Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चित्रपट सुसह्य करणारे
चित्रपट सुसह्य करणारे फॅक्टर्स या निकषावर राज कपूरचे बरेच सिनेमे आजही पाहता येतील.
हे असे online ट्रान्स्फर वै
हे असे online ट्रान्स्फर वै तर ऐकून पण नव्हतो तेव्हा.
>>>
बायकांची अदलाबदली हे सुध्दा ऐकून नव्हतो.
घरच्यांसोबत बघताना काय हे अक्षय कुमार सारखा हिरो आणि काय करतोय हा असे झालेले.
पण शेवटाला टाइप केलेला
अजनबी मध्ये करीना आणि बिपाशा असे 2 फॅक्टर देखील होते चित्रपट सुसह्य करणारे. >>>> त्यातल्या त्यात बिपाशा जास्तच
पण शेवटाला टाइप केलेला पासवर्ड **** असा न दाखवता Everything is planned कि काय दाखवला तेव्हा लै हसलेलो.
सगळ्यांना अगदी अगदी
सगळ्यांना अगदी अगदी

यातून काहीच चांगले किंवा वाईट कळणार नाही अशा बेताने वाक्ये टाकून बाजू सावरून धरली Happy>>>> मला ही शाळकरी वयात आवडलेला आणि नंतर घरी केबल वर लागला तेंव्हा आई ग काय भयाण चालू आहे असे काहिसे वाटल्याचे आठवते. त्यात ते जस्पाल भेट्टी चे झोपेत चालायचे नाटक करून जॉ. लिव्हर च्या बायको च्या रूम मधे जाणे वगैरे कहर होते
सर्व धर्मांचा स्टीरीओ टाईप होता त्यात.
अजनबी भारी वाटलेला त्या काळी. सगळे एक जात एक तर मस्त दिसतात. स्टोरी वेगळी होती, शेवटाचं ते पासवर्ड वालं लॉजिक कहर
चलती का नाम गाडी वरून आलेल्या
चलती का नाम गाडी वरून आलेल्या मराठी सिनेमाचे नाव इना मिना डिका आहे कि नाही हे आठवत नाही. बहुतेक एक गाडी बाकी अनाडी असं काही तरी असेल.
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक टारझन द वंडर कारवरून घेतलाय.
आता हे लास्ट साडे माडे तीन
आता हे लास्ट
साडे माडे तीन
हे पाहून झाल्यावर मूळ गाणे नक्की पहा.
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक टारझन द वंडर कारवरून घेतलाय.
>>>>
वावे, उलटं आहे हे.
लक्ष्याचा पिक्चर बालपणीची आठवण आहे तर टारझनची कार आली तेव्हा मी तारुण्यात पदार्पण केले होते.
आता मूळ संकल्पना कुठल्या इंग्लिश चित्रपटाची असेल तर त्याची कल्पना नाही. त्यासाठी मला मागच्या जन्मात डोकावावें लागेल
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक
एक गाडी बाकी अनाडी बहुतेक टारझन द वंडर कारवरून घेतलाय.
>>
हर्बी द लव्ह बग ओरिजिनल आहे, एक गाडी त्याची कॉपी
टारझन आणखी 10-15 वर्षांनी आलेली कॉपी
त्यासाठी मला मागच्या जन्मात
त्यासाठी मला मागच्या जन्मात डोकावावें >>> एक प्रतिसाद चोरला माझा. पुढच्या पिक्चरला लिहीणारच होतो, तेव्हढंच शिल्लक होतं.
हर्बी द लव्ह बग >>> वाटलेले
हर्बी द लव्ह बग >>> वाटलेले च .. इंग्लिश निघणार काहीतरी
बाई दवे, धडाकेबाज मधील बाटलीतला गंगाराम लक्ष्या किंवा दे दनादण मधील पॉवरबाज लक्ष्या ज्याची पॉवर लाल रंग बघताच फुस्स होते या कल्पना ओरिजिनल आहेत का? गेला बाजार झपाटलेला बाहुला तात्या विंचू ??
तात्या विंचू - चाईल्ड्स प्ले
तात्या विंचू - चाईल्ड्स प्ले
बाटलीतला गंगाराम - एक्झॉर्सिस्ट ( कथा वेगळी आहे)
आजून एक चित्रपट नाव आठवत
आजून एक चित्रपट नाव आठवत नाही, ज्यात अनिल कपूर , करीना कपूर , सुश्मिता सेन, अक्षय कुमार होते , ज्यात सुश मरते आणि करीना तिची बाहीण असते, सुश च्या मुलांना सांभाळायला ती सुश च्या नवऱ्याशी म्हणजे अनिलशी लग्न करते , पण तिचा प्रियकर अक्षय असतो , अनिल तिला हिणवतो कि सुश ची जागा घेऊ शकणार नाही वगैरे ,
अक्षय खन्ना चा दिवार भयानक मुवि , ब्लॅक ज्यात मोठे बच्चन आणि राणी मुखर्रजी आहे (अत्यन्त ओव्हर रेटेड ), लहानपणी जेव्हा केबल चा ऑपशन नव्हता तेव्हा शनिवार रविवार पाहिलेले तमाशा पट आणि अनेक चित्रपट , उर्वीसी गाणे असेलेला मुवि, ज्यात नगमा, प्रभुदेवा, गिरीश कर्नाड (चक्क)वगैरे
अरे हो, टारझन द वंडर कार
अरे हो, टारझन द वंडर कार नंतरचा आहे. हर्बी द लव्ह बग माहिती नव्हता.
आजून एक चित्रपट नाव आठवत नाही
आजून एक चित्रपट नाव आठवत नाही, ज्यात अनिल कपूर , करीना कपूर , सुश्मिता सेन, अक्षय कुमार होते , ज्यात सुश मरते आणि करीना तिची बाहीण असते, सुश च्या मुलांना सांभाळायला ती सुश च्या नवऱ्याशी म्हणजे अनिलशी लग्न करते , पण तिचा प्रियकर अक्षय असतो , अनिल तिला हिणवतो कि सुश ची जागा घेऊ शकणार नाही वगैरे ,>> हाय तो म्हणजे बेवफा.
र्वीसी गाणे असेलेला मुवि, ज्यात नगमा, प्रभुदेवा, गिरीश कर्नाड (चक्क)वगैरे> हा कादलन किंवा तेलुगुत प्रेमिकुडू. ह्यातील गाणी एक सो एक होती. उर्वशी आजच सकाळी ऐकले.
मी फारच जुनाट म्हातारी आहे कारण मी हर्बी द लव्ह बग थेट्रात बघितलेला आहे. गाडीचे स्वतःचे व्यक्तिमत्व असते व फार विनोदी सिनेमा.
यलो कलरची वोक्स वागन बीटल कार आहे. म्हणून ती गाडी घ्यायचे स्वप्न फार दिवस डोसक्यात होते. पण लैच महाग आहे. त्यात तिचा वॉर संबंधित इतिहास वगिअरे. ह्या ची एक सीरीज आलेली. हर्बी गोज बनानाज व इतर सिनेमे होते. खट्याळ कार.
वावे, हार्बीचे सगळे चित्रपट
वावे, हार्बीचे सगळे चित्रपट शोधून बघ. फार गोड आहेत सगळेच
The love bug 1969
छोटी क्लिप मिळाली युट्युबवर
https://youtu.be/4XWufUZ1mxQ
ही कास्ट शोध
हा कादलन किंवा तेलुगुत
हा कादलन किंवा तेलुगुत प्रेमिकुडू. ह्यातील गाणी एक सो एक होती>>> हो आणि हिंदीत हमसे है मुकाबला
रेहमान ची जादू
पण हिंदीतील लिरिक्स इतके भीषण आहेत की विचारूनका
तोच प्रकार हिंदुस्थानी मध्ये
अमा पांढरी वर लालपांढरानिळा
अमा पांढरी वर लालपांढरानिळा पट्टा अन 53 नंबर
या "हर्बी" वर बेतलेले
या "हर्बी" वर बेतलेले अमिताभच्या "हाच तो अमिताभ का" वाटायला लावण्याच्या काळात "हाच तो रमेश सिप्पी का" वाटेल अशा पिक्चर मधले हे गाणे ("अकेला")
https://www.youtube.com/watch?v=Na8rWbxGnbE
त्यामानाने अमिताभची खुद्दार मधली टॅक्सी मजेदार होती. तो खोटे बोलला की स्टार्ट होत नसे असे काहीतरी होते.
मिनाक्षी सुंदरेश्वर, हिंदी,
मिनाक्षी सुंदरेश्वर, हिंदी, नेटफ्लिक्सवर.
लॉंग डिसटन्स रिलेशनशिप, मदुराईतील मंदिरं, सान्या मल्होत्राच्या साड्या-दागिने,मदुराई स्पेशल जीगरथंडा आणि खादाडी आणि हलकाफुलका फैमिली ड्रामा बघा मिनाक्षी सुंदरेश्वर मधे.. चांगला आहे सिनेमा..
अमिताभच्या "हाच तो अमिताभ का"
अमिताभच्या "हाच तो अमिताभ का" वाटायला लावण्याच्या काळात
या काळाव्रही एक लेख येउदे फा !
तो खोटे बोलला की स्टार्ट होत
तो खोटे बोलला की स्टार्ट होत नसे असे काहीतरी होते. >> क्रिमीनल, दोन नंबर वाला, खोटे बोललेला पॅसेंजर बसला कि सुरू व्हायची नाही.
या धाग्यावर कॅप्टन फिलिप्स बद्दल कुणीच कसं सांगितलं नाही ? मला इंग्लिश मूवीज दिसतच नव्हते. आज मुद्दाम सेटींग्ज बदलले तर हा समोर आला.
मस्त आहे. दुसर्याच सीन मधे अंदाज आला कि हा चाललाय आणि सोमाली चाचे म्हणजे हा यांच्या तावडीत फसणार. प्रत्येक सिनेमात तो कुठल्या न कुठल्या सिच्युएशन मधे फसतच असतो.
कादलन किंवा तेलुगुत
कादलन किंवा तेलुगुत प्रेमिकुडू.
>>> हिंदीत हमसे हैं मुकाबला!
दे दनादण मधील पॉवरबाज लक्ष्या
दे दनादण मधील पॉवरबाज लक्ष्या ज्याची पॉवर लाल रंग बघताच फुस्स होते >>> याचा ओरिजिनल म्हणजे Super Snooper पिक्चर. याचं नाव सर्च केल्यावर Super Fuzz असं दिसतंय. पण मी आधीच्याच नावाने बघितलाय हा पिक्चर
पूर्वी झी टीव्हीवर एक हॉलीवूड
पूर्वी झी टीव्हीवर एक हॉलीवूड से बॉलिवूड असा कार्यक्रम लागायचा, त्यात असे कथेची आणि/किंवा सीन्सची कॉपी मारलेले चित्रपट असायचे. अक्षरशः नक्कल असायची. सलमान खानचा चंद्रमुखी, अमिताभचा सत्ते पे सत्ता हे दोन मला लक्षात आहेत. बाकी आठवत नाहीत.
प्रत्येक सिनेमात तो कुठल्या न
प्रत्येक सिनेमात तो कुठल्या न कुठल्या सिच्युएशन मधे फसतच असतो. >>> टॉम हॅन्क्स बरोबर कधीही प्रवास करू नका अशी एक मीम आली होती
पूर्वी झी टीव्हीवर एक हॉलीवूड से बॉलिवूड असा कार्यक्रम लागायचा, >>> आठवतोय मला. सत्ते पे सत्ताचा ओरिजिनल तुकड्यांत पाहिला होता. पण सत्ते पे सत्ता जास्त मजेदार वाटला होता. देशीकरण जमले असेल. मूळ पिक्चर पेक्षा बॉलीवूड आवृत्ती जास्त बघणेबल वाटल्याचे अजून एक उदाहरण म्हणजे "मालामाल वीकली". मूळ आयरिश पिक्चर इतका खास नव्ह्ता वाटला.
आता ते भारतीय "परिप्रेक्ष्य" वगैरे सगळी कारणे आलीच. पण देशी आवृत्ती जास्त बघणेबल आहे हे नक्की.
याउलट "शक्ती -द पॉवर" वगैरे महाभीषण आहेत. ओरिजिनल "नॉट विदाऊट माय डॉटर". ब्रूस विलिस-मॅथ्यू पेरीचा "द होल नाइन यार्ड्स" एक अफलातून पिक्चर आहे. पण त्याचा देशी महाटुकार होता. बहुधा आवारा पागल दीवाना.
मीट जॉन डो वरून मै आझाद हूं
मीट जॉन डो वरून मै आझाद हूं आलेला. देशी आवृत्ती जास्त चांगली वाटली. जावेद ने लिहीलेला.
जॉन क्यू (John Q) वरून एक
जॉन क्यू (John Q) वरून एक संजय दत्तचा मूव्ही आला होता. बास! इथेच माझी पोस्ट थांबवतो आणि एक मिनीट मौन पाळतो.
(No subject)
फेफ
फेफ
Pages