बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
ही आठवण याहया खान आणि १,०००
ही आठवण याहया खान आणि १,००० रुपयाच्या मोटरसायकलच्या संदर्भात आहे.
हे तेच फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, जे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार होते, जेव्हा ते दिवंगत झाले तेव्हा भारतीय सेना त्यांना विसरली. सर्वोच्च अश्या ५ स्टारच्या या ऑफिसरच्या अंत्यविधीला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, तिन्ही दलांचे (भूदल, नौदल, वायुदल) चीफ ऑफ स्टाफ, राज्याचे मुख्यमंत्री कुणीही हजर न्हवते आणि ज्यांच्यासाठी राष्ट्रीय दुखवटापण केला गेला नाही.
खरंय.
खरंय.
उ.बो. लेख वाचला. आवडला.
उ.बो. लेख वाचला. आवडला.
पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधींच्या चरित्रातही इंदिरा गांधी आणि माणेकशांमधले काही चांगलेच लक्षात राहण्यासारखे संवाद आहेत.
मला आठवणारी एक खूप लहानपणी
मला आठवणारी एक खूप लहानपणी वाचलेली बातमी - पाकचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी.
आणि एक योगायोग - त्या घटनेच्या एक आठवडा अगोदर शनिवारी सकाळी शाळेत जाताना रस्त्यात लागणाऱ्या एका मोकळ्या मैदानावरच्या एकुलत्या एका पिंपळाच्या झाडाला आत्महत्या केलेल्या कोणा एका अनामिक इसमाचा देह लटकताना पाहिला होता. त्यानंतर अनेक वर्षं त्या रस्त्यावरून जाताना भिती वाटे.
होय, भुट्टो यांच्या फाशीची
होय, भुट्टो यांच्या फाशीची घटना मलाही आठवते. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या दिवसापूर्वी जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी ती फाशी रद्द करावी अशी पाकिस्तानला विनंती केली होती.
फाशी देण्याच्या दिवशी जेव्हा दोन रक्षक भुट्टोना त्या स्तंभाकडे घेऊन चालले होते तेव्हा मात्र भुट्टोचे सगळे अवसान गळून पडले होते. त्यांनी अगदी लहान मुलाप्रमाणे हातवारे करून त्या रक्षकांच्या हातून सुटून जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
असे तपशीलवार वर्णन वाचल्याचे आठवते
२६/१२ /२००४
२६/१२ /२००४
रोजी घडलेल्या एका दुःखद घटनेची आठवण इथे लिहीतो (असा वेगळा धागा नसल्यामुळे).
तेव्हा आलेल्या जबरदस्त सुनामीमुळे भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये हाहाकार झाला होता. कित्येक नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये माझ्या एका डॉक्टर वर्गमित्राचा समावेश होता. ते सहा जण एकत्रित अंदमान निकोबार सहलीला गेले होते. सुनामीमुळे ते राहत असलेले संपूर्ण बेटच उद्ध्वस्त झाले होते.
त्यापैकी कोणाचाही मृतदेह मिळू शकला नाही.
आदरांजली.
“यात्रीगण कृपया ध्यान दें!'
“यात्रीगण कृपया ध्यान दें!'
.. रेल्वे स्टेशनवर ऐकू येणारा हा आवाज कोणाचा?
हा गोड आवाज सरला चौधरी यांचा आहे.
त्यांनी ही उद्घोषणा प्रथम १९८२ मध्ये केली.
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/l...
हे एक अजबच...
हे एक अजबच...
आपल्यातील बहुतेक सर्वांना प्रिय असणारा सामोसा हा खाद्यपदार्थ !
सोमालियात 2011 पासून हा पदार्थ बनवणे, खाणे अथवा बाहेरून आणणे या सर्वांवर बंदी आहे !
बंदीचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद आहे.
तिथल्या मूलतत्त्ववाद्यांच्या मतानुसार सामोशाचा त्रिकोणी आकार म्हणजे "ख्रिश्चन त्रिमूर्ती " शी साम्य. म्हणून ही बंदी म्हणे..
https://www.news18.com/buzz/why-samosas-are-banned-in-this-african-count...
मला वरील माहिती शोधण्यास एका
मला वरील माहिती शोधण्यास एका इंग्लिश शब्दकोड्याने उद्युक्त केले.
"सामोशावर बंदी असणारा देश " असे शोधसूत्र होते !
समोशावर.
.
धन्यवाद !
धन्यवाद !
मी टंकन करताना आळस केला होता
बहुतेक कोणी हरकत घेणार नाही असे मनात म्हटले होते !
मी मायबोलीच्या तीन दिवाळी
मी मायबोलीच्या तीन दिवाळी अंकांसाठी मुद्रित शोधक चमूत होतो. त्यामुळे शुद्धलेखनाचे नियम डोक्यात घट्ट बसले आहेत. तुमच्या लेखनात पहिल्यांदाच असं काही दिसलं. तुम्ही बोलून मजकूर उतरवता ना?
होय, बोलून उतरवतो. त्यामुळे
होय, बोलून उतरवतो. त्यामुळे असे होते की मूळ शब्दच उच्चारला की तो योग्य उमटतो. प्रत्ययासहित म्हटला की तिथे झालीच गडबड !
टंकन कष्ट कमी व्हावेत म्हणून मी बोल लेखन सुविधेकडे वळलो. त्याचे संपादन करताना काही वेळेस कंटाळा येतो आहे खरा !
जोडाक्षर अधिक प्रत्यय असा शब्द उच्चारला की मग तिथे फारच गोंधळ झालेला दिसतो.. असो
त्यातून नुकत्याच घेतलेल्या नव्या लॅपटॉपमध्ये माझी इच्छा नसतानाही विंडोज इलेवन येऊन पडलेले आहे. त्यातून मराठी टंकनाच्या काही अडचणी उद्भवत आहेत.
टेन छान होते.
आज माजी खासदार आणि पत्रकार-
माजी खासदार आणि पत्रकार- लेखक खुशवंत सिंग यांची आज जयंती आहे.
हा माणूस एकूणच अफलातून होता. त्यांच्या पेन चोरण्याच्या सवयीबद्दलचा किस्सा आणि अन्य काही मजेशीर येथे आहे:
https://www.esakal.com/desh/khushwant-singh-khushwant-singh-birth-annive...
115 वर्ष जुनी रुबाबदार बाईक,
115 वर्ष जुनी रुबाबदार बाईक, तब्बल 5.91 कोटींना विकली गेली.!
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...
काल सहज फेरफटका मारताना
काल सहज फेरफटका मारताना घराजवळच हे दृश्य दिसले आणि एकदम मनात आले..
आजही शहरांमध्ये ही कला जिवंत आहे तर !
आणि ती भांडी वापरणारे शौकीन देखील आहेत.
शालेय अभ्यासात कल्हईतील रसायनशास्त्रावर हमखास प्रश्न असायचे.
अरे वा! तो हाताने फिरवायचा
अरे वा! तो हाताने फिरवायचा ब्लोअरही अगदी तसाच आहे, लहानपणी पाहिलेला.
>>>शालेय अभ्यासात कल्हईतील
>>>शालेय अभ्यासात कल्हईतील रसायनशास्त्रावर >>
नवसागर (अमोनियम क्लोराईड) चा नेहमी उल्लेख असायचा.
आमच्या घरी "कल्हई मारणे" हा
आमच्या घरी "कल्हई मारणे" हा वाक्प्रचार प्रचलित होता.
एखादा खाद्यपदार्थ (भाजी, कालवण वगैरे) चांगला झाला तर तो पदार्थ ज्या भांड्यात शिजवलेला असायचा ते भांडे कल्हई केल्याप्रमाणे चाटून, पुसून लख्ख केले जायचे. आणि आई ते कौतुकाने बघायची.
छान वाक्प्रचार.
छान वाक्प्रचार.
तसेच "उगाच डोक्याला कल्हई नको" हा देखील वाक्प्रचार बऱ्याचदा वापरला जातो
(कलह >>> कल्हई )
मस्त कल्हईवाला. भिंतीवरची
मस्त कल्हईवाला. भिंतीवरची सुचनाही लक्षवेधी आहे. प्रत्येक शहरात ही सूचना सगळीकडे लावायला हवी.
कल्हई वर इथे इब्लीस आणि
कल्हई वर इथे इब्लीस आणि मनीमोहोर यांचे चांगले लेख आहेत.
अभिप्राय आणि माहितीसाठी
अभिप्राय आणि माहितीसाठी धन्यवाद !
भारतातील सर्वात अल्पाक्षरी
भारतातील सर्वात अल्पाक्षरी नावे (२ अक्षरी) असलेली ही दोन रेल्वे स्थानके :
१.
आणि
२.
...
रेल्वे शौकिनांनी शोधून काढलेली ही दोन नावे आहेत. याहून अधिक कोणाला सापडल्यास जरूर लिहा.
मुद्दा लक्षात घ्यावा :
नुसते गावाचे नाव दोन अक्षरी असून चालणार नाही, तर रेल्वे स्थानकाचे नाव दोन अक्षरी हवे.
बेलानगर
बेलानगर
पूर्व रेल्वेच्या या स्थानकाचे एक वैशिष्ट्य आहे .
या स्थानकाचे नाव बेला बोस (नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी) यांच्यावरून दिले गेले आहे.
एखाद्या रेल्वे स्थानकाला भारतीय नागरिक असलेल्या महिलेचे नाव देण्याची ही पहिली घटना होती.
https://www.getbengal.com/details/indias-first-railway-station-was-named...
मोबाइल संपर्काचा
मोबाइल संपर्काचा सुवर्णमहोत्सव!
३ एप्रिल १९७३. याच दिवशी न्यूयॉर्कच्या सहाव्या ‘ॲव्हेन्यू’ या अलिशान मार्गावर उभ्या असलेल्या मार्टिन कूपर यांनी साधारण एका विटेच्या आकाराच्या उपकरणाद्वारे सर्वप्रथम दूरध्वनी संपर्क केला.
https://www.loksatta.com/explained/history-of-mobile-connectivity-know-a...
सिंहासन या मराठी चित्रपटाला
सिंहासन या मराठी चित्रपटाला नुकतीच 44 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यावर बरीच चर्चा झाली आणि लेखही प्रकाशित झाले.
हा चित्रपट अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित आहे. विद्यार्थीदशेत असताना मी मुंबई दिनांक वाचली होती आणि ती खूप आवडली होती.
साधूंच्या या दोन कादंबऱ्यांबद्दल ना. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे व्यक्त केलेली टोकाची दोन मते इथे वाचता येतील :
https://www.loksatta.com/manoranjan/sinhasan-movie-sharad-pawar-and-yash...
रोचक माहिती.
रोचक माहिती.
नवापूर रेल्वे स्थानक
नवापूर रेल्वे स्थानक
नवापूर रेल्वे स्थानकावर एक बेंच देखील आहे, त्यातील अर्धा महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहे. या बाकावर बसणाऱ्यांनी आपण कोणत्या भागात बसलो आहोत, याचे भान ठेवावे लागते....
दोन राज्यांमध्ये विभागलेल्या या स्टेशनची तिकीट खिडकी महाराष्ट्रात येते, तर स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतात. इतकेच नाही तर या स्थानकावर चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा केल्या जातात.
https://www.mhlive24.news/half-in-maharashtra-and-half-in-gujarat/
या बाकावर बसणाऱ्यांनी आपण
या बाकावर बसणाऱ्यांनी आपण कोणत्या भागात बसलो आहोत, याचे भान ठेवावे लागते.... >>>>>> म्हणजे?
आणि का भान ठेवावे लागते?
Pages