चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मुलीचे कपडे (ओढणी घेण्याची पद्धत) आणि हेअरस्टाईल बदलून पिक्चर च्या शेवटी ती थोडी मोठी वाटते आहे.
बंदा सुंदर पिक्चर आहे.आरोपी चा वकील एक सेन्सिटिव्ह प्रश्न मुलीला विचारताना ऑकवर्ड होतो ते आवडलं.
मनोज वाजपेयी बेस्टच. अगदी शेवट क्लोजिंग स्पीच मध्ये जरा ओव्हर ऍक्ट वाटलं.

मला एक बंदा... चे कौतुक वाटले कारण एरव्ही जे स्टिरिओटाइप असतात, जसे त्या बाबाचे व्हिलन टाइप डायलॉग्ज, लाउड अ‍ॅक्टिंग, मुलीला ऑब्जेक्टिफाय करणे, बलात्कारची ग्राफिक वर्णने इ. बोलून ह्यूमिलिएट करणे, आई बापांचे हृदयद्रावक सीन वगैरे काही घेतलेले नाहीत, अ‍ॅक्चुअली त्या मुलीने कायम चेहरा झाकून घेतलेला दाखवला आहे, तरीही परिस्थिती आपल्यापर्यन्त व्यवस्थ्ति पोहोचते. शेवटचे क्लोजिंग आर्ग्युमेन्ट च काय ते जरा ड्रॅमॅटिक आहे. पण तेवढे प्रत्यक्षात पण असणार.

Submitted by maitreyee on 11 June, 2023 - 22:47 >>> करेक्ट.

त्यामुळे वयाचा मुद्दा ( डिटेलिंग) मधल्या चुका इग्नोर करू शकतो.

ज्या सा़क्षीदाराला शोधण्यासाठी व्हिलन खुंख्वार गँगला सोडलेले असते, त्याच साक्षीदारासहीत सनी देओल अड्ड्यात शिरून व्हिलनला धमकी देतो कि उद्या बारा वाजता हा साक्षीदार अमक्या फलाण्या कोर्टात साक्ष देईल >>>
आयजीला इन्स्पेक्टर, सब इस्न्पेक्टर्स रिपोर्ट करतात. पोलीस पण त्याच चौकीत बसलेले असतात. हेडक्वार्टर मधे कदाचित हेडकॉन्स्टेबल बसत असावेत. >>> Lol

धमाल आहे हे. पुढचे पण येऊ दे.

विविध ऑर्गनायझेशन मधले संबंध, त्यातील रिपोर्टिंग स्ट्रक्चर, कोण कोठे कोणत्या वेळेस का असतो याचे डिटेलिंग आपल्याकडे अफलातून असते. अनेकदा फक्त नायकाच्या विरोधात आहेत म्हणून एरव्ही एकमेकांशी काहीही संबंध नसलेले लोक एकत्र येउन स्कीमिंग वगैरे करतात, एकाच रूम मधे प्लॅनिंग करतात. हीरो किंवा व्हिलन दणदणीत टायटल हवे म्हणून हायरार्की मधे एकदम वर असतो पण प्रत्यक्षात सगळे तो स्वतःच "घर मे घुसके मारूंगा" पद्धतीने करतो, ते ही त्या ऑर्गनायझेशन मधे त्याला उपलब्ध असलेले प्रोसीजरल उपाय न वापरता. ९०ज ची ही एक खासियत होती. पण मला आठवते - इव्हन रंग दे बसंती मधे असे आहे (एरव्ही अनरिलेटेड असलेले व्हिलन्स एकत्र)

She Said अ‍ॅमेझॉन प्राईमवर पाहिला. मी टू चळवळीचा उगम असलेल्या Harvey Weinstein केसवर आधारीत आहे. बघण्यासारखा आहे.

अवतार वे ऑफ वॉटर कि काय तो थोडा बघितला. सीजी इंप्रेसिव्हच आहे. पण किती तो लांबडा सिनेमा? व सीजीच आहे फक्त. समुद्रातले प्राणी पण सीजी. मेन कॅरेक्ट र्स पण सीजी हे जरा बोअर होते. रुनमेषचे मुलांना बागेत फिरवायचे बाफ आहेत तसे त्या पिक्चर मधले काही भाग आहेत. खेळणारी मुले फिश वॉटर वाळू झाडे जंगल फुले पाने असे आहे. कॉन्फ्लिक्ट कधी येइल?

त्या पर्ल हार्बर सिनेमात पण असेच होते. शेवटचा अ‍ॅटेक लै भारी चित्रित केला आहे पण तिथ परेन्त पोहोचे परेन्त फार बोअर होते. त्यापेक्षा युट्युब वर डोक्यु मे टरी बघावी.

Unlocked,कोरियन, नेटफ्लिक्सवर.
एका तरुण मुलीचा लीनामीचा फोन हरवतो..तो एका सायको क्रीमीनल ला सापडतो..तो मोबाईलमधे स्पाय ऐप टाकून लीनामीला परत करतो.. आणि सुरू होते थ्रीलींग गोष्ट... लीनामी काय करते? कुठे जाते? कुणाशी काय बोलते?सगळे सीक्रेट्स लाईव त्या माणसाला कळत असतात..त्याचा मिसयुज करून तो लीनामीच्या आयुष्यात किती लेवलपर्यंत त्रासदायक ढवळाढवळ करू शकतो..पहा सिनेमात..
शहराच्या बाहेर जंगलात एकीकडे डेडबॉडीज सापडत असतात.. काय कनेक्शन असेल दोन्ही घटनांमधे?
थ्रीलींग, सस्पेन्स, खिळवून ठेवणारा सिनेमा.. आवडला.

मिसिंग - हा 'सर्चिंग' सारख्याच थीमचा वाटतोय.

She Said अ‍ॅमेझॉन प्राईमवर >>> यादीत टाकला.
(किती सिनेमे, सिरीज बघायच्या यादीत आहेत, कधी बघून होणार काय माहित! Biggrin )

स्वाती आंबोळे, फारएण्ड धन्यवाद.

फारएण्ड, केसच्या संदर्भात रोजची प्रगती बॉसऐवजी व्हिलनला रिपोर्ट करणाऱ्या पोलीस नायकाचा स्वतंत्र धागा निघू शकतो इतके प्रसंग आहेत.
ए ग्रेड चित्रपट सुद्धा अपवाद नाहीत.
विश्वनाथ मधे शत्रुघ्न सिन्हा (सरकारी वकील) प्रेमनाथला इशारा द्यायला जातो आणि केसचे अपडेट देतो. स्वतःच संवेदनशील माहिती पुरवतो ते पुरवतो पण व्हिलन बधत नाही म्हटल्यावर प्रेक्षकांपुढे इज्जत जायला नको म्हणून जली को आग कहते है " हा सुतळी बॉंब फोडून येतो. त्याचा एंड रिझल्ट काय हे त्यालाच माहीत.

जंजीर मधे अमिताभ बच्चन अजितला त्याचा कोणता माणूस पकडलाय हे इशारे देताना सांगून सावध करतो.

दुसऱ्या वेळी पोलीस चौकीत फारसे काम नसल्याने अजित कडे जाऊन जाने से पहले दो बाते हा प्रसिद्ध डायलॉग चिपकवून येतो. तसं त्याचं तिथे दुसरं काही काम नसत. त्या वेळी मायबोली असतं तर वेळ तरी गेला असता बिचाऱ्याचा.

मुळात 5 वर्षात चेहरेपट्टी किंवा एकुणातच लक्षात येण्याजोगे बदल होत नाहीत, त्यातल्या त्यात कुठे टाईम लीप घेतलेली नाही.. तशी घेतली तर झालेले बदल ठळकपणे जाणवतात. scooter वरून कार

बंदा पिक्चर चांगला आहे पण अजून परिणामकारक करता आला असता. संवाद फार भेदक नाहीत. शेवटचे स्वगत विशेष करून अधिक टोकदार लिहिता आले असते. पण मग बहुतेक सेन्सर बोर्ड ने पास केले नसते. हिरो सिंगल पेरेंट असणे व मुलाशी भावुक संवाद. हिरो निराश झाल्यावर
वयस्कर पालकांनी धीर दायक बोलणे व लगेच नेक्स्ट डे हिरोची एनर्जी परत येणे व परिस्थिती पण सुधारणे हे खूप क्लिशेड आहे. पण प्रयत्न चांगला च आहे. मनोज बाजपेयी रॉक्स.

सिर्फ एक बंदा काफी है पाहिला
मनोज वाजपेयी बेस्ट.
कोर्ट मधील वातावरण आवडलेच.
दोन्ही वकील sensitive matter आहे, पण कामही करायचं आहे हे भान ठेवून आहेत. विशेषतः त्या बाबाचे वकील. मनोज वाजपेयीला सॉरी म्हणतो आणि प्रश्न विचारतो.
( मला एकदम दामिनी आठवला , त्यात एकदम ऑफेन्डींग प्रश्न खूपच विचित्र प्रकारे विचारलेले आहेत. )
पोक्सो related जुगलबंदी छान.
नंतर खूप abruptly संपतो असे वाटले.
काही काही गोष्टी खटकणार्या आहेतच , ज्या इथे सर्वांनी लिहिल्या आहेतच.

केसच्या संदर्भात रोजची प्रगती बॉसऐवजी व्हिलनला रिपोर्ट करणाऱ्या पोलीस नायकाचा स्वतंत्र धागा निघू शकतो >>> Lol

ए ग्रेड चित्रपट सुद्धा अपवाद नाहीत. >>> हो टोटली.

छान बनवला आहे एक बंदा
काय मस्त बेरिंग पकडले आहे मनोज वाजपेयी ने..
क्लायमॅक्स स्पीच पण एकदम भारी.. सत्य असेच सांगितले गेले पाहिजे तरच ते ठसते !

शेवटच्या रावण किस्सावरून आदीपुरुष ट्रेलरच्या वेळी झालेली चर्चा आठवली.. तिथेही रावण विद्वान आणि शिवभक्त असल्याचा मुद्दा उपस्थित होत होता. जो बिलकुल पटत नव्हता. विलनला विलनच दाखवा. यात आसूमल चिड येईल असाच दाखवला आहे

महाराष्ट्र शाहीर

शाहीर साबळेंच्या स्टोरीत इंटरेस्ट आहे म्हणून पहायला सुरुवात केली. शिवाय शाळेत असताना महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला होता, खूप आवडला होता, तो पण एक धागा आहे.

पण पहिल्या १० मिनिटांतच सिनेमा बोअर झाला. (अर्धाच पाहून झालाय.) तरी अंकुश चौधरी आवडतो म्हणून उर्वरित किल्ला लढवणार आहे.
आपल्याकडे बायोपिक म्हणजे कलाकारांच्या बाह्यरुपावर सगळा फोकस असतो. स्क्रिप्टवर काम करत नाहीत. स्टोरीचे तुकडेतुकडे जोडलेत. ती हिरॉइन तर महान बोअर. शिकवलेला अभिनय सुद्धा करत नाही.

फार अपेक्षा नव्हत्या सिनेमाकडून, तरी टोटल विरस झाला माझा.
शाहीर साबळेंची तेव्हा गाजलेली गाणी परत ऐकायला जरा मजा आली तेवढंच.

तसं त्याचं तिथे दुसरं काही काम नसत. त्या वेळी मायबोली असतं तर वेळ तरी गेला असता बिचाऱ्याचा. >>> Lol

मिरेस अंडरकव्हर - अ आणि अ.
२ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला असावा. एकाने विनोदी करण्याचा घाट घातला आहे तर दुसर्‍याचे प्रवचनात्मक करण्याचा.
एकंदर फसलेला सिनेमा.
राधिका आपटेचे काम छान.

महाराष्ट्र शाहीर>>> मीही नेटाने तुकड्यात तुकड्यात करत सपवला, खुपच बाळबोध चित्रिकरण केलय, अन्कुश अजिबात साबळे वाटत नाही पण त्याने मेहनत घेतलिये अस वाटत तरी जिला लॉन्च करायला मुव्हि बनवला ती सना शिन्दे अभिनयात मठ्ठ आनी मन्द आहेच पण मराठी उच्चार सुद्धा निट जमलेले नाहीत... तिला पाहुन मला पुलच्या बिगरि ते मॅट्रिक मधल्या गोदीचीच आठवण झाली.
(हार्श झालेय माहिती आहे पण मुव्ही रिलिजच्या आधी प्रमोशनला डायरेक्टरच्या ज्या डिन्ग्या मारण चालल होत त्याच्या १% सुद्धा काम पोरिने केल नाहिये मग अट्टाहास कशाला करायचा पण नाही नेपोटीझम रेटलच पाहिजे )
अश्विनी महागडे ने फक्त गेटप बदललाय बाकी तीने आइ कुठे काय करतेच्या सेटवरचाच अभिनय केलाय, सेम लाडीक खोट खोट हास्य.
कळस म्हणजे सानेगुरुजीचा रोल केलेला अभिनेता साबळेच्या लहानपणि आणी तरूणपणी सेम दिसतो आणि काहिवेळेस मेकप गण्डल्याने असेल चक्क अन्कुश पेक्षा तरूणही दिसतो... धन्य ते कास्टिन्ग!!
फक्त निर्मिती सावन्तच कास्टिन्ग जमलय पण तिला काहीही स्कोप नाही.
गावाकडच चित्रीकरण तेही त्या काळातल करायला किचित ब्रेन स्ट्रॉम केला नाहीये??? आम्ही वर्शानुवर्शे उन्हाळी सुट्टित खेड्यात शेतावर गेलोय...जनरली पब्लिक काय प्रकारचे कपडे घालतात तेही पाहिलय.
रोजच्या कामाना जाताना,किर्तन एकताना नवी कोरी पातळ नेसलेल्या बायका? पोरिना घातलेली अगदी नवि नवि परकर पोलकी, भारे घेवुन जाणारे अगदी पाण्ढरे शुभ्र कपडे घातलेले मजुर बघुन कपाळ बडवती वाटत..
गाणी चान्गली म्हटलियेत, गोन्धळ जमलाय अस वाटताना शेवटी हिरो गिरी करायचा मोह करुन माती कालवलीये,
जय जय महाराश्ट्र माझा गाण जमलय.

Lol प्राजक्ता
हे असे पांढरेशुभ्र, नवेकोरे पोशाख गावाकडच्या लोकांनी घातलेले इतके कृत्रिम दिसतात! मी हा पिक्चर बघितला नाहीये, पण बऱ्याचदा हे खटकतं. कोकणातली लाल माती, हिरवी झाडं हेही अगदी 'बघा, बघा ही लालचुटुक माती, हिरवीगार झाडं' असं म्हटल्यासारखं डोळ्यावर आदळतं. मग ते कृत्रिम वाटायला लागतं. (याउलट सुमित्रा भाव्यांच्या 'घो मला असला हवा' मधलं कोकण अस्सल नैसर्गिक दिसतं, वास्तुपुरुषमधलं खेडेगाव अजिबात पोशाखी दिसत नाही.)

प्राजक्ता Lol सगळ्याला +१००
मी हे सगळं लिहिण्याचा कंटाळा केला होता.
साने गुरुजी कास्टिंग, पात्राचं वय हे तर खरंच कहर आहे.
गोदी Biggrin

तो लंडनभर फिरत फिरत इंटरव्ह्यू पण हास्यास्पद वाटला मला. Uhoh (वावे म्हणतेय तसं बघा बघा आम्ही लंडनमध्ये कसं शूटिंग केलं असं दाखवण्याचा प्रयत्न वाटला तो.)

तो लंडनभर फिरत फिरत इंटरव्ह्यू पण हास्यास्पद वाटला मला.>>>अगदी अगदी पण तेही इतक बालनाट्य लेव्हलला केलय की आजकाल सामान्य लोक रिल सुद्धा जास्त भारी बनवतात.
गावाकडच चित्रीकरण परफेक्ट जमलेले उदाहरण म्हणजे सैराट्,देउळ्,वळू,फॅन्ड्री वैगरे

Pages