Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिव आणि टीना सेटिंग होईल असा
शिव आणि टीना सेटिंग होईल असा माझा अंदाज आहे...
अरेरे ती टीना म्हणजे इचकी
अरेरे ती टीना म्हणजे इचकी आवडत नाही अजिबात.
एनिवे खरंच हिंदीचा खरंच वेगळा धागा काढा कोणीतरी.
एकही व्यक्ती माहीत नाही.
एकही व्यक्ती माहीत नाही.
ती अपूर्वा अत्यंत इरिटेटिंग आहे. प्रसादला भरपूर फुटेज मिळालं आणि तो चांगला वाटला. यशश्री मसुरकर आवडली.
हिंदी बघत नसले तरी शिव
हिंदी बघत नसले तरी शिव नॉमिनेशनमध्ये आला कधी तर लिहा, वोट्स देईन.
>>> आला .. पहिल्याच नॉमिनेशन मध्ये...
साजिद ला हुंगत फिरतोय.. हेच करत राहिला तर.. जाईल बाहेर लवकरच.. .
हिन्दी बिबी साठी वेगळा धव्गा
हिन्दी बिबी साठी वेगळा धव्गा काढला आहे ,
https://www.maayboli.com/node/82524
काल अपूर्वा दूर उभ राहून" अरे
काल अपूर्वा दूर उभ राहून" अरे ती पडत आहे अस ओरडली.संचालक आहेस ना ,मग जरा धाव ना.तू जाऊन पकड तिला.पण नाही.नुसती बोलबच्चनच ठरेल बहुतेक.
कालचा भाग प्रसादचा होता,पण त्यात फार काही केल नाही त्याने ,ह्या मुलीच सारख त्याला बोलायला ,समजवायला जात होत्या.आयत फुटेज मिळाल त्याला.
ब्रेकफास्टला तेजस्विनीला मसालेभात हवा होता.मग जेवताना ही काय खाते.?
एकंदरीत कँप्टन्सीचा टास्क हाणामारीत रद्द नाही झाला म्हणजे मिळवली.
प्रसाद एकटा फुल्ल कॅमेरा
प्रसाद एकटा फुल्ल कॅमेरा फुटेज खातोय , इतर लोक खरच अनॉयिंग आहेत, अपूर्वा अशक्य असह्य आहे !
समृद्धी आवडतेय मला !
टास्क्स बघताना हहपुवा झाली, पहिल्याच टास्कला मारामार्या, पिझ्याची फेकाफेकी
या सिझनचे लुक अलाइक्स :
निखिल : हिमेश रेशमिया
प्रसाद : सुबोध भावे
अपूर्वा : सीमा देशमुख
मेघा : दीपिका मुटियाला (इन्फ्लुअन्सर)
आला .. पहिल्याच नॉमिनेशन
आला .. पहिल्याच नॉमिनेशन मध्ये...>>> हो का, वोट द्यायला हवं. थॅंक यु.
काल अपूर्वा दूर उभ राहून" अरे ती पडत आहे अस ओरडली.संचालक आहेस ना ,मग जरा धाव ना.तू जाऊन पकड तिला.पण नाही.नुसती बोलबच्चनच ठरेल बहुतेक. >>> हो ना. ही दुसरी रेशम टीपणीस होणार, आराम करत रहाणार, हाताखाली एखादी स्मिता ठेवेल, तिला नाचवेल. रेशम नंतर काही टास्कस बरी वाटली, हीला तेवढं जमेल असं नाही.
त्या यशश्री का कोणी तिला मॅरीड आहे का विचारलेलं ना, तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही म्हणाली. जणू काय लपुन राहीलंय, काही वर्षांपुर्वी स्टार प्रवाहने तिची पहिली वटपौर्णिमा, तिच्या सासरच्या जवळच्या महिलांबरोबर करताना फोटो टाकलेले, नंतर तिचा डिवोर्स झाला हे ही कुठेतरी वाचलं. हे लिहायचं नव्हतं मला पण मीडियात आलेलं ते लपवून ठेवतेय. अर्थात न सांगणं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ऑलरेडी हे जाहीर झाल्याने, काही जणांना तरी माहिती असेल .
अंजूताई, तुम्ही बहुधा अपूर्वा
अंजूताई, तुम्ही बहुधा अपूर्वा नेमळेकर विषयी बोलता आहात. तिचे काही वर्षांपूर्वी मनसेशी संबंधीत एका नेत्यासोबत लग्न झाले होते पण आता तिने काही दिवसांपूर्वी एकटीच असल्याच सांगितले होते.
हो तिच्याबद्दल लिहिलं.
हो तिच्याबद्दल लिहिलं.
कोणीतरी काल विचारलं तेव्हा मला याविषयी बोलायचं नाही म्हणाली, पण आधीच महितेय बाहेर असं म्हणायचं आहे मला.
टास्क मात्र धड कोणी कोणाला खेळू देत नसल्याने, कोण चांगलं काही समजलंच नाही. मागच्यावर्षी असं व्हायचं पण मीनलचे एफर्टस जाणवायचे. काल मला काहीच समजलं नाही.
काही मुली चपळ आहेत मात्र.
मला प्रसादच हुषार वाटला काल
मला प्रसादच हुषार वाटला काल तरी. बरोबर कॅमेरा स्वतःवर ठेवला. बाकी लोक उगीच मुद्दाम त्याच्याशी पंगा तरी घेत होते किंवा बळेच समजावायला तरी जात होते कारण त्यांना कळले असावे याला कॅमेरा फूटेज मिळत असावे म्हणून. तोही जरा कुणाचेच एकही वाक्य खाली पडू न देता अर्ग्यू करत राहिला ते जरा जास्त वाटले मात्र.
कॅमेरावर दिसण्याची डेस्परेट धांदल 
नुस्ती हाणामारी.
ती यशश्री येड्यासारखी स्वतःशीच बोलत होती, "तू मूर्ख आहेस , का गेलीस त्याच्याशी भांडायला" वगैरे . किरण माने पण स्वगत
टास्क्स एकही धड होणार नाही असे दिसते सध्या तरी
बाकी सो कॉल्ड नॉमिनेशन कार्यात सगळ्या सांगकाम्यांनी त्या अमृता आणि निखिल ला टारगेट केलेले दिसले. ती मेघा तर काहीही कारणे देत होती नॉमिनेट करण्याची. मला वाटले प्रसाद अपूर्वा ला करेल पण त्याने तिचे नाव घेतले नाही इतके भांडण होउन. म्हणाजे ते भांडणच लुटुपुटीचे होते की प्रसाद ची काही आयडीया होती त्यात काय माहित. अपूर्वा खोटीच वाटते आहे अजून.
>>यशश्री येड्यासारखी स्वतःशीच
>>यशश्री येड्यासारखी स्वतःशीच बोलत होती>> हो! बराच वेळ समजलंच नाही ती स्वतःशी बोलत्येय.
बाकी पिझ्झा टास्क महान होत. नुसतीच मारामारी. गुडघा गँगच आहे सगळी. शनिवारी मांजरेकरांना बोलायला चिक्कार मट्रिअल आहे.
बघितलं तर म्यूट ठेवूनच बघतोय.
बघितलं तर म्यूट ठेवूनच बघतोय. सतत कचकच करतात
मी ही बरेचदा म्युट केलं आज.
मी ही बरेचदा म्युट केलं आज.
मला समृद्धी, अमृता, यशश्री या मुली आवडल्या.
आज प्रसाद एवढा निगेटिव्ह वाटला नाही, अपुर्वा वाटली.
मानेनी यशश्रीला बिग बॉसच्या आवाजात छान गडवलं.
सासरच्या आडनावबंधुने लावणी छान सादर केली.
हिंदी बरोबर रिलीज करून चूक
हिंदी बरोबर रिलीज करून चूक केलीय... माझासारखे लोक फक्त हिंदी बघतायत आता.. वेगवेगळा टाईम असता दोन्ही पहिले असते...
मागच्या वेळी मराठीला जास्त
मागच्या वेळी मराठीला जास्त टीआरपी होते ना. म्हणून ओव्हरकॉन्फिडन्स आला. पण दोन्ही जर एकाच चॅनेलवाल्यांचे आहेत तर व्यवसाय गणित काय आहे ? viewership कमी नाही का होणार ?
मराठीत दोन अमृता आहेत का ? एक
मराठीत दोन अमृता आहेत का ? एक मुख्यमंत्रीवाली आणि एक अजून आहे का ?
यशश्री ठार वेडी वाटतेय खरच,
यशश्री ठार वेडी वाटतेय खरच, मध्यरात्री पण बोल्स्त होती
ती विशाल निकमला कॉपी करतेय पण विशालचा स्वॅग होता, तो ंमाऊली‘ वगैरे स्वगत बोलायचा, त्याच्या इमेजला शोभायचं सगळं !
मराठीत दोन अमृता आहेत का ? एक
मराठीत दोन अमृता आहेत का ? एक मुख्यमंत्रीवाली आणि एक अजून आहे का ? >>> नाही, अपुर्वा लिहायचं होतं, चुकुन अमृता लिहीलं मी, एडीट केलं.
शिव ला बिलकुल वोट देऊ नका....
शिव ला बिलकुल वोट देऊ नका.... प्रचंड इरिटेट करतोय... लवकर बाहेर पडावा..
अमृता देशमुख आहे दुसरी, आई
अमृता देशमुख आहे दुसरी, आई कूठे काय करते मधल्या यशची सख्खी बहिण
फिनाले आणि एक दोन एपिसोडस
प्रिमियर आणि एक दोन एपिसोडस बघितले त्यावरूनचे माझे बनलेले प्रथमदर्शनी मत:


प्रसाद जवादे ज्याप्रकारे घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करत होता आणि त्यांचे काम पाहिल्याचे आवर्जून सांगत होता (एरवी हे सेलिब्रेटी लोक अश्या बाबतीत जरा शिष्ठपणा करतात) ते बघता तो आवडत्यांच्या यादीत जाणार असे वाटत होते पण पहील्या एपिसोडमध्ये तो डोक्यात गेला; नॉमिनेट झाल्यावर त्याचा अगदीच सूर हरवल्यासारखा वाटत होता पण काल परत भलताच फॉर्मात आला गडी..... शेवटपर्यंत टिकण्याचे पोटेंशियल आहे..... त्याच्या सो कॉलड ॲरोगन्समध्येही एक खट्याळपणा आहे.... मुद्दे मांडताना गंडतोय तो पण इतरवेळा क्विक विटेड वाटला
एंट्रीवरुन तो अक्षय पुढे जाऊन आवडेल असे वाटलेले पण एकंदर अजुनतरी फुसका बार वाटतोय.... काल त्या रोहितने त्याला ज्याप्रकारे लॉक करुन ठेवलेले ते बघता त्याचा शक्तीवाल्या टास्कमध्येही फारसा काही उपयोग नाही असे दिसतेय.
निखिल प्रिमियरला फारसा आवडला नव्हता..... एपिसोडभर फक्त आलेल्या पाहुण्यांना पाटी लावण्याची आठवण करुन देताना दिसला पण त्याने ज्या प्रकारे मेघा घाडगे चा मामा बनवला आणि कालपण त्या काउंटवाल्या मुद्द्यावरुन चक्क अपूर्वाला गप्प केले ते बघता डोकेबाज आहे आणि पुढेपर्यंत जाईल
योगेश एक उंची सोडली तर विशाल आणि शिवच्या साच्यातून काढल्यासारखा वाटतोय; थोडासा ग्रामीण बाजाचा; रांगडा पण भाऊक गडी पण त्याची ताकद आणि फायटर इमेज त्याच्याविरोधात जाऊ शकते कारण अश्यावेळी लोकांची सहानुभूती समोरच्याला मिळते.
विकास सावंत फार काळ टिकेल असे वाटत नाही शोमध्ये; जरा चुरस सुरु होताच हे आतले लोक वेगवेगळी कारणे देत त्याला नॉमिनेट करत राहतील असा अंदाज आहे.
त्रिशूल मराठे सरप्राईज पॅकेज ठरु शकतो पण आत्तातरी तो आवडत्या/नावडत्या कुठल्याच लिस्टमध्ये नाही आहे.
किरण माने यांच्याबद्दल साताऱ्यातल्या मित्रमंडळींकडून फार काही बरे ऐकलेले नाहीये; मध्ये एका कुठल्याश्या सिरीअलमध्ये बरीच कोंट्रोवर्सी पण झालेली म्हणे यांच्या सहकलाकारांशी एकूण वर्तणूकीवरुन तर ती इमेज बदलायची एक चांगली संधी त्यांच्याकडे आहे; बघू ते त्याचा किती लाभ घेवू शकतात ते!
तो रोहित शिंदे प्रिमियरला अज्जिबात आवडला नाही (डंब वाटला) आणि काय फिल्मी उत्तरे देत होता. त्याची आणि रुचिराची केमिस्ट्री फक्त डान्समध्ये दिसली आणि तो फेव्हऱिट थिंग्स वाला टास्क घेऊन मांजरेकरांनी त्या केमिस्ट्रीतली हवाच काढून घेतली
रुचिरा मात्र त्यामानाने स्मार्ट उत्तरे देत होती मांजरेकरांना आणि काल तिने त्या केकचे प्रेझेंटेशनही अतिशय स्मार्टली दिले अपूर्वाला त्यामुळे ती आवडत्या स्पर्धकांच्या लिस्टमध्ये जाऊन बसली.
अमृता देशमुख आवडली; आत्तापर्यंत फारशी चमकली नसली तरी तिचा वावर सकारात्मक वाटला
यशश्री प्रिमियरला फारशी आवडली नव्हती पण कालच्या एपिसोडमध्ये ती एकदम मजेशीर वाटली...... she is adding much needed fun element in otherwise annoying environment.
अपूर्वा पुऱ्या तयारीने आलेली दिसतेय (अगदी attitude दाखवणारे टीशर्ट वगैरे घेउन).... तिने दोन दिवस भरपूर कचकच केली पण असे लोक लागतात शेवटपर्यंत बिगबॉसला (जरी त्यांना जिंकवत नसले तरी)
तिने हाच टेंपो कायम ठेवला तर फिनालेपर्यंत जाईल.
मेघा घाटगे मागच्या सीझनच्या सुरेखाताईंचा वारसा चालवणार असे दिसतेय
बाकी महिला मंडळ (अमृता धोंगडे, समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारे) आतापर्यंतच्या एपिसोडमध्ये पुरेश्या प्रकाशझोतात आलेल्या नाहियेत त्यामुळे त्यांचाबदल विशेष अशी काही मते बनलेली नाहीत!!
अर्थात पहील्या आठवड्यात बनलेली मते आणि बांधलेले आडाखे सीझन जसाजसा पुढे सरकू लागतो तसेतसे बहुतांशी बदलत जातात हा गेल्या काही सीझनचा अनुभव आहेच!
बाकी यावेळही बिग बॉसचे घर नेहमीसारखेच आधीच्या सीझनपेक्षा वरचढ आहे.
बिग बॉसच्या आवाजमध्ये प्रत्येक सीझनला व्हेरिएशन्स नकोत; त्या आवाजात एक कन्सिस्टंसी हवीच!
काय करायचे ते व्हेरिएशन फॉर्मेट मध्ये आणि टास्क मध्ये करा.... तिथे तोचतोचपणा नको
बाकी मांजरेकरांवर वीकेंडच्या चावडीनंतरच बोलू!!
फिनाले म्हणजे शेवटचा भाग ना?
फिनाले म्हणजे शेवटचा भाग ना?
भरत, बरोबर आहे तुमचे फिनाले
भरत, बरोबर आहे तुमचे फिनाले नाही प्रिमीयर म्हणायचे होते
करतो दुरुस्त!!
धन्यवाद!!
तुरू , स्पर्धकांची नावं आणि
तुरू , स्पर्धकांची नावं आणि फोटो हेडरमध्ये देता येतील का?
इथे मिळतील
https://indianexpress.com/article/entertainment/television/meet-bigg-bos...
अमृता देशमुख आहे दुसरी, आई
अमृता देशमुख आहे दुसरी, आई कूठे काय करते मधल्या यशची सख्खी बहिण >>> हो हो. तीच आवडली मला, लिहून विसरले. धोंगडे नाही आवडली. आता आडनाव पण लिहायला लागेल. preets28 थँक यु.
अपुर्वाच्या ऐवजी मी अमृता लिहीलं ते चुकीचं लिहीलं, ते एडीट केलं .
तो त्रिशुल ४२ वाटत नाही. तो
तो त्रिशुल ४२ वाटत नाही. तो कॉमन मॅन पण नाहीये, मॉडेलिंग वगैरे केलंय, या क्षेत्रात धडपडतोय, आता कलर्स रोल देईल. कॉमन मॅन म्हणत उगाच घेतलं त्याला. मॉडेल म्हणून घ्यायचं.
काल लावणी केलेले २ कोण होते.
काल लावणी केलेले २ कोण होते. एक मला वाटते अक्षय. दुसरा कोण?
मला पण प्रसाद आतापर्यन्त स्मार्ट प्लेयर वाटला. मुलींपैकी रुचिराची एक पॉझिटिव वाइब आहे. पण सध्या फार फुटेज मधे नाहीये ती. अपूर्वा कैच्या कै इरिटेट होतेय. तिलाच भयंकर अॅरोगन्स आहे जरी ते ती स्वतः प्रसाद ला म्हणत असली तरी. यशश्री समहाऊ बरेच फुटेज घेतेय. पण अजून आवडत अशी नाहीये.
स्वरूप तुमचं विश्लेषण आवडलं.
स्वरूप तुमचं विश्लेषण आवडलं.
हो अपुर्वा अतिशय निगेटिव्ह वाटतेय. माने तिच्या स्वभावाबद्दल काही म्हणाल्यावर लगेच उसळली. प्रेक्षकांचा गैरसमज होईल माझ्याबाबतीत वगैरे.
प्रसाद नाही काल निगेटिव्ह वाटला, परवा वाटलेला मला.
अपूर्वा निगेटिव्ह शेड मुळेच फायनलला असेल.
रुचिरा काल केकबद्दल सांगताना इंप्रेसिव्ह वाटली.
काल लावणी केलेले २ कोण होते.
काल लावणी केलेले २ कोण होते. एक मला वाटते अक्षय. दुसरा कोण? >>>>>>> प्रसाद जवादे
Pages