Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज अशी हि बनवाबनवी बघितला
आज अशी हि बनवाबनवी बघितला कितव्यांदातरी...
त्याचा ओरिजिनल "बिवी और मकान"
त्याचा ओरिजिनल "बिवी और मकान" ओटीटी / युट्यूबवर आहे. मेहमूद = अशोक सराफ, केश्टो मुखर्जी = लक्ष, विश्वजीत = सचिन. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शक आहेत.
नेफ्लिवर इन्व्हिटेशन म्हणून
नेफ्लिवर इन्व्हिटेशन म्हणून नवीन मूव्ही अपलोड झालेला दिसला.
टीजर पाहिला. मतकरींच्या कथेची आठवण झाली. बघेन बहुतेक.
कधी मुहूर्त लागतो !
परत थोडा वेळ ऍक्शन हिरो
परत थोडा वेळ ऍक्शन हिरो बघण्याचा प्रयत्न केला पण वैतागून बंद केला
तो हरियाणा च्या एक राजकीय नेता असतो का जेम्स बॉण्ड
आरामात लंडन ला जातो, सेलिब्रिटी च्या घराची चावी मिळवून घरात शिरतो, दिवसा ढवळ्या पोलिसांना मारतो
पोलिसांना न मिळालेला हिरो कुठं थांबलाय हे त्याला अचूक माहिती असतं
आणि अर्ध्या सेकंद गाडी थांबलेली असतात त्यात जाऊन बसतो
अगदीच आवरा यार
सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला काही मर्यादा???
वाळवी पाहिला. एकदा बघायला
वाळवी पाहिला. एकदा बघायला हरकत नाही. मजा आहे. आचरटपणा आहेच पण चालसे टाईप.
थाय मसाज बोर वाटला नंतर नंतर
थाय मसाज बोर वाटला नंतर नंतर.
दौड: पुन्हा पाहिला. बरा आहे
दौड: पुन्हा पाहिला. बरा आहे टाईमपास. उर्मिला काय जबरदस्त दिसते
शूल: छान आहे. मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे, ताकदीचे कलाकार. रविना साठी बदाम
कोड नेम तिरंगा आज नेटफ्लिक्स
कोड नेम तिरंगा आज नेटफ्लिक्स वर दिसला. इतक्यात आलाय का ?
४८ मिनिटे पाहून झाला. आतापर्यंतचा मस्तच आहे. वेगवान, थरार.
परिणिता चोप्राचं काम खूप छान झालं आहे. तिचे अॅक्शन सीन्स पण आवडले.
"वध" कुणी पाहिलाय का ? कुणी रिकमेण्ड केला तर बघेन.
गडद अंधार (मराठी) छान आहे असे कळले. मराठीतली पहिली अंडरवॉटर सुपरनॅचरल फिल्म.
इतक्यातच पठाण पाहिल्यामुळे तिकीट काढून नाही जमायचं.
द एंडलेस (२०१७)
द एंडलेस (२०१७)
विचित्र आणि भीतीदायक सिनेमा. आवडला, पण खूप नाही आवडला. अजून खूप मस्त होऊ शकला असता असे वाटते.
एका कॅम्प आर्केडिया नामक कल्ट मधुन सुटलेले दोघे भाऊ गरिबीत दिवस काढत असतात. मोठ्या भावाला कल्टच्या अंधाऱ्या बाजू जास्त चांगल्या आठवत असतात, तर लहान भावाला तिथली कम्युनिटी आठवत असते. आणि बाहेरच्या आयुष्यापेक्षा कल्ट मधले आयुष्य जास्त सुखद होते असे त्याला वाटत असते. एक दिवस त्यांना कल्टकडून एक व्हिडिओ टेप येते, त्यात एक त्यांच्या ओळखीची सभासद मुलगी येणाऱ्या "ascension" बद्दल बोलते. हे ascension म्हणजे नक्की काय हे दोघांना माहीत नसते, पण मृत्यू संदर्भात आहे असा त्यांना अंदाज असतो.
शेवटी उत्तरे मिळवण्यासाठी दोघे भाऊ पुन्हा एकदा कॅम्प आर्केडियाला एक दिवस भेट देऊया म्हणून जातात. तिथे हळूहळू cult चे रहस्य आपल्यासमोर येते.
Sci-fi - thriller.
बेन्सन - मूरहेड ह्या जोडीने सिनेमा लिहीलाय, भावांची भूमिका केली आहे, दिग्दर्शित आणि चित्रित केलाय.
सिनेमा नोलनायटीस रोगाने ग्रस्त आहे असे वाटले. सिनेमा प्रेक्षकांना कळावा म्हणून आणखी थोडे प्रयत्न करावेत असे वाटले. म्हणजे, सगळे ताटात वाढून द्यावे असे नाही. काही सिनेमे अतिशय कमी माहिती देतात तरीही भारी असतात. उदा - क्लोव्हर्फिल्ड. ह्यात कोण राक्षस आहे, कुठून आला आहे हे मुख्य पात्रांना माहीत नसते, पण राक्षस आहे आणि त्याच्यापासून स्वतः ला वाचवायचे आहे हा उद्देश आपल्याला समजतो.
ह्या सिनेमात मुख्य पात्रे शेवटी शेवटी सगळे समजले आहे अश्या आविर्भावात वावरतात, पण मला काही समजत नव्हते. हा प्रॉब्लेम आहे. प्रेक्षक आणि प्रमुख पात्रांनी शून्य महितीपासून सुरुवात केली. सर्व घटना प्रेक्षक आणि पात्र दोघांनी पाहिल्या. पण साक्षात्कार पात्रांना झाला असे पटकथेत लिहून जर प्रेक्षक अंधारातच राहत असतील तर काहीतरी चुकते आहे असे मी म्हणीन. आणखी थोडे exposition दिले असते तर सिनेमा परफेक्ट झाला असता. यूट्यूब वर सिनेमा समजावून सांगण्याऱ्या चॅनल ची मदत घ्यावी लागली.
अमेझॉन प्राईम वर आहे.
नोलनायटीस
नोलनायटीस
साक्षात्कार पात्रांना झाला असे पटकथेत लिहून जर प्रेक्षक अंधारातच राहत असतील तर काहीतरी चुकते आहे असे मी म्हणीन>>> हे प्रेक्षकांशी सरळसरळ चिटिंग आहे , असं होतं काही सिनेमांत.
चांगले लिहिलेयं कॉमी.
राभु, कोड नेम तिरंगा मलाही आवडला.
ॲक्शन हिरो संपवला आताच.
ॲक्शन हिरो संपवला आताच.
चांगला होता. वेगळा होता.
त्या दिबशी पाऊण तास पाहिला तेव्हा ठिकठाक वाटलेला. पुढे बघावे का नाही विचार करत होतो.
पण मग काल फेसबूक ग्रूपबर त्याचे परीक्षण बाव्हले त्यात हा चित्रपट शाहरूखने करायला हवे होते असे लिहिलेले. मग लगेच आज पाहिला.
उत्तरार्ध रोचक होता. शेवट तर फार मजेशीर वाटला. ये नया भारत है, घुस के मारेंगे हे ऐकून तर हसायलाच आले
वाळवी पहिला
वाळवी पहिला
ठीक ठाक वाटला, म्हणजे यांच्या अभिनयाचे फार कौतुक ऐकलेलं तसे काहीच वाटलं नाही
म्हणजे काही मस्त संवाद आणि टायमिंग सोडलं तर बाकी अभिनय म्हणावा असा काहीच वाटला नाही
कथा मात्र भारी ट्विस्ट घेत राहते, आणि मला जे जे वाटत होतं असं होईल ते ते होत नसल्याने अजूनच मजा आली
हा सिनेमा केवळ आणि केवळ दिग्दर्शकाचा आहे, कलाकार कोणीही असते तरी तेवढीच मजा आली असती
अगदी नवखे कोरे चेहरे असते तरीही
आज सकाळी बीटीएस : यट टू कम
आज सकाळी बीटीएस : यट टू कम द बुसान कॉन्सर्ट मुव्ही पाहिला. खूपच मजा आली. हा त्यांचा लॉकडाउन नंतरचा पहिलाच कॉन्सर्ट होता व गृप मधील जिन हा खर्याखुर्या कोरीअन आर्मीत जॉइन व्हायला जायच्या आधीचा. पूर्ण ग्रूप परत एकत्र यायला २०२५ - २०२६ होईल. व त्या पुढे
सर्वांचे एकत्र कॉन्सर्ट कधी होईल कोण जाणे व ते बघायला आपण असु कि नाही कोण जाणे म्हणून हौसेने जाउन बघितला. वयस्कर लोक्स पण आले होते त्यामुळे अगदीच कानकोंडे झाले नाही. बीटी एस फॅन्स ना आर्मी म्हणतात ही संख्येने हजर होती. सेंट्रल साइडला व्हिवीआना व कुर्ला मार्केट सिटी इथेच चित्रपट लागला आहे. व जेम तेम पाच सहा दिवस राहील त्यामुळे हा एक बकेट लिस्ट आयटेमच झालेला.
सर्व महत्वाची व वर्ल्ड फेमस गाणी पर्फॉरम केलेली आहेत. व जबरदस्त एनर्जी. साउंड , नाच वगैरे. पोरी आर्मी चा एक श्लोक आहे तो सारखा म्हणत होत्या. ठिक ठिकाणी आरोळ्या टाळ्या मॅरी मी!! घोषणा वगैरे. मला जिन जिमिन व्ही सुगा आर एम , जे होप व बच्चाजी जंगकुक सर्वच
आवडतात. पण आर एम व जिमिन फार फेवरिट. आर एम म्हणजे मला मोठा मुलगा हवा तसा आहे अगदी. रॅप मॉन्स्टर आहे पण प्रत्यक्षात साधे पण टेस्ट फुल घर, पुस्तके वाचणे, आर्ट मध्ये इंतरेस्ट युरोपात फिरणे असे गोड उद्योग करतो. ह्याचा व्ह्लॉग पण आहे. ह्याला इंग्रजी येत असल्याने गृप लीडर आहे. आर एम, सुगा व जे होप ह्यांची एक फर्स्ट क्लास फास्ट रॅप जुगलबंदी सिनेमात आहे जी मी पहिल्यांदाच बघितली.
जिमिन म्हण जे परी/ गंधर्व टा इप व्यक्तिमत्व आहे बारकी फ्रेम पण उत्तम डान्सर, आवाज व भरपूर ज्वेलरी घालणे ह्याला आव डते. हा सर्व वयाच्या बाया पुरुषांचा फेवरिट आहे. मी त्यातलीच एक म्हातारी.
शेवटाला सर्व मेंबर्स त्यांचा एक ट्रेडमार्क पर्पल कलर आहे त्याचे हुडी घालुन आले व एक दोन भावनात्मक गाणी म्हटली. संपला मामला.
एक वेगळा अविस्मरणीय अनुभव.
ह्यांची बटर, डायनामाइट बॉय विथ लव परमिशन टु डान्स व इतर गाणी युट्युब वरा आहेत. इच्छुकांनी बघावीत. सर्व पब्लिक कोरीअन थोडे बहुत समजणारे होते. व काही ठिका णी इंग्रजीत सबटायटल्स आहेत. घरबसल्या बघतोच पण कॉन्सर्ट हा वेगळा अनुभव आहे.
एक सांगायचे म्हण जे आत
एक सांगायचे म्हण जे आत गेल्यावर प्रतिक्षिप्त क्रिया असल्या सारखे दोन पॉपकॉर्न छोटे डबे, एक छोटे कोक व एक पाण्याचे बाटली घेतली. ह्याचे बिल १११० रु. झाले. तेव्हा अगदीच शॉक बसला. खरेतर गरज नव्हती. घरुन ब्रेफा करुन आलेलो. तिथे पाण्याचे फाउंटन आहे एअर्पोर्ट वर असते तसे. पण घेतले खरे. आता परत घेणार नाही. त्यात माझी पंधरा दिवसांची भाजी फळे/ एक आठवड्याची ग्रोसरी/ एक आठवडा फुल ब्रेफा व लंच कँटिन मध्ये केले तरी तितके होत नाही. मोठ्या फॅमिलीला तर अशक्यच आहे पोराबाळां सहित जाणे कारण बारके तर बिचारे हटट करणार.
त्या मुली ने कसले तरी काँबो विकायचा प्रयत्न केला पण ते तर संपलेच नसते. लूट आहे निव्वळ.
चित्रपटाचे नाव बीटी एस यट टु
चित्रपटाचे नाव बीटी एस यट टु कम इन सिनेमाज मुळे माझा सारखा गोंधळ होत होता. नक्की कधी येणार. पण यट टु कम हे गाण्याचे नाव आहे. व आपले बेस्ट मोमेंत्स आर यट टु कम असा त्याचा अर्थ आहे हे कळले. कॉन्सर्ट मुव्ही आव्डत असतील तर बघा. फार पूर्वी एटीज मध्ये एबा द मुव्ही बघितली होती. तेव्हा ते रेनिन्ग स्टारस होते व सर्व प्रसिद्ध गाणी त्या सिनेमात घातली होती.
banshees of inisherin
banshees of inisherin ऑस्करसाठी जाहीर झाल्यावर पुन्हा थेटरला लागलाय. म्हणुन लगबगीने जाऊन पाहिला.
मस्त आहे सिनेमा. आयर्लंड सुंदर दिसते. दोन्ही मुख्य पात्रांची कामं ए-वन. वेगळीच कथा आहे. कल्पनाच वेगळी आहे सिनेमाची जी लगेच कळते. “एकाला दुसर्याची मैत्री कालपर्यंत हवी होती पण आजपासून नकोय“ .. इतकंच. कारण हळुहळु कळतं, पण त्यावर मस्त फुलवलाय सिनेमा. पुढे काय होणार वाटत रहाते.
आता शामलन् चा “नॉक ऑन द कॅबिन“ पहायचाय.
banshees खरच मस्त आहे.
banshees खरच मस्त आहे.
द मेन्यु पाहीला. कै च्या कै
द मेन्यु पाहीला. कै च्या कै वाटला. फारच रक्तपात.
फुरसत ही ईशान खट्टरची, विशाल
फुरसत ही ईशान खट्टरची, विशाल भारद्वाज दिग्दर्शित शॉर्ट म्यूझिकल फिल्म बघितली. ही यूट्यूबवर जाहिरात म्हणून लागली होती, अनेकदा स्किप केली होती पण एकदाची बघितली, आवडली, वेगळी आहे. गुलजारची गाणी आहेत. पूर्ण फिल्म आयफोन प्रो फोर्टीन वर शूट केली आहे, ज्याचं कौतुक टीम कूकने केलं.
फुरसत इथे बघा.
https://youtu.be/f1VEks-QQ4Y
टिम कुकने केलेले कौतुक इथं बघा.
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/new-updates/apple-...
राभु, कोड नेम तिरंगा मलाही
राभु, कोड नेम तिरंगा मलाही आवडला.
Submitted by अस्मिता. on 4 February, 2023 - 19:17 >>> मस्तच.
फुरसत - इशान खट्टर इतक्यात कशात तरी दिसलाय ना ? बघेन नक्की. शॉर्ट फिल्म्स चांगल्या वाटतात.
काल थँक गॉड पाहिला. सिद्धार्थ मल्होत्रा आता सवयीचा झालाय. रणवीर सिंग पण आधी अजिबात आवडत नव्हता. मूव्ही काही खास नाही. पण आपल्या धावपळीच्या जगात आपल्याला मिळालेलं आयुष्य, जगण्याचा एक चान्स किती महत्वाचा आहे याची जाणिव करून देणारी टकटक वाटली. यापेक्षा चांगले सिनेमे असताना नेमका हाच पहावा हाच योग असेल त्यामागे
ब्लॅक अॅडम पाहिला.
ब्लॅक अॅडम पाहिला. नेहमीच्या सुपर हिरो पिक्चर्स पेक्षा थोडा वेगळा आहे पण थोडाच वेगळा आहे फार नाही. नेहमी प्रमाणे रॉक चांगले काम करतो पण मला मात्र अजूनही पियर्स ब्रॉस्ननच आवडतो. त्याने फेटचे काम मस्त झाले आहे. काही वेळेस तर मला तो डॉ. स्ट्रेंजपेक्षा जास्ती चांगला वाटतो. हे युनिव्हर्स जरा जास्ती चांगले एक्स्प्लोअर करायला हवे होते. ब्लॅक अॅडम आणि जस्टीस लिगची मारामारी पुढे आली तर भन्नाट होईल.
ब्लॅक अॅडम आणि जस्टीस लिगची
ब्लॅक अॅडम आणि जस्टीस लिगची मारामारी पुढे आली तर भन्नाट होईल. >>>
हे होणार नाही.
DC आणि वॉर्नर ब्रदर्स ने रॉक आणि जस्टीस लीग ची जुनी कास्ट (कॅव्हिल, गडोत इत्यादी) यांचे सगळे प्लॅन सिनेमे कॅन्सल केले आहेत आणि ते परत या रोल मध्ये असतील का याची खात्री नाही.
आता सुत्र जेम्स गन (गार्डिअन्स ऑफ गॅलॅक्सि / सुसाईड स्क्वाड चा दिगदर्शक) च्या हातात आहेत आणि त्याने परत शून्यापासून सुरुवात करायचा निर्णय घेतला आहे.
रेडी ऑर नॉट (२०१९) पाहिला.
रेडी ऑर नॉट (२०१९) पाहिला. एकदम धमाल सिनेमा आहे, wildly, wildly, entertaining.
ग्रेसचे, अलेक्स ला डोमास, तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न होते. अलेक्स तिला त्याची फॅमिली कशी विचित्र आहे ह्याबद्दल सांगत असतो, पण पूर्ण सत्य त्याने सांगितले नसते. ला डोमास कुटुंब बैठ्या खेळांच्या प्रसिद्ध कंपनीचे मालक असते. आणि, त्यांच्या कुटुंबात एक जुनी प्रथा असते - कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचे लग्न झाल्यावर नवीन वर/वधू ने लग्नाच्या रात्री एक खेळ खेळायचा असतो. त्यांच्या कुटुंबावर वरदहस्त ठेवणाऱ्या मिस्टर ल बेल ह्या व्यक्तीने त्यांना एक बॉक्स दिला असतो. त्या बॉक्समधून ज्या खेळाचा पत्ता निघेल तो खेळ खेळला जाईल.त्यात चेस, चेकर्स इत्यादी निरागस आणि सर्वसाधारण खेळ सुद्धा असतात. पण, त्यातला सर्वात धोकादायक खेळ असतो हाईड अँड सिक.
एकदम ब्रूटल सिनेमा, श्वास रोखून बघत राहिलो. मध्ये मध्ये संवाद लेखन थोडे पाणचट वाटले, पण एकंदर पटकथा मस्त आहे.
ग्रेसचे पात्र अतिशय आवडले. समारा व्हिविंग अभिनेत्रीच्या प्रेमात पडलो आहे.
Disney hotstar वर आहे.
हो हा सिनेमा मलाही आवडला होता
हो हा सिनेमा मलाही आवडला होता.
ॲक्शन हीरो बघायला घेतला.
ॲक्शन हीरो बघायला घेतला. काहीच्या काहीच्या काहीहीहीहीही आहे! पूर्ण बघवला नाही.
ॲक्शन हीरो पाहिला. अ आणि अ
ॲक्शन हीरो पाहिला. अ आणि अ ठासून भरलाय पण तरी मजा आली कारण अॅक्टींग जबरदस्त लेव्हल ची
आ.खु. कोणताही रोल मस्त च करतो.
प्राईम वर ब्लॅक बॉक्स बघितली खूप म्हणजे खूप च एंगेजींग आहे. एखाद्याला ४-६ वर्षांची चिमुरडी लेक असेल तर अजून च भावेल. अमेझिंग संकल्पना आहे.
अॅक्शन हिरो लै आवडला !! एक
अॅक्शन हिरो लै आवडला !! एक नंबर डोकं लावून बनवलेला पिक्चर आहे. बहुतेक देशातल्या लोकांना त्यातली ब्लॅक कॉमेडी कळली नाही किंवा त्यांची कळून घ्यायची इच्च्छा नसेल अर्णव वगैरेंची खिल्ली उडवलेली पाहून फार मजा आली. सध्याच्या काळाला अगदीच समर्पक.
बर्याच दिवसांनी मस्त डायलॉग्ज ऐकायला मिळाले. पठाणचे पण आवडले होते पण ते मुरलेल्या टायरवाल्याने लिहीले होते त्यामुळे ते चांगले असणारच होते. अॅक्शन हिरो सुखद धक्का होता.
रेडी ऑर नॉट थिएटर मध्येच पाहिला होता आणि आवडला होता.
धनि +1
धनि +1
मलाही चिमटे घेणाराच वाटलेला.
अॅक्शन हिरो आवडलेले / न
अॅक्शन हिरो आवडलेले / न आवडलेले संख्येने सारखे झाल्याने कुणी तरी नवीन धागा काढावा ही नर्म सूजना.
काल फन रल सिनेमा पाहिला.
काल फन रल सिनेमा पाहिला. प्राइम वर. मस्त आहे
Pages