दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazon rainforest जळून खाक झाले तरी चालेल परंतु Amazon IN चे नवनवीन फेस्टिव्हल सदैव बहरत राहावे.

खरा मुद्दा तेव्हा झोपलो म्हणून आता उठू नये हा नसून, आम्हाला सोयीचे तेव्हा आम्ही उठणार, एरवी झोपून राहणार हा आहे.
>>>>>

आपला लढा फक्त अश्यांविरुद्धच आहे हे बघून बरे वाटले.
सध्या मेट्रोला विरोध करणारे सारे असेच आहेत हे तुमचे तुम्हीच ठरवले याचेही कौतुक वाटले.
आणि आता अश्यांची मुस्कटदाबी करून आपण आरेच्या कत्तलीला हातभार लावत आहात याबद्दल आपल्या सर्वांचेच विशेष अभिनंदन.

जे झाडे तोडायला विरोध करत आहेत त्यांचा फक्त झाडे तोडायला विरोध आहे .
मेट्रो ला बिलकुल विरोध नाही .
मेट्रो ची गरज आणि फायदे हे त्यांना माहीत आहेत .
पण असं चित्र उभ केले जात आहे की त्यांचा मेट्रो ला विरोध आहे .
मेट्रो मुळे जे भाग फक्त रस्ता मार्गांनी जोडले ते मेट्रो नी जोडले जातील आणि रस्ते वाहतुकीवरील बोजा कमी होईल .
लोकल ट्रेन वरील बोजा कमी होईल हे माहीत आहे पर्यावरण वादी लोकांना .
पण मुंबई सभोवताली जे जंगल आहे ते मुंबई साठीच राखणे गरजेचं आहे .
मुंबई चे वातावरणाचा balance राखण्यासाठी ते आवशक्याच आहे .
विरोध ह्या साठी आहे की जेवढ्या जागेची गरज आहे त्या पेक्षा जास्त जागा मोकळी केली जात आहे .
मेट्रो शेड साठी पर्याय म्हणून दुसरे सर्व पर्याय विचारात घेतले गेले नाहीत .
Ovhal मैदान आहे,क्रिकेटची मैदाने आहेत .
पण तसा विचार सुद्धा सरकार करू शकणार नाही आणि केलाच तर सुप्रीम कोर्ट जरी विरोधात गेले तर आंतरराष्ट्रीय न्यायालय मध्ये केस चालेल .
प्रियदर्शनी पार्क मध्ये अग्निशमन दलाच्या 4 गाड्या साठी जागा ठरवण्याचा प्रयत्न झाला म्हणून तेथील श्रीमंत लोकांनी कोर्टात केस केली होती

मला तर अजून ह्या विषयात इकडे आड तिकडे विहीर वाटतंय. त्यामुळे दोन्ही बाजू बरोबर (दोन्ही चूक) वाटतायत. अनेक वर्षं ट्रेनचा दिवसेंदिवस भयानक होत चाललेला प्रवास पाहिलाय, रस्त्याला होणारा ट्रॅफिक मुरंबा पाहाते आहे. मुंबईकर इंच इंच लढवत सकाळी ऑफिसला आणि संध्याकाळी/रात्री घरी पोहोचतोय. त्याच बरोबर कमी कमी होत चाललेले हरित पट्टे अस्वस्थ करत आहेत. लहानपणी पवई तलाव व आजूबाजूची भरगच्च हिरवाई, डोंगर पाहिले आहेत. त्याच जागी डोंगर सपाट करून हिरानंदानी गृहसंकूल बनत असताना पाहिले आहे. त्या वयातही हे काहितरी अघटीत चालले आहे हे जाणवले होते. माणसं डोंगर नाहिसा करतात ही कल्पनाच सोसत नव्हती. कोकणात आजोळी जाताना लोटे परशुरामातील हिरवागार परिसर नाहिसा करून तिथे कारखाने उभे राहिलेले पाहिले तेव्हाही असंच वाटलं होतं. पृथ्वीलगतचे रस्ते कमी पडतायत म्हणून जिकडे तिकडे फ्लायओव्हर तयार होत गेले. ह्या पुढे डबल फ्लायओव्हरही होतील. आकाशच दिसणार नाही. आकाशाचा तुकडा बघायला मिळणे अप्रूपाची गोष्ट होऊन राहील. ठाणे आणि बोरिवली जोडणारा घोडबंदर रोड आधी जंगलातून जायचा. आता ते जंगल दोन्ही बाजूनी आक्रसत गेलंय ठाणे-बोरिवलीला जोडता जोडता. सगळीकडे हाऊसिंग कॉम्प्लेक्स. त्यातली कितीतरी बेकायदेशीर असतील.

निसर्ग पण हवा आहे मला आणि विकासही हवा आहे.

आज आरे प्रकरणात 24 लोकांना अटक केली होती म्हणे,
त्यात ठाकरे नव्हते म्हणे.

तुरुंगवास भोगल्याशिवाय मी मत देणार नाही.

Proud

ह्या सर्व प्रकाराला कारण आहे अंधाधुंद पने वाढणारी भारतीय शहरांमधील लोकसंख्या .
जगात बांगलादेश सोडला तर भारत च असा देश आहे त्याला शहर बसवताना प्लॅनिंग करावे लागत .
त्यात लोकसंख्येची मर्यादा हा सुधा भाग असतो हे माहीत नाही .
जे घटनेचे कलम कुठे ही जा आणि कुठे ही रहा हे सांगत आहे त्याचा त्याच कलमाचा विपरीत अर्थ लावून सर्व भारतीय शहरांची वाटचाल स्मशान वाटेकडे चालली आहे .
लोकसंख्या वाढली म्हणून जास्त वाहतूक सुविधा पाहिजे की वाहतूक सुविधा वाढली म्हणून लोकसंख्या वाढली .
ह्याचे पाहिले उत्तर शोधावे लागेल

लोकसंख्या वाढली म्हणून जास्त वाहतूक सुविधा पाहिजे की वाहतूक सुविधा वाढली म्हणून लोकसंख्या वाढली .

दोन्ही आहे. मेट्रो करुनही लोंढे थांबणार नाहीत. हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं तर रोहिंग्ये, बांगलादेशी, पाकिस्तानी निर्वासितांना पण मुंबई पुण्यात सामावून घेणार असा त्यांचा निर्धार आहेच. आणि लोकसंख्येसाठी निसर्ग कमी करावाच लागेल. इलाजच नाही.

सनाव बरोबर .

त्यात आपले मराठी विदुषकी नेते केंद्राच्या तालावर नाचत असतात .
पुणे ,मुंबई,नाशिक ह्यांची मर्यादा संपली आहे आणि एका सुधा दुसऱ्या राज्यातील लोकांना इथे जागा नाही हे सांगा .
नाहीतर सर्व विकास कार्य थांबवा .

हे शक्य नाही .
मराठी नेते स्वाभिमानी नाहीत .
पण त्या साठी देशा ची व्याख्या पुढे करतील .
फक्त स्वार्थ झाकून ठेवणे हेच कारण असेल .
जे संशोधक धोक्याची सूचना देत आहेत ती सत्यात उतरणार आहे .
पर्यावरणाचा समतोल बिघटनाराच आहे .
आणि त्या मधून भारतीय शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना कोण्ही वाचवू शकणार नाही .
आत्ताच सावध होणे गरजेच आहे .
प्रत्येक शहराची सर्वोच्य लोकसंख्या ठरवा त्या पलीकडे 1 सुधा व्यक्ती तिथे प्रवेश करू शकणार नाही ह्याची प्रेमाने किंवा सक्ती नी काळजी घ्या .
नाहीतर विनाश अटळ आहे

हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं तर रोहिंग्ये, बांगलादेशी, पाकिस्तानी निर्वासितांना पण मुंबई पुण्यात सामावून घेणार असा त्यांचा निर्धार आहेच

आता आहे ते सरकारही इतर देशातल्या हिंदू , शीख , जैन वगैरेंना ठेवून घेणार आहेत, फक्त मुसलमान नको आहेत.

रोहिनग्या म्हणजे फक्त मुसलमान नव्हेत , त्यात इतरही असतात,

आणि मुंबईच्या गर्दीत भारतीय किती अन बाहेरचे किती?

पाकिस्तानी अदनान सामीचे फ्लॅट सेना भाजप सरकारनेच कायदेशीर करून घेतले दंड भरून घेऊन

आता उर्वरित भारतातून लोक म़ुंंबईत यायचे थांबतील. काश्मीरमध्ये जातील.
शिवाय 'यांच्या' आमदार खासदारांना लैंगिक शोषण करायला आणखी मुलीही उपलब्ध होतील.

>>>>>>>> हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं तर रोहिंग्ये, बांगलादेशी, पाकिस्तानी निर्वासितांना पण मुंबई पुण्यात सामावून घेणार असा त्यांचा निर्धार आहेच. <<<<<<<<<<<<

बाण बरोबर लागला !! लगेच कोणाची किंकांळी निघाली !!

३०,००० रोहिंग्ये निर्वासितांना काश्मिरमध्ये सामावून घेतले तेंव्हा ह्यांचे सरकार घोरत पडल्याचे ढोंग करत होते.

>>>>>>>>>> अश्यांची मुस्कटदाबी करून आपण आरेच्या कत्तलीला हातभार लावत आहात याबद्दल आपल्या सर्वांचेच विशेष अभिनंदन. >>>>>>>>>>>
स्वःता माँग्रोव्ह मारुन खाडी बुजवुन तयार केलेल्या जमिनीवरच्या ईमारतीत राहुन वर दुसर्यांचे विशेष अभिनंदन करणार्यां
जाड कातडीच्यांचे , विशेष विशेष अभिनंदन !!!

सिंध प्रांत मधून विस्थापित झालेले सिंधी महाराष्ट्र च्या च डोक्यावर येवून बसले.
बांगलादेश युद्धात विस्थापित झालेले बंगाली भाषिक महाराष्ट्र च्याच डोक्यावर बसले
आणि आता शाह च्या कायद्याने जे भारतीय म्हणून दर्जा प्राप्त होतील ते पण महाराष्ट्र च्याच डोक्यावर बसणार आहेत .

सिंधी , बंगाली हिंदू ना ? तेही नकोत ? अरेरे काय हा बंधुभाव,
त्यांचे दुःख पाहूनही तुमच्या तोंडून किंकाळी येत नाही, हाच फरक तुमच्यात अन आमच्यात

महाराष्ट्र मधील शहरांची मर्यादा संपली आहे .
महाराष्ट्र आपल्या ग्रामीण बांधवांना तिथेच रोजगार देण्यास सक्षम आहे .
फक्त हे लष्कराची भाकरी भाजयचे उद्योग बंद करावे लागतील

ब्लॅक cat
रोहिंगे मुस्लिम आहेत म्हणून इराक,सौदी अरेबिया,दुबई,कुवैत अगदी पाकिस्तान सुधा त्यांना प्रवेश देणार नाही .
तेवढे शहाणपण त्यांच्यात आहे

आता मोदी , शहा आहेत , म्हणजे आपलं नावही शहाण्या यादीत गेले ना ? की अजून काँग्रेसच्या नंदनवनातच आहात ?

तुमचा शहावर भरोसा नई का ? कुणाला कसे तडीपार करायचे, ते करतीलच की

हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं ...
कोणत्याही विषयाची गाडी इथे न्यायलाच हवी का ? मुळात गेली पाच वर्षे केंद्रात , महाराष्ट्रात, मुंबईत व सर्वात जास्त लोंढे जिथून येतात त्या यू पी मध्ये 'आपलेच' सरकार आहे. हे लोंढे थांबवयचा काही उपाय गेल्या पाच वर्षात केला आहे का? नसेल तर मग लोंढ्यांचे बिल काँग्रेस, नेहेरु यांच्यावर का फाडायचे? ( योगी आदित्यनाथ प्रचाराला कर्नाटकात गेले होते तिथेही यू पी चे बरेच तरुण जातात. खरे तर त्यांनी कर्नाटक कडून काही टिप्स घ्यायला हव्या होत्या , ते राहिले बाजूला, तिथेही मंदीर मस्जिद चे तुणतुणे. हे म्हणजे बोर्डात आलेल्या मुलाच्या घरी दहावी नापास मुलाने जाऊन "अभ्यास कसा करावा" वर मार्गदर्शन करणे झाले)

असो, या विषयावर दोन्ही बाजूचे काही मुद्दे पटताहेत. झाडे तोडून होणारे नुकसान वाहतूक सुरळीत झाल्याने व ( लोक जर रिक्षा, तॅक्सी , बस ऐवजी मेट्रो वापरतील तर ) प्रदुषण कमी झाल्याने भरून येणार असेल तर?

ब्लॅक कॅट
तुम्ही दुबई मध्ये जा कायदेशीर कागद पत्र न घेता आणि सांगा मी मुस्लिम आहे
ते एन्ट्री देतील की लाथ मारून बाहेर काढतील ते माहीत पडेल

आता 6 वर्षे शहांचे सरकार आहे, त्यांना सांगा , दुबईत कुणीही विना कागदपत्रे गेला तर ते त्याला हाकलतीलच

तुमचे शहा हिंदूंना ठेऊन घेणार आहेत, इतरांना घालवणार आहेत,

बाकी, शहा हिंदू म्हणजे व्याख्या कोणती वापरणार आहेत ? सावरकरांच्या व्याख्येत रोहिनग्या कोण ?

Pages