४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

६ जानेवारीला केंद्र सरकारच्या इमारतींच्या रक्षणार्थ जास्त कुमक मागवा वगैरे संबंधित अधिकार्याची विनंती पेलोसी बाईनी धुडकावली होती >>> या सगळ्या पुंगळ्या कधीच निकाली निघाल्या आहेत. हे म्हणजे चोराने मालकालाच "तुम्ही तेथेच असलेला चाकू का माझ्याविरूद्ध उगारला नाहीत" म्हणण्यासारखे आहे. पेलोसीने बोलावले होते का पब्लिकला? ट्रम्प तेव्हा विद्यमान अध्यक्ष होता - आणि निवडणूक हरल्यावरही अजून बेकायदेशीररीत्या तसाच राहू पाहात होता. त्याला हे रोखण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. म्हणे काचा फोडायला गेले होते लोक. स्वतःच्याच लोकांना उल्लू बनवून पुन्हा त्यांनाच "अंडर द बस" टाकणे याला काय म्हणतात माहीत नाही, पण जे काही म्हणतात ते चांगले नाही हे नक्की. म्हणे शांततापूर्वक आंदोलन! शस्त्रे वगैरे जमा केली गेली होती. ट्रम्पचेच साथीदार त्यात होते. सगळे "फिफ्थ" घेउन बसलेत. सर्वांना माहीत होते नक्की काय होणार आहे. गाढव पळाले म्हणून पुन्हा ब्रह्मचर्याचे क्लेम्स आहेत हे.

लोकांच्या डोक्यात वाट्टेल त्या कॉन्स्पिरसीज भरल्यात म्हणून लोकांना ६ जाने. बद्दल कमी रस आहे. कारण त्यांना जेन्युइनली असे वाटते की हा सगळा उद्योग लोकशाही आणि अमेरिका वाचवण्याकरता केला गेला होता. मला राग त्या लोकांपेक्षा त्यांच्या कानात हे भरवून नामानिराळे राहणार्‍यांचा आहे. मार्जोरी टेलर ग्रीन म्हणते ती म्हणे याची विक्टिम होती. त्याआधी तिनेच अनेक महिने लोकांना फितवले.

डेमोक्रॅट लोकांनी काहीही वाईट केले तरी ट्रंप हेच करत होता म्हणून त्याचे समर्थन करायचे. थोडक्यात ट्रंप हाच मापदंड आहे >> मस्त लॉजिक आहे हे. तुम्हीच इतके दिवस समर्थन करत आहात त्याचे आणि आता १८० मधे फिरून तुम्हाला सर्वांना समान न्याय वगैरे सुचत आहे.

ट्रंप हा काही लोकांच्या रिकाम्या डोक्यात भाडे न देता रहातो आहे. >> आता हिलरी, कमला, कुख्यात मेक्सिकन लोक, बी एल एम आणि अँटिफा शेंडेच्या डोक्यात राहतात ना तसेच समजा हवे तर Wink

. डेमोक्रॅट लोकांनी काहीही वाईट केले तरी ट्रंप हेच करत होता म्हणून त्याचे समर्थन करायचे. थोडक्यात ट्रंप हाच मापदंड आहे. >> आता एक पार्टी पूर्ण तात्याला वाहून घेतलेली आहे म्हटल्यावर तो मापदंड्च काय, सगळे तोच आहे. काही दिवसांपूर्वी विचारले होते ते परत विचारतो कि तात्या २०२४ ला उभा राहणार नाही ह्याची खात्री देतोस का ?

त्याचे आणि आता १८० मधे फिरून तुम्हाला सर्वांना समान न्याय वगैरे सुचत आहे. >> ते थोडेसे मेरिक गारलँड कन्फर्मेशनसारखे आहे रे फा ... Lol

फॉक्स व न्युज्मॅक्सची फाल्तु बकवास ऐकुन ऐकुन स्वतःचा ब्रेनवॉश झालेल्यांनी व तीच बरळ इथे मायबोलीवर येउन शब्दशः ओकणार्‍यांनी असा गोड गैरसमज मुळीच करु नये की त्यांचा ब्रेनवॉश झाला आहे तसा मायबोलीवर अजुन स्वतःचा ब्रेन वापरण्याची क्षमता असणार्‍यांचाही असल्या त्यांच्या आकांडतांडवी व काइच्या काई पोस्टींनी ब्रेनवॉश होइल!

फेटरमनच्या उमेदवारीबद्दल मात्र शेंडेनक्षत्र व राजशी सहमत.स्ट्रोकमुळे त्याच्या कॉम्प्रिहेन्शन व कम्युनिकेशनच्या अ‍ॅबिलीटीवर नक्कीच परिणाम झाला आहे. अश्या उमेदवारांनी आपल्र नाव मागे घेणे रास्त आहे.

पण रिपब्लिकन पार्टीने सुद्धा या निवडणुकीत बरीचशी “ पात्रे“ उभी केली आहेत व त्यांच्याकडे त्यांना स्ट्रोक झाला आहे हाही बचाव नाही!

मुकुंद - फेटरमनला होणारा त्रास आणि त्यामुळे तो एक सिनेटर म्हणून काम करू शकेल का वगैरे कल्पना नाही. पण फॉक्स ने यामुळे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना "लायर्स" म्हणणे वगैरे फार विनोदी आहे. फॉक्स स्वतः गेली दोन वर्षे पद्धतशीररीत्या एक "बिग लाय" पसरवत आहेत. आणि एकदा त्याला उमेदवार म्हणून उभा केल्यावर त्याच्या मागे पार्टी उभी राहात आहे यातही काही आश्चर्य नाही. कारण सिनेट व हाऊस काबीज करणे हाच मुख्य उद्देश दोन्ही पार्ट्यांचा आहे यावेळेस (नेहमीच असतो पण मागच्यासारखाच यावेळेस काटाकाटी असल्याने जास्तच).

नाहीतर तिकडे हर्शेल वॉकरच्या मागे दूरदूरहून रिपब्लिक्न्स बिगविग्ज येउन सपोर्ट देउन जात आहेत आणि त्याच्या इतक्या काड्या बाहेर येउन सुद्धा "कॉन्झर्वेटिव्ह्ज" भक्त लोक माना डोलावत आहेत याचे दुसरे काय कारण असू शकते. हा हीरो आधी म्हंटला की "बाप" घरी नसणे हे अनेक मुले गुन्हेगारीत व वाईट मार्गाला लागण्याचे कारण आहे. नंतर निष्पन्न झाले की याचीच १०-१५ मुले जाईल तिकडे आहेत आणि त्यातल्या एकाही घरी हा कधी जात नाही. मग म्हंटला की हा एकदम फुल अ‍ॅबॉर्शन बॅन आणणार. नो अपवाद. लगेच दोन जणी उभ्या राहिल्या की यानेच त्यांना अ‍ॅबॉर्शन करायला पैसे दिले, इतकेच नाही तर एकीला अ‍ॅबॉर्शन करायला भाग पाडले.

तरी हा इतक्या काड्या केलेला आणि एका "रेव्हरंड"च्या विरोधात उभा असलेला उमेदवार "कॉन्झर्वेटिव्ज" ना चालतो आहे. एकच कारण. सिनेट. याच्याही मुलाखती/भाषणे बहारदार असतात. डाउनटाउन मधे एखाद्या चौकात उभे राहून ख्रिश्चॅनिटी बद्दल किंवा डूम्सडे बद्दल असंबद्ध बोलत राहणारे असतात तसे वाटते त्याचे भाषण. तो फेक पोलिस बॅज दाखवणे वगैरे तर सोडाच.

लॉरेन बोबर्ट ही एक अजून महान हस्ती. "चर्च हे राज्यघटनेची दिशा ठरवते" की असेच काहीतरी अगम्य बडबडते. मार्जोरी टेलर ग्रीन तिच्यापुढे शांत वाटेल असे ती ओरडत बोलते.

पण सर्वात force to reckon with आहे ती केरी लेक. ही बाई २०२४ मधे रनिंग मेट असेल नक्की. तीही बरीच फेकते. पण आर्टिक्युलेशन, पॉइज वगैरे फार जबरदस्त आहे.

नाहीतर तिकडे हर्शेल वॉकरच्या मागे दूरदूरहून रिपब्लिक्न्स बिगविग्ज येउन सपोर्ट देउन जात आहेत आणि त्याच्या इतक्या काड्या बाहेर येउन सुद्धा "कॉन्झर्वेटिव्ह्ज" भक्त लोक माना डोलावत आहेत याचे दुसरे काय कारण असू शकते. >> तात्या पुराणाला मान्यता देऊन झाल्यावर हर्शेल वॉकर ला कुठल्या तोंडाने नको म्हणणार असे झाले असावे रे Wink

<<<लोकांना महागाई, चलनफुगवटा, बेरोजगारी, पेट्रोल आणि उर्जेचे गगनाला भिडू घातलेले भाव, शून्य पैशात जामीन वगैरे बिनडोक योजनांमुळे अफाट वाढलेली गुन्हेगारी, चोरी, खून, बलात्कार आणि ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याची डेमो वृत्ती. बेछूट , लाखोंच्या संख्येने घुसणारे बेकायदा घुसखोर हे सगळे मुद्दे जिव्हाळ्याचे आहेत.>>>
खरे आहे. या मुळे रिपब्लिकन लोक यंदा काँग्रेस घेणार हे नक्की. पण त्यामुळे यातले काहीहि सुधारणार नाही.
कारण त्यांना टॅक्स कमी करणे या शिवाय दुसरे काही येतच नाही. हे सगळे जे होत आहे ते थांबवण्याचा त्यांचा काय प्लॅन आहे हे कुणीच सांगत नाहीत. फक्त दुसर्‍याला शिव्या देणे एव्हढेच येते त्यांना.
हे असेच चालायचे.
आपापले पैसे व तब्येत सांभाळून रहा. एव्हढेच. बाकी सर्व निरर्थक. दुसर्‍या देशांमधे काही वेगळे नाही.

फारेंड, हर्शल वॉकरचे काय घेउन बसला आहेस? याच लोकांनी तात्याला त्यांची मते दिली आहेत, जो तात्या जाहीररित्या व निर्लज्जपणे जगाला सांगतो की तो नेहमी सुंदर तरुणींच्या पु…… ग्रॅब करतो( तेही त्यांच्या मनाविरुद्ध!)

हे म्हणे फॅमीली व्हॅल्यु वाले लोक! हर्शल वॉकर सारख्या निच माणसाला मत द्यायला तयार असलेली माणसे व त्यालाच मत द्या अस त्याच्या वतीने सांगणारी माणसे मॉरली किती खालच्या थराला गेली आहेत हे दिसुन येते.

महागाइ व चलनवाढ फक्त लिबरल्स पॉलीसीमुळे झाली आहे अस म्हणणार्‍यांनी आपले डोके जरा तपासुन घ्या.

आणी मिडटर्ममधे जर डेमॉक्रेट्सनी त्यांची मेजॉरीटी घालवली तर त्यात उर बडवण्याइतके नवल काहीच नाही. अमेरिकेत इन्कंबंट प्रेसिडेंटची पार्टी बहुतेक नेहमीच मिडटर्म इलेक्शन हरते. ते कशामुळे याची यादी जाणकार लोक जाणुन आहेत. त्यामुळे लिबरल्सनी यांव केले किंवा त्यांव केले म्हणुन ते मिडटर्म हरणार असे टिव टिव करणार्‍यांनी जरा चारच वर्षांपुर्वी झालेल्या मिडटर्म इलेक्शच्या निकालाडे बघायचे कष्ट घ्या! मग त्यांची टिव टिव बंद होइल. २०१८ च्या मिडटर्ममधे तात्याच्या पार्टीने दणकुन मार खाल्ला होता! ( नेट लॉस ऑफ ४२ सिट्स इन काँग्रेस!)

सुंदर तरुणींच्या पु>>> अहो पण ते एक थोर विभूति होऊन गेले ते तर नुसते बोलण्यावर थांबले नाहीत, तर चक्क बायकोच्या पाठीमागे खुद्द व्हाइट हाउसमध्ये सुंदर तरुणीकडून ब्लो जॉ* की कायसंसं म्हणतात ते घेत असत म्हणे Lol Lol Lol
चालायचंच Biggrin
#कुसळ-मुसळ

अहो ते रामायण त्याला निवडुन् दिल्यानंतर झाले हो.. तात्याचे प्रताप तर निवडणुकीच्या आधीपासुन जगजाहीर होते तरीसुद्धा त्याला मत देणारे “ डिप्लोरेबल“ माणस आहेत यातच काही सार आल! आणी तुमच्याच लॉजिकनुसार “ त्याने केले“ म्हणुन “ आम्ही” पण करणार हे न्याय्य होत नाही ना?

“ ट्रंप हा काही लोकांच्या रिकाम्या डोक्यात भाडे न देता रहातो आहे. डेमोक्रॅट लोकांनी काहीही वाईट केले तरी ट्रंप हेच करत होता म्हणून त्याचे समर्थन करायचे. थोडक्यात ट्रंप हाच मापदंड आहे. ट्रंपने केले म्हणून ते किंवा त्याहून वाईट कृत्य क्षम्य.”

हे जरा मागच्याच पानावरचे तुमच्याच विचारसरणीच्या लोकांचे मत बघा! मगच कुसळ-मुसळ करत फिदी फिदी हसा.

आणी हो, ट्रंप नुसता “बोलला”हा शोध तुम्हाला कधी लागला? तो काय बोलला हे नीट ऐकले तरी का किंवा तो काय बोलला याचे आकलन तरी झाले का? तो बोलला की ते तो नेहमी “करतो”!

मुख्य म्हणजे ते जे कोण विभुती आहेत त्यांच्यावर तितकीच टीका केली आहे. इथे ट्रम्पविरूद्ध लिहीणारे सगळे डेमोक्रॅट्स, अ‍ॅण्टिफा, डावे, अमेरिका हेटर्स आहेत ही अनेकांच्या डोक्यातील रम्य कल्पना आहे. उद्या आणखी कोणाविरूद्ध काही निष्पन्न झाले तर त्याच्यावरही तितकीच टीका करायला काहीही वाटणार नाही. कारण आम्ही इथे कोणाला मखरात बसवून ठेवलेले नाही तात्याभक्तांसारखे.

दुसरे म्हणजे लोक पुन्हा पुन्हा ट्रम्पचा विषय काढतात वगैरे बद्दल - जवळजवळ १००% रिपब्लिकन उमेदवारांनी आत्ताआत्तापर्यंत इलेक्शन बद्दलची बकवास चालू ठेवली होती. आमचा संत तात्या कसा बरोबर असून जालिम जमाना - डीप स्टेट, कबाल वगैरे- त्याला कसा छळत आहे वगैरेची टेप लावली होती. कारण प्रायमरीजमधे तात्याचा पाठिंबा हवा होता आणि त्याचा बेसही असला नामी आहे की त्यांना समजावण्यापेक्षा त्यांची री ओढणे सोपे. त्यामुळे प्रायमरीज जिंकण्याकरता या टेपा लावणे जरूरीचे होते.

मग प्रायमरीज झाल्यावर सुमडीमधे एकेकाने कट्टर बिनडोक क्लेम्स आपापल्या कॅम्पेन मधून, वेबसाइट्स मधून काढायला सुरूवात केली. कारण आता मुख्य निवडणुकीत पक्षातील मॉडरेट्स आणि इतर कुंपणावरचे उमेदवार आपल्याकडचे यायला हवेत.

तेव्हा अजून ट्रम्पबद्दल का बोलता वगैरे राहूदे. तुमचे बरेचसे लाडके लोक कालपर्यंत तेच करत होते.

ओके लेट मी नोट इट डाऊन...
'निवडून आल्यावर' काहीही करणे... उदा. आपल्या पोझिशन आणि आपल्या वलयामुळे भारून गेलेल्या एखाद्या तरूण इंटर्नचा गैरफायदा घेणे - ओके
निवडून येण्यापूर्वी खाजगीमध्ये आपल्या पुरुष मित्राबरोबर काहीबाही वाह्यात (फक्त) बडबडणे - सॅक्रिलिज!!! Wink
#लिबरललॉजिक

तुमच्याच विचारसरणीच्या लोकांचे>>> कृपया इतर लोकांचे बिल माझ्यावर फाडू नका. त्या आयडीचा आणि माझा संबंध नाही. मी कुठल्याही 'विचारसरणीला' वाहून घेतलेले नाही. ॲबॉर्शन आणि एलजीबीटी बद्दल मी रिपब्लिकन भूमिका स्वीकारत नाही (डेमोक्रॅट भूमिकाही पूर्णपणे स्वीकारत नाही) प्रत्येकाची विचारसरणी ही त्याची इन्डिव्हिज्युअल विचारसरणी असते.

तो बोलला की ते तो नेहमी “करतो”!>>>
म्हणजे???... ट्रम्प महाशयांनी आत्तापर्यंत किती बायकांच्या पु_ खरोखरच ग्रॅब केल्या आहेत याबद्दल आपल्याकडे काही खात्रीलायक प्रत्यक्षदर्शी माहिती आहे का? असल्यास इथे काय करताय! सीएनेन किंवा एमेसएनबीसीला कळवत का नाही? लोक मार अ लागो विसरून जातील. आमचाही मस्त टाईमपास होईल दोनतीन महिने Happy

सर्वप्रथम, मोरोबा

“ नाही. मी कुठल्याही 'विचारसरणीला' वाहून घेतलेले नाही. ॲबॉर्शन आणि एलजीबीटी बद्दल मी रिपब्लिकन भूमिका स्वीकारत नाही (डेमोक्रॅट भूमिकाही पूर्णपणे स्वीकारत नाही) प्रत्येकाची विचारसरणी ही त्याची इन्डिव्हिज्युअल विचारसरणी असते.“

हे तुम्ही लिहीलेले आवडले व त्याचा आदरच आहे. तुम्ही जर माझ्या या बीबीवरच्या व इतर ठिकाणी अमेरिकन राजकारणावर लिहीलेल्या काही पोस्टी पाहील्या असतील तर तुम्हाला मी त्यात तुमच्यासारखीच भुमीका घेतलेली दिसेल. असो.

मी इथे मायबोलीवर कोणाच्याही मनोरंजनासाठी येत नाही ना कोणी कोणते व किती “ पराक्रम“ केले आहेत याची आकडेवारी द्यायला येत नाही. पण जे कोणी काय वाट्टेल ते बोलत सुटले तर तसल्या पोस्टींना उत्तर द्यायला मात्र अधुन मधुन जरुर येतो.

माझ्या क्लिंटनच्या पोस्टीचा अर्थ तुम्ही वेगळाच काढला. मला म्हणायचे होते की तुम्ही म्हणता ती गोष्ट जगापुढे त्याच्या दुसर्‍या टर्मच्या मध्याला आली. तीच गोष्ट जर त्याच्या पहिल्या निवडणुकीच्या आधी जगासमोर आली असती तर १९९२ च्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. तो काळही सोशल मिडियाच्या आधीचा असल्यामुळे बिल क्लिंटनने आधी केलेले चाळे लोकांसमोर आज जसे सगळे लगेच बाहेर येते त्या प्रमाणात बाहेर आले नव्हते. असो.

फारेंड म्हणतो तसे इथे बिल क्लिंटनला देव मानुन मखरात बसवणारे व त्याच्या “ त्या“ कृत्त्यांचे समर्थन करणारे इथे मायबोलीवर माझ्या तरी पाहण्यात कोणी नाही.

मोरोबा परत एकदा विचारतो की रिप्ब्लिकन २०२४ चा उमेदवार तात्या नसणार ह्याबद्दल तुझे काय मत आहे - त्याला तुझा सपोर्ट असणार आहे का ? तात्याच्या पावलावर पाऊल ठेवणारे नग रिपब्लिकन पार्टीने एकामागोमाग एक उभे केले आहेत त्याला तुझा सपोर्ट आहे का ?

>> बिल क्लिंटनला देव मानुन मखरात बसवणारे व त्याच्या “ त्या“ कृत्त्यांचे समर्थन करणारे इथे मायबोलीवर माझ्या तरी पाहण्यात कोणी नाही.<<

मुकुंद - ऑनेस्टली, "त्या" कृत्याच्या बाबतीत आय नेव्हर गॉट हंगप ऑन. मी रिपब्लिकन असुनहि आय हॅव ए ग्रेट अमाउंट ऑफ रिस्पेक्ट फॉर बिल. हि प्रॉबॅबली इज द ओन्लि प्रेसिडेंट पुटिंग अस इन सरप्ल्स इन रिसेंट टाइम्स. परंतु तुला माहित आहे, मला माहित आहे आणि जे कोणि अजुनहि घेट्टो मधे रहात नाहित त्यांनाहि माहित असायला हवं. सेक्स्+पॉवर गो हँड इन हँड इन अमेरिका. मग ते ट्रंपच्या बाबतीत असेल किंवा क्लिंटन्/जेएफके/आरएफकेच्या बाबतीत असेल. असो...

बाकि, या बाफवरच्या चर्चेसंबंधीत बोलायचं झालं तर मोरोबांची मतं स्ट्रेट टु द पॉइंट, शेंडेंची थोडी पॅशनेट कडे वळणारी आहेत; पण दोन्हित तथ्य मात्र आहे; इफ यु आर विलिंग टु डिग डीप. आता अदर साइड ऑफ द आय्ल बाबतीत बोलायचं झालं तर, यु हॅव ऑलरेडि अर्न्ड माय रिस्पेक्ट. तुझी (बहुतांशी Wink ) मतं विचारात घेण्यासारखी असतात परंतु इतरांची माझ्यामते तरी वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारी आहेत; बिटींग ए डेड हॉर्स. नो रियल सबस्टंस.. व्हॉटसोएवर...

इथे कुणा राजकारण्याच्या खाजगी बाबतीत लक्ष घालू नये. जसे त्रम्प्याच्या गोष्टि आहेत तशाच दुसर्‍या पार्टीतील लोकांच्याहि आहेत.
तर ते सोडून पॉलिसी, निवडून आल्यावर काय केले याची चौकशी करा.
रिपब्लिकन लोकांनी टॅक्स कट खेरीज इतर काय केले ते माहित नाही. त्या टॅक्स कटचा फायदा सामान्य जनतेस कसा झाला हे दाखवणारे लेख कुठेहि वाचनात आले नाहीत. ओबामाने निदान २००८ नंतर आर्थिक परिस्थिती सुधारली, क्लिंटनने पण आर्थिक परिस्थिती सावरली, असे म्हणतात, त्याकाळात माझी आर्थिक परिस्थिती आत्तापेक्षा चांगली होती. तशी त्रम्पच्या काळात देखील. पण त्यात त्याने काय केले माहित नाही.
दिवसेंदिवस इन्फ्लेशन, भाववाढ इ. गोष्टी सरकारच्या ताब्यात नसून फक्त मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या हातात असतात, सरकार त्याबाबतीत जे कायदे करेल त्यात सामान्य माणसांना काय उपयोग होतो ते कळत नाही.

म्हणून माझे मत असे आहे की फुक्कट राजकारणावर चर्चा करत बसण्यापेक्षा, आपापले पैसे, स्वास्थ्य , कुटुंब सांभाळा. जरा मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष घाला. अजकाल शाळांमधे काय शिकवतात ते माहित नाही, पण माझ्या दुसरीतल्या नातीला ५ + ६ हे गणित दिले त्याची बेरीज मी केली पण त्यांच्या गणित सोडवण्याची पद्धत मला कळलीच नाही! तर शाळांच्या जास्त नादी न लागता स्वतः जरा मुलांच्या शिक्षणात जास्त लक्ष घाला.

शेंडेनक्षत्र व त्यांचे मित्रहो- धडधडित पुरावा!! दिनेश डिसूझा ने स्पष्ट म्हंटले आहे की -पॉल पेलोसी स्टोरी वॅकी नि implausible आहे आणि ते हसताहेत की किती रिडिक्युलस आहे ही स्टोरी. आता हिंडा बोंबलत सगळीकडे की हल्ला झालाच नाही!! प्रत्यक्ष पुरावा आहे!!!
शिवाय पॉल पेलोसीच्या बाबतीत तुम्ही लिहीले की त्यांना दारु पिउन गाडी चालवताना पकडले पण सोडून दिले, यावरून कदाचित तुमच्या मते त्याच्यावर झालेला हल्ला योग्यच होता!! तुमचे पण लॉजिक ग्रेटच हो!! म्हणजे हल्ला झालाच नाही, पण झाला असला तरी योग्यच!! कारण दारू पिउन गाडी चालवत होता!! अमेरिकेत असे कुणि करते का?
तुमच्यासारखे लोक जे काही बाही लिहितात, त्यावरून माझा या धाग्यावरचा इन्टरेस्ट गेला.

राज, तुझ्या पोस्टला उत्तर द्यायला व एकंदरीत अमेरिकेतल्या आजच्या राजकारणावरच्या माझ्या चिंतनपर सविस्तर पोस्ट्साठी रुमाल टाकुन ठेवतो. रविवारपर्यंत बिझी आहे.

तुर्तास एवढेच लिहीतो की अमेरिकेतच काय पण जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात ३७५ मिलिअन लोकांचे एकमत असणे अशक्य बाब आहे व तशी आशा करणेही क्विक्झॉटिक आहे.

पण! एका बाबतीत मात्र दुमत नसावे की लोकशाही जर टिकवुन ठेवायची असेल तर इन डेमॉक्रेसी देअर आर सर्टन फंडामेंटल अ‍ॅक्सिअम्स अँड नॉर्म्स इन व्हिच एव्हरीबडी( हु बिलिव्ह इन डेमॉक्रेसी अँड हॅज अ स्टेक इन इट्स सर्व्हायवल) शुड बिलिव्ह इन!

आता ते अ‍ॅक्सिअम्स आणी नॉर्म्स कोणते व त्यात सगळ्या पार्टीजनी का बिलिव्ह करायचे, आणी सध्याच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी( खासकरुन प्रॉलिफ्॑रेशन ऑफ सोशल मिडिया अँड स्पेशली इट्स रोल इन द स्प्रेड् ऑफ फेक न्युज/ कॉन्स्पिरसीज) अँड इट्स इफेक्ट ऑन डेमॉक्रेसी याचा सविस्तर उहापोह मला माझ्या पोस्ट मधे करायचा आहे. त्या पोस्टसाठी रुमाल!

मुकुंद, लुकिंग फॉरवर्ड टु. नळावरील भांडणांसदृष चर्चेला रिसेट करुन, अभ्यासु, थॉटप्रोवोकिंग चर्चेची अपेक्षा ठेउया...

मला फक्त एकाच गोष्टीत इन्टरेस्ट आहे - ही भाववाढ, इन्फ्लेशन हे सगळे थांबवण्यासाठी कोणत्या पक्षाकडे कोणता उपाय आहे? त्यांना मी मत देणार, मग खाजगी आयुष्य बघणार नाही.

डेमोक्रॅट लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे अशी शंका येत आहे. काय वाट्टेल ते तारे तोडत आहेत. ही निवडणू़क म्हणजे लोकशाहीला देण्याचा कौल आहे. लोकशाही हा एक उमेदवार आहे (डेमोक्रसी इज ऑन द बॅलट!). म्हणजे रोज भेटणारे जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव पाहू नका, संंभाव्य इंधन टंचाई विसरा, प्रचंड गुन्हेगारी जी वाढवण्यात डेमोक्रॅट मंडळींची अनाठायी भूतदया आहे, लाखो बेकायदा घुसखोर आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न विसरा. फार तर गर्भपात, जाने ६, पापा पेलोसीवरील हातोडा हल्ला एवढेच मुद्दे उरले आहेत. त्यातला पापा पेलोसीचा मुद्दा अगदी सॅन फ्रॅन्सिस्कोतील मतदारांना भावेल असे वाटत नाही. ह्या प्रकरणातील अनेक गमती जमती लपवू म्हटले तरी लपत नाहीत. त्यातून हा हल्ला स्क्रिप्टेड असावा असे वाटते. कदाचित दारू पिऊन गाडी हाकली आणि अपघात केला आणि तरी नगण्य शिक्षा मिळाली ह्याच्या बदल्यात "योग्य वेळ येताच" स्वतःला थोडी फार इजा करून बळीचा बकरा बनण्याचे पापाजींनी मान्य केले असेल!
एन बी सी च्या पत्रकाराने असे सांगितले की ह्या रम्य प्रकरणात पोलिस जेव्हा पेलोसी प्यालेस मधे अवतरले तेव्हा खुद्द पापा पेलोसीने दार उघडले. पोलिस आत येताच साहेब बाहेर पलायन करण्याऐवजी पुन्हा त्या माथेफिरुला भिडले आणि पोलिसांसमोरच त्या नग्नपंथी, बी एल एम प्रेमी, बर्कले बस रहिवाशाने आपला हतोडी हल्ला केला. आणि नंतर घाईघाईने हे वर्णन चुकीचे होते असा खुलासा केला. पोलिसांनी आणि डी ए ने काही साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. पेलोसी प्रासादात सिक्युरिटी कॅमेरा होता का? पोलिसांचा बॉडी कॅम त्याचे चित्रण कधी दाखवणार? उत्तरः
माहिती देणार नाही! जर आरोपी आत असेल तर अशी माहिती प्रसारित करुन आणखी काय वाकडे होणार आहे? पण ह्या लपवाछपवीवरून काहीतरी पाणी मुरत आहे एवढेच कळत आहे.
असो. पापा पेलोसीची कवटी म्हणजे अमेरिकेतील लोकशाही. माथेफिरू नग्नपंथी, ड्रगी, बर्कले वासी हतोडाधारी हल्लेखोर म्हणजे ट्रंप. जानेवारी ६ हल्ला म्हणजे त्या पवित्र कवटीला गेलेला तडा. जानेवारी ६ समिती म्हणजे पापा पेलोसीवर आय सी यूत उपचार करणारे सर्जन वगैरे असे रुपक पुढे ठेवायला हरकत् नाही. अजून दोन-तीन दिवस उरले आहेत!

>>
मला फक्त एकाच गोष्टीत इन्टरेस्ट आहे - ही भाववाढ, इन्फ्लेशन हे सगळे थांबवण्यासाठी कोणत्या पक्षाकडे कोणता उपाय आहे? त्यांना मी मत देणार, मग खाजगी आयुष्य बघणार नाही.
<<
ज्या पक्षाला असे काही होते आहे हेच मान्य नाही तो त्या प्रकाराला काय थांबवणार डोंबल? डेमोक्रॅटिक पक्षाची एम एस एन बी सी साठी काम करणारी प्रवक्ता जॉय रीड असे म्हणाली की इन्फ्लेशन हा शब्द रिपब्लकन लोकांनी मतदारांना शिकवला आहे. त्यांना तो शब्द त्याचा अर्थ हे आजिबात माहित नाही. त्यामुळे हे सगळे निरर्थक आहे. कदाचित खून, हल्ले, चोर्या, दरोडे, बेकायदा घुसखोरी हे शब्द देखील सामान्य मतदारांच्या शब्दकोशात नव्हते पण ते रिपब्लिकन लोकांनी डोक्यात भरवले असेही मत मांडले जाईल! असो.

बायडनच्या कारकीर्दीत फाऊची हा एक उन्मत्त अधिकारी काय वाट्टेल ते जाचक नियम लावत होता. जे लोक लस घेणार नाहीत त्यांना बहिष्कृत करा, त्यांना नोकरीवरून काढून टाका वगैरे भयानक प्रकार त्याच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. आता असे दिसत आहे की अगदी पाच दहा ज्या काही लसी आणि बूस्टर फूस्टर आहेत ते घेऊनही कोविड होऊ शकतोच. सी डी सी ची मुख्य बाई वलेन्स्कीच्या बाबतीत हे झाले आहे. एकंदरीत ही लस म्हणजे रोग पूर्ण बरा करायला, तो पसरण्यापासून वाचायला रामबाण उपाय आहे हा सुरवातीचा सूर आता पार बदलला आहे. लस काही काळ तुम्हाला ह्या रोगापासून कदाचित वाचवेल अशी "सायन्सची" माहिती आहे. शिवाय लसीचे दुष्परिणाम? त्यांचे काय? मुळात तरूण धडधाकट लोकांना हा रोग झाला तर फ्लू सदृश त्रास होतो. उलट लशीचा दुष्परिणाम हृदयविकार आणि अजून काय काय असू शकतो. कुठले जास्त घातक आहे? आणि मग सक्तीला काय अर्थ आहे?
त्यामुळे आता काही लोकांना उपरती होत आहे. कोविड, लस प्रकरणी गेले २ वर्षे झाले गेले विसरून जा आणि सगळे माफ करून पुन्हा नव्याने सुरवात करु. असा सूर काही उच्चपदस्थ आळवू लागले आहेत. परंतु असे होता कामा नये. नसलेली वा चुकीची माहिती वापरून घातक, जाचक बंधने घालून अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त किंवा नष्ट करणारे, रोजगार बंद करणारे फाउची सारखे उन्मत्त लोक मोकळे रहाता कामा नयेत. त्यांना अशी शिक्षा व्हावी की पुढचा अधिकारी असे बेबंद वागताना विचार करेल.

मस्त अभ्यासू आणि विचारप्रवर्तक करमणूक आहे हे लांबलचक प्रतिसाद.
This piece has been removed from publication because it did not meet NBC News reporting standards
पण आमच्या स्टॅन्डर्ड मध्ये एकदम फिट बसत़ं.

सायन्स भारताला दिल्यानंतर वर्षभराने अमेरिकेला माहिती देतं का?
लस घेतली की कोविड होणार नाही, असं काही नसून लस घेतल्याने त्याचा त्रास कमी होईल हे इथे गेल्या वर्षीच कळलं होतं.

अच्छा, मग कोव्हिड झाला तर ब्लीच का काय ते प्या हे थेट व्हाइट हाउस मधून सांगणार्‍यांना लोकांनी मत द्यावे म्हणता? सायन्स वगैरे जाऊदे? हेल्थ अ‍ॅण्ड ह्यूमन सर्व्हिसेस बंदच करावी काय? नाहीतरी त्या रिक पेरी ला पूर्वी "तीन संस्था बंद करू" म्हंटल्यावर दोन संस्थांची नावे घेतल्यावर तिसरी आठवत नव्हतीच. बाकी उपचार वगैरे तात्याच्या ट्विट मधून करू. नाहीतर व्हॉट्सअ‍ॅप मधून पन्नासएक रोगांना उपचार असलेल्या वनस्पती वगैरे येत असतातच.

आणि कोणाला मत द्यावे? फेडरल अ‍ॅबॉर्शन लॉ आणू, नो एक्स्पेप्शन्स म्हणणार्‍यांना? किंवा अ‍ॅबॉर्शनचा निर्णय हा "स्थानिक राजकीय नेत्यांच्या सल्ल्याने" घ्यावा म्हणणार्‍यांना?

की ६ जानेवारी ला बरेच लोक कॅपिटॉल मधे फिरायला गेले होते म्हणणार्‍यांना?

की इलेक्शन आमच्या मनासारखी झाली नाही तर सर्टिफायच करणार नाही म्हणणार्‍यांना? किंवा "Church directs the constitution" हे भर सभेत ठणकावून सांगणार्‍यांना, व Wanton ऐवजी Wonton म्हणणे वगैरे इतकी बायबलची माहिती असणार्‍यांना? खुद्द बायबलमधला महत्त्वाचा शब्द माहीत नसणारे "कॉन्झर्वेटिव्ह" उमेदवार इन्फ्लेशन म्हणजे काय आणि कशामुळे होते हे एक्स्पर्ट असल्यासारखे सांगतात. यांना एकतर बायबलचा गंध नाही, किंवा इकॉनॉमीचा. बहुधा दोन्हीचा.

भरत - हे तुमच्या पोस्टवर नाही Happy पोस्ट्स ओव्हरलॅप झाल्या.

लस घेतल्याने कोव्हिड होणारच नाही असे कुणी म्हटलेले नाही.

लस घेतल्याने कोव्हिड होण्याची शक्यता जरुर कमी होते. हे अनेकांनी अनेकदा अनेक प्रकारे सांगितले आहे.

Pages