Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरू केला आहे ऑलरेडी.
सुरू केला आहे ऑलरेडी. मुलीसाठी पॉज केलाय.
लिहीणार नाही काही.
हो, नाहीतर खेळातून आऊट करेन
हो, नाहीतर खेळातून आऊट करेन
(No subject)
सर्कस बघायला सुरूवात केली
सर्कस बघायला सुरूवात केली होती पण पूर्ण करण्याचं धाडस, पेशन्स, मानसिक ताकद, तितिक्षा कि काय म्हणतात ते, तसलं काही नाहीये. त्यापेक्षा अंगूर सलग दहा वेळा बघेन. अस्मिता, तुम्ही लिहाच.
पाहिला टिच्चून सर्कस.
पाहिला टिच्चून सर्कस. शेवटच्या क्षणापर्यंत हा अंगूरची कॉपी नसेल, कोंबडी ऑफ एरा रोहित शेट्टी स्टाईल असेल असे वाटले होते. वर न लिहीण्याचे वचन दिलेले आहे, ते "मै आपका वफादार हूं, बिल्कुल नही लिखुंगा " सारखं होतंय का असं वाटतंय. तेव्हां अस्मिता लौकर लिखो.
अरे रोहित बाळा, तू गाड्या उडव, भौतिक शास्त्र नव्याने लिही काहीही कर रे सोन्या. पण अंगूर सारख्या सोन्याला सावरिया आणि ओम शांती ओमच्या सेटसचे रामोजी राव पितळ का लावतोस माझ्या छकुल्या ? त्यातही दोन संजीवकुमार , दोन देवेन वर्मा अगदी सेम टू सेम कपड्यात होते. पण आत्ता हा आलाय तो कुठल्या जोडीतला असा गोंधळ नाही झाला. किमान वरूण शर्मा देवन वर्माच्या पावलावर पाऊल टाकू शकेल..
पण संजीवकुमार म्हणून रणवीर सिंग ?
हे म्हणजे राज कपूरसारखा सिनेमा बनवायला राज कुंद्रा डायरेक्टर म्हणून नेमण्यासारखं झालं कि लका.
Ranvir Singh is better than
Ranvir Singh is better than Sanjeev Kumar.
तो वरून शर्मा कोणत्याही
तो वरून शर्मा कोणत्याही चित्रपटात चुचाच वाटतो...
Ranvir Singh is better than
Ranvir Singh is better than Sanjeev Kumar
>>>>
अभिनयात नाही. रणवीर सिंग छान आहे तसा. आवडीचा आहे. शाहरूखच्या तोडीची एनर्जी आणतो. पण अभिनयाची संजीव कुमारची जी रेंज आहे ती अमिताभपेक्षा भारी आहे तिथे रणवीर सिंग बेटर बोलणे पचनी पडत नाहीये.
तो वरून शर्मा कोणत्याही
तो वरून शर्मा कोणत्याही चित्रपटात चुचाच वाटतो
>>>
वरून शर्मा नाव ऐकून कोण हा गूगल करणार होतो. आता गरज नाही.
आणि हो चुचाच वाटतोला +७८६
अच्छा हा सर्कस अंगूरची कॉपी
अच्छा हा सर्कस अंगूरची कॉपी आहे का रोहीत शेट्टीने बनवलेल्या..
फार पूर्वी वाचलेले की शाहरूखला घेऊन बनवणार आहे.. उत्सुक होतो.. मग ते बारगळले.. मग आता हा कांड केला का त्याने
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/83044
धाग्यावर या.
आचार्य , सा खि खाऊन ताबडतोब लिहिले.
फेफ , हे गुण माझ्यात आहेत असं वाटायला लागलं
मागे कुठेतरी अज्ञातवासी ची
मागे कुठेतरी अज्ञातवासी ची कमेंट होती थ्रीलर मल्याळम सिनेमाची...सापडत नाहीये.. कोणता सिनेमा सुचवला होता??
जय जय जय जय हे, मल्याळम
१.जय जय जय जय हे, मल्याळम हॉटस्टार वर हिंदीत पाहिला..
आवडला..मजा आली बघायला...मस्ट वॉच..
२.Lost पाहिला झीफाईव वर.
एक कॉलेज विद्यार्थी गायब होतो..इन्वेस्टिगेशन पत्रकार यमी गौतमी तपास करत असते..बंगाली पार्श्वभूमी आहे..थोडा संथ वाटू शकतो..बरा आहे.
३.Cadavar तमिळ बघितला हिंदीत, हॉटस्टार वर.
मर्डर मिस्ट्री, इन्वेस्टिगेशन सिनेमा.. अमला पॉल एक पोलीस सर्जन असते..पोस्ट मार्टम करून केस सॉल्व करणारी..तितकासा छान नाहिये.. बरा आहे..
४.ब्रह्मास्त्र बघितला..सिनेमा बद्दल बोलायला शब्द नाहीत...
प्राईम वर नव्याने आलेला कुमन
प्राईम वर नव्याने आलेला कुमन हा मल्याळम सिनेमा पहिला.
दिग्दर्शक जितू जोसेफ चा थ्रिलर सिनेमे बनवायचा ट्रॅक रेकॉर्ड आहे (दृश्यम सिरीज पासून). जर त्याचे सिनेमे आवडत असतील तर नक्की पहा.
मला तरी हा सिनेमा आवडला.
द स्टोरी थिंग्स (तमिळ )
द स्टोरी थिंग्स (तमिळ ) पाहिला ... ब्लॅक मिरर ला टफ आहे.. आवडले...
बरेच दिवस गोविंदा मेरा नाम
बरेच दिवस गोविंदा मेरा नाम बघायचा होता, विकी कौशल आवडतो मला. मस्त tp पिक्चर. जबरदस्त प्लॅन गोविंदाचा. विकी आणि रेणुका शहाणे यांनी तर जबरदस्त काम केलंच आहे पण मला फारसा न आवडणारा अमेय वाघ यात एकदम भारी वाटला. छान रोल केलाय त्याने.
शेहेझादा पाहीला का कोणी? आज
शेहेझादा पाहीला का कोणी? आज सव्वातीनच्या शो ला जाणार होते पण मैत्रिणींचा दुसराच कार्यक्रम ठरला. आता उद्या परवा पाहीन.
कार्तिक आर्यन आवडत नाही आणि
कार्तिक आर्यन आवडत नाही आणि ओरिजिनल पाहिल्यावर शेहेजादाचे ट्रेलर पाहूनच त्याच्यापासून दूर रहायचे ठरवले आहे.
गोविंदा नाम मेरा पाहिला. मस्त
गोविंदा नाम मेरा पाहिला. मस्त आहे. मजा आली पहायला. ट्विस्ट्स आणि टर्न्स छान आहेत आणि एकदा स्पीड पकडल्यावर सोडत नाही, त्यामुळे खिळवून ठेवतो.
The menu पाहिला हॉटस्टार वर.
The menu पाहिला हॉटस्टार वर.
चांगला आहे..
काल परस्पर तिकिटे काढली
काल परस्पर तिकिटे काढली म्हणून पठाण पाहिला. एक भारतीय म्हणून लाज वाटली कि आपल्याकडे असे पिक्चर बनतात. दीपिकाची बिकिनी पाहून श्रम वाटली. बाहेरच्या देशात काय विचार करत असतील?
बेबी ड्रायव्हर पाहिला. मस्त
बेबी ड्रायव्हर पाहिला. मस्त सिनेमा आहे.
त्या दिग्दर्शकाचे (Edgar Wright) पाहिलेले सगळे सिनेमे आवडले आहेत.
शॉन ऑफ द डेड
स्कॉट पिलग्रिम
बेबी ड्रायव्हर
बेबी नावाचा मुलगा गेटवे ड्रायव्हर म्हणून एका गुंडासाठी काम करत असतो. बेबीची खासियत असते, की परफेक्ट गाणे लावले की तो अचाट ड्रायव्हिंग करू शकत असतो. बेबीचे त्या गुंडावर कर्ज असते त्यामुळे त्याला काम करत रहावे लागणार असते. पण बेबीला एका डायनर मधल्या वेट्रेस वर प्रेम होते आणि तो ह्या धंद्यातून बाहेर पडायचा प्लॅन करतो.
सिनेमात गाणी खूप मस्त वापरली आहेत.
Lost पाहिला झीफाईव वर.
Lost पाहिला झीफाईव वर.
एक कॉलेज विद्यार्थी गायब होतो..इन्वेस्टिगेशन पत्रकार यमी गौतमी तपास करत असते..बंगाली पार्श्वभूमी आहे..थोडा संथ वाटू शकतो..बरा आहे.>>> डिट्टो माझे पण मत. पंकज कपूर ने आजोबा चा रोल काय गोड केलाय. यामी ला हेप कपडे आणि ग्लॅमर लूक न दिल्याने तिचे कॅरॅक्टर भुमिकेच्या जास्त जवळ गेले.
Lost पाहिला
Lost पाहिला
बरा आहे.
तो हिरो आश्रम मध्ये होता भावाच्या कॅरेक्टर मध्ये.
सलाम वेंकी पाहिला.
झी अथवा prime वर आहे.
सत्यकथेवर आधारित.
सिरीयस आणि इमोशनल चित्रपट.
ह्याच किंवा अशाच एका सिंड्रोम ने आजारी एक।मराठी मुलगा देखील होता. नाव आठवत नाहीये.
दूरदर्शन वर त्याची आणि फॅमिली ची मुलाखत झालेली.
प्रचंड हुशार होता. घैसास किंवा असेच काही आडनाव.
लॉस्ट पाहिला मी पण.. शेवट
लॉस्ट पाहिला मी पण.. शेवट इतका बोर आहे... फसवणूक झाली वाटते चित्रपट बघून...
पंकज कपूर आणि राहुल खन्ना( हा म्हातारा कधी होणार ) यांची कामे छान आहेत.. यामी फेल्स ....
द मेनु मला आवडला नाही. हॉरर
द मेनु मला आवडला नाही. हॉरर आहे. एक तर हॉरर आवडत नाहीत ....
प्राईमवरचा मन कस्तुरी रे
प्राईमवरचा मन कस्तुरी रे संपूर्ण पाहिलेले कुणी आहेत का ?
गंध ..मराठी.. प्राईमवर
गंध ..मराठी.. प्राईमवर
तीन गोष्टी गंधाशी निगडित एकानंतर एक..
पहिली: होणारी नवरी
दुसरी:औषधे घेणारा माणूस
तिसरी: बाजूला बसलेली बाई
पैकी पहिली गोष्ट म्हणजे राणी मुखर्जी चा अय्या चित्रपटच आहे..इथे अम्रुता सुभाष आणि गिरीश कुलकर्णी (दुसरं कुणीतरी चाललं असतं खरंतर) मस्त हहपुवा आहे.
दुसरी तितकीशी नाही आवडली मोठी सोकु भयानक अभिनय करतेय इथे.
तिसरी छान आहे..पावसाळी वातावरण, जुना वाडा आणि नीना कुलकर्णी छान आहे.
गंध ..मराठी.. प्राईमवर
गंध ..मराठी.. प्राईमवर
तीन गोष्टी गंधाशी निगडित एकानंतर एक..
पहिली: होणारी नवरी
दुसरी:औषधे घेणारा माणूस
तिसरी: बाजूला बसलेली बाई
पैकी पहिली गोष्ट म्हणजे राणी मुखर्जी चा अय्या चित्रपटच आहे >>> दोन्हीही सचिन कुंडलकरांचेच चित्रपट आहेत आणि अय्याच्या प्रमोशनदरम्यानच त्यांनी गंधमधल्या एका स्टोरीवर आधारित असल्याचे सांगितले होते. मी गंध युट्युबवर बघितला होता.
पैकी पहिली गोष्ट म्हणजे राणी
पैकी पहिली गोष्ट म्हणजे राणी मुखर्जी चा अय्या चित्रपटच आहे..>> गन्ध वरुनच काढलाय तो
Pages