चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

The menu बघितला. एकंदर आवडला, पण फर्स्ट हाफ सुपर्ब आहे, एकदम भारी उपहास विनोदांनी भरलेला आहे. सेकंड हाफ त्यामानाने फिका वाटला. पण सिनेमा बघण्यासारखा आहे. >>+१ . नंतर नंतर पारच गंडलाय. चांअग्ल्या अ‍ॅ़टींगमूळे टीकून राहतो. काँस्पेट इंटरेस्टींग आहे एव्हढेमात्र नक्की.

पहिल्या गाण्यात ताडपत्री सारख्या लालड्रेसमधे कटरिना फार वाईट दिसली आहे. >>> Lol

नेटफ्लिक्सवर एमी अॅडम्सचा 'लीप ईयर' पुन्हा दिसतोयं. हलकाफुलका रोमँटिक कॉमेडी आहे. जरूर बघा. मी अनेकवेळा बघितलायं. >> याची क्लिप काल पाहिली नेफि ब्राउज करताना. त्यातला तो हीरो ओळखीचा वाटला पण नक्की आठवेना. मग नावावरून शोधला तर हा तर डाउनटन अ‍ॅबी मधे नंतर आलेला हेन्री टॅलबॉट! सतत बॉलीवूडचे पिक्चर पाहात असल्याने मी ही त्याला केवळ मिशा असल्याने या क्लिप मधे ओळखले नाही Happy

त्याला केवळ मिशा असल्याने या क्लिप मधे ओळखले नाही >>>>
जुन्या हिंदी व्हिलन्सचा दुर्मिळ सद्गुण आहे हा, जो आजकाल जवळजवळ नामशेष झालायं, फा Lol
हो तोच मॅथ्यू गूड. तिथे अपटाईट चकाचक लूक आहे. लीप ईयरमधे सार्कास्टिक , मेसी, आयरीश हॉटेल ओनर आहे.

लोल. ते मूळ गाणे अजून मी पाहिले/ऐकलेच नाही. त्याबद्दलच्या चर्चा आणि स्पूफ्सच पाहिलेत Happy

जुन्या हिंदी व्हिलन्सचा दुर्मिळ सद्गुण आहे हा, जो आजकाल जवळजवळ नामशेष झालायं, फा >> Happy हो
मला आधी तो जेम्स फ्रँको वाटला होता. तो ही असे रोल्स करतो कधी कधी.

फोनभुत पाहिला...
अस्मिता च्या पुर्ण पोश्टीला अनुमोदन Lol

LION पाहिला प्राईमवर..इन्सपायर्ड बाय ट्रु स्टोरी..
चांगला आहे सिनेमा.

Beast पाहिला प्राईमवर.
ठिक आहे..

सतत बॉलीवूडचे पिक्चर पाहात असल्याने मी ही त्याला केवळ मिशा असल्याने या क्लिप मधे ओळखले नाही
फारएन्ड >>> Biggrin

HIT - the second cases तेलुगू .प्राईमवर.
वेगवान कथानक... >>>> आवडला. शेवटी शेवटी heroic झालायं , पण मस्त आहे. तो अभिनेता मला आवडतो.
गूढाचारी , soldier , Evaru भारी handsome आहे तो.
त्या hangover मध्ये Evaru परत पाहिला .

Massab हिंदी बघितला प्राईमवर..चांगला आहे..युपी च्या शैक्षणिक पध्दतीवर.सकारात्मक सिनेमा..

Parole तमिळ प्राईमवर.
नायक (खलनायक?) मर्डर केसमधे जेलमध्ये असताना त्याची आई वारते..अंतिम संस्कार करायला त्याला पैरोलवर बाहेर काढण्यासाठी त्याच्या लहान भावाचे प्रयत्न.. डार्क सिनेमा, थ्रीलर, भरपूर वायोलंस..

Lense तमिळ प्राईमवर.
सायबरक्राईम रिलेटेट.. चांगला आहे.

@स्वस्ति..evaru मस्त आहे..तो हिरो चांगला अभिनय करतो.. स्पेशली खलनायक कैरेक्टर..आठवा बाहुबलीमधे..

कैरेक्टर >>> हे ए च्या ऐवजी ऐ झालेले अनेकदा दिसते. बहुतांश व्हॉट्सअ‍ॅप वर. हे एखाद्या एडिटर मुळे होते का? उदा: नोकरी शब्द अनेकदा नौकरी असा लिहीलेला दिसतो मराठीमधे सुद्धा Happy

चंद्र उपलब्ध नाही काही किबोर्डांवर, माझ्याकडे पण बिनटिंबाचा चंद्र नव्हता. मगं ॲपलचे ॲंपल व्हायचे. लोक ए वर चंद्र देतात. ते कसं वाचावं कळतं नाही. 'ऍ क्या बोलती तू टाईप' वाचते. ॲप तर नेहमीच एप असं वाचते. Read between the lines ने खूप मजा येते. Wink

हो तर, एकसो सोला टिंबाच्या चंद्राच्या राती काढल्या की आपोआपच अपडेट होऊन बिनटिंबाचा चंद्र मिळतो. नील आर्मस्ट्राँगला काय वाटलं असेल तसं वाटतं मगं Lol

मृ Proud

काल evaana बघितला प्राईमवर..इंडोनेशियन मुव्ही बहुतेक... हॉरर,स्केअरी...रामसे बंधू, झी हॉरर शो टाईप आहे..नका बघू.

इमरान हाश्मी चा चेहरे पाहिला . आवडला.
गुन्हा कसा प्रश्नोत्तरातून उलगडतो ते interesting आहे.
Evidance and conclusion based on it , जरा योगायोग वगैरे वाटलं.
एवढा मोठ्ठा बंगला , बर्फ , रिया , इमरान सगळे आवडले.

इमरान हाश्मी चा चेहरे >>> अमिताभ बच्चनची काय अवस्था केलीय !
उदय चोप्राचा धूम / सुजीतकुमारचा आराधना किंवा डिंपलचा टेनेट / ब्रह्मास्त्र पाहिला असं ऐकताना जसं वाटेल तसं वाटतंय...

'उदय चोप्रा चा धूम' पूर्ण पणे व्हॅलीड वाक्य आहे हां.त्याने धमाल केलीय धूम 1 आणि 2 मध्ये.
त्याचे सर्वात चांगले काम धूम मध्येच आहे.

'उदय चोप्रा चा धूम' पूर्ण पणे व्हॅलीड वाक्य आहे हां. >>> सहमत. उदय चोप्रामुळेच जॉन अब्राहम, हृतिक रोशन, आमीर खान यांचे ढासळते करीअर किनार्‍याला लागले. धूम सिरीजच्या चित्रपटांनी जेव्हढा धंदा केला तेव्हढा या स्टार्सच्या कुठल्याही चित्रपटाने त्याआधी केलेला नव्हता. नंतर त्यांनी उदय चोप्राचे आभार मानले नाहीत. ज्याचा त्याचा स्वभाव !

महागुरू सचिन यांच्या शोलेमुळेही अनेकांचे करीअर घडले होते.

हो, उदय चोप्राचा करीअर बेस्ट परफॉर्मन्स आहे धूममध्ये. (करीअर वगैरे शब्द जरा जास्त आहे त्यासाठी ते एक ठिक) अभिषेक बच्चनही मस्त वाटतो धूममध्ये. तसेच दुसऱ्या भागात हृतिक सुद्धा स्टायलिश वाटतो. आमीरचा धूम बघायची ईच्छाच झाली नाही आयुष्यात...

पण ....
धूम म्हटले की तो जॉनचाच. धूम म्हटले की डोक्यात त्याची ती टॅनॅनॅना नॅना नॅनानॅना म्युजिक वर सुसाट सुटलेला जॉनच आठवतो... बदाम बदाम बदाम!

ऋत्विक रोशनचा कभी खुशी कभी गम असे सहसा म्हटले जात नाही कारण त्यात अमिताभ बच्चन , जया भागदौडी, जिब्रान खान, मालविका राज, कविश मुजुमदार आणि रानी मूर्खजी पण होते.

सुसाट सुटलेला जॉनच आठवतो... बदाम बदाम बदाम! >>> अशा प्रकारच्या हक्कांसाठी आम्ही सर्व जण प्राणात प्राण असेपर्यंत लढा देऊ.
५ सप्टेंबर २०१८ रोजी न्यायालयाने अशा सर्वांना जगण्याचा हक्क दिलेला आहे. (बाळ कुरतडकर यांच्या आवाजात) त्यांना आपले म्हणा !

त्यात अमिताभ बच्चन , जया भागदौडी, जिब्रान खान, मालविका राज, कविश मुजुमदार आणि रानी मूर्खजी पण होते.
>>>>

जया भादुरी, वा बच्चन सुद्धा चालेल. राणी मुखर्जी ..

Pages