Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फा आणि हर्पा - सही.
फा आणि हर्पा - सही.
कुमारी बघितला. चांगला आहे, पण
कुमारी बघितला. चांगला आहे, पण हस्तर इतका परिणामकारक अजिबातच नाही. एकतर प्रचंड मोठा आहे. शेवटी क्लायमॅक्सला भिती वगैरे नाही वाटली. संपवा एकदाचा असंच फील होतं. एकदा बघायला ठीक आहे. बॅग्राऊंड स्कोर भारी आहे. आ SSSS ए ए ए ! करतच झोपी गेलो आणि स्वतःला थोडं घाबरवलं. Happy
नवीन Submitted by अमितव on 30 November, 2022 - 22:
धन्यवाद
पुने ५२ जास्त अवघ्ड
पुने ५२ जास्त अवघ्ड नाही
https://www.maayboli.com/node/40592. वाचा
फारएण्ड, पुणे-५२ सब-टायटल्स
फारएण्ड,
पुणे-५२ सब-टायटल्स
वैचारिक मराठी चित्रपटांकरता
वैचारिक मराठी चित्रपटांकरता अर्थपूर्ण सबटायटल्स त्यांनाच लिहायला सांगितली पाहिजेत. इव्हन टायटल्सच्या वेळेस चित्रपटाचे नाव काहीही असो, त्याचा अर्थ "मध्यमवर्गीय आनंदांत मग्न असणार्यांना एक आरपार आरसा दाखवणारा चित्रपट" असा दाखवावा
>>>>
पुणे ५२ >> बघितला नाही आणि ही चर्चा वाचून बघणार ही नाही
<<त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
<<त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे Happy>>
फा,
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे
मी हा पिक्चर पाहिला नाही. पण ते बोअरींग म्हणजे नेमके कसे दाखवले असावे हा विचार आता स्वस्थ बसू देणार नाही
पुणे ५२ चर्चा वाचून "अरे,
पुणे ५२ चर्चा वाचून "अरे, हा चित्रपट आलाय आता? कोणाचा आहे बघु" म्हणून गुगल सर्च केले आणि बावन बावन करणे ही गावची म्हण (अर्थ: पश्चाताप करणे) अनुभवायला मिळाली.
पण कॉमेंट्स वरुन कल्पना आली.
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे Happy >>
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे
त्यावेळेस सबटायटल्स मधे "हे जनरली इतकं बोअरिंग नसतं" द्यायला हवे >>>
पुणे ५२ सब टायटल्स rofl
पुणे ५२ सब टायटल्स rofl
इथे सोनाली कुलकर्णी
इथे सोनाली कुलकर्णी चिमण्यांच्या घरट्याचा उल्लेख करते तो यांच्या घराच्या संदर्भात आहे
- इथे या चित्रातील विरोधाभास पाहा
- इथे या काकांनी पुस्तक वाचायला दिवा लावणे हे इथल्या "डार्क" थीमशी संबंधित आहे
- हे काका इथे गचकले म्हणजे जुना काळ संपला
आणि उगाच आपण भलतेसलते अर्थ लावत बसू नये म्हणून काही सीन्सना हे फाइन प्रिण्ट द्यावे:
- इथे गिरीश कुलकर्णी फक्त इकडून तिकडे जातोय. यात कसलाही गूढ अर्थ अभिप्रेत नाही.
>>
गुडबाय: अत्यंत घिसापिटा आणि
गुडबाय: अत्यंत घिसापिटा आणि महाबोरिंग आहे. मृत्यूवर किती तरी वेगवेगळे टेक घेऊन आत्ता पर्यंत सिनेमे बनले असतील! इतका बेकार टेक २०२२ मध्ये घेऊन का असा सिनेमा बनवलाय?
काही म्हणजे काही आवडलं नाही. का! का!! का!! ???
गुडबाय ना,
गुडबाय ना,
आताच बघतं होते, महाबोअर, रटाळ अगदी. रश्मिकाला हिंदी येत नाही की तिचे सर्व संवाद विचित्र आहेत काय माहिती. पाऊनतासात पेशंसच संपला व गुडबाय म्हटलं.
रश्मीला हिंदी बोलता येत नाही
रश्मीकाला हिंदी बोलता येत नाही हे आधी खटकत होतं. मग तीच काय ती सुसह्य होती कोणी पूर्ण बघू शकलं तर तो नकुल कोण आहे आणि तो इतके दिवस फोन का उचलत नाही तेवढं सांगा की सुडोमि.
आता कला बघतोय.
गुडबाय ... थँक्स आधीच
गुडबाय ... थँक्स आधीच कळवल्याबद्दल.
आपडी थापडी नावाचा मराठी पिक्चर कधी आला कधी गेला कळलंच नाही. युट्यूबवर राजस्थानी रिअॅक्शन बघताना कळलं. श्रेयस तळपदेचे सिनेमे छान असतात. आधी प्राईम व्हिडीओ वर इंग्रजी स्पेलिंग देऊन शोधलं तर भलतेच दोन दाखवले. मग एक एक करत शोधलं. कुठेच नाही. शेवटी ओटीटी प्ले ची मदत घेतली तर त्यांनी प्राईम व्हिडीओवर शोधून दिला.
दोन मिनिट पाहिली सुरूवात. हलका फुलका दिसतोय. आज निवांत बघायची सोय झाली. नाही आवडला तर कळवीन.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5Xqp1Bip7fs
याचे व्हिडीओज बघणे ही पण करमणूक असते. बॉलीवूडचा भयंकर राग आहे. बॉयकॉट करा म्हणून मोहिमा चालवतो. सध्या मराठी पिक्चर्स वर फिदा आहे. त्याला मराठीतला कुणी सोम्या गोम्या पण खूप महान वाटतो. बॉलीवूडचा नाही ना ? मग ग्रेट ! मज्जा येते.
नकुलला राहू द्या तिकडंच,
अमित,
नकुलला राहू द्या तिकडंच, गोमुत्राला 'गाय का पेशाब' म्हणाले तिथे 'आता माझी सटकली' झाले व ताबडतोब बंद केला. कलाचे ट्रेलर आवडले होते. बघणारे.
राभु,
आपडी थापडी नावाचा मराठी पिक्चर कधी आला कधी गेला कळलंच नाही. >>> मलाही हे वाचून कळला.
आज 'जरब' दिसला, पण बघायची इच्छाही होत नाहीये.
गोदावरी अतिशय आवडला. पण शो
गोदावरी अतिशय आवडला. पण शो अगदीच कमी, आता आणखी कमी झाले असतील. तरी वेळ काढून बघावा असा सिनेमा आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या माणसांची गोष्ट. त्या परिसराचं उत्तम चित्रण आहेच. पण चित्रपट त्या माणसांच्या इतका मर्यादित न राहता आपल्यालाही विचार करायला लावणारा आहे.
जितेंद्र जोशीने अमेझिंग काम केलं आहे. He has hit this one out of the park! आतून धुमसणारा पण प्राप्त परिस्थितीतून जमेल तसं सोल्यूशन काढू पाहणारा निशिकांत त्याने संयतपणे साकार केला आहे.
विक्रम गोखलेंचा शेवटचा मुव्ही. एखादाच संवाद असला तरी केवळ चेहऱ्यावरील हावभावांवरून ते बरंच काही सांगून जातात. असे अजून रोल्स करायला त्यांनी आणखी जगायला हवं होतं.
नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे सगळ्यांची कामं मस्त झाली आहेत.
संजय मोने या माणसानेही कमाल केली आहे. इतकं चांगलं काम हे लोक किती सहज करून जातात.
दोन सीन्स विशेष लक्षात राहतात- प्रियदर्शन जाधव आपण ब्राम्हण नसल्यामुळे आपल्याला धार्मिक विधी करण्याचा अधिकार नसल्याचं जितेंद्रला सांगतो तो सीन. आणि सगळ्यात बेस्ट सीन- वरच्या मजल्यावरील खोलीत संजय मोने व जितेंद्र या बापलेकांचा होणारा संवाद. या एका सीनसाठी मी हा चित्रपट अनेकदा पाहायला तयार आहे.
चित्रपट थोडा आर्ट फिल्मच्या वळणाने जाणारा आहे त्यामुळे थोडा संथ वाटू शकतो. पण थोडा पेशन्स ठेवून बघण्यासारखा आहे
परंपरांचा प्रवाह, श्रद्धा-अंधश्रद्धा यातील फरक, काळानुसार होणारे बदल व त्याच्याशी adjust करताना होणारी कसरत, वैयक्तिक इच्छा-आकांक्षा आणि जबाबदाऱ्या यातलं द्वंद्व, अचानक आयुष्यात समोर येणारे existential प्रश्न व त्याच्याशी deal करावं लागणं- यावर इतकं परिपूर्ण भाष्य करणारा दुसरा चित्रपट आठवत नाही.
कला (Qala) बघितला.
कला (Qala) बघितला. नितांतसुंदर आहे!
कथा, पटकथा, संगीत, चित्रीकरण, लोकेशन्स तो काळ... वेगळाच चित्रपट आहे. अनेकोनेक अनुत्तरित प्रश्न डोक्यात राहून चित्रपट संपला की काहीतरी परिपूर्ण बघितल्याचा भास होत राहिलेला आवडतो मला. ते खूप दिवसांनी झालं. आपल्याकडे नेफ्लिवर तरी असेच चित्रपट होत राहोत.
आणि एकच... 'उड जाएगा हंस अकेला' ची चाल फार आवडली. कुमारांची आवडतेच पण ही सुद्धा अनवट आणि अन प्रेडिक्टेबल आहे.
थॅम्क्यु कलाबद्दल
थॅम्क्यु कलाबद्दल सांगितल्याबद्दल. पहावा की नाही विचार चालु होता कारण हिंदी नवे सिनेमे पहायचे बंद केलेत.
कला (Qala) बघितला.
कला (Qala) बघितला. नितांतसुंदर आहे! >>>>>>>>>खरंच खूप छान आहे।
आपडी थापडी नका बघू कुणी
आपडी थापडी नका बघू कुणी
नकुल कोण आहे आणि तो इतके दिवस
नकुल कोण आहे आणि तो इतके दिवस फोन का उचलत नाही तेवढं सांगा की सुडोमि. << नकुल कुठेतरी ट्रेकिंग ला गेलेला अस्तो म्हणुन फोन लागत नाही. तो ४था मुलगा. त्यातला सरदारजी अडॉप्टेड असतो. पण नकुल च कळलं नाही. टीव्ही वर येताजाता बघितला त्यामुळे काही गोष्टी मिस झाल्यात.. आता तु डोळे मिटायला हरकत नाही हाहा...
कला - याचा आज पेपरमध्येही
कला - याचा आज पेपरमध्येही चांगला रिव्ह्यू आला आहे.
आपडी थापडी नका बघू कुणी >>>
आपडी थापडी नका बघू कुणी >>>>बोअर आहे स्लो मुवि .
आपडी थपडी
आपडी थपडी
छोटीशीच गोष्ट खूप फुलवण्याचा प्रयत्न केलाय.
बोअर वाटला बघताना.
Black panther: The Wakanda
Black panther: The Wakanda forever
थिएटरमध्ये बघितला. अतिशय अप्रतिम चित्रपट, नक्की बघा. जुन्या ब्लॅक पॅन्थरला सुरेख व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तो खरोखरच कॅन्सरने अकाली गेल्याने हे फार लागलं/पोचलं मला. शुरीचा दादा व राणीचा मुलगा म्हणून त्या दोघी जे आपापल्या परीने क्लोजर मिळवायचा प्रयत्न करतात ते बघताना भावूक व्हायला होतं. त्यांच्या पद्धतीने केलेले अंत्यसंस्कार फार भावस्पर्शी वाटले. जे काय स्वाहिली -आफ्रिकन प्रेरित दाखवले आहे, ते मला अतिशय सुंदर वाटलंय. स्त्री-प्रधान कथा आहे व इतक्या ग्रेसफुली व पावरफुली सादर केलीये, तरीही सहज वाटते. नेहमीचं सायफाय छानच पण भावाबहिणीचं, आईमुलीचं नातं , सगळीच नाती भावभावनांचे आविष्कार अतिशय सुंदर व वरचढ. अडीच तासांचा सिनेमा आहे, तरीही कुठेही कंटाळवाणा होत नाही.
धन्यवाद व्हाईट हॅट, गोदावरी
धन्यवाद व्हाईट हॅट, गोदावरी ओटीटीवर यायची वाट बघतेय.
अनेकोनेक अनुत्तरित प्रश्न डोक्यात राहून चित्रपट संपला की काहीतरी परिपूर्ण बघितल्याचा भास होत राहिलेला आवडतो मला. >>>हे आवडलं.
'उड जायेगा' तर आवडतंच.
After the Sunset धूम च्या आधी
After the Sunset धूम च्या आधी आलाय कि नंतर ? यातला डिटेक्टिव्ह तर अभिषेक बच्चनच वाटतोय. पीअर्स ब्रॉस्नन ऋत्विक की जॉन हे ठरवतोय.
Pages