चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो मी सलमान आणि काजोल अरबाज आणि धर्मेंद्र यांचया एक लांबलचक नाव असलेला सिनेमा खूप आवडीने बघायचो>>>> प्यार किया तो डरना क्या..

नॉस्टॅल्जिक सिनेमा-हद करदी आपने..केबल कनेक्शन नव्हते घरी तेव्हा.. दुरदर्शन वर जितक्या वेळा दाखवायचे तितक्यांदा बघितलेला.

मला आत्ताच्या कुठल्याही पिक्चरपेक्षा हे सगळे पिक्चर आजही पाहायला आवडतात. मग कोणी बाळबोध म्हणो की शिव्या घालो. अगदी प्यार किया तो डरना क्या सुद्धा. सुपर टाईमपास पिक्चर आहे तो!

बाकी वरच्या एका पोस्ट मध्ये ए अजनबी शाहरुख गातो असं लिहिलं आहे ते तसं नाहीये. ए अजनबी गाणं background ला आहे. ते शाहरुखने रेडिओ वर लावलेलं असतं.

स्पायडर मॅन: ॲक्रोस द स्पायडर व्हर्स बघितला. सिनेमा चांगला आहे. आवडला. काही नोंदी.

१. स्पायडर पीपल ची गर्दी आहे त्यापेक्षा होबी किंवा पवित्र सारख्या रोचक स्पायडर मेन बद्दल आणखी जाणायला आवडले असते.

२. सिनेमाच्या राखाडी / खल पात्रांची उद्दिष्टे काहीतरीच वाटतात. एकाचे लॉजिक तर काहीही आहे. आणि ते पात्र जोकर टाईप नाही की लॉजिक बरोबर नसले तरी चालते.

३. पिटर बी पार्कर मला पहिल्या सिनेमात खूप आवडलेला. इथे त्याला फुटेज तर कमी आहेच (which इज okay, त्याचा सिनेमा नाहीये) पण जे आहे ते फार बालिश वाटले. कदाचित पुढील सिनेमात धमाका असेल त्याचा.

४. सिनेमा पूर्ण झाल्याचे फिलिंग आले नाही. भलेही तुम्ही दुसरा पार्ट काढणार असाल. पण मला सिनेमा संपताना काहीतरी conclusive भावना मिळावी अशी अपेक्षा असते.

५. प्रत्येक विश्वास वेगळी अनिमेशन स्टाईल ही अतिशय भन्नाट कल्पना आहे आणि चोख साकार केली आहे. अक्षरशः स्क्रीनवर कुठेपाहू कुठे नको असे होते इतके exploding visuals आहेत.

६. माईल्स अतिशय आवडला. त्याचे आणि ग्वेनचे पात्र उत्तम डेव्हलप झाले आहे.

ए अजनबी शाहरुख गातो असं लिहिलं आहे ते तसं नाहीये. ए अजनबी गाणं background ला आहे. ते शाहरुखने रेडिओ वर लावलेलं असतं.
>>>>>

हो. ते गाणे बॅकग्राऊंडला रेडिओवर वाजत असते.
पण तसंही आपल्याकडे दर दुसऱ्या पिक्चर मध्ये हिरो स्वतः गाणाराच असतो Wink

बाकी आतंकवाद्याची प्रेम कहानी या विषयावर मला तो आमिरचा फनाह पिक्चर बाळबोध वाटतो. पण त्याने कदाचित बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली असावी.

मग कोणी बाळबोध म्हणो की शिव्या घालो. अगदी प्यार किया तो डरना क्या सुद्धा. सुपर टाईमपास पिक्चर आहे तो!
<<<<<

माझा ही तो ऑल टाईम फेवरेट आहे. सलमानने खाऊन टाकला आहे तो पिक्चर. माझ्या मुलीला मी जे जुने माझ्या काळातले पिक्चर आठवून दाखवले त्यात तोही होताच. तिलाही आवडला. असे पिक्चर अल्लड मनाने आणि त्या काळात जाऊनच एन्जॉय करायचे असतात असे वाटते.

सलमान आणि काजोल अरबाज आणि धर्मेंद्र यांचया एक लांबलचक नाव असलेला सिनेमा >>> हो, तेव्हा तो खूप गाजला होता. उगीच! Lol
'प्यार किया तो डरना क्या'
ओ ओ जानेजाना गाणं असलेला.

----

जुने आवडलेले सिनेमे पुन्हा बघताना मोस्टली आवडतच नाहीत. या थीमवरच्या एका पॉडकास्टबद्दल समजलं, तेव्हा ती लिंक सेव्ह करून ठेवली होती. (हॅज इट एज्ड वेल) अजून त्यातलं एकही पॉडकास्ट ऐकलं नाही. Biggrin

बाकी आतंकवाद्याची प्रेम कहानी या विषयावर मला तो आमिरचा फनाह पिक्चर बाळबोध वाटतो. पण त्याने कदाचित बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली असावी.
>>> फना सपशेल आपटला होता!

जूने सारेच चित्रपट बाळबोध किव्वा न आवडणारे असतात असे मी म्हणत नाही आहे. नाहीतर evergreen ही टर्म /संकल्पना कशी असती? काही काही चित्रपट, पुस्तके कालातीत असतात अणि काही कालांतराने आपल्याला तितकेच नाही आवडत. कोणत्याही कारणाने.

या धाग्यावर पहिला प्रतिसाद आहे माझा.
फना वर गुजरात मधे बॅन होता. बाकी ठिकाणी हिंदुत्ववाद्यांनी बहीष्कार टाकला होता. तरी त्याने १०३ कोटींचा धंदा केला. १०० कोटी क्लब त्या वेळी अस्तित्वात नव्हता. फना बनवायला ३० कोटी रूपये खर्च आला होता.
https://boxofficeindia.com/movie.php?movieid=297

फना सपशेल आपटला होता!
>>>>
वरच्या लिंक नुसार सुपरहिट आहे.
मी स्वतः तो दुसऱ्या आठवड्यात एका मैत्रिणीसोबत थिएटरला पाहिलेला. तिने आधी तो तिच्या मैत्रीणी सोबत पहिल्या आठवड्यात पाहिलेला. तरी दुसऱ्यांदा बघायला आलेली. त्यामुळे चित्रपटाची क्रेझ असल्याचे आठवतेय.

पण पिक्चर बंडल होता.
मला फक्त गाण्यातील शानचा आवाज आवडलेला.

हा सिनेमा आला तेव्हां मी रांगत होतो. तरीही त्याची क्रेझ आठवते तर.
शिवाय त्यातला लांब केसाचा आमीरचा लुक पण आवडला होता. आमीर काजोल दोघांचा अभिनय आवडला होता.

या निमित्ताने एक जुनी आठवण

काजोल आणि अनिल कपूर चा एक महाभीषण सिनेमा आलेला
हम आपके दिल मै रेहते हे

आणि पहिल्यांदा पहिला तेव्हा मला खूप आवडलेला, मग नंतर एका मैत्रीणीशी बोलताना विषय निघाला तर म्हणे
अरे कसला मेलोड्रामिक सिनेमा आहे तो

बोंबला, तेव्हा मेलोड्रामिक चा अर्थ कुठं माहिती होता, मोबाईल ही नव्हते की पटकन गुगल करावं
बर ती अशा सुरात बोलली की तो चांगला आहे का वाईट हे काहीच कळल नाही Happy

मी आपला चाचपडत हो ना, खूपच
आणि काजोल कसलं काम करते, रडताना अगदी
अनिल कपूर पण असले रोल करतो ना

यातून काहीच चांगले किंवा वाईट कळणार नाही अशा बेताने वाक्ये टाकून बाजू सावरून धरली Happy

यातून काहीच चांगले किंवा वाईट कळणार नाही अशा बेताने वाक्ये टाकून बाजू सावरून धरली >>> Lol

जागेच्या समस्येवरचा सिनेमा होता बहुतेक तो. त्यांना जागा मिळत नसल्याने दिल मधे राहत असतात.

फारच भीषण होता
पण गाणी मस्त होती एकसे एक

जुन्या भारतभूषण, प्रदीप यांच्या अनेक सिनेमांना जसे संगीताने तोलून धरले तसेच 90 च्या दशकात पण अनेक सुमार सिनेमे केवळ गाण्यांच्या जोरावर चालले

त्यातच जॉनी लिवर कोणत्याही सणाच्या दिवशी भलताच सण साजरा करत असतो अशी आचरट कॉमेडी होती बहुतेक. ते भारी होतं. Lol

ते नई आठवत पण उधार पैसे देण्यावरून बराच वेळ चाललेला जॉनी लिव्हर, सतीश कौशिक यांचा आचरटपणा आठवतोय

महाराष्ट्र शाहीर चित्रपट. गेले 5 दिवस जरा जरा बघत होतो. भानुमती आणि अंकुश साताऱ्याच्या घरात आलेत, रेडिओची फोटोग्राफी सुरू आहे, काहीतरी व्हय नाय होय नाही जोक झाला, आणि... अंकुश चौधरी हसला!

तसा माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होऊन मी tv बंद केला. ही अशी acting? कधीकाळी जमलं असेलही अंकुशला अभिनय करणं, पण गेल्या 5-7 वर्षात पार गाळात गेलंय काम. त्यात पुन्हा ती लादलेली नायिका, सना शिंदे! काय आहे काय हे? इतकं गृहीत धरायचं प्रेक्षकांना? अभिनयाच्या बाबतीत अतिशय फसलाय हा चित्रपट. एक निर्मिती सावंत सोडता इथवर एकही पात्र पुरेसं convincing वाटलं नाही.

आणि वर हे लोक मराठी प्रेक्षकांच्या नावाने ठणाणा करणार. का बघायचे तुमचे चित्रपट??

सो कॉल्ड एव्हरग्रिन सिनेमे अंदाज अपना अपना पाहिला तर आजिबात आवडला नव्हता
×××××

तसाही तो तेव्हा पडलेला आहे बॉक्स ऑफिसवर.

मला तर मराठी कॉमेडी चित्रपटांमध्ये अशी ही बनवाबनवी सुद्धा ओव्हर हाईप वाटतो. म्हणजे आहे तो छान. नो डाऊट. पण तरी लोक जास्तच कौतुक करतात. इतरही बरेच मराठी चित्रपट आहेत त्या काळातले छान. शेवटी लोक कशाला उचलून धरतील काही सांगता येत नाही. ते सगळ्यांनाच पटेल असे नसते.

हा वर उल्लेख केलेला अंदाज अपना अपना सुद्धा मी मुलीला दाखवायला घेतला. मी कितीतरी हजारावी वेळ बघत होतो तरी मला हसायला येत होते. पण तिला बिलकुल येत नव्हते. मी सुद्धा हा तिच्याच वयात पाहिलेला, मी तेव्हापासून दरवेळी हा बघून हसतोय.

विनोद पण जुना होतो.
पठाणच्या वेळी मी शिशु असलो तरी अंदाज अपना अपनाच्या वेळी कॉलेजला होतो. बनवाबनवी शाळेत असताना पाहिलेला होता. शोलेच्या वेळी जेव्हां मोठा होईन तेव्हां हे विनोद जुने वाटतील.

क्युरिअस केस ऑफ आचार्य....! Lol

आशुचॅम्प Lol

असामी, 'दिल से' वरील पोस्ट आवडली.

'प्यार किया तो डरना क्या' (बहुतेक) दहावीच्या सुट्टीत केबलवाल्याने जितका वेळा लावला तितका बघितला. 'ओओ जाने जाना' व 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' ही गाणी दर्जेदार व अरबाज काय हॉट मोठा भाऊ आहे वाटायला लागलं होतं. स्टॉकहोम सिंड्रोम असावा. असंच एका सुट्टीत 'कहो ना प्यार है' व एका सुट्टीत 'बादशहा' सिनेमाची पारायणे केलीत. कधी केबलवाल्याची तर कधी आमची लाईट जायची पण आम्ही व्रतापासून ढळलो नाहीत, हातची कामं सोडून पळत येऊन कंटिन्यू केलेय.

हम आपके दिल मै रेहते हे >>>> हा सिनेमा आम्ही बारावीची परीक्षा संपल्याच्या दिवशी थिएटर मध्ये जाऊन पाहिला होता. परीक्षा संपलेली असल्याने तो शो हाऊसफुल होता. पण सिनेमा इतका भयाण होता की शेवटी सगळे कॉलेज गेदरींग असल्यासारखे दंगा करायला लागले ! तिथला माणूस येऊन ओरडून गेला Happy

छुप गया बदली मे जाके चांद भी शरमा गया
आपको देखा तो फुलो को पसीना आ गया
हे गाणे त्यातलेच ना
शब्द फनी वाटतात आता पण चाल मस्त होती

बाकी काही असो एकेकाळी गाणी मस्त असायची
आता ती मेलडी हरवली आहे

Pages