Submitted by अक्षय समेळ on 16 June, 2023 - 10:59
कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया
बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला
संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही
नव्याने लिहावे लागले तरी पुनः लिहेन
आयुष्याचे प्रत्येक पान नव्याने रंगवेन
इच्छा तुझी मला हारताना बघण्याची
इच्छाच राहील कधीही न पूर्ण होणारी
© अक्षय समेल
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ईश्वराला किंवा नशीबाला -
ईश्वराला किंवा नशीबाला - उद्देश्युन लिहीलेली कविता आहे का?
छान आहे. वीररस आहे.
@सामो, हो. धन्यवाद!
@सामो, हो. धन्यवाद!