चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला उद्देशून नव्हतं हो..

मी इथं फक्त पाहिलेल्या सिनेमांबद्दल माझी मतं लिहिते....पूर्वी पण एका आयडीने या काकू अशे सिनेमे बघतात आणि तशे सिनेमे बघतात म्हणून कमेंट केलेली..वर पण मी टायपो मिस्टेक म्हटले तरी.. येऊन इमोजी टाकलाय..इथं फक्त मेजोरिटी लोकांना आवडणार्या सिनेमांबद्दल च लिहायचं असतं का? तसं असेल तरी ठिक आहे..माझा वेळ इथं लिहिण्यात न घालवलेला बरा..

इथं फक्त मेजोरिटी लोकांना आवडणार्या सिनेमांबद्दल च लिहायचं असतं का?
>>>

मायबोली आणि मेजॉरीटी आवड हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. पण थोडक्यात सांगायचे झाल्यास ईथे जी सक्रिय सभासदांची आवड मेजॉरीटीत दिसते तिच्यावर जाऊ नका. ती फसवी असू शकते. मायबोलीचा मूकवाचक वर्ग फार मोठा आहे. त्यात कित्येक जण असे असतील की ते दाक्षिणात्य सिनेमांबद्दल जाणून घेण्यासाठी म्हणून तुमच्या पोस्ट फॉलो करत असतील. त्यामुळे लिहीत राहा. तुमच्याएवढे चित्रपट ईथे कोणीच बघत नाही Happy

१९९४ च्या स्पीलबर्गच्या "जुरासिक पार्क" ला फारशी ऑस्कर्स न मिळण्याचे कारण त्यानेच दिग्दर्शित केलेला शिंडलर्स लिस्ट त्याच वर्षी ती घेउन गेला हे असावे! जुरासिक पार्कला फक्त व्हिज्युअल आणि असेच काहीतरी मिळाले होते. नाहीतर एक चित्रपट म्हणून तो चांगला होताच पण त्याची लास्टिंग लीगसी सुद्धा प्रचंड आहे. पण महत्त्वाची ४-५ अ‍ॅवॉर्ड्स शिंडलर्स लिस्ट घेउन गेला.

शाहरूखचे मै हू ना, वीर झारा आणि स्वदेस एकाच वर्षी फिल्मफेअरला होते याची आठवण झाली.
तिघांनी पुरस्काराची लयलूट केलेली. तरी सर्वाधिक पुरस्कार स्वदेसने मिळवले होते असे आठवतेय..

महत्त्वाची ४-५ अ‍ॅवॉर्ड्स शिंडलर्स लिस्ट घेउन गेला.>>>
टोटल सात

शिंडलर्स लिस्ट ज्यावरन घेतला आहे ते थॉमस केनेलीचे शिंडलर्स आर्क अजून वाचायचं आहेच्या यादीत आहे....

बाकी ज्युरासिक पार्क पहिलाच त्यातल्या त्यात बेस्ट आहे. सिक्वेल तर भयाण आणि ज्युरासिक वल्ड तर अतिभयाण....

ज्युरासिक पार्क पुस्तक हे पूर्णपणे इयान माल्कमवर फोकस आहे, पण चित्रपटात त्याला अक्षरश लोचट विनोदी दाखवून माती केलीय. का असे केलं ते कळत नाही.

मूळ पुस्तकातले कितीतरी महत्वाचे संदर्भ सिनेमात गाळून टाकले आहेत.
त्यातले काही दुसऱ्या तर काही तिसऱ्या भागात बळच कर टाकले आहेत.

संत्रे सोलणे आले.

शिंडलर्स लिस्ट वर्ल्ड क्लासिक चित्रपट आहे. स्पीलबर्गचाच दुसरा एक करमणू क प्रधान सिनेमा आहे इंडिआना जोन्स अ‍ॅण्ड द लास्ट क्रुसेड.
ह्यात एक पात्र आहे डाँ एल्सा श्नायडर ही कट्टर नाझीलोकांच्या बाजूने आहे. व इंडिआना बाप लेकांना फसवून होली ग्रेलची माहिती व मॅप असलेली डायरी चोरते व नाझी लोकांना देते. आता शिंडलर्स लिस्ट मधील लोके हे जर श्नायडर बाईच्या लिस्टित आले तर काय ह्या मजेशीर
पॅराडोक्स ला दिलेली दाद आहे.

ह्यातच पुढे इंडी डायरीच्या शोधात बर्लिन ला जातो व श्नायडर कडून ती डायरी घेतो. तिथे इतर पुस्तकांची होळी चालू असते. अगदी विचित्र नाझी रॅलीचा सीन आहे. त्यात इंडी ढकलला जाउन चक्क हिटलर समोर येतो व सही करायला काही दुसरे नसल्याने त्याच डायरीतील रिकामे पान पुढे करून त्यावर हिटलरची सही घेतो. करमणूक प्रधान सिनेमा आहे. व शॉन कॉनरी व हॅरिसन फोर्ड असल्याने ट्राइड अँड टेस्टेड आय क्यांडी. श्नायडर बाई पण सुरेख दिसते इन अ नाझी फीमेल वे. ही अ‍ॅक्ट्रेस मुळात तेव्हा २१ वयाचीच होती.

महायुद्ध एक व दोन बद्दल सोर्स मटेरिअल बद्दल वेगळा बाफ काढून लिहिते.

आता एक फेबल मान्स म्हणून पण नवा मुव्ही आलेला आहे.

हे कुणालाही उद्देशून नाही. कृपया मनावर घेऊ नये.
कुणीही मराठी भाषिक सातत्याने अन्य भाषेतल्या चित्रपटांची माहिती देत असेल तर ते कौतुकास्पदच आहे. धन्यवादच मानायला हवेत.

हा धागा सर्वच भाषेतल्या चित्रपटांसाठी आहे. तरी देखील मराठी चित्रपटांसाठी वेगळ्या धाग्याचे स्वागत झाले आहे. कारण मराठी प्रेक्षक हिंदी, इंग्रजी चित्रपटांना आश्रय देतो, तसाच तो इतर भाषेतल्या चित्रपटांना सुद्धा दाद देतो. पण दाक्षिणात्य भाषा समजणे ही व्यवहार्य गोष्ट नाही. त्यामुळं गाजलेले चित्रपट मराठी प्रेक्षक सबटायटल्स असतील तर त्यासहीत किंवा तसेही पाहण्याचा प्रयत्न करतो. कंतारा अनेकांनी कन्नड मधे पाहिला. पण हे सर्वच चित्रपटांच्या बाबत होणे अशक्य आहे.

त्यामुळं तमिळ, तेलगू, बंगाली अशा भारतातल्या इतर चित्रपट सृष्टीबाबतचा एकच एक धागा किंवा वेगवेगळे धागे आले तरी काही बिघडत नाही. उलट शोधायला सोपे जाईल. याचा अर्थ इथे लिहू नये असा नाही. इथेही लिहावे. पण इथे त्याची नोंद करूनही त्यातले कितीसे बघितले जाणार ? ज्यांना बघावेसे वाटेल त्यांना चिकवाच्या सहा सात भागातून शोधणे अवघड नाही का ?

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हा लहान असताना दूरदर्शवर पाहिलेला चित्रपट आज युट्यूबवर पाहिला.
व्यंकटेश माडगुळकरांची कथा / पटकथा / संवाद या तिन्ही आघाड्यांवरची कामगिरी हीच चित्रपटाची युएसपी आहे. ही त्यांच्याच बहिणीच्या यजमानांच्या बाबत घडलेली कथा आहे .
मी जेव्हां पहिला मराठी चित्रपट पाहिला तो ही कृष्णधवलच होता तर १९६९ साली जास्त अपेक्षा करता येत नाही. साधीशीच कथा आहे. पण पात्रांचे स्वभाव. लोभ, मत्सर यांचे अगदी व्यवहारातले चित्रण, खरी खुरी वाटणारी पात्रे, अगदी खरे वाटणारे प्रसंग यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. घट्ट आणि बांधीव पटकथा आणि त्याला चंद्रकांत मांढरे (अण्णा) आणि अजून एक नवखा कलाकार यांनी अभिनयाने आणखी उचलून धरले आहे. निळू फुले तेव्हां फुटकळ भूमिका करत. जी वाटेला येई तीत जीव ओतत. चंद्रकांत यांनी दरोडेखोर जबरदस्त उभा केला आहे. महाराजांची भूमिका करणारे किंवा "एक माणूस रागावलंय वाटतं" विचारणारे, मिस्कील आणि प्रेमळ पाटलाची भूमिका साकारणारे हेच का ते असं वाटावं.

गायिकेमधे उषा चव्हाण हे नाव आहे. त्या आणि चित्रपटातल्या उषा चव्हाण एकच असतील तर आवाज आणि गायकीला दाद द्यायला हवी. उषा मंगेशकर असाव्यात म्हणून पुन्हा चेक केले पण आवाज ऐकला तर लता बाई असतील असे वाटले. गदिमा लावणी लिहीतात हे ठाऊक नव्हते.
या निमित्ताने "आपल्या दोन मुलांपैकी एक तुमचे नाही" फेम अभिनेत्रीचे नाव जयमाला काळे आहे हे एकदाचे समजले.

आताच्या प्रेक्षकांना आवडण्याची शक्यता कमीच. पण ६९ सालातला सिनेमा आहे हे लक्षात घेऊन समजून उमजून पहावा.

मराठी चिकवा वरच लिहीले होते. पण आख्खी पोस्ट सिलेक्ट ऑल होऊन डिलीट झाली. माबोवर (डेस्कटॉप - विंडोज) हे नेहमी घडते. मग पुन्हा ती पोस्ट लिहायचा उत्साह राहत नाही.

नाही. मुपो ढेबे वाडी मधे दिले आहे. आधीच्या सिनेमात बहुतेक त्या वेगळे नाव वापरत होत्या.

आचार्य - गदिमांच्या खूप लावण्या फेमस आहेत का माहीत नाही पण काही नक्कीच आहेत. बहुधा सर्वात लोकप्रिय "उसाला लागंल कोल्हा"
https://www.gadima.com/marathi-songs/playsong/259/Tuzya-Usala-Lagal-Kolh...

महाराजांची भूमिका करणारे किंवा "एक माणूस रागावलंय वाटतं" विचारणारे, मिस्कील आणि प्रेमळ पाटलाची भूमिका साकारणारे हेच का ते असं वाटावं.
>>>> हे सूर्यकांत यांच्याबद्दल बोललं जातं ना!

Cape Fear पाहिला. (अ‍ॅमेझॉन प्राइम)
मार्टिन स्कॉर्सेसीचा थ्रिलर सिनेमा. मुख्य भूमिका रॉबर्ट दी निरो.
बलात्काराच्या गुन्ह्याची १४ वर्षं शिक्षा भोगून सुटलेला कैदी तेव्हा त्याची केस लढलेल्या वकीलाच्या मागे लागतो, त्याच्या कुटुंबाला घाबरवून सोडतो. त्या घाबरवून सोडण्याची, त्यामागच्या कारणाची गोष्ट आहे.
त्याचं यामागचं कारण त्याच्या दृष्टीकोनातून पटतं. वकिलाच्या कुटुंबाच्या दृष्टीकोनातून त्यांची भीती, हतबलता, धडपडही पटते.
थ्रिलर सिनेमा असूनही (क्लायमॅक्स वगळता) तसं बर्‍यापैकी धीम्या गतीचं स्क्रिप्ट, पार्श्वसंगीत. खालच्या पट्टीतले संवाद. यामुळे त्या-त्या सिच्युएशन्स आणखी अंगावर येतात.
बर्‍याच सीन्समध्ये आता काहीतरी घडणार अशी वाट बघणार्‍या प्रेक्षकांचा (चांगल्या अर्थाने) अंत पाहिला आहे. तर काही सीन्समध्ये प्रेक्षकांना अगदी बेसावध पकडलं आहे.
त्यामुळे एकूण परिणाम खतरनाक होतो.

क्लायमॅक्स जरा ताणलाय असं मला वाटलं, पण अगदी शेवटचा रॉबर्ट दी निरोचा क्लोज-अप डेंजर घेतलाय.
रॉ दी नि आणि वकिलाच्या तरुण मुलीचं काम करणार्‍य अ‍ॅक्ट्रेसला ऑस्कर नॉमिनेशन होतं.
ऑस्कर्ससंदर्भातल्या बातम्या नेहमी फॉलो करते त्यामुळे काही जुन्या सिनेमांची नावंही कानावर पडली की ओळखीची वाटतात. तसंच हे एक नाव. कास्ट, दिग्दर्शक वगैरे काही लक्षात नव्हतं. पण २०-३० वर्षं जुना सिनेमा म्हणून पहायला मजा आली.

फारएण्ड , स्वाती आंबोळे >> गदिमांच्या लावण्याबद्दल आभार.

आबा >> तो टिपीकल संवाद सूर्यकांत यांचा आहे साधी माणसं चित्रपटातला. पण चंद्रकांत यांनीही अशाच भूमिका केल्या आहेत.

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी - शाळा कादंबरीत उल्लेख आहे. जोशी हा सिनेमा टाकतो सिनेमा ओळखण्याच्या खेळामध्ये, आणि मुलींना ओळखता येत नाही, आणि असा सिनेमाच नाही म्हणून दंगा करतात त्या.

मु पो ढेबेवाडी जबरदस्त आहे… कथा एका रात्रीची असली तरी त्या रात्रीच्या आधीच्या सर्व घडामोडी विस्ताराने दाखवल्या आहेत.

प्रत्यक्ष गुन्हा घडताना व नंतरचे प्रसंग अंगावर काटा आणतात.. मराठीत पडद्यावर असे फारसे पाहिलेले नाही. शेवट थोडासा गुंडाळलाय.

उषा चव्हाण खुप गोड दिसलीय, लावणीत तर ती अव्वलच होती. तिच्या अभिनयक्षमतेच्या तुलनेत तिला तितकी जबरदस्त कामे मिळाली नाहीत. पण मिळालेल्या मोजक्या संधींचे तिने नेहमी सोने केले.

पुढे दादा कोंडकेंसोबत केवळ दिखाऊ बाहुली इतकेच तिचे अस्तित्व राहिले.

या चित्रपटात वर्षा व जयमाला काळे दोघीही आहेत.

>>> या चित्रपटात वर्षा व जयमाला काळे दोघीही आहेत.
धन्यवाद! Happy
जयमाला काळे या नंतरच्या जयमाला प्रकाश इनामदार.

ओह !

Critical Thinking नेटफ्लिक्स वर. सत्य घटनेवर आधारित फील गुड मुव्ही. इनर सिटी शाळेतली मधली एक चेस टीम. थोडासा संथ.>>>> हे सापडलं नाही मला नेटफलिक्स वर

र. आ. , चित्रपटात सालस खानावळवाली दाखवलीय ती वर्षा व तिच्या हाताखाली काम करणारी सखु का ठकु आहे ती जयमाला. यात मस्त शिडशिडीत आहे पण नंतर तिचाही फुगा झाला तिच्या नवर्‍यासारखा. दोघांनी खुप चित्रपटांत एकत्र कामे केलेली आहेत.

यातली गाणी उषा चव्हाणने गायलीत याकडे माझेही लक्ष गेले नाही. मला रोशन सातारकरने गायलीत असे वाटले होते. उषा चव्हाण पण तमाशातुन आलेली कलावंत होती, गायनाचे अंगही चांगले यात फारसे आश्चर्य नाही. चित्रपटात गायनाची संधी मिळाली हेच थोडेसे आश्चर्य.

चित्रपटात सालस खानावळवाली दाखवलीय ती वर्षा व तिच्या हाताखाली काम करणारी सखु का ठकु आहे ती जयमाला. >> धन्यवाद. मी गुगल केलं होतं. Proud त्यात जयमाला काळे म्हणून उषा चव्हाणचा फोटो आहे आणि यादी दिलीये ती वर्षा यांच्या सिनेमांची !

उषा चव्हाण पण तमाशातुन आलेली कलावंत होती, गायनाचे अंगही चांगले यात फारसे आश्चर्य नाही >> बरोबर. पूर्वी तमाशात नृत्याबरोबर गाणेही शिकवले जायचे.

बर्‍याच कलाकारांचे हे असे वेगळे टॅलेण्ट दुर्लक्षित राहिले. राज कपूर ने स्वतः गायलेले एकमेव गाणे ऐकले. अप्रतिम आहे. शम्मी कपूर सुद्धा उत्तम गायक होते. रेखा सुद्धा छान गाते.

कपिल शर्मा आणि आता भाऊ कदमचे हे टॅलेण्ट !
https://www.instagram.com/reel/CpSD2nwobC7/

Pages