे अजीथकुमार, तमन्ना चा..)

Pages