Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑटो करेक्टने बऱ्याच गंमतीजमती
ऑटो करेक्टने बऱ्याच गंमतीजमती केल्यात
मला काही कळले नाही, सगळे जण
मला काही कळले नाही, सगळे जण अजून काहीही मनाप्रमाणे करत आहेत. एक ग्रुप असावा असे वाटले तर पुढच्या क्षणी तेच लोक एक मेकाला बाद करतायत. कसं होणार अशाने.
मला काही कळले नाही, सगळे जण
काल कोणी पाहिले का, रुचिरा सकाळी तयार होऊन आली त्यावेळी रोहित तिला हळूच म्हणाला "टी शर्ट घाल याच्यावर" तिने क्रॉप टॉप घातला होता. तिने मोठा इश्यू न करता मला समजते, मी काळजी घेईन असे उत्तर दिले. आणि कपडे बदलले नाहीत. त्यानेही विषय पुढे वाढवला नाही.
इट्स गोइंग टु बी फन वॉचिंग दीज टू
रुचिरा मधे मला पोटेन्शियल दिसते. टास्क्स पण चांगली करते ती. बहुतेक वेळा रोहित ला बरोबर वाचवले तिने काल.
प्रसाद मला आधी चांगला वाटला होता पण आता मूर्ख वाटत आहे. नुसताच सगळ्यांशी भांडतो. कोणती मतं स्पष्टपणे न मांडता तो फक्त आरडाओरड करतो असे दिसते.
अमृता दे ला भरघोस वोटिंग
अमृता दे ला भरघोस वोटिंग होण्याचं अजून एक कारण प्रसाद आहे. प्रसादच्या पाठीमागे पब्लिक आहे आणि अमृता कायम त्याला सपोर्ट करते. मी अजूनही bb चे कुठलं fb पेज बघितलं नाही पण youtube शॉटस खालचे कमेन्टस बघून प्रसाद अमृता करतंय पब्लिक असं दिसतंय.
यावेळी फार मनात बसलं नाहीये कोणी, मागच्यावेळी पहिली मीनल आणि दोन वि होते सुरुवातीला मनात. ह्यावेळी जरा समृद्धी, रुचिरा, देशमुख, अजून कोण बरं मुलगी, सुरुवातीला चांगल्या वाटल्या.
काल जरा अक्षय बरा वाटला. ज्याला आऊट करायचं होतं त्याची bag घेऊन ठामपणे तो बाहेर होता.
यावेळेचा सीझन रंगत नाहीये अजिबात.
फक्त अपूर्वा शांत आहे सध्या आणि प्रसाद विरुद्ध अक्षय सामना होत असल्याने प्रसाद हीरो, अक्षय व्हिलन आणि अपूर्वा साइडलाईनला असल्याचं दिसतंय.
खर आहे.सि़झन रंगत नाही आहे
खर आहे.सि़झन रंगत नाही आहे.खुर्ची सम्राट टास्क लवकरच आणावा लागणार बहुतेक.
काल अक्षय आवडला. रुचिरा पण
काल अक्षय आवडला. रुचिरा पण आवडते मला.
प्रसाद मधे नुसता तोंडात दम आहे. बाकी काही नाही. उगीच लीडर बनायला जातो पण कोणी भाव देत नाही मग भडकतो.
अपुर्वा एकदम शांत च झाली आहे. ममां नी दिलेला डोस फारच मनावर घेतलाय पण एकदम बॅकफुट वर गेली आहे.
हो, मी रोहित -रुचिरा
हो, मी रोहित -रुचिरा कॉन्व्हर्सेशन लग्गेच नोटिस केलं, स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्स बघून म्हंटला टि.शर्ट घाल
ती म्हंटली मी लिमिटेड आणलेत टि शर्ट्स , हा योगा ड्रेस आहे आणि आय विल बी केअरफुल (टस्स्क्स्/कॅमेराने चूकीच अँगल पकडु नये यासाठी ?)
हे दोघे आवडत आहेत , पण त्यांचे फ्रेंड्स नाही , सिझ्स्न गोइंग फ्लॉप!
रोहित कॅप्टन झाला.
रोहित कॅप्टन झाला.
टिंग्या (हे बॉडी शेमिंग नाही, कौतुकाने लिहिलं) विकासने कमाल केली. अक्षयचा oc नडला. आधी विकास त्याला सांगत होता की मला आणि योगेश घे मदतीला, त्याने ऐकलं नाही. तिसऱ्या फेरीत रोहितने त्या दोघांना निवडून योग्य केलं. कॅप्टन झाल्यावर सर्व एकत्र छान एंजॉय करत होते. अक्षय म्हणाला असेच राहुया, मला हसू आलं, हे होणार नाही म्हणून. प्रसाद संचालक होता, योग्य निर्णय देत होता.
बाकी आधी चहावरुन यशश्री, अमृता मध्ये घमासान आणि रडारड झाली. हे झालं नाही तर bb घर कसं वाटणार.
कालचा टास्क बघत असताना मला जय
कालचा टास्क बघत असताना मला जय,विशाल, नेहा ,शिव, मिनल,उत्कर्ष मीरा,मेघा सईची आठवण येत होती.शिव आणि विशालने ताकद लावली असती पण बाकीच्यांनी काहीतरी लूप होल्स शोधून डोक लावल असत.
हे फक्त शक्तिप्रदर्शन करत होते.
टायरला तेल लावण,ड्आधीच जाउन डिओ मारण,साबणाच पाणी वापरण जेणे करून गाडी घसरेल ,अस काहीतरी तरी डोक लावायला हव होत.कदाचित पसंचालकाने ते बाद ठरवल असत किंवा प्लॅन फ्लॉप गेला असता.पण डोक तर चालवता आल असत.
पण हे.लोक सरधोपट मार्गाने.जाउन टास्क खेळणारे आहेत.
युक्तीचा पण वापर करावा लागतो.
अगदी त्या बँग्ज च्या वेळी पण ,अदलाबदल करण,टेबल फिरवण अस करू शकले असते.
नेहा तर टास्क सुरू होण्याच्या आधीच डिओ वगैरे टाकायची.
ममांनी जरा याडे लक्ष द्यायला हव.
फालतू कारणांवरून भांडत बसले आहेत.ती यशश्री टास्क छान करते पण डोक्यात पण तेवढीच जाते.
मी बघायचं बंद केलं आता इकडे च
मी बघायचं बंद केलं आता इकडे च कमेंट वाचते
चांगले स्पर्धक नाही घेतले
चांगले स्पर्धक नाही घेतले यंदा. भांडणं सुरू झाली की लगेच मध्यस्ती करून बंद पाडतात.
मुलींचे कपडे खूपच कमी झालेत यंदा.
यशश्री बिबॉ २१ अपेक्षित वाचून
यशश्री बिबॉ २१ अपेक्षित वाचून आली आहे . काल "जिथे Tea तिथे मी " असा शर्ट घातला होता आणि बरोब्बर चहा वरून उकरून उकरून भांडण केले.
नंतर एक बारीक पाखरू बसले हातावर तर त्याच्याशी बोलत वगैरे होती
काल त्या कार टास्क साठी योगेश ला सर्वात आधी सिलेक्ट करायला हवे होते , शक्तीचा टास्क होता. आधी आपल्या ग्रुप मधल्यांना घेऊ वगैरे काय ?! मला कळलेच नाही लॉजिक.
अरे म्हणजे आम्ही काही भलतंच
अरे म्हणजे आम्ही काही भलतंच बघतोय काय! कारचं टास्क न्हवतंच. येर्पोर्टवर बॅगा घेऊन काही टास्क करत होते.
ते पण किती गोडीगुलाबीने खेळत होते. अपूर्वा स्टाईल कचाकचा नको पण वादावादी करा की! कोणी बघत नाही करुन बॅंगावरच्या लेबलांची आदला बदल, बॅगा आधीच गायब करणे, हिसकवा हिसकवी, डील करायचं म्हणजे एकदा सांगायचं असं नसतं, परत परत पटवून द्यायचं असतं. काय function at() { [native code] }रंगीपणा नाहीच.
आता आज कार टास्क दिसेल बहुतेक.
कार टास्क विकासने खाल्ला.....
कार टास्क विकासने खाल्ला..... त्याच्याकडून इतक्या शक्तीची अपेक्षाच नसावी कुणाला!!
सध्यातरी सगळे भलतेच गुडीगुडी चाललेय...... पक्के ग्रूप झाल्याशिवाय मज्जा नाही
अमित ते बॅगांचे टास्क
अमित ते बॅगांचे टास्क कॅप्टनसी ची दावेदार ठरवण्यासाठी होतं. काल तो कार चा टास्क्च अॅक्चुअल कॅप्टन्सी टास्क होता, रोहित वि. क्षय. रोहित जिंकला.
मी अगदी हेच म्हणत हिते कि
मी अगदी हेच म्हणत हिते कि सर्वात आधी योगेश डिमांड मधे असेल पण शेवटी आणला त्याला
मागच्या वर्षी कितीही भांडाभांडी असली तरी जयने विशाल-मीनलला सिलेक्ट केले होते त्याच्यासाठी खेळायला !
कुठल्याही शक्तीच्या टास्कस्ना जय विशाल मीनल डिमांड मधे असायचे .
पार्कींगच्या टास्कमधे हाताला
पार्कींगच्या टास्कमधे हाताला तिखट वगैरे लावून यायला हवं होतं.
बि. बाॅ ला च बोअर होतील बहुतेक हे सगळे.
आजच्या चावडीवर ममां काही
आजच्या चावडीवर ममां काही ठिकाणी उगाच चवताळत होते.ते बघून असच वाटत होत की बिबॉसलाच मेसेज द्यायचा होता की बाबांनो काहीतरी करा रे,दुसर्याच आठवड्यात सिझन फ्लॉप जात आहे.
मला तर आता सिझन 2चे स्पर्धक आता सुपिरियर वाटायला लागले आहेत.
काही का असेना ,पण पहिले चार विक्स तरी शो हँपनिंग होता.बिचुकलेनी निदान मनोरंजन तरी केल होत.परागने डोक तरी चालवल.होत,शिवानीने घर पेटवल तरी होत.है बाहेर गेले आणि सिझन आपटला.
पण आता तर हे स्पर्धक खरच आधघचे सिझन्स बघून आले आहेत का अस वाटत.
मी आजही नाही बघितलं.
मी आजही नाही बघितलं.
एक प्रोमो बघितला त्यात म मां उगाचच अपूर्वावर डाफरत होते असं वाटलं, ती तशी शांत होती ना आठवडाभर. त्यांचे कपडे चित्रविचित्र होते.
काल ममां अमृताला म्हणाले,
काल ममां अमृताला म्हणाले, कुणी भांडत असतील तर तू का जाऊन गप्प बसवतेस त्यांना ...त्यांचं ते बघतील ना.
शप्पत सांगते...दया आली काकांची.
काल गोधडीसारखं काहीतरी लेऊन आले होते ममां.
सगळे जण त्यांना तुम्ही छान दिसताय असं का सांगतात काय माहीत.
निखील गेला ना, कालपासून
निखील गेला ना, कालपासून येतंय.
फार रटाळ चालु आहे सिझन,
फार रटाळ चालु आहे सिझन, ममांची चावडी भारी असते पण अजुनही कोणीच आवडत नाहीये !
एखादी धमाकेदार वाइल्ड कार्ड एंट्री लवकरात लवकर झाले पाहिजे, केतकी चितळे सारखी कोणीतरी काँट्रोव्हर्शियल !
काल ममांनी त्या रोहितला भारी टाँट मारला ‘टि शर्ट घाल‘ वरून
आजही वेळ नाही मिळाला बघायला.
आजही वेळ नाही मिळाला बघायला.
तसं रविवारी बोअर असतं म्हणा, कालचा वुटवर बघायला हवा.
>>सगळे जण त्यांना तुम्ही छान
>>सगळे जण त्यांना तुम्ही छान दिसताय असं का सांगतात काय माहीत.
अगदी अगदी..... त्यांना बघुन आमच्या सगळ्या बघणाऱ्यांची हीच रिॲक्शन होती की काय घालून आलेत आज हे! आणि मी म्हणालो सुद्धा की तरीसुद्धा आतले सगळे त्यांना म्हणतील की किती छान दिसताय तुम्ही वगैरे वगैरे आणि पुढच्याच मिनिटाला घरातल्या सगळ्यांकडून तीच रिॲक्शन आली
मांजरेकरांना उलटे बोलले की विषय वाढत जातो आणि सगळा वाद घालून परत माघारच घ्यावी लागते हे स्पर्धकांना कधी कळणार? काल काय त्या अपुर्वा आणि यशश्री वाद घालत होत्या त्यांच्याशी? प्रसादला ते अचूक कळलेले दिसतेय..... सगळे आरोप मान्य केले की त्यांच्या आरडाओरड्यातली निम्मी हवा निघून जाते
मानेना ऑडिशन वरुन मस्त शालजोडीतुन मारली मांजरेकरांनी.... ग्रूप हळूहळू पडायला लागलेत असे दिसतेय.... काल अमृता देशमुखला सेफ आहे हे सांगत सांगत जेंव्हा मांजरेकरांनी फिरकी घेतली तेंव्हाची प्रसाद आणि ग्रूपची एक्सायटमेंट बघितली का? निम्मे उठले होते ते जागेवरुन
निखिलसाठी वाईट वाटले पण त्यानेच मागचे एकदोन आठवडे स्वताच्याच पायावर धोंडा मारुन घेतला होता तरीही त्याला अजुन थोडा वेळ मिळायला हवा होता असे वाटले
तेजस्विनी दिवसेंदिवस आवडत चाललीय
ग्रुप्स धड बनत नाहीयेत, लोक
ग्रुप्स धड बनत नाहीयेत, लोक अजून ओपन अप होत नाहीयेत त्यामुळे मजा येत नाही असे मला वाटते. अजून कोणी कोणाशी खरं वागत नाही, हातचे राखून वाटतायत.त्यामुळे कुणाच्या दोस्त्या, लॉयल्टी, दुश्मन्या , दगाबाजी वगैरे दिसत नाहीत. असे चालत राहिले तर बोअर होईल.
योगेश, विकास , दोघी अमृता कधीही घरी जाऊ शकतात.
माने, अपूर्वा, यशश्री, तेजस्विनी, अक्षय, रोहित आणि रुचिरा, कदाचित त्रिशूल पण , हे नक्कीच कन्टेन्ट देऊ शकतील असे वाटते पण त्यांना अजून सूर सापडलेला नाही. प्रसाद अनस्टेबल वाटतो फार. समृद्धी काहीच उठून दिसत नाही.
मानेंनी लवकर काही फ्रेन्ड्स तयार नाही केले तर त्यांनाही कायम नॉमिनेशन मधे राहावे लागेल.
आजचा नॉमिनेशन टास्क म्हणजे
आजचा नॉमिनेशन टास्क म्हणजे निव्वळ नळावरची भांडण होती.
मी उशीराच लावलं, पावणेअकराला
मी उशीराच लावलं, पावणेअकराला वगैरे . फार इंटरेस्ट राहीला नाहीये आता. नॉमिनेशनवरुन कचाकचा एकमेकींशी भांडून बातमीत रहातात. दोन्ही अमृता, अपूर्वा, यशश्री भांडणात सहभागी होत्या. अपूर्वा माझे fans, माझे fans करत होती.
आज प्रसाद, अक्षय शांत होते.
मानेना पाठवा आता, काहीच करत नाहीत. आराम करतात, विकासला उचकवतात.
समृद्धी मला इंप्रेसिव्ह वाटते, कोणासारखी दिसते सांगता येत नाहीये पण फार ओळखीची वाटते. तेजस्विनी, रुचिरा पण इंप्रेसिव्ह वाटतात. टास्कबाबत नाही सांगता येणार, वावर आवड्तो .
रोहितच्या तोंडावरची (नाकावरची) माशीही हलत नव्हती आज.
प्रसादला खूप सपोर्ट आहे, हा सीझन तो जिंकेल बहुतेक पण अजूनतरी मला जिंकण्याइतकं पोटेन्शियल त्याच्यात किंवा कोणाच्यात वाटत नाहीये.
समृद्धी, तेजस्विनी आणि
समृद्धी, तेजस्विनी आणि डोक्यावर पडलेली नसेल तर यशश्री त्याच क्रमाने आवडल्या. रुचिरा ठीक आहे पण त्या रोहित मध्ये लुक्स सोडून काय बघितलं झाल्याने मंदच असावी वाटलं.
मुलांमध्ये त्यातल्यात्यात त्रिशुल ठीक आहे. पण तो असुन नसुन सारखाच प्रकार आहे. प्रसाद आला पुढे तर चांगला आहे, पण डोक्याने अस्थिर आहे. अक्षय आणि अपूर्वा एक नंबर इरिटेटिंग पर्सनॅलिटीज! समोर आल्या की डोकं दुखतं.
डोक्यावर पडलेली नसेल तर
डोक्यावर पडलेली नसेल तर यशश्री >>> हाहाहा, हे भारी आहे. मलाही यशश्री आवडते एरवी, इथेही सुरुवातीला आवडली होती पण कधी कधी विचित्र वागते. तिला मी एका हिंदी सिरियलमध्ये बघितलेलं, चांगला अभिनय केलेला.
अन्जु,
अन्जु,
समृद्धी स्मिता गोन्दकर सारखी वाटते मला.
हा आठवडा झाला तरी कोणीही फेवरेट नाही
Pages