Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या चावडीत काँटेस्टन्ट्स कमी पडले मांजरेकरांना उत्तरं देण्यात , माने पण !
अपूर्वा उत्तरं देत होती त्यातल्या त्यात पण अनॉयिंग अ‍ॅज ऑलवेज.
प्रसादला अ‍ॅप्रिशिएट केलं नाही पण ओव्ह्रॉल मांजरेकर वॉज गुड अँड फेअर !
तेजस्विनीची ग्रे पैठणी आणि अमृता देशमुखची पिंक पैठणी आवडली , बाकी बायका विचित्रं दिसत होत्या !

खर्या बिबॉसला अजून सुरूवात झाली नाही आहे.ती सुरू होईल जेव्हा बिबॉसचा हुकुमी एक्का असलेला बहुचर्चित सिंहासन किंवा खुर्ची सम्राट टास्क येईल.
याच टास्कमुळे सिझन 1 आणि सिझन3 मध्ये अनुक्रमे मेघा ,विशाल हे हीरो ठरले सोमिवर आणग विनर झाले.
सिझन 2 मध्ये या टास्कने कहरच केला,याच टास्कमुळे पराग बाहेर गेला,वैशाली आणि नेहा ज्या व्हिलन ठरल्या त्या शेवटपर्यंत.वीणा किशोरी,रुपालीच्या ग्रुपमध्ये फुट पडायला याच टास्कपासून सुरुवात झाली.
हा टास्क या सिझन मध्ये बिबॉस कधी आणतो,हे बघायच.कारण यांचे अजून तसे ग्रुप्स झालेले नाहीत.

ममां फॉर्म मधे आहेत एकदम. मला आवडली चावडी Happy यशश्री, अपूर्वा, निखिल यांच्यावरच्या टिप्पण्या ऐकताना मजा आली .यशश्रीची गोची झाली असावी. अ‍ॅक्टिंग होते हे मान्य करावे तरी पंचाईत आणि न करावे तरी पंचाइत Lol

अमृता देशमुखची पिंक पैठणी आवडली >>> हो पैठ्णी छान होती तिची.

अपुर्वाचे कानातले अजिबात आवड्ले नाहीत, तिला सूट होत नव्हते, ती दिसत छान होती मात्र.

साडीत सर्वात गोड तेजस्वीनी दिसत होती, कलर कॉम्बो छान होतं.

मला रविवारची चावडी बोअर झाली तशी.

काल शेवटची दहापंधरा मिनिटं मधूनमधून पाहिलं.
निखिल राजेशिर्के कसला डंब आहे! आविष्कार आणि माधव देवचके यांनापण कित्येक कोस मागे टाकेल.
अमृता देशमुखचा चेहरा पार उतरला होता. मागच्या दोन सीझनयध्ये पहिली गच्छंती झालेल्या दोघांनीही बेअरिंग नीट सांभाळलं होतं

डिजे,
सोनाली पाटील तिथे तरी मुद्देसूद बोलतेय काय
Happy

रविवारची चावडी नाही आवडली, ममांचे आठवड्याचे टॉप ४ बघून मला आपण हाच शो बघतोय ना असे फिलिंग आलं Uhoh
त्रिशुल्,रोहित, रुचिरा आणि अमृता ??
प्रसाद आणि अपूर्वा हवे होते टॉप मधे , जरी ती कचाकचा भांडली असली तरी तिच्यामुळे कन्टेन्ट तर मिळालं कलर्सला , प्रसाद तर ऑडियन्सला आवडला होता !
मला तर ममांचे टॉप ४ लोक फार दिसलेच नाहीत स्क्रीन वर , काय केले नक्की त्यांनी ?
मानेंना पण जास्तच सुनावलं का?

एपिसोड एन्डला यशश्रीचं बोलणं पुन्हा महाविनोदी , ठार वेडी Biggrin
अपूर्वा सुद्धा ड्रामॅटिक, पण त्या बाईमधे पोटेन्शिअल आहे, हिरो बनायचे नसले तरी कन्टेन्ट क्वीन बनायचे !

अमृता दिसतेय, बोलतेय. रोहित आणि त्रिशूल ला बहुतेक फेक न वाटता जेन्युइन वाटत आहेत म्हणुन चांगले करताय म्हणाले असावे. यशश्री आणि अपूर्वा हुषार असतील तर अजूनही गेम बदलू शकतात. कॅमेर्‍यात तर दिसत आहेत त्या दोघी भरपूर .त्यांनी डॅमेज कन्ट्रोल सुरु पण केलेले दिसले प्रोमोज मधे. रडणे, कॅमेर्‍याशी बोलत सिंपथी घेणे वगैरे.
मेघा ला सगळ्यांनी हिरो म्हटले काल. बहुतेक घरकाम केल्यामुळे? तिच्यामधे पोटेन्शियल आहे तसे पण ती अपूर्वाच्या मागे मागे करते. ते सोडायला हवे. मानेंना आता घरात थोड्या फ्रेन्डशिप्स कराण्याची गरज आहे नाही तर घरातले सगळे त्यांना दर आठवड्यात टार्गेट करणार.

एपिसोड एन्डला यशश्रीचं बोलणं पुन्हा महाविनोदी , ठार वेडी Biggrin>>+१
परवा मी यशश्रीला पहिल्यांदाच पाहिले समृद्धीबरोबर बोलत होती, काहीतरी माझ्यातील लहान मूल शोधतेय वगैरे वगैरे काहीतरी. हहपुवा..
हिला काय आपण सीरिअलमधले संवाद म्हणतोय असे वाटले की काय.

समृद्धी आणि रुचिरा सगळ्यात प्रॉमिसिंग वाटल्या.

माझ्यातलं लहान मूल तडफडतंय म्हणे Lol ते जंगलात बसते म्हणत बाथरूम मधल्या शोभेच्या झाडां मधे तोंड काय घातले. किरण माने ला बिबॉ काय समजली. तिला बहुतेक वाटले की क्यूट समजतील लोक तिला. पण ममांनी फुगा फोडला तो Happy

अख्ख्या एपिसोडभर फक्त नॉमिनेशन, इथून तिथे आणि तिथून इथे, safe आणि nominated. बोअर आणि बोअर.

विकास जाईल. विकास म्हटल्यावर मला विकास पाटील आठवतो पटकन.

वीकेंडची चावडी बघितली..... पहिले काही आठवडे चावडी ओकेओकेच असते कारण कुणी अजुन हिरो; व्हिलन झालेले नसते आणि बिग बॉसवर बायस्डचा शिक्का बसलेला नसतो!!
मांजरेकरांच्या टॉप ४ मध्ये प्रसाद आणि अपूर्वा हवे होते; त्रिशूलचे एक ठीक आहे पण रोहितने असे काय केले होते?
मांजरेकरांनी त्यांना टॉप फोर म्हंटल्यामुळे लगेच त्यांची री ओढत सगळ्यांनी रोहित आणि त्रिशूलला हिरो म्हंटले आणि किरण माने आणि विकास चे भरपूर बॅशिंग झाल्यामुळे ते सगळ्यांच्या झीरो लिस्टमध्ये आपसूक जाऊन बसले.
मांजरेकरांनी त्यांचे मतप्रदर्शन करण्याआधी हा टास्क घेतला असता तर हेच लोक हिरो ठरले असते का याबद्दल मला शंका आहे.

निखिलला पुरतेच टारगेट केले होते मांजरेकरांनी आणि अर्थात तो ही त्यांना मटेरिअल पुरवत होताच.... त्याची थॉट प्रोसेस बरोबर असते पण ती त्याला डिफेंड करता येत नाही..... मुद्देसूद बोलता येत नाही!
अर्थात हा प्रॉब्लेम इथे बऱ्याच जणांचा दिसला.... अगदी प्रसाद जवादेलाही मुद्देसूद बोलता येत नाही..... कुठलीही गाडी कुठेही घसरते Wink

किरण माने नको तिथे सुपीरियरिटी कॉंप्लेक्स (मी किती सिनियर, किती लोकांबरोबर काम केलेय, कितीकिती काम केलय) आणि नको तिथे इन्फिरियरिटी कॉंप्लेक्स (सगळ्यांच्यात न मिसळणे, त्या विकासला घेऊन बाकीच्यांपासून वेगळेवेगळे रहाणे) या कात्रीत अडकल्यासारखे वाटतात.

यशस्वीला उगाचच टारगेट केल्यसारखे वाटले..... वागू देत ना तिला वागायचे तसे.... मजा येत होती की!! उगाच सगळ्यांना मारुनमुटकून एका साच्यात कशाला घालताय आणि असेल तिचा तो मुखवटा तर उतरेल की एक दिवस आपोआप..... तुम्हाला कसली एव्हढी घाई झालीय??
अपुर्वा एरवी अनॉयिंग असली तरी ती न कचरता आणि योग्य मुद्दे मांडते ते आवडले.
धोंगडे अज्जिबातच दिसत नाही याबद्दल फारसे काही बोलले नाहीत याचे आश्चर्य वाटले
तेजस्विनी आणि अमृता देशमुख दिसत पण मस्त होत्या आणि बोलल्याही योग्य आणि मुद्देसूद!!
बाकी सगळे ओकेओकेच होते

तो एलिमिनेशनचा ड्रामा पण एकदम प्रेडिक्टेबल वाटला..... नवे काहितरी आणा राव!!

कालचा एपिसोड अजुन बघितला नाही

>>सोनाली पाटील तिथे तरी मुद्देसूद बोलतेय काय

काहीच्या काही अपेक्षा तिच्याकडून Lol
बघितला परवा एक live थोडावेळ; निम्मावेळ मागच्याच सीझनमध्ये अडकून पडले होते सगळेजण..... सोनाली मला मागच्या सीझनमध्ये आवडली होती पण review वगैरे जरा जास्तीच्या अपेक्षा वाटल्या तिच्याकडून पण अर्थात तिचातिचा फॅनबेस आहे त्यामुळे लोक गर्दी करतील तिकडेही Happy

>>यशश्रीची गोची झाली असावी. अ‍ॅक्टिंग होते हे मान्य करावे तरी पंचाईत आणि न करावे तरी पंचाइत Lol
हे मात्र खरेय!! अगदीच इकडे आड तिकडे विहीर झाले असणार तिच्यासाठी Wink
पण मजा येत होती राव त्याच्यामुळे; आता मांजरेकरांच्या कानपिचक्यांमुळे ती उगाच धीरगंभीर वगैरे होऊ नये म्हणजे मिळवली

>>अपूर्वा सुद्धा ड्रामॅटिक, पण त्या बाईमधे पोटेन्शिअल आहे, हिरो बनायचे नसले तरी कन्टेन्ट क्वीन बनायचे !

अगदीच!! आणि अधूनमधून एखादा हळवा ॲंगल आणि कुणाशी तरी चांगली मैत्री हे आवश्यक आहे तिला पुढे जायला पण पाहिजे तिथे कचकच केलीच पाहिजे

स्वरूप Lol
मी प्रयत्न केला बघण्याचा पण ते live प्रकरण आवडतच नाही म्हणून सोडून दिलं.

स्वरुप छान पोस्ट.

मी आजचा (खरंतर आता कालचा म्हणायला हवं) एपिसोड फार उशीरा बघायला सुरुवात केली. सोनीवर अमिताभ बड्डे स्पेशल केबीसी बघत होते. एकदा तिथे अ‍ॅड असताना लावलं तर मेधाताई विकासशी वाद घालत होती. केबीसी संपल्यावर लावलं, तर माने, समृद्धी ला केळकर आणि तेजुने बाद केलेलं कॅप्टन पदाच्या रेसमधून. नंतर मराठे, धोंगडे बाद झाले, त्यावर धोंगडेने धिंगाणा घातला.

केळकर फार आरडाओरडा करतो का, त्याचं आणि प्रसादचं पटत नाही का.

प्रसाद आणि केळकर हे सध्यातरी जय आणि विशालचा रोल करत आहेत.आज तर फिजिकल फाईटपण होणार आहे.त्यामुळे सध्या संथ चाललेल्या शोमध्ये बिबॉस याचा फायदा घेणारच.
आता हळूहळू ग्रुप तयार व्हायला सुरवात होत होती कालपासून तर आताच यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला ज्यात प्रसाद दुसर्या ग्रुप मध्ये गेला म्हणून त्याचा ग्रुप चर्चा करत आहे.पण व्हिडीओ वरून नाही अंदाज येणार ,प्रत्यक्ष आज कळेल.
पण हे लोक टास्क फारच बाळबोध खेळत आहेत.
दुसर्यांच्या बँग्ज उचलताना दोन्ही ग्रुपचे प्लँन वेगळे होते,प्रसादच्या टीमने एकमेकांच्या उचलायच्या तर आता अपूर्वाची नाही तर मेघाची म्हणावी लागेल(काल ताईंचा आवाज गगनाला भिडला होता.)तर त्यांनी ओपोझिट टीमच्या घ्यायच्या अस ठरल होत,यावरून बँग्ज उचलतानाच खरतर धक्काबुक्की ,भांडण व्हायला हवी होती,नाही झाली पण पहिल्या राऊंडला मग बरीच निगोशिएशन्स झाली आणि सम्रुध्दी आणि माने आऊट झाले आणि नियमानुसार संचालक बनले.
सेंकड राऊंडला मात्र चुकून की मुद्दाम माहित नाही पण प्रसादच्या टीममध्यला काहीनी दोन उचलल्या ,आयत्या वेळी एक फेकली,मग अक्षयच रडगाणं सुरू झाल.पण यावर सेल्फ डिफेन्स मध्ये प्रसादच्या टीमने टिपिकल बिबॉस सदस्यांचा "स्ट्रँटेजी" हा शब्द न वापरता स्पष्टीकरण देत बसले होते.बावळट आहेत.अरे बिबॉसला तेच हव असत.
असो ,पण शेवटी अम्रुता धोंगडे आणि त्रिशुल आऊट झाले.
आज मात्र बिबॉसला हवी असलेली फिजिकल फाईट प्रसाद आणि अक्षयमध्ये होणार आहे.
वोटिंग ट्रेंडनुसार अम्रुता देशमुखला भरघोस मत मिळत आहेत ,पण काल तर ती कुठे नव्हतीच,तस फार अस काही करत नाही ती,तशी एवढी फेमस पण नाही, मग का ? पहिल्या नंबरवर आहे.निखिल पण काल पहिल्या तीनात होता.
तिकडे हिंदीमध्ये म्हणे शिव मैदान गाजवत आहे.त्यामुळे या बिबॉसचे मराठी प्रेक्षक कमी होत असल्याची चर्चा आहे.
गेल्या वेळचा आपटी खाल्याचा बदला म्हणून हिंदी बिबॉस शिवला ठेवेल आणि मराठीला या वेळी आपटवेल.
अन्जू....शिवला वोटिंग करत आहात की नाही.

अन्जू....शिवला वोटिंग करत आहात की नाही.>>> मागच्यावेळी नव्हतं केलं कारण तो होता दुसऱ्या नंबरवर. तो stan एक नंबर वर होता. यावेळी परत आहे का तो नॉमीनेट.

वोटिंग ट्रेंडनुसार अम्रुता देशमुखला भरघोस मत मिळत आहेत >>> भावाची पण मदत होत असेल, यश म्हणून गाजतोय ना तो आई मध्ये.

काल ते माने विकास ला किती उचकावत होते! शनिवारी खाणार आहेत ममांची बोलणी. नंतर टॉन्ट्स पण मारत होते शेपुट वगैरे म्हणत. पण गंमत अशी की तिथे बरीच शेपटे आहेत त्या अपूर्वाची Happy त्यामुळे बर्‍याच जणांना ती कमेन्ट लागली. आणि आले भांडायला.
विकास पण बिथरला होता काल.
टास्क मधे अजून आउट ऑफ द बॉक्स विचार दिसत नाहीये कुणाकडून. सरळसोट टास्क खेळतात. किंवा फिजिकल होतात. आयडिया नाही लढवत.
कदाचित दोन स्प्ष्ट ग्रुप्स तेवढे पडले नाहीयेत म्हणून असेल.

आज अपुर्वा फार खिजगणतीत नव्हती. प्रसाद सारखा आवाज चढवत होता. अक्षय केळकर उजवा वाटला. प्रसादला स्व त:चे ऐकावं सर्वांनी असं वाटतं का. निखिलशी भांडण झाल्यावर, निखिलवर राग काढला त्याने, त्याला आऊट करून. निखिलला स्पर्धेत ठेऊ शकला असता आणि नंतर बघा त्या टीमने कशी चलाखी केली, अक्षय आणि रोहित जिंकतील असं म्हणाला. तेव्हा निखिलने छान उत्तर दिलं.

आज समहाऊ अक्षय जास्त आवडला.

बाय द वे त्या समृद्धीचे नाव त्रिशूलशी का जोडतायेत.

ती खूप लहान आहेना वयाने.

तेजस्विनी त्रिशूल बरे दिसतात एकमेकांसोबत .

प्रसादला पब्लिक सपोर्ट खूप दिसतोय. बिग बॉस मराठी संबंधी काही दोन तीन मिनिटांचे व्हिडिओज यूट्यूबवर बघितले की, त्याखाली कमेंट्स काय आहेत बघते त्यावरून प्रसाद, प्रसाद आणि प्रसाद जास्त दिसतं.

अमृता दे कायम त्याला सपोर्ट करते, समजावत असते.

प्रसाद आणि अक्षयच्या मारामारीचा सीन नेमका हुकला माझा पण नंतर आपल्याला काही दाखवलं नाही पण live मध्ये अक्षयला कनफेशन रूममध्ये बोलाऊन परत असं झालं तर काढणार तुला असं सांगितलं, हे youtube वर बघितलं म्हणजे सीन नाही फक्त फोटो दाखवून कोणीतरी बॅकग्राऊंडला सांगितलं असं झालं.

काल वीकेंडचे एपिसोड बघितले. एकुणच लेव्हल हेडेड जन्ता कोणीच नाहीये. ती एक अपूर्वा आहे पण ती अगदी कचाकचा भांडते. प्रसादला मुद्देसुद बोलून कॅशइन करता नाही आलं. मांजरेकर सांगताहेत तर त्यांच्या ऑ मध्येच सगळे हो ला हो करत सूर मिसळत आहेत. अरे मानेच्या वर काही आहे का नाही? त्या मसुरकरला चक्रम का असेना पर्सनॅलिटी आहे. वरच्या स्वरुपच्या पोस्टला +१. मांजरेकर सगळं गुळगुळीत नका करू हो!
त्या निखील राजेशिर्केला पहिली लाथ घालुन हाकला. कसला बोर आहे तो! सगळेच हिरो म्हणे!
बाकी झिरो मध्ये अपूर्वाचं नाव कोणीच घेतलं नाही अगदी प्रसादने पण नाही? आणि अपूर्वाने प्रसादला झिरो म्हटलं नाही? ममां बोंबलताहेत तरी हे आपलं पीसी पणा सोडत नाहीत. सगळी मंदि-आळी आहे भरलेली.
त्यातल्या त्यात तेजस्विनीला अक्कल आहे वाटलं. अमृता देशमुख चांगलं बोलते पण पर्सनॅलिटी नाही. तो केळकर तर टीनेजर टँट्रम बॉय आहे. अगदीच बाळबोध आणि डोक्यात जाणारा. ती रुचिरा ठीक वाटली पण ती काही फार दिसली नाही अजुन.
विकास आणि तो उंच माणूस तर महाबोर आहेत.

बोरिंग चालु आहे हा सिझन , मानेंचं भडकवणे , विकास पपेट बनणे प्रकरण, विकासचं फुटेज फार कंटाळवाणं आहे !
कोणीच आवडलं नाहीये अजुन , मेघा पण अज्जिबात नाही आवडत !
हिन्दी बर्‍यापैकी हॅपनिंग चाल्लाय मग !

मी पण विकेन्डचा वारच बघितलाय अजुनतरी रोजचे एपिसोड अजुनही बघण्याची उत्सुकता नाही.
कुणीही फार खास वाटलेच नाहीत.एक दोन लोक सोडले तर सगळ्याच मराठी हॉ री ब ल आहे.एकदम धेडगुजरी.
ग्लॅमरस तर कुणीही नाही

>>वोटिंग ट्रेंडनुसार अम्रुता देशमुखला भरघोस मत मिळत आहेत
हो तिला खुप पाठिंबा आहे बाहेर पण अशीच मिळमिळीत खेळली तर अवघड आहे. तिला बघून मागच्या सीझनचा अक्षय आठवला.... too nice for this game!!

>>विकास पपेट बनणे प्रकरण,
'पपेट' नाही 'पेपेट' Wink

>>सगळ्याच मराठी हॉ री ब ल आहे.एकदम धेडगुजरी.
Including Manjarekar..... प्रिमियरच्या एपिसोडमध्ये ते कुणाला तरी विचारत होते की तुला 'खायला' आवडते की 'खिलवायला' ..... खरचं?
इतरवेळीही ते बऱ्याचदा अगदी रोजच्या वापरातले सहज प्रतिशब्द मराठीत असताना ते हिंदी/इंग्रजी शब्द वापरतात!

दोन दोन आरजे असताना त्यांना कधी सूचना वगैरे वाचताना फारसे बघितले नाही पण किरण मानेनी काल परवा मस्त वाचन केले..... त्यांचे मराठी इतरांच्या मानाने बरेच चांगले वाटतेय.
वरती कुणीतरी लिहले होते की त्यांना आता घरात फ्रेंडशिप्स करायची गरज आहे तशी ती ते प्रसादबरोबर करताना दिसतायत
पण विकासला उचकवणे त्यांनी अजूनही सोडलेले नाही.... परवा एव्हढी हवा भरुन त्यांनी विकासला मेघाकडे पाठवले पण हा गडी उलट तिचेच ऐकून घेऊन परत आला.

त्यातल्या त्यात तेजस्विनी बरी वाटतेय सध्या!!

बिबॉसने सांगितल्याप्रमाणे नॉमिनेटेड कंटेस्टंट्स्ंना जाड करण्यासाठी सतत दिसणे आणि चर्चेत राहणे अपेक्षित असूनही निखिल निद्रिस्त वाटला म्हणून की काय पण प्रसारवर ही जबाबदारी बिबॉसने टाकली असावी,अस काल त्या दोघांच्या भांडणावरून वाटल.मला ते भांडण का होत तेच कळल नाही.
प्रसारने निखिलला बाद करून निखिलला पू पडद्यावर आणल आणि मुळात तितकासा तयार नसलेला ग्रुप फोडला.
आज बहुतेक दुसराही फुटेल कारण त्यांच्यातही घट्ट अशी एकी दिसत नाही पण टास्क साठी ठीक आहे.
कालही देशमुख दिसली नाही,न खेळताच भरघोस मत मिळणारी मी तरी ही पहिलीच मराठी बिबॉसमधली स्पर्धक बघत आहे.
बाकी, हा सिझन अंधारच आहे.मध्येमध्ये उजेडासाठी अक्षय,प्रसाद ,अपूर्वा,माने यांना अपॉईंट केल आहे.
समीर परांजपे वाईल्ड कार्ड एंट्रीने येणार असल्याची चर्चा आहे.तस झाल तर कलर्सच्या फेसला बिबॉस नेईल पहिल्या सहात.

Pages