दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?
हे प्रकरण नक्की आहे तरी काय?
विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.
पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.
एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.
यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.
मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.
माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट
विरोधीपक्ष नेते देवेंद्र
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन दिल्ली मेट्रोमधील प्रवासाचे काही फोटो ट्विट केले. यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रो कधी पूर्ण होईल असा प्रश्नही उपस्थित केला. या प्रश्नाला काँग्रेसने उत्तर दिलं आहे.
फडणवीस यांच्या या ट्विटची दखल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे. फडणवीस यांचं ट्विट रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी मुंबई सध्या जी एकमेव मेट्रो सेवा सुरु आहे ती सुद्धी आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरु झाली असल्याची आठवण करुन दिली आहे. तसेच सावंत यांनी फडणवीस सरकारला २०१९ च्या नियोजित वेळमर्यादेत म्हणजेच डेटलाइनच्या आत मेट्रोचं काम पूर्ण करता आलं नाही असंही सावंत म्हणाले आहेत. “काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण झालेल्या दिल्ली मेट्रोचं तुम्ही कौतुक केलं याचं समाधान आहे. मुंबईमध्येही जी एकमेव मेट्रो सेवा पूर्ण झाली आहे ती सुद्धा आघाडी सरकारच्या काळात झालीय. तुमच्या सरकारला २०१९ ची डेडलाइन पाळता आळी नाही. महाविकास आघाडीला प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव असून तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु फक्त मोदी सरकाने निर्माण केलेले अडथळे दूर झाले पाहिजेत,” असं सावंत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
पुढच्या ट्विटमध्ये सावंत यांनी मेट्रो काडशेडच्या गोंधळासंदर्भात भाष्य केलं आहे. “कांजूर येथील जमीन उफलब्ध होती. मात्र तुमच्या सरकारने तिथे गोंधळ घालून जागेचा सौदा शापुरजी पालोनजी बिल्डर सोबत केला. तुमच्या सरकारने खासगी बिल्डरला सार्वजनिक मेट्रोपेक्षा अधिक झुकतं माप दिलं. तुम्हाला या मेट्रोच्या गोंधळासाठी कोणाला दोष द्यायचा असेल तर तुम्ही आरशात पहावे,” असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/opposition-leader-d...
जो राग आहे माझ्यावर काढा
जो राग आहे माझ्यावर काढा मुंबईच्या काळजात खंजीर खूपसु नका असे सांगत कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान नव्या सरकारला केले, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार हे ठणकावून सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत 'आरे वाचवा' या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली आहे.
देशद्रोही आहेत , भाजपला विरोध
देशद्रोही आहेत , भाजपला विरोध
आज ह्यांची घरे आहेत , तिथेही पूर्वी झाडेच होती , मग हे वृक्षप्रेमी लोक ह्यांचे स्वतःचे घर पाडून झाड का लावत नाहीत ?
तसेही ग्लोबिल वोर्मिंग होऊन सगळे बुडणारच आहे
मग आमच्या नेरळला समुद्र येणार
आमच्या नेरळला समुद्र येणार>>
आमच्या नेरळला समुद्र येणार>> माथेरान बेटावर शिफ्ट व्हायला लागेल
आरेमध्ये कार शेड नकोच.
आरेमध्ये कार शेड नकोच.
आणि भाजपाच्या आधीच्या प्रस्तावानुसार तिथे केवळ कार शेडच नाही तर मेट्रो जाळ्याची मुख्य कचेरी म्हणून एक ३३की ३० मजली टॉवर होणार आहे. त्यातल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भाजी, फळे, मेडिकल दुकान, रस्ते, रिक्षा,कार पार्किंग हे सर्व होणार आहे. शिवाय आरटीओ येणार आहे आणि झोपु ( S R A) सुद्धा. अर्थात बिल्डर वगैरे येणारच आणि त्यातले एक बडे नाव असणारच आधीच तिथे.
मुख्य म्हणजे अनेक मेट्रोमार्गांची कामे दोन वर्षांच्या कोविड काळात पूर्ण थांबलेली असूनही आता काही महिन्यांत बऱ्यापैकी प्रगती दाखवत आहेत. एक दोन वर्षांत पूर्णही होतील. ( त्याचे श्रेय भाजपाला मिळेल ती वेगळी गोष्ट). ती आधी पूर्ण करून बहुतेक सर्वच प्रमुख रस्त्यांवर उभारलेले अडथळे दूर करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. दहिसर अंधेरी मार्गावर तर निम्म्यापेक्षा जास्त टप्प्यावर गाड्या सुरूही झाल्या आहेत.
ह्यापैकी दहिसर/भाईंदर - अंधेरी, दहिसर -चारकोप मानखुर्द, घोडबंदर - ठाणे - वडाळा हे कळीचे आणि फार मोठ्या लोकसंख्येची गरज भागवणारे आणि अडचण दूर करणारे मार्ग आहेत त्यांना प्राधान्य असावे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रचंड ताण आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.
seepz ह्या उद्योगकेंद्राकडे मुंबईच्या उत्तरेकडून होणारी अतिप्रचंड वाहतूक सुरळीत होऊन seepz मधला वाहतूक खोळंबा हटवण्यासाठी मेट्रो रेल्वे उत्तरेकडे वाढवायला हवी. म्हणजे ठाणे/कल्याण - seepz, भाईंदर/ विरार - seepz वगैरे.
दक्षिण मुंबईत आता नवीन लोकसंख्या किंवा उद्योगधंदे येणे एक गिरणी टापू सोडला तर पूर्वीच्या मानाने फारच कमी झालेले आहे. ह्या भागासाठी सध्याचे तीन रेल्वे मार्ग आणि तिथले बेस्ट बसमार्गाचे जाळे पुरेसे आहे. दक्षिण मुंबई मुळात अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर वगैरे विस्तृत उपनगरांच्या मानाने फार चिंचोळी आहे. तिथल्या लोकांना कोणतेही रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागत नाही. स्थानिकांसाठी तरी आणखी एका रेल्वेची गरज दिसत नाही. इथल्या जागांच्या भरमसाठ किंमतीमुळे आय टी पार्क वगैरे इतर बरेच व्यवहार उत्तर दिशेला वाढत आहेत. तेव्हा कुलाबा seepz रेल्वेसाठी संपूर्ण आरे जमिनीचा बळी द्यावा इतकी काही ती रेल्वे महत्त्वाची नाही.
आता निषेध सुरू होणारच. आणि
आता निषेध सुरू होणारच. आणि मागच्या वेळेप्रमाणे आताही हे सरकार कलम १४४ लावून जमावबंदी वगैरे करेल, निषेध करणाऱ्यांना तुरुंगात पाठवेल आणि रातोरात बांधकाम सुरू करेल. जसा काय मास्टर स्ट्रोक किंवा ' कसं फसवलं 'असा मूर्ख छद्मी आविर्भाव.
कालपर्यंत - कांजूरमार्गची
कालपर्यंत - कांजूरमार्गची जागा मेट्रो ३ च्या कारशेडसाठी योग्य नाही. संघ सरकार तिच्यावरचा हक्क सोडणार नाही.
पण आता - फडणवीस तीच जागा संघसरकारकडे मेट्रो ६ च्या कार शेडसाठी मागणार असल्याच्या बातम्या आहेत.
दिल पुकारे हे गाणे मुंबईच्या
दिल पुकारे हे गाणे मुंबईच्या विकासाविरोधात आहे का? पण आज तर ते जुने झाले आहे. आता कसे काय अडलेय या गाण्यामुळे?
मेट्रो चे एकंदर चौदा की पंधरा
मेट्रो चे एकंदर चौदा की पंधरा रूट आहेत. त्यापैकी फक्त कुलाबा seepz ला विरोध होतो आहे. तो सुद्धा रेल्वे नको म्हणून नाही तर एका मार्गाची कार शेड आरेमध्ये नको ह्या कारणासाठी आहे. त्यामुळे मुंबई विकासाला देशद्रोही विरोध, देशाला १० हजार कोटी रुपयांनी खड्ड्यात घालणारे देशद्रोही वगैरे सर्व गोबेल्सचा प्रचार आहे. अनेक रेल्वेमार्गाची कामे निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात पूर्ण झालेली आहेत, तेही कोविड काळातल्या खोळंब्याला तोंड देऊन. दोन मार्गांवर गाड्या काही अंतरासाठी सुरूही झाल्या आहेत. तेव्हा विकास अडलेला नाही. मुंबईबाहेरील लोकांना आणि काही थोड्या मुंबईकरांनाही हे कळलेले नाही. किंवा ते कळूनही नकळतेपणाचे सोंग पांघरत आहेत.
रात्रीत झाडं तोडायचा प्रकार
रात्रीत झाडं तोडायचा प्रकार झाला, तेव्हा आता आणखी एकही झाड तोंडानं लागणार नाही असं फडणवीसनी सांगितलं होतं. मग नोव्हेंबर २०२२ मध्ये मेट्रोचे सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी ८४ झाडं तोडायची परवानगी मिळवली. मेट्रोने ट्री ऑथॉरिटीकडे १२४ झाडं तोडायची परवानगी मागितली. आपल्या निकालाचा असा फायदा घेतल्याबद्दल न्यायालयाने मेट्रोला दहा लाखांचा द़ड ठोठावला. आणखी झाडं तोडायची परवानगीही दिली
दरम्यान दुसऱ्या एका लाइनची कारशेड कांजूरमार्गला होते आहे
आता कांजूरमार्गची जागा का
आता कांजूरमार्गची जागा का निवडली?
मेट्रो बांधकामात आरे मधील
मेट्रो बांधकामात आरे मधील झाडे तर एक गट्ठा तोडली गेली आहेत. पण रस्त्याच्या कडेची अनेक झाडे एक एक करून तोडली गेली आहेत त्याबद्दल कोठेही काही नाही. मेट्रो येण्या आधी रस्त्यामध्ये डिवायड र होते व त्यातही काही मध्यम उंची ची बारीक अंगाची झाडे होती. ती ही क्रमाक्रमाने तोडत आहेत. त्या शिवाय पर्यायच नाही. हे आमच्या एल बी एसच्या एका छोट्या पट्ट्याचे मी सांगत आहे. जॉन्सन कंपनी समोरची जुनी डेरेदार झाडे तोडली. आता तिथे नवीन फुट पाथ करतील. फक्त संतोषी माता मंदिर समोरच्या एका झाडाला ठेवले आहे कारण त्याखाली काहीतरी मूर्ती मंदिर टाइप आहे. आता रस्त्याला फक्त सिमेंटचीस च सावली आहे. बहुतेक मेट्रो ट्रॅक खालच्या भागात डिवायडर येतील तिथे झाडे लाव णार आहेत. विकास करुन सोडणार् बघा.
हो. सरकार बदलताच कडेकोट
हो. सरकार बदलताच कडेकोट पोलीस बंदोबस्तात झाडे तोडायचा कार्यक्रम केला गेला. व्हिडियो क्लिप बाहेर आल्याच.
मायबोलीवरचे पुणेकर वेताळ
मायबोलीवरचे पुणेकर वेताळ टेकडी बद्दल काय म्हणतात?
तिथे आंदोलन करणारे सगळे एसी मोटारीतून फिरतात आणि त्यांची वीकेंड होम्स आहेत, असं वाचून झालं माझं.
मायबोलीवरचे पुणेकर वेताळ
मायबोलीवरचे पुणेकर वेताळ टेकडी बद्दल काय म्हणतात?>> ही एकेकाळी रम्य जागा होती. सध्या एक शिल्पा गोडबोले नामक व्यक्ति ट्वि टर वर बीबी पीपी रोडच्या विरोधात पोस्टत आहे. व आंदोलने व्गैरे करत आहेत लोक्स.
आरे मधली झाडे तोडली तेव्हा
आरे मधली झाडे तोडली तेव्हा तिथल्या घरी सैरभैर झाल्या. थेट.गोरेगाव स्टेशन पर्यंत पोचून लोकांच्या खिडकीत बसू लागल्या. तोपर्यंत घारींचा वावर जास्त करून आरेपुरताच होता. घार तसा शक्तिशाली आणि खतरनाक ( डेंजरस) प्राणी आहे. आरेपासून सुमारे पाच सहा किलोमीटर लांब असलेल्या इमारतींच्या गच्चीत पोपटांचे थवे येतात. ह्या वर्षी पोपटांची पिले उचलून नेण्याचे प्रकार घडले. थवे लगेच निघून गेले. जाऊन जाऊन कुठे जाणार बिचारे! सगळीकडे तेच.
एक दाट वदंता सतत कानावर येतेय. hearsay म्हणून आतापर्यंत लिहिले नव्हते. काही लोक असे म्हणतात की आरेची जमीन कधीचीच unofficially विकली गेलीय. सहा भागांमध्ये. २०१९ च्या जस्ट आधी. पैसे योग्य जागी पोचलेत. त्या काळात निवडणुका व्हायच्या होत्या आणि खर्च वाढणार होता.
किंवदंती. ऐकीव माहिती.
मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी
मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून अतिशय मेहनत घेतली होती. महाविकास आघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता आणि आरे कारशेडचे काम थांबले होते. फडणवीस यांनी हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावला व त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबरला होणार आहे. मोदी हे औपचारिक उद्घाटन करून मेट्रोमधून फेरफटका मारणार असून ठाण्यातील समारंभास जाणार आहेत. https://www.loksatta.com/explained/how-ratan-tata-built-indigenous-tata-...
लिंक चुकीची आहे.
लिंक चुकीची आहे.
बाकी मुंबई लोकसंख्येची घनता आधीच इतकी असताना अजून त्यातच विकास करून अजून किती ताण येणार आहे या शहरावर समजत नाही.
Pages