Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आता ती मेलडी हरवली आहे >>>
आता ती मेलडी हरवली आहे >>> टोटली.
पण 'हम आप के दिल में रहते है' खरंच केकता कपूर सिरिअलिस्टीक भीषण होता.
क्युरिअस केस ऑफ आचार्य.... >>
क्युरिअस केस ऑफ आचार्य.... >> Lol
अरबाज काय हॉट मोठा भाऊ आहे वाटायला लागलं होतं >> प्रत्यक्षात एकदम अॅप्रोचेबल आहे नि पर्सनॅलिटी झक्कास आहे एकदम.
यातून काहीच चांगले किंवा वाईट कळणार नाही अशा बेताने वाक्ये टाकून बाजू सावरून धरली >> मैत्रीण म्हटल्यामूळे हा कसरती कराव्या लागल्या असणार हे समजू शकतो
अन्दाज अपना अपना त्यावेळेस
अन्दाज अपना अपना त्यावेळेस कसा काय आवडला बुआ इतकी बाळबोध कॉमेडी आहे त्यात.म्हणजे रविना जरातरी सुसह्य आणि इयत्ता १लीतली मुलगी (आमच्या काळची ..आत्ताची पिढी स्मार्ट आहे)वाटावी असा (न) अभिनय करणारी करिश्मा...
भ या ण मेकप किती भयाण असावा तर आमिर आणि सलमानने पिन्क लिपस्टीक आणि लिपग्लॉस लावलेल दिसतय...यक्क!
डायलॉग !
डायलॉग !
अंदाज अपना अपना चे डायलॉग लिहायला घेतले प्रत्येक प्रतिसादात एक तर शंभर प्रतिसाद त्याचेच होतील
मॅड कॉमेडीची भट्टी बस जमते. त्याचा काही फॉर्म्युला नसतो..
डायलॉग !>>
डायलॉग !>>
नक्की कितव्या मिंटापासून सुरू होतात हे शंभर डायलॉग.
कल्ट मूवी आहे ऐकून दोन तीन वेळा पाहायचा प्रयत्न केला आहे. दर वेळी कंटाळून अर्ध्या तासात बंद केला.
मॅड कॉमेडीची भट्टी बस जमते.
मॅड कॉमेडीची भट्टी बस जमते. त्याचा काही फॉर्म्युला नसतो >>> +१
चलती का नाम गाडी वरून एक
चलती का नाम गाडी वरून एक मराठी सिनेमा आला होता. भयंकर आहे. पहिल्या अर्ध्या तासात जांभया आल्या.
चलती का नाम गाडी वरून एक
चलती का नाम गाडी वरून एक मराठी सिनेमा आला होता.
>>>>
साडे माडे तीन
कलाकार चांगले असल्यामुळे एकदा पाहिला
नेटाने
नक्की कितव्या मिंटापासून सुरू
नक्की कितव्या मिंटापासून सुरू होतात हे शंभर डायलॉग.
>>>>>
गोविंदा चिपक्के चिपक्के पासून सुरु होतात
भयंकर पिक्चरची यादी काढतच
भयंकर पिक्चरची यादी काढतच आहात तर मलापण असाच एक थेटरात जाऊन पाहीलेला पिक्चर आठवला
पण नाव काही केल्या आठवत नाहिये. शाहरुख खान, वजन वाढलेली माधुरी दीक्षित आणि सलमान खान होते त्यात. माधुरी सलमान बेस्ट फ्रेंड, तिचा नवरा शाहरुख, मैत्री वर संशय, सलमानचा आचरटपणा, लय बंडल पिक्चर होता. ज्या मित्रांना जबरदस्ती पिक्चर बघायला घेऊन गेलेलो (तिकिटाचे पैसे पण त्यांनीच दिलेले :फिदी:) त्यांनी जाम शिव्या घातलेल्या आम्हाला आणि पिक्चरला पण 
हा असेल तो https://en
हा असेल तो
https://en.wikipedia.org/wiki/Hum_Tumhare_Hain_Sanam
मी १५-२० मि. पाहिला होता. जीतेंद्र, बरोबर आणखी एक हीरो, आणि ८०ज मधे रीना रॉय व ९०ज मधे जयाप्रदा घेउन पिक्चर काढत तशा मॉडेल मधे शाखा, माधुरी व सलमान कोंबले होते असे वाटले होते
अंदाज अपना अपना वर बर्याच बाफं वर चर्चा झाली होती मधे. तो ज्यांनी तेव्हाच पाहिला असेल, कॉलेज मित्रांबरोबर वगैरे तर ऑटाफे वाटतो. बाकीच्यांना काही विशेष वाटत नाही. मी ही दुसर्या गटात आहे
फक्त शक्ती कपूरच्या "ढक्की चिकी" ला तुफान हसलो होतो. त्या सीन मधे चुकून हे लोक काहीतरी असे करतात की त्याचे पारडे एकदम जड होते. नक्की आठवत नाही.
क्युरिअस केस ऑफ आचार्य.. >>>
मला हम तुम्हारे है सनम मध्ये
मला हम तुम्हारे है सनम मध्ये माधुरी चा खूप राग येतो.
हम आपके दिल मे रहते है आणि हमारा दिल आपके पास है हे दोन्ही अनिल कपूर चे अति भीषण सिनेमे आहेत.
असाच एक भीषण पण गाण्यांमुळे पाहिलेला म्हणजे बॉबी देओल अक्षय कुमार चा अजनबी.
माझेही दोन ट्रॉमॅटिक अनुभव.
माझेही दोन ट्रॉमॅटिक अनुभव.
लक्झरी बस मध्ये 'जुनून' ( राहूल रॉय => वाघ )
विमानातून भारतात परत जात होतो तर शेजारी गाववालाच निघाला. समोर स्क्रीन वर 'हमशकल्स'. तो मी पाहिलेला नाही हे कळल्यावर त्याने ' प्रचंड आग्रह करून पूर् ण पहायला लावला. बाजूला लाईव्ह हशा व टाळ्या.
विकु
विकु
तरी जुनूनच्या काळात हिमेश रेशमिया आलेला नसावा. नाहीतर हे गाणे राहुल रॉय स्क्रीनवर असताना ऐकायचे म्हणजे कल्पना करा.
हम तुम्हारे है सनम हा बहुदा
हम तुम्हारे है सनम हा बहुदा रखडलेला पिक्चर असावा. अगदी जुनाट फिलिंग येत होते बघताना.
पण त्यातले एक गाणे ओ साथी रे सब कुछ भुला दिया ये वफा का कैसा सिला दिया हे दर्दभरे चिरक्या आवाजात गायला फार मजा येते..
हम तुम्हारे है सनम हा बहुदा
हम तुम्हारे है सनम हा बहुदा रखडलेला पिक्चर असावा. अगदी जुनाट फिलिंग येत होते बघताना.
पण त्यातले एक गाणे ओ साथी रे सब कुछ भुला दिया ये वफा का कैसा सिला दिया हे दर्दभरे चिरक्या आवाजात गायला फार मजा येते..
नाहीतर हे गाणे राहुल रॉय
नाहीतर हे गाणे राहुल रॉय स्क्रीनवर असताना ऐकायचे<<<<
मला लिंकवर क्लिक न करताही ओळखू आलं.
भयंकर सिनेमाचा माझा पण एक अनुभव! बऱ्याच वर्षांपूर्वी एकाच महिन्यात मी पुणे जळगाव, जळगाव पुणे असा ट्रॅव्हल्स बसने एकूण चार वेळा प्रवास केला होता आणि चारही वेळा सिनेमा 'विजयपथ'! तिसऱ्यांदा प्रवास करताना 'आइये आपका इंतजार था' हे तब्बू सिनिस्टर टोनमध्ये मला उद्देशून म्हणतेय असे वाटायला लागले.
तिसऱ्यांदा प्रवास करताना
तिसऱ्यांदा प्रवास करताना 'आइये आपका इंतजार था' हे तब्बू सिनिस्टर टोनमध्ये मला उद्देशून म्हणतेय असे वाटायला लागले. >>>
पुणे-जळगाव रस्त्याचे नावच विजयपथ ठेवायला हवे आता.
>>>>>यातून काहीच चांगले किंवा
>>>>>यातून काहीच चांगले किंवा वाईट कळणार नाही अशा बेताने वाक्ये टाकून बाजू सावरून धरली

अन्दाज अपना अपना त्यावेळेस
अन्दाज अपना अपना त्यावेळेस कसा काय आवडला बुआ
>> तेजा मै हु मार्क इधर है!
एकूण चार वेळा प्रवास केला होता आणि चारही वेळा सिनेमा 'विजयपथ'!
>> सीडी आत अडकली असावी.
सुटलेत सगळे
सुटलेत सगळे
नक्की कितव्या मिंटापासून सुरू होतात हे शंभर डायलॉग
--
Starting from वाह वाह प्रॉडक्शन! मेरे लिये सदाबहार चित्रपट!
हा reference प्यार किये जा चित्रपटाचा जिथे महमूद त्याच्या कंपनी che नाव वाह वाह प्रॉडक्शन ठेवतो. महमूद आणि ओम प्रकाश चा रात्रीच्या haunted हवेली चा सीन हसुन हसुन पुरेवाट होता.
त्याच्यावर बेतलेला महेश कोठारे, लक्षा आणि अशोक सराफ चा धूमधडाका पण फूल timepass होता. बघायला पाहिजे तिन्ही आता
क्युरिअस केस ऑफ आचार्य >>
क्युरिअस केस ऑफ आचार्य >>
मला आमिर खान फार आवडतो ‘
मला आमिर खान फार आवडतो ‘ अंदाज अपना अपना’ मधे. अजुनही पाहिला तरी त्याचे बरेच सीन आवडतात. सलमान व बाकी दोघी तितक्याच समर्थपणे बोअर करतात त्यात.
ऋन्मेषने लिहिलेले कभी बंधन भुला दिया गाणे मलाही खूप अवडते. तो सिनेमा ठीक नव्हता पण त्यातले शाहरुखचे २ सीन्स , बहिणीला थोबाडीत मारतो तो आणि घोड्याच्या पुतळ्याशी बोलतो तो… खूप आवडले होते तेव्हा. बहिणीला मारतो तेव्हा तर भितीच वाटते त्याची. सिनेमा वाहवा नव्हताच पण मस्त केलेत ते सीन त्याने व एकुणच मत्सरी नवरा मस्त रंगवला होता. पण माधुरी आणि सलमानने बोअर केलं.
एकुणच मत्सरी नवरा मस्त रंगवला
एकुणच मत्सरी नवरा मस्त रंगवला होता
>>>
मला त्यातला शाहरुख सुध्दा बोअर झाला होता. पिक्चरचा एकत्रित परिणाम असावा..
पण येस, मत्सर दाखवावा तर तो शाहरूखनेच. त्याला छान जमते हे. किंबहुना आपल्या स्वभावात मत्सर असणे ईज ओके हा विश्वास मला त्याच्याच काही भूमिकांनी दिला. ज्यात सर्वात वरचे नाव कभी हा कभी ना चित्रपटाचे राहील.
मॅड कॉमेडीची भट्टी बस जमते.
मॅड कॉमेडीची भट्टी बस जमते. त्याचा काही फॉर्म्युला नसतो >>>> +1000
हम तुम्हारे है सनम 3-4 वर्ष
हम तुम्हारे है सनम 3-4 वर्ष रखडला होता
दोन्ही अनिल कपूर चे अति भीषण सिनेमे
>>
सतीश कौशिक नी डायरेक्ट केलेले South Indian रेमेक्स
रूप की रानी चोरो का राजा चे लॉसेस भरून काढायला अनिल नी मिळतील ते सिनेमे केले त्यापैकी हे दोन (मन मधे ही छोटा रोल केला होता पैशा साठी) असं एका इंटरव्ह्यू मधे म्हणाला होता.
अजनबी मधे अब्बास मस्तान वाले ट्विस्ट होते म्हणून ओके होता.
नो एंट्री मात्र बस प्रवास
नो एंट्री मात्र बस प्रवास करताना 4-5 वेळा पाहिला अन् एकदा तर लुफ्तांसा च्या विमानातही लागलेला
हमशकल्स मात्र 40 मिनिटं पाहून बंद केला
मी अर्ध्यात सोडलेला एकमेव सिनेमा
सगळेच सुटलेत
सगळेच सुटलेत


क्युरिअस केस ऑफ ___ >>>
अरे, एक तर हा मूव्ही भारतातल्या प्राईमवर नाही,
गोविन्दाचा सँड्विच नावाचा
गोविन्दाचा सँड्विच नावाचा चित्रपट तर कोनत्या तरी चॅनल ने व्रत घेतल्यासारखा सतत दाखवल्याचे आठवतय
Anki अजनबी मध्ये करीना आणि
Anki अजनबी मध्ये करीना आणि बिपाशा असे 2 फॅक्टर देखील होते चित्रपट सुसह्य करणारे.
( तेव्हा 22 की 23 वय फक्त, सो त्या चष्म्यातून बघा )
बाकी त्या काळात तो पिक्चर बघून आम्हाला फार भारी वाटलेले. हे असे online ट्रान्स्फर वै तर ऐकून पण नव्हतो तेव्हा.
Pages