Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१९९३ चा लुटेरे युट्यूबवर
१९९३ चा लुटेरे युट्यूबवर दिसला. आता मला प्लीज कुणीही अडवू नका.
जा सिमरन जा ,जी ले अपनी
जा सिमरन जा , जी ले अपनी जिंदगी
अरे वा.. आता तुमचं 'लुट गये
अरे वा.. आता तुमचं 'लुट गये हम तेरी मोहोब्बतमे' होणार.
लिहिलेलं पत्र येऊ दे आता. (Of Course आपके नयनोंकी प्यास पुरी होने के बाद)
आणि गेल्या वेळेसारखं अर्ध नको. पूर्णच येऊ देत.
------------
हे बोलून दाखवल्यावर मला घालवण्यात आलं तिथून >>
आशुचँप,
एकसेएक धमाल पोस्टी आल्या आहेत
एकसेएक धमाल पोस्टी आल्या आहेत.
------
'सत्ते पे सत्ता' सिनेमात अमिताभने रोमॅन्टिक अभिनय किती समरसून केला आहे. पण एकीकडे रंजिता आणि दुसरीकडे हेमामालिनी आहे. रंजिता बोअर आणि हेमामालिनी अलिप्त वाटते. एवढा अनुनय करवून घेतात की दुसरी एखादी मधुबाला दुसऱ्या एखाद्या अवतार गिलवर सुद्धा प्रसन्न झाली असती.
------
जुही अतिशय गोड आणि तजेलदार दिसायची. ड्युप्लिकेटची गाणी मस्त आहेत. 'मेरे महेबुब मेरे सनम' ह्यात सोनाली व जुही दोघी आहेत. दोघीही सुंदर दिसतात. ते आवडतं होतं. सिनेमा विशेष नव्हता.
ईश्कचा पाईपवरून चालत जाण्याचा सीन धमाल आहे. 'मिस्टर लोवा लोवा तेरी आंखो का जादू' यातला अजय देवगणचा नाच विशेष म्हणजे हाताच्या हालचाली बघा. त्याला लॉन्ग शॉट देऊन प्रेक्षकांना भूल दिली आहे. पण आपण कशाला सोडायचं.
https://youtu.be/UTFyDM_mR_c
अस्मिता
अस्मिता
हाहा मस्त चर्चा. ए कुणाला
हाहा मस्त चर्चा. ए कुणाला हसीना मान जायेगी हा सिनेमा आवडत नाही का? टाईमपास आहे. गोविंदा, संजय दत्त, करिश्मा होती आणखी अजून एक हिरॉईन होती (चेहरा आठवतोय पण नाव नाही) अरुणा इराणी, कादरखान वगैरे नेहमीची मंडळी आहेतच.
अजून एक हिरॉईन होती >>>> पूजा
अजून एक हिरॉईन होती >>>> पूजा बात्रा
येस्स मृणाली
येस्स मृणाली
इष्क हा एकदम स्टीरिओटाईपी
इष्क हा एकदम स्टीरिओटाईपी चित्रपट आहे.आमच्या घरात लहान मुलांना आवडतो कारण त्यांना अजय देवगण आवडतो.
तो पुतळ्याचा सीन अतिशय एपिक आहे.त्यात पप्पू कंघी आणि देवेन वर्मा आहेत.दोघे नाहीत आता
काजोल चे मिनी ड्रेस चांगले आहेत.
अस्मिता
अस्मिता
पण माझ्यासारख्या निब्बर प्रेक्षकालाही दहा मिनिटांनंतर जमलं नाही बघायला.
सन्नी देओल चा घायल टोन सहनेबल झाला असता, पण सोबत चंकी पांडे पण आहे.
मिसेस अंडरकव्हर पाहिला.तसा
मिसेस अंडरकव्हर पाहिला.तसा ओके आहे.पण कथा साधारण 30 वर्षांपूर्वी लिहिलेली वाटली.आणि सिरीयल किलर वर अजिबात भर दिलेला नाहीये.राधिका थोडी ओव्हर ऍक्ट करतेय असं वाटलं.भूमिकेची गरज वगैरे असेल तर माहीत नाही.स्मृती भ्रंश वाली सासू क्युट आहे.
.राधिका थोडी ओव्हर ऍक्ट करतेय
.राधिका थोडी ओव्हर ऍक्ट करतेय>> अनु, थोडी या शब्दाला जोरदार आक्षेप आहे माझा
तसही त्यांनी त्यांच्या साईटवरच सिनेमाची कॅटेगरीच कॉमेडी अशी लिहीलेय (पण कॉमेडीही माती खाते तो भाग वेगळा )
थ्रिलर करावा की वुमेन्स डे स्पेशल करावा हे ठरवता ठरवता काही न ठरुन हसे झाले म्हणून शेवटी कॉमेडी कॅटेगरी देऊन टाकली असावी त्यांनी.
राधिका आपटे बरेचदा अंडर
राधिका आपटे बरेचदा अंडर एक्टिंग करते असे मला वाटते. इथे ओव्हर केली असेल. तिला अधलेमधले जमत नाही का..
नाही नाही. एका सीन मधे ती
नाही नाही. एका सीन मधे ती गच्चीवर पण दाखवलीय.
तिचे बेसमेंटचे किंवा ग्राऊंड फ्लोअरचे सीन्स जास्त असतात हे कबूल आहे. पण त्यामुळे अंडर अॅक्टिंगचा तिच्यावर शिक्का बसू नये.
गोदावरी पाहिला jiocinema वर.
गोदावरी पाहिला jiocinema वर. खूप जास्त आवडला. रिलिज झाल्यावर थिएटर मध्येच पाहायचा होता पण काही कारणाने राहून गेला. तेव्हापासून ott var येण्याची वाट पाहात होते. Finally पाहिला आज. माझ्या नाशिकचं सुरेख चित्रीकरण आहे, मीही गोदावरीच्या शहरातच लहानाची मोठी झालेय, त्यामुळे मला अधिकच भावला. जितेंद्र जोशी ने कमाल केली आहे.
वर्षा, मला गोविंदाचे डेविड
वर्षा, मला गोविंदाचे डेविड धवन बरोबरचे सिनेमे आवडतात. गोविंदा नाचात दादा आहे. तो नाचतो तेव्हा हिरॉईनकडे पण लक्ष जात नाही. कमीतकमी अंग हलवून चेहरा व हाताने कमाल करतो नाचात.
त्या बॉबी देओलची एक बर्दाश्त नावाचा सिनेमा, त्याची कथा खरंतर मस्त होती, सिनेमाही फार वाईट नव्हता पण चांगले अभिनय येणारे कलाकार हवे होते.
विनोदी चित्रपटाच्या
विनोदी चित्रपटाच्या निमित्ताने --- आफताब, फरदीन आणि सैफचा लवके लिये कुछभी करेगा नावाचा एक दुर्लक्षित सिनेमा आहे. Mad comedy . दर्जा फार उच्च नाही पण चांगला टाईमपास आहे.
काल आणि आज पाहिलेले.
काल आणि आज पाहिलेले.
1. Missing इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
एका LA मधे राहणाऱ्या मुलीची आई मित्रासोबत कोलंबिया ला ट्रिपला जाते आणि ट्रिपवरून परत आल्यावर मुलगी जेव्हा आईला आणायला एअरपोर्ट वर जाते तेव्हा आई मिसिंग असते...लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलगी आईला कशी शोधून काढते ते पहा सिनेमात..
मिस्ट्री, थ्रीलींग सिनेमा.
2. Nazar andaz हिंदी, नेटफ्लिक्सवर.
एक सुधीर नावाची दयाळू अंध व्यक्ती असते..त्याची एका भुरट्या चोराबरोबर मैत्री होते..हा चोर आणि सुधीर ची कामवाली यांच्यात सुधीरच्या इस्टेटीसाठी चुरस लागते.. कॉमेडी, फिल गुड , इमोशनल सिनेमा.
3. Choked(पैसा बोलता है), हिंदी, नेटफ्लिक्सवर.
एक बँकेत जॉब करणारी स्त्री,बेरोजगार,कर्जबाजारी पतीचे कर्ज फेडत असते..अचानक तीला पैशांचा एक source सापडतो..पुढे काय होते पाहा सिनेमात..
चांगला आहे सिनेमा.
सुनिधी, मृणाली +१
सुनिधी, मृणाली +१
चोक्ड मस्तच आहे.
बरेच सिनेमे, वेबमालिका
बरेच सिनेमे, वेबमालिका पहायच्या राहिलेल्या असतानाही लुटेरे मधले "पोटेन्शियल" नजरेआड करता आले नाही. आणि लुटेरे अपेक्षांवर पाचशे टक्के उतरला.
घायल सारखी सुरूवात. सुरूवातीलाच जुही चावलाला कड्यावरून फेकून द्यायचे दृश्य , झोपेत ते आठवून सनी देओल घामाघूम होऊन उठतो. पोलीस स्टेशनला येतो. तर चौकीत सगळे झोपलेले असतात. इतक्यात त्याच्यावर शोले मधे ठाकूरच्या हवेलीत जय आणि वीरू येतात, तेव्हां शेजारच्या कोठीत जसा हल्ला होतो तसा हल्ला होतो. नायक सन्नी देओल असल्याने हल्लेखोर टिकत नाहीत. इतक्यात छडी घेऊन आयजी झालेला सुब्बीराज येतो. "मै देखना चाहता था, आज भी तुम्हारे मे वो बात है या नही " इथून पुढे जे वेगवेगळ्या चित्रपटातले सीन्स आठवत राहतात ते शेवटपर्यंत.
आयजी स्वतः उघड्या जीपमधून इन्स्पेक्टरला घ्यायला आडवळणाच्या गावी येतो, व्हिलन इतका पॉवरफुल कि इन्स्पेक्टरला ठार मारतो आणि पोलीस हवालदील होतात. पोलीस ठाण्यात हल्ला करून पोलीसांना ठार मारतो आणि साक्षीदाराला फक्त धमकावतो.
बळी पडलेला इन्स्पेक्टर तसेच सनी देओल हे नियमित व्हिलनच्या अड्ड्यावर जाऊन दम देणे, डायलॉग हाणणे हे काम इमाने इतबारे करत असतात. तसेच आता बघ मी उद्या कसा तुला कोर्टात खेचतो असे म्हणून सावध करत असतात.
ज्या सा़क्षीदाराला शोधण्यासाठी व्हिलन खुंख्वार गँगला सोडलेले असते, त्याच साक्षीदारासहीत सनी देओल अड्ड्यात शिरून व्हिलनला धमकी देतो कि उद्या बारा वाजता हा साक्षीदार अमक्या फलाण्या कोर्टात साक्ष देईल तेव्हां तुझे साम्राज्य कोसळेल. हे म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्यांच्या कर्नलला आम्ही उद्या गुपचूप उधमपूरमार्गे रणगाड्यांची जी पलटण तुमच्या देशात घुसवणार आहोत त्यानंतर बघा मग तुमचं कसं होतंय असा दम दिल्यासारखंच आहे. असल्या ऑफीसरला तत्काळ त्याचे वरीष्ठ क्वार्टर मधे बंद करण्याचा आदेश देतील. तिथे आधी थर्ड डिग्री लागेल, मग कोर्टमार्शल होईल. पण लहानपणापासून पाहिलेली परंपरा पाहताना नॉस्टॅल्जिक होता आलं ही भावना सर्वात महत्वाची. नंतर आलेलं शहाणपण काय कामाचं ?
सुब्बीराज पीळ पीळ पीळतो. आयजी असून सतत मधुकर तोरडमल यांच्याप्रमाणे नाटकी भाषेत सणकी पांडे आणि शनी देऊळ यांच्याशी वाद घालतो. आयजीला इन्स्पेक्टर, सब इस्न्पेक्टर्स रिपोर्ट करतात. पोलीस पण त्याच चौकीत बसलेले असतात. हेडक्वार्टर मधे कदाचित हेडकॉन्स्टेबल बसत असावेत.
नासीरूद्दीन शाहला गंभीर आर्थिक अडचण असल्याने हा सिनेमा केला असावा. खर्च भागल्यानंतर दोन तीन पॅरलल सिनेमे करायला मोकळा.
पूजा बेदी जेव्हां शर्टच्या दोन्ही कडा छाती चिरणार्या हनुमानाच्या शैलीत दोन हातात घेऊन नासीरला "क्या तुम्हे मै दिल चीर के दिखा दू " असे टाहो फोडून विचारते, तेव्हां उठून ओरडून " हा हा जल्दी चीर दो" असे म्हणायचा मोह झालेला.
ज्या सा़क्षीदाराला
ज्या सा़क्षीदाराला शोधण्यासाठी व्हिलन खुंख्वार गँगला सोडलेले असते, त्याच साक्षीदारासहीत सनी देओल अड्ड्यात शिरून व्हिलनला धमकी देतो कि उद्या बारा वाजता हा साक्षीदार अमक्या फलाण्या कोर्टात साक्ष देईल तेव्हां तुझे साम्राज्य कोसळेल.
>>>> अगग्गं… रघू तुमची पेशन्स कमालीचा आहे.
(No subject)
दोघात तिसरा नाही व्हायचं. पण
दोघात तिसरा नाही व्हायचं. पण पुढच्या वेळेस स्वतःच्या ओळखीत / नात्यातील गरजूंना मदत हवी असेल तर तिथेही हेडर मधे असे वाक्य कोरून ठेवणार का?
जेव्हा लोक मदत करतात तेव्हा ते आभार मानण्याची अपेक्षा सुद्धा ठेवत नाहीत. माणुसकी टिकून आहे अजून. पण त्यांच्या कडून विरोध झाला कि व्हिक्टीम कार्ड खैळायचं राजकारण कशाला? अशा वेळी साथ देणाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न आहे.
पूजा बेदी जेव्हां शर्टच्या
पूजा बेदी जेव्हां शर्टच्या दोन्ही कडा छाती चिरणार्या हनुमानाच्या शैलीत दोन हातात घेऊन नासीरला "क्या तुम्हे मै दिल चीर के दिखा दू " असे टाहो फोडून विचारते, तेव्हां उठून ओरडून " हा हा जल्दी चीर दो" असे म्हणायचा मोह झालेला.
>>>>>>>>>>>
पूजा बेदी जेव्हां शर्टच्या
.
दिवाना मस्ताना पण मस्त
दिवाना मस्ताना पण मस्त जबरदस्त काॅमेडी होता यात गोविंदा व अनिल कपूर जुही ला आपआपल्या परीने पटवण्याचा प्रयत्न करत असतात एका सीन मध्ये हे तिघे गाडीने जात असतात तर अनिल गाडी घाटा मध्ये थांबून जुहीला म्हणतो
नेहाजी वह जो पहाड दिख रहाँ हैना उसके पीछे के पुरी जमीन मेंने खरीद ली है मैं वहाँ एक फ्वाईस्टार हाॅटेल बनाना चाहता हु ...गोविंदा - मगर उस पहाड के पीछे तो नदी है...अनिल- नदी के साथ खरीद ली है नेहाजी असे भन्नाट डायलॉग होते तर सतीश कौक्षीक चा पप्पु पेजर तर कहरच.होता ..आजही हा चित्रपट बोर करत नाही
एक ही बंदा काफी है मधल्या
एक ही बंदा काफी है मधल्या मनोज वाजपेयी साठी झी ५ चा मेंबर झालो आज.
कमाल अभिनेता आहे हा. संपूर्ण सिनेमात कुठेही स्टारडम नाही. दिग्दर्शन सुद्धा सुंदर आहे. यातला नायक सुपरहिरो नाही. सतत दडपणाखाली दाखवल्याने कनेक्ट होता आलं. सत्यकथाच आहे. बहुधा वकिली डावपेचांपेक्षा केस लढवण्याची हिंमत करणे, दबावाखालीही डळमळीत न होणे हा युएसपी आहे चित्रपटाचा. कारण जे काही युक्तीवाद आहेत ते फक्त जामीन मिळावा / न मिळावा याकरताच आहेत. त्यानंतर थेटच जजमेंट डे. केवळ मुलीच्या जबाबावरून शिक्षा (अगदी पॉस्को सारख्या कायद्यातही) होईल असे वाटत नाही. नैसर्गिक न्याय तत्त्व अशा कडक कायद्यांच्या केसेस मधे लागू केलं जातं. ते कसं झालं हे समजलं नाही.
एकूणच या केसमधला वास्तवातला थरार पाहता हा चित्रपटाचा नाही तर वेबसिरीजचा विषय आहे.
एक ही बंदा हे शीर्षक कॅची आहे. पण वास्तवात केस उभी करणारी पोलिसांची टीम सुद्धा तितकीच अभिनंदनास पात्र आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ती मुलगी आणि तिचे आईवडील हे महत्वाचे आहेत.
दिग्दर्शन सुद्धा सुंदर आहे
दिग्दर्शन सुद्धा सुंदर आहे
>>
२०१३-२०१८ अशी ५ वर्ष केस चालते
पण या ५ वर्षात जनरल लाईफ स्टाईल मध्ये झालेले काहीही बदल सिनेमात दिसत नाहीत
हेच काय, एकाही पात्राचं वय ही बदलेलं दिसत नाही (मनोज चा लहान मुलगा / व्हिक्टीम मुलगी हे ही मोठे झाल्याचं दिसंत नाही.
मनोज च्या अक्टिंग वर डीपेंड असलेला सिनेमा आहे
आश्रम + क्रिमिनल जस्टिस चं कॉम्बिनेशन असलेली कथा.
मीही हाच सिनेमा पाहण्यासाठी
मीही हाच सिनेमा पाहण्यासाठी महिन्याभराची मेंबरशिप घेतली आणि अगदी तंतोतंत हीच प्रतिक्रिया झाली माझीही.
केस घेताना ती बाइकस्वाराची गोष्ट तो सांगतो ती फार बोलकी आहे. बापू आरोपी आहे, पण त्याच्या एनेबलर्सचं (त्यात मुलीला त्याच्याकडे पाठवणारे आईवडीलही आले!) काय?!
बाकी त्या बापूच्या बचावासाठी धावलेल्या वकीलांची नामावळी अपॉलिंग आहेही - आणि दुर्दैवाने नाहीही! महिला कुस्तीपटुंचीही आठवण होत राहिली - फार हतबल वाटलं!
पण या ५ वर्षात जनरल लाईफ
पण या ५ वर्षात जनरल लाईफ स्टाईल मध्ये झालेले काहीही बदल सिनेमात दिसत नाहीत >> +१
Pages