दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे पर्यावरणाला मोठा फटका बसणारया प्रकल्पांची चर्चा करा. स्मारक भूखंड घोटाळे यात येत नसतील तर वगळा. ईतर धागे त्यासाठी आहेतच.

चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगी सरकार करणार ६३ हजार झाडांची कत्तल – https://www.loksatta.com/desh-videsh-news/yogi-govt-to-cut-down-64000-tr...

हे खरे असेल तर अवघड आहे.
यांना तर रोखणेही अशक्य.>>> हे खर असेल तर अतिशय बेक्कार निर्णय आहे, जागा नसेल तर हे प्रदर्शन लखनवलाच कशाला भरवायला हवय? मुर्ख लेकाचे ४ दिवसात काय तोडलेली झाड परत येणार आहेत? आधी झाड तोडायच खर्च मग परत लावायच खर्च ,प्रदर्शनातुन नक्कि गेन काय आहे?
आरेची केस वेगळी आहे तिथे आघाडी ने जे चालवलय तेही निव्वळ बावळटपणा आहे, मेट्रोच काम सुरु आहे म्हणए पण कारशेड शिवाय उपेग काय असणार आहे त्याचा आणी आता एक निर्णय घेवुन तिथे तोडलित ना झाडे ,मग तिथेच बान्धाना कारशेड पण नाही ,आधिच सगळ वर्क चुलित घालुन वर मनमर्जि कारभार करतिल, कारण नविन टेन्डर , नविन समिति यातुन परत नविन आवक..

मुळात तिथे कारशेड आणि अन्य काही गोष्टी बांधण्याचा, तेवढा भाग संवेदनशील क्षेत्राच्या पट्ट्यातून वगळण्याचा हे निर्णयच विवादास्पद आहेत.
त्या प्रकरणांत न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे सुनावणी चालू आहे. आधीचा निर्णय हा मनमर्जीचा कारभार होता. एका रात्रीत हजारो झाडणे तोडणे ही त्याची परमावधी.
फक्त कारशेड नाही, मेट्रो भवन, जिजामाता प्राणीसंग्रहालय अशा इतरही गोष्टी तिथेच येणार आहेत. प्राणिसंग्र हालयाचा निर्णय मुंबई मनपाने घेतलाय म्हणजे तो शिवसेनेचा आहे.

नवी मुंबईत घरं, गोल्फ कोर्स यासाठी ७२४ झाडं तोडली!

https://www.hindustantimes.com/mumbai-news/724-trees-cut-for-houses-golf...

आता निवडणुक झाली आहे आणि पुरोगामी सरकार जबरदस्ती लोकांच्या डोक्यावर येऊन बसलं आहे, त्यामुळे आता झाडं पाडली तरी चालतील. शिवाय श्रीम्ंत लोक पुन्हा सत्तेवर आल्यामुळे गोल्फ कोर्सही पाहिजेच.
तसंही आम्हाला रोहिंग्या आणि पाकिस्तानी मुस्लिमांना 'कागज नही दिखाएंगे' म्हणत हक्काची मतपेढी म्हणून महाराष्ट्रात स्थायिक करवायचं आहे, जागा तर लागणारच. झाडं तोडावी तर लागणारच.

चला बघुया, आरे वृक्षतोडिविरुद्ध कावकाव करणारे किती पक्षी नवी मुंबईतील वृक्षतोडी विरुद्ध बोंबलतात.....

नवी मुंबईत कधी झाली वृक्षतोड, मला आता हे या धाग्यावर समजले. हवे तर ईथेच चर्चा करूया. बाकी बोबलायचे म्हणाल तर मी नक्कीच ईथेही कावकाव करू शकतो. कारण मी कुठलाही जातधर्म प्रांतप्रदेश राजकीय पक्ष संघटना मानत नाही. ज्यांनी दोन्हीकडची झाडे कापली त्यांचे त्याच कुर्हाडीने हात कापले तरी मला आनंदच होईल.

झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे लोक भंपक आहेत , जिथे हे रहातात , तिथेही कधीतरी झाडेच होती, ह्यांच्या खापर पणजोबांनी कधीतरी तिथे प्लॉट पाडून तिथले झाड पाडून जागा एन ए केली असणार

आता हे लोक इतरांना झाड पाडायला विरोध करतात.

झाडावर इतके प्रेम आहे , तर तुम्हीही तुमच्या पणजोबाची चूक सुधारा, तुमचे घर पाडून तिथे झाडे लावा , मग इतरांना सांगा

ऋन्मेश भौ, तुम्ही तुमचा एक प्रतिसाद टाकला त्याबद्द्ल धन्यवाद,

जे दुतोंडी सेलेक्टीव्ह कावळे त्यांचा बाब्या सध्या सत्तेत असल्याने अजूनही गप्प आहेत, मी त्यांच्याबद्दल लिहिले.

महामेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे ह्यांची बदली झाली. (की केली? )
कार शेड साठी आरे येथील 2000 पेक्षा जास्ती झाडांची कत्तल करण्यात आली त्याबद्दल त्यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेतला आणि निवडणुकांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी अश्विनी भिडेंची बदली केली.
बदली केली ते केली वरतून त्यांना ट्रान्सफर ऑर्डरही दिली नाही.
2000 झाडांची कत्तल करणं तेही एका रात्रीतहे मलाही पटलं नव्हतं.पण त्या काळचे मुखमंत्री मा.देवेंद्र फडणवीस ह्यांनी त्यांच्या ह्या निर्णयाचे समर्थन केले.
पण भाकरी फिरली आता ना देवेन्द्रजी मुख्यमंत्री आहेत नाही अश्विनी भिडे महामेट्रोच्या संचालिका....

आताच फेसबूकवर मित्रयादीत हा शुभसमाचार वाचण्यात आला

मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे होणार . आरेमधील जंगल अबाधित राहणार .

मुंबईतील येणार्‍या अनेक पिढ्यांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला निर्णय .

सरकार सोबतच , आरे वाचवा मोहिमेतील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन

कांजूरला होईल कार शेड पण आरेमधे जे काही बांधकाम आणि कुदळकाम झालेले आहे ते सपाट करणार का? बत्तीस मजली इमारत, त्यातले हजारो कर्मचारी, त्यांच्यासाठी आनुषंगिक सोयीसुविधा, पार्किंग, इमारतीत स्वत:च्या कामासाठी येणारे भेटकरी, त्यांच्यासाठी बाहेर सेकंडरी सोयी सुविधा, झेरॉक्स, चहाकॉफी , खाद्यालये, सार्वजनिक वाहनतळ, रस्ते, अशी एक सुशस्त नगरीच वसवली जाणार होती आरेत. तीसुद्धा रद्द व्हायला हवी.

हीरा , हो ना.

नाहीतर आरे गेले ते गेलेच, त्यात कांजूरची जागाही असं नको व्हायला.

मेट्रोचं घोडं आता गंगेत न्हातंय यापेक्षा चांगली बातमी मुंबईकरांकरता होउ शकत नाहि. "यु कॅनाट मेक ऑल पिपल हॅपी ऑल द टाइम" हे सूत्र लक्षात ठेउन हा प्रोजेक्ट सरकारने लवकरात लवकर पुर्ण करावा...

लवकर कसा पूर्ण होणार? आता जमिनीची की मातीची पहाणी करायला घेतायत. अजून किमान ४-५ वर्ष तर कुठेच नाही गेली.

आरेतील जे बांधकाम झालं आहे त्याचा काहीतरी वापर करणार आहेत म्हणे. मॉल / क्लब नाही सुरू केला म्हणजे मिळवली.

माझे वैयक्तिक मत तर असे आहे की कुलाबा - सीpझ मेट्रोची गरजच नाही आहे. त्याऐवजी दहिसराहून दक्षिणेकडे येणारे मार्ग प्राधान्याने कार्यान्वित करावे. तसेच ठाणे कल्याण वरून दक्षिणेकडे येणाऱ्या मार्गांनाही गती द्यावी. तसेच जोगेश्वरी विखरोळी जोड मार्गावरून पूर्व पश्चिम अशा मेट्रो मार्गाची शक्यता तपासून पाहावी.

https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-poll-readers-voted-against...

यासंदर्भात लोकसत्ता डॉट कॉमच्या वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमने ट्विटरवर जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ट्विटर पोलमध्ये २० हजार ८०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवलं असून मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्गला स्थलांतरित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय योग्य नसल्याचे मत ७४.५ टक्के वाचकांनी नोंदवलं आहे.

मला कळत नाही, खोदकाम करून बांधकाम सुरू केलेला प्रत्येक मेट्रो मार्ग आज अर्धवट पडला आहे, त्यामुळे लोकांना अनेक वर्षे अत्यंत त्रास सहन करावा लागतो आहे, तर ते आधी पूर्ण करण्याऐवजी नवनवीन मार्गांसाठी कशासाठी सरकार धावत होते? पश्चिम द्रुतगतीमार्गावर अंधेरीच्या फ्लाय ओवर खालून जाताना दीड किलोमीटर् अंतरासाठी(आणि खालून प्रवास करावा लागणाऱ्यांची संख्या इथे खूप मोठी आहें) अर्धा तास लागतो आहे. द्रुतगतीमार्गावरचे आणि अत्यंत जरूरीचे असे मेट्रो मार्ग तरी लवकर पूर्ण करण्याकडे संसाधने जुंपायला हवी होती. आज मुंबईत सगळीकडे खणण्याच्या सामग्रीने अडलेले आणि अर्धवट बांधकामामुळे चिंचोळे झालेले रस्ते दिसतात. सुरेश प्रभूंचे रेल्वेमंत्रीपद गेल्यानंतर मेट्रोमार्गांची प्रगती अगदीच मंदावली होती, अपवाद कुलाबा सीप्झ मार्गाचा. इथे विद्युत वेगाने प्रशासकीय आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय हालचाली केल्या गेल्या. विकास जणू ह्याच लाभक्षेत्राचा आणि बांधकामाचा व्हायला हवा होता, लोकांची गरज दुय्यम होती. कदाचित काहीशे हेक्टर जमिनीचा विकास हा सरकारच्या दृष्टीने मोठाच जनहिताचा मुद्दा होता
२०१४ पूर्वी, तत्कालीन सरकारने प्रचंड जनक्षोभाचा आदर करून ह्या मार्गाचे काम पुढे ढकलले होते.

आरे कारशेडसाठी ४०० कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मेट्रो प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये फडणवीस यांनी खर्चासंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरे येथील जंगलांच्या संवर्धनार्थ काम करणारे पर्यावरणवादी झोरु भथेना यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात आरेमध्ये सरकारने ७० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता भथेना यांनी फडणवीस यांना उरलेला ३३० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे.

https://www.loksatta.com/mumbai-news/fadanvis-said-govt-spent-rs-400-cr-...

झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे लोक भंपक आहेत , जिथे हे रहातात , तिथेही कधीतरी झाडेच होती,>>>>>>
बरोबर !
झाडे तोडल्या शिवाय रस्ते आणि रेल्वे मार्गाचे विकास होवूच शकत नाही !
पुणे सोलापूर आणि पुणे नगर रोड रुंदीकरण करताना १०० वर्षापूर्वीची झाडे तोडावी लागली , त्या शिवाय पर्याय च नव्हता !
नाही तर , महाराष्ट्र , भारत सरकार यांच्या कडे लाखो करोड पडून असतील तर झाडे वाचवून नवीन मार्गाची आखणी करता येईल .
पण नेहमी प्रमाणे दोन्ही ठिकाणी ढब्बू पैसा शिल्लक आहे .

जोगेश्वरी विखरोळी जोड मार्गावरून पूर्व पश्चिम अशा मेट्रो मार्गाची शक्यता तपासून पाहावी.

कुलाबा सीपझ त्याचाच एक प्रकार आहे

<सरकार तुमचेच आहे ! घोटाळा दाखवा शोधून .>
दिल्लीत तुमचे सरकार आल्याला साडेसहा वर्ष होतील. तरी पण एकही घोटाळा शोधून न दाखवता घोटाळे झाले घोटाळे झाले असं सारखं कोकलायचं कधी बंद करणार?

नुसता धुरळा उडवून काय फायदा ? केस ठोका ,
नंतर जामिनावर बाहेर राहता येत की !
राहुल बाबा जामिनावर बाहेर राहून च पंतप्रधान पदाची स्वप्न बघतोय ना ?
" जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश " हे बिरूद मिरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आत ठेवून कसे चालेल ?
Happy

माणसे हलकट आहेत ह्यावर एक झाड व एक मांजर ह्यांचे एकमत झाले आहे >>>>>>
हो की !
लोकसंख्येचा स्फोट झाल्या मुळे रस्त्यावर माणसांचे अक्षरशः लोंढे वाहत असतात .
त्यात पुण्यामुंबैत मेट्रोंच्या कामा मुळे रस्ते अजुन अखडले गेले आहेत .
प्रत्येक जण अक्षरशः इंच इंच भूमी लढवत असतो . गाड्यांचा धूर , हॉर्न चे आवाज , घासा घासी मुळे होणारी भांडणे , त्यातून वयोवृध्द पेशंट मुले बायकांचे होणारे हाल हे आपल्या पाचवी ला पुजलेले असताना झाडे तोडण्यावर बंदी आणणारे अती शहाणे समजले गेले पाहिजेत ....
इतर ठिकाणी झाडे पुन्हा लावून जोपासता येतील , पण रस्त्यावर त्या गोंगाटात मरणारे पुन्हा जिवंत करता येईल का ?

पुण्यात सुद्धा एका शहाण्याने नदीपात्रातील जीव जंतूंना हानी पोहचेल म्हणून नदीपात्रातील रस्त्या विरोधात कोर्टात केस टाकली होती .

मुळात त्या घाणेरड्या पाण्यात जीव जंतू आहेत आणि ते माणसाच्या जिवापेक्षा महत्वाचे असतात असे दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते आणि असलेच लोकं जनहिताच्या विरोधात कोर्टात खेळत बसतात . कोर्टाने स्टे संध्याकाळी उठवल्या नंतर एका रात्रीत महानगरपालिका ने तो रस्ता करण्याची हुशारी दाखवली होती , हाय कोर्टात अपील जाण्याअगोदर !!!!!
त्या रस्त्यामुळे लक्ष्मी आणि जंगली महाराज रोड वरील बराचसा ताण कमी झाला .
त्यावेळचे राज्यकर्ते पण या केस मध्ये हुशार समजले गेले पाहिजेत .
पण इथे आर शेड साठी मंत्री स्वतःच घोळ घालत बसले , झाडे तोडू नये म्हणून चमकोगिरी करत बसले , मुंबईतील सेलिब्रिटी वर्तुळात टाळ्या वाजल्या असतील पण एकंदरीत त्यामुळे होणारे आर्थिक आणि सामाजिक नुकसान भरून न येण्यासारखे आहे .

Pages