चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फारेण्ड - माझ्या उसाला लागंल कोल्हा ही लावणी गदिमांची आहे हा मला धक्काच आहे. कारण ज्याप्रमाणे आरत्या पूर्वापार चालू असतात , तसंच उसाला लागंल कोल्हा ही लावणी पण प्राचीन काळापासून चालत आलेली असावी असा माझा समज होता. Proud

गदिमा कशाला लावण्या लिहीतील असं वाटत होतं. अफाट रेज आहे त्यांची !

या धाग्यावर अवांतर आहे पण गदिमांचा विषय निघाला म्हणून , 'गदिमांजली 'हा कार्यक्रम रोज सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत आकाशवाणी वर लागतो . त्यात बरीच चांगली गाणी ऐकायला मिळतात .

दिलिप कुमारने मुसाफिर मध्ये गायलेले गाणे मी अनंत वेळा ऐकले होते आणि रफीचेच आहे असे वाटले होते. ते दिलिपने गायलेय हे हल्ली कळले तेव्हा त्याचा बोलणारा गळा जरी ऐकु न येणार्‍या खर्जातला असला तरी गाणारा गळा गोड व सुरेल होता असेच वाटले… Happy

ते गाणे डोळ्यात पाणी आणते. विधवा स्त्रीवर इतकी मानसिक बंधने की बालमित्रासोबत आधी कधीतरी गायलेले गाणे आता ती मोकळेपणे गुणगुणूही शकत नाही…

ज्या चित्रपटामुळे मराठीत तमा शापटांची लाट आली असं मानलं जातं त्या सांगते ऐका चित्रपटातल्या लावण्यासुद्धा गदिमांनीच लिहिल्यात.
यात चंद्रसूर्य दोघेही आहेत.

नमस्कार,
अवांतर आहे पण एव्हढ्यासाठी मुद्दामून वेगळा धागा काढायचं जिवावर आलं आहे.
मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रीप्शन बंद केलं. पण महिन्याची फी तरीही आपोआप डिडक्ट झाली. ई मॅण्डेट दिलेलं आहे, . सबस्क्रीप्शन फेब्रुवारीतच बंद केलं आहे. सेवा पण चालूच आहे.

हे असे खूपसे मनोरंजन पुढ्यात येणे म्हणजे बुफे मधे सव्वाशे पदार्थ असावेत आणि काय खावे हे न समजून काहीच खाता न यावे अशी अवस्था आहे. त्यातच प्राईम, नेफ्लि . युट्यूब यांचे ए आय वैताग आणते. एखादा व्हिडीओ पाहिला कि त्यांचे अल्गोरिदम त्याच त्याच प्रकारचे कण्टेण्ट दाखवते. युट्यूब चे सेटींग्ज युट्यूबरचाच व्हिडीओ पाहून बदलले तेव्हां काही काळ वेगवेगळ्या विषयांचे कंटेट दिसले. पण आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या !

प्राईम आणि नेफ्लि वर तर आता एकसुरी कंटेट दिसतोय. वेगळा कंटेट असेल तर शोधायचा कसा हे समजत नाही. शेवटी सबस्क्रीप्शन बंद करण्याचा निर्णय घेतला तर हे असं !

उसाला लागंल कोल्हा ही लावणी गदिमांची आहे हा मला धक्काच आहे >> >हो मलाही पहिल्यांदा समजले तेव्हा आश्चर्य वाटले होते Happy

दिलिप कुमारने मुसाफिर मध्ये गायलेले गाणे मी अनंत वेळा ऐकले होते आणि रफीचेच आहे असे वाटले होते. >> मी अलिकडेच ऐकले आहे ते गाणे. तुमच्याकडे असलेली अशी दुर्मिळ माहिती शेअर करत रहा. वाचायला आवडेल.
राज कपूरने गाणे गायलेय ते ही मुकेशचे आहे असेच वाटते. ही मंडळी उसना आवाज का घेत असावीत ?

वैरी मंगळसूत्राचा हा एक कल्ट सिनेमा आहे. गुंडा हा जसा अपने आप मे कल्ट आहे तसाच. मध्यंतरी अर्धवट स्वरूपात व्हायरल झाला होता. आता पूर्ण लांबीचा आहे युट्यूबवर. अशा सिनेमांवर तुम्ही लेख पाडू शकत नाही इतके ते जबरदस्त असतात. ते अनुभवायचे असतात. त्यांच्यावर उपहासात्मक लिहीणे किंवा कॉमेण्ट्री लिहीणे म्हणजे आकाशाला ठिगळे लावण्यासारखे आहे. अगदीच हुक्की आली तर जसेच्या तसे वर्णन केले तरी पुरे. अधिकच्या प्रतिभेसाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माता गणेश काळे पाटील यांनी जागाच ठेवलेली नाही.

थोडक्यात वैरी मंगळसूत्राचा हे आव्हान आहे अशा लेखकांसाठी ! Wink

अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो बघितला.
ओके वाटला... खूप आवडला नाही.
काही सीन्स, डायलॉग्ज जमून आलेत. पण ओव्हरऑल जयदीप अहलावतला वाया घालवलाय असं वाटलं.
अ‍ॅक्शन हिरो म्हणून तो स्वत:चे स्टंट्स स्वतः करतो, त्यामुळे नंतरची खरीखुरी मारामारीही करताना दाखवलाय, ते एकवेळ मान्य; पण तो शार्पशूटरही दाखवलाय, ते पटलं नाही.

*** स्पॉयलर ***
विकीचा अपघात होतो, तिथून हिरो निघून जाताना एक तिसरी गाडी तिथे असल्याचं सूचित केलंय (साइड व्ह्यू मिररमध्ये दोन्ही गाड्या दिसतात). ती कोणाची? पापाराझी का?

गुलमोहर - एक तरल अनुभव!

काल हॉटस्टार वर सहज browse करताना हा सिनेमा दिसला आणि लगेचच बघायला घेतला.

गुलमोहर नावाच्या एका घरी एक फॅमिली पार्टी कम गेट टुगेदर पासून ह्या सिनेमाची सुरुवात होते, दुसऱ्या दिवशी तो बंगला सोडायचा असतो. ही पार्टी ते बांगला सोडेपर्यंतच्या काळात सर्व सदस्य आणि त्यांची पर्सनल स्टोरी चालू राहते, काही गुपितं उघड होतात. एकंदरीत आपण पूर्णपणे बत्रा फॅमिलीमध्ये सामावून जातो. अगदी त्यांच्या घरी काम करणारी रेश्मा आणि वॉचमन जितू ह्यांची स्टोरी सुद्धा अगदी तरलपणे पुढे सरकत असते.

शर्मिला टागोर (कुसुम) आणि मनोज वाजपेयी (अरुण) ह्यांच्यातील आई मुलाचं नातं अगदी सुंदर portray केलं आहे, आणि अर्थातच ते दोघंही सुंदर सहजतेने वावरतात. अरुणची पत्नी इंदू (सिम्रन) कुठल्याही घरच्या स्त्री ला जवळची वाटेल अशीच आहे! अमोल पालेकर (अरुणचे काका) त्यांच्या भूमिकेत लक्षात राहतात..

विशेष उल्लेख म्हणजे अनुराग बत्रा (अरुणचा चुलत भाऊ) ह्या पात्राचा करावा लागेल, ज्या पद्धतीने हे पात्र लिहिलं आहे आणि ज्या प्रकारे हे कठीण परिस्थितीत वागतं ते एकदम उल्लेखनीय आहे म्हणजे अशा पद्धतीने हे पात्र फार कमी वेळेस लिहिलं जातं.

अगदी शेवटपर्यंत आपण ह्या सिनेमासोबत कनेक्टेड राहतो...शेवटचा कुसुम आणि अरुण यांचा सीन डोळे पाणावतो. शर्मिला टागोर अतिशय सुंदर आणि एलिगंट दिसतात, त्यांच्या एकदंरीत वावरात एक प्रकारची शांत, संयत भावना आहे आणि ती आपल्याला जाणवते.

म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोर एकदम रिफ्रेशिंग आहे.. म्हणजे ज्यात ठेहेराव आहे असा अगदी! शेवटचं गाणं मला खूप आवडलं. एकंदरीत हा सिनेमा एकदम positive vibe आणि सुखद अनुभव देतो!

* चित्रपट review/ माहिती लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे सांभाळून घ्यावे!

छान लिहिलय की रिव्यू. आज वेळच वेळ आहे. नक्की बघेन. धन्यवाद.

काल वकांडा फॉर एव्हर पूर्ण पाहिला. मी पहिल्याम्दा चालू केला होता पण ओपनिन्ग शॉट मध्येच शुरीचा भाउ मरतो असे तिची आई सांगते व त्याला वाचवायची तिची धड पड चालू आहे ते काही सहन होईना त्यामुळे बंद केले होते. चॅडविक बोसमन चा पहिला ब्लॅक पेंथर थेट्रात बघितला होता. त्यानंतर तो वारल्याचीच बातमी आली. तेव्हा धक्का बसला होता.

हा सिनेमा एक सुखद सरप्राइज आहे. अ‍ॅक्षन सीन्स मार्व्हेलचे असल्याने एकदम सफाईदार आहेत. रिरिच्या वडिलांची गाडी एक क्लासैक मॉडेल आहे ते फार छान आहे. आय वाँट टू गो फॉर अ स्पिन इन दॅट कार. पूर्ण सिनेमात शुरीचा मोठा रोल आहे व तिच्या आईचा पण. व स्त्रीशक्ती एकदम पावरबाज दाखवली आहे. शुरी मात्र अंमळ फारच बारीक झालेली आहे.

व्हिलन पाण्यातील सैतान आहे जो हवेतही उडू शकतो. हा फार हॉट व हॅपनिन्ग आहे व क्लायमॅक्स मध्ये शुरी कडून पराभव पत्करतो. पाण्यातील विश्व पण सुरेख साकारले आहे. मला त्यांची ज्वेलरी फार आवडली. तशी कुठे मिळेल.
बोसमन ला ट्रिब्युट आहे दोन वेळीस. एक एकदम सुरुवातीला टायटल सिक्वेन्स अगदी पिन ड्रॉप सायलेन्स नो म्युझिक असा आहे तेव्हा.
व शेवटाला थोडे फुटेज आहे. वडील व भाउ वारल्यावर शुरी व आई राज्य सांभा ळतात हे एकदमच रिलेटेबल. बीन देअर डन दॅट.
शेवटास एक मस्त सरप्राइज आहे. नव्याने सुरुवात टाइप व शुरीची एक फॅमिली संपते पण नवी सुरू होते. सर्व कपडेपट एकदम लै भारी. अगदी बारके कॅरेक्टर पण व्यवस्थित सजवले आहे. संगीत पण छान च आहे. आमचा नवा टीव्ही लै पावरबाज असल्याने फार जोरात लावता येत नाही. पण तरी मस्त वाटले. करमणूक प्रधान पण हृद्य फॅमिली बाजू असलेला सिनेमा

वकांडा आवडलेला. बाकी स्त्री शक्ती आहेच पण पोस्ट क्रेडिट सीन मध्ये त्याची माती होते त्याचं काय! मला तरी काय गरज वाटलेला तो सीन.

ब्रँडन फ्रेजरचा "द व्हेल" बघितला. सिनेमा आवडला... पण बघताना खूप त्रास झाला.
एक morbidly obese व्यक्ती मरणाच्या दारात आहे. त्याला त्याच्या मुलीशी कनेक्ट व्हायचे असते, आणि त्याला समजते की मुलीचे आयुष्य गडबडले आहे. ती हायस्कूल मधुन हाकलल्या जाण्याच्या वाटेवर आहे. शेवटी तिचे आयुष्य सुरळीत करण्याची धडपड यशस्वी होते का ?

ब्रँडन फ्रेझर ने अतिशय उत्तम अभिनय केला आहे. खासकरून, इतके प्रॉस्थेटिक अंगावर वावगून अभिनय करणे सोपे नव्हे. सिनेमा चांगला आहे, पण आपापल्या रिस्कवर बघावा.

"The boring parts {from the book Moby Dick} saddened me the most. They just had endless discription of whales. I think the narrator was protecting the readers from all the sad parts of his life."

दोन ऑफबीट चित्रपट
रामप्रसाद कि तेरहवी - चार वर्षांपूर्वी नेटफ्लिक्स वर पाहिलेला - फॅमिली ड्रामा. अनेक भारतीय कुटुंबात घडणारं नाट्य अचूक तपशीलात दाखवलंय.
ब्रिजमोहन अमर रहे - हा पाहून बरीच वर्षे झाली. डार्क ह्युमर प्रकारातला सिनेमा आहे. अफलातून चित्रपट. नेफ्लिवर हिंदी कंटेट नव्याने असतानाच्या काळातला असतानाचा.

अस्मिता बघून आधी दचकलेच. पहिले परीक्षण वाचून हुश्श झालं कारण मी तर नेहमीच नावं ठेवते. Proud
अस्मिता, छान लिहिले आहे. ट्रेलर बघितलं आहे.

सध्या अतुल कुलकर्णीची अजून एक सिरीज प्राईमवर येते आहे तीही बघायची आहे. मग शर्मिलाला गुगलून पतौडी पॅलेस, पहिला बिकिनी फोटो, लग्नाचे फोटो, पतौडी सिमीचा एक्स होता ती कशी चिडली वगैरे बघत/वाचत बसले. हॉटस्टार नाही ना काय करणार!!

मै,
मी टिंबासहीत आहे, त्या बिनटिंबाच्या आहेत.
अस्मिता.

गोल्ड नावाचा हिंदी डब्ड (मल्याळम) चित्रपट आहे प्राईम वर. छान आहे.
जोशी नावाच्या एका माणसाच्या घरासमोर एका सकाळी एक बोलेरो ट्रक रस्ता ब्लॉक करून पार्क करून कुणी तरी निघून गेलेलं असतं. तो पोलिसात तक्रार करून येतो. कुतूहलाने आत माल काय आहे हे पाहतो तर स्पीकर्स असतात. एक स्पीकर घरात घेऊन येतो तर त्याच्या आत मधे एक किलो सोन्याची वीट असते. असे दोनशे स्पीकर्स गाडीत असतात.

दुसरीकडे ती गाडी चोरायला काही चोर येतात. आणखीही काही लोकांना त्या सोन्याची माहिती असते.
हा सगळा गोंधळ मस्त रंगवलाय.

अस्मिता नाव गोंधळ भारीच.

वर उल्लेख केलेला वाकांडा नवऱ्याने बघितला, मी मध्ये मध्ये बघितला.

अस्मिता गुलमोहर सिरीज परिचय छान .

गुलमोहर पाहिला सिनेमा. काही काही भाग एकदम सुरेख घेतले आहेत. जसे की मनोज बाज पेयीच्या पात्राचे सेंट्रल कॉन्फ्लिक्ट. एक वेगळाच प्रश्न हाताळला आहे. बाकी लिहिले तर स्पॉयल र होईल. पण मलातरी एक दम रिलेटेबल वाटले. पण बरेचसे प्रेडिक्टेबल आहे. समलिन्गी मुलगी तिचे प्रश्न त्याला आजीने प्रगल्भ पणे दिलेले सोलुशन. स्टार्टप वाला मुलगा अयशस्वी पणा चा सामना करतो. चौकिदार व मेडची लव्ह स्टोरी इंटरफेथ. हे बोअर होते. शेवट सर्व गोड गोड. होळी पार्टी. शर्मिला टागो रची माधुरि दिक्षितच झालेली आहे बकेट लिस्ट मधली. नो रिस्क रोल.
ती तिच्या स्टाइलने डायलॉग मारते. किंवा त्याला नैसर्गिक अ‍ॅक्टिन्ग केले आहे असे ही म्हण ता येइल. टिपिकल दिल्ली श्रिमंती माहोल आहे.
जो मला फार बोअर होतो. परत ह्यातले वयस्कर लोक्स मी फार सहन केले मी फार त्रास भोगला म्हणत राहतात.

प्राईम वर दक्षिणपंथी मर्डर नावाचा चित्रपट पाहिला. काय विकृत सिनेमा !
एका श्रीमंत माणसाचं आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम असतं. पण ती एका साधारण मुलाशी लग्न करते.
त्यामुळं वेडापिसा होऊन त्याच्या खूनाचा निश्चय करतो.

हैद्राबाद इथे घडलेल्या एका घटनेवरून कदाचित दुसरीही बाजू मांडावी या उद्देशाने बनवलेला वाटला चित्रपट.
यात् त्याचे जे काही समर्थन केले आहे तो एखादा विकृत इसमच करू शकेल.
अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नक्कीच आहे सर्वांना. पण विकृतीचं ?

गुलमोहर पाहिला...आवडला....पण काही गोष्टी आवडल्या नाहीत...
स्पाॅईलर :
शर्मिला टागोरचे पण समलैंगिक संबंध असतात आणि आता ती तिच्या partner कडे pondicherry ला जाणार असते ते नाही आवडलं

Pages