Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुरू , स्पर्धकांची नावं आणि
तुरू , स्पर्धकांची नावं आणि फोटो हेडरमध्ये देता येतील का?
इथे मिळतील>> भरत, मला मजकुरात फोटो अपलोड करायला जमत नाहीये . मी फोटो मोबाईल गॅलरी मध्ये सवे केले आणि मजकुरात image द्या वर क्लिक केलं ,तिथे file अपलोड केली ,select केली पण तिथे पुढे save करायचा ऑप्शन दिसत नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.
मोबाईलमध्ये insert file चा options दिसत नाही . लॅपटॉप वरून upload केले
दिसताहेत फोटो.
दिसताहेत फोटो.
आपला मराठी बिग बॉस सिझन ४
आपला मराठी बिग बॉस सिझन ४
थीम :चाळ
चाळीतील व्यक्तीरेखा
१)चाळीची खडूस मालकीण -अपूर्वा नेमळेकर
२) चाळीतला स्वाभिमानी म्हणून मालकीणीला खुपणारा तरुण -प्रसाद जावदे
३) नुकताच मिसरूड फुटलेला पण स्वतःला डॉन मानणारा हिरो - अक्षय केळकर
४) नुकतेच लग्न होऊन चाळीत रहायला आलेले जोडपे -रुचिरा आणि रोहित
५)चाळीतल्या बबली गर्ल्स -समृध्दी ,अमृता देशमुख
६) खोडसाळपणा करणारी मुलगी - यशश्री मसुरेकर
७)सर्वांवर नजर असणारे काका- निखिल राजेशिर्के
८)सगळ्यांच्या खबरी काढून पारावर बसलेले रिकामटेकडे - तिकडी ..अर्थात माने ,जाधव आणि सावंत
९)मालकिणीच्या हो ला हो करणार्या - तेजस्विनी आणि अमृता
१०) कोणाच्या अध्यामध्यात न करणारे - मेघा आणि एअरटेल बॉय
बघा पटतंय का

Cp
भारी आहे एअरटेल बॉय म्हणजे
भारी आहे
एअरटेल बॉय म्हणजे कोण?
एअरटेल.बॉय म्हणजे त्रिशुल .
एअरटेल.बॉय म्हणजे त्रिशुल .
त्रिशूल मराठे एअरटेल बॉय.
त्रिशूल मराठे एअरटेल बॉय.
भारी आहे हे तुरू.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=MohudYJV8DU
श्रेयस तळपदे पिक्चर प्रमोशन साठी येत असावा.
एअरटेल वाला नावालाच सामान्य
एअरटेल वाला नावालाच सामान्य माणूस आहे...तो किती तरी वर्ष मॉडेल fashion industry मध्ये आहे... Fashion प्रियांका चोप्रा च्या जलवा fashion का है जलवा गाण्यात आहे मॉडेल म्हणून रॅम्प वर.. ४२वर्षाचा आहे पण छान maintain आहे
काल किरण माने ने यशश्री ला
काल किरण माने ने यशश्री ला मस्त बकरी बनवलं...गॅलरी मध्ये बसून बिग बॉस च्या आवाजात सूचना देत होते..की माईक चालत नाही तुमचा .. स्टोअर रूम मध्ये या..ती मंद गेली पण आणि दार उघडत नाही बिग बॉस असं म्हणून तिकडे बसून राहिली..सगळ्यांना सांगत सुटली बिग बॉस ने सांगितलं आहे मला ...
तिने रिक्षा मध्ये बसून घेतलेली मुलाखत पण छान खुमासदार.. ती छान हसनेबल प्रसंग देते....
निखिल मठ्ठ आहे, माने यांनी
निखिल मठ्ठ आहे, माने यांनी उल्लू बनवलं त्याला.
मी प्रसादची लावणी बघितली नाही, दुसरा performanceही नाही त्यामुळे तिथे काही म्हणू शकत नाही पण बायगो बायगो जास्त चांगलं वाटलं, तिथे पॉइंट मिळायला हवा होता.
जिंकलेल्या टीममधल्या रुचिरा आणि अमृता दे पण म्हणत होत्या की तिसरा मार्क त्या दुसऱ्या टीमला द्यायला हवा होता . सो स्वीट ऑफ देम.
अपूर्वा डोक्यात जाते as usual .
मला हा सिझन म्हणजे मागच्या
मला हा सिझन म्हणजे मागच्या सिझनचं कंटिन्युएशन वाटतय टास्क्स च्या बाबतीत , सगळे टास्क्स कॅन्सल

मागच्या सिझनला उत्कर्ष आणि विकासने लावणी केली होती .
अपूर्वा वागायला , आवाज आणि स्क्रीन प्रेझेन्स सगळच अनबिअरेबल , तिची ती स्पॉटबॉयची डेड बॉडी फ्लाइटने आणली गोष्ट पण क्रीपी होती !
प्रसादच स्मार्ट आहे सर्वात , रुचिरा -रोहितही बरे आहेत !
पण ओव्हरॉल सिझन आणि भांडणे टिसरी ड व्हरायटी चालु आहेत, त्यात अक्षय- प्रसाद भांडणं एकदम तिसरी व्हरायटी
हिन्दी सिझन बरा चालु आहे मग सरप्रायजिंगली , मागच्या सुपरफ्लॉप सिझन कडून धसका घेतलेला दिसतोय !
प्रसादवर पब्लिक खुश आहे असं
प्रसादवर पब्लिक खुश आहे असं दिसतंय. तो अपूर्वाला नडतो ना त्यामुळे त्याचा त्याला फायदा होईल.
एक कोणीतरी जबरदस्तं अनॉयिंग
एक कोणीतरी जबरदस्तं अनॉयिंग निगेटिव असल्याशिवाय दुसरा हिरो होत नाही, बिबीचा नेहेमीचा पॅटर्न!
पण हे सगळं माहित असूनही, सगळे सिझन रट्टा मारून पुन्हा त्याच चूका कसं काय करतं पब्लिक काय माहित !
हो ना.
हो ना.
पण कितीही अनॉयिंग वागली , वाद
पण कितीही अनॉयिंग वागली , वाद झाले तरी कुणीही त्या अपूर्वाशी अॅक्चुअल पंगा घेत नाही आहे हे लक्षात आले का? तिच्याशी भांडण होऊन पण तिला नॉमिनेशन मधे टाकण्याची संधी असताना प्रसाद ने केले नाही. तिला कॅप्टनशिप च्य उमेदवारी मधून बाद करण्याची संधी असताना कुणी केले नाही. तिला कुणीही कुठे टार्गेट करत नाहीये. असं का?
मिनिमम गॅरेंटी घेऊन आली असेल,
मिनिमम गॅरेंटी घेऊन आली असेल, १० आठवडे मिनिमम बरेच सेलिब्रिटीज घेऊन येतात !
प्रसाद कालच्या भागात आवडला...
प्रसाद कालच्या भागात आवडला... तो नॉर्मल बोलला तरी ती शेवंता नुसती वसवस करत अंगावर येते....
त्या शेवंता ला विनर वगैरे केलं तर खूप च नॉनसेन्स गिरी होईल.... चीप आहे खूप ती...
तिला साधी मस्करी पण आवडत नाही किंवा समजत नाही... नुसतं स्क्रीन वर दिसायचं म्हणून भांडणं करत फिरत असते... फुल निगेटिव्हीटी च भांडार
कालच्या भागात किरण मानेंनी
कालच्या भागात किरण मानेंनी निखिलला चक्क मँनिप्यलेट केल ,आणि हा नुसत ऐकत होता.किरण माने काहीही सांगत होते,क्रायटेरिया,परफेक्शन काहीही ,जस काहघ स्वत: बिरजूमहाराजच आहेत ,महागुरू असते तर एकवेळ ठीक होत.
आणि हख फक्त ऐकत होता.खरच उल्लू बनत होता की प्रसादच्या टीमला जिंकवून ,आपल्या टीमकडून बोलणी खाऊन मग सोमिवर सिम्पथी घ्यायची असा विचार करत होता ,त्याच त्यालाच माहित.
पण ड्युएटमध्ये नक्कीच टीम बी सुपिरियर होती.
पुरुषांनी बाईच्या वेशात लावणी सादर करण हा कॉन्सेप्टच मला आवडत नाही,त्यामुळे मला दोघही नाही आवडले ,त्यातल्या त्यात मग अक्षय बरा होता .निदान लवणी करताना स्लिवलेस शक्यतो घालत नाहीत या कॉश्च्युम पॉइंट वरून तरी निखिलने वाद घालायला हवा होता ,तो पण नाही.
ग्रुप डान्स मला तरी कोणाचाही नाही आवडला.
का माहित नाही,पण यशश्री, रुचिरा सोडल्या तर बाकीच्या मुली मला अजूनही डंब वाटत आहेत.
अपूर्वा मँडम जीवाचा आटापिटा करत आहेत कदाचित मेघासारख होण्याचा पण ममां शनिवारी नक्कीच आरसा दाखवतील.
गरबा अजिबात आवडला नाही,ती चोणकर तर चक्क काही ठिकाणी बेसुर झाली.
गेल
या वेळी मिनल,मीरा,सोनाली किती छान नाचल्या होत्या.अगदी कुडची सुध्दा.
आता मेधा,यशश्री चांगल्या वाटत आहेत.
अम्रुता आर जे आहे,पण तो स्मार्टनेस दिसत नाही.
कदाचित ममां जाग कलतील
कारण आजकाल मां चक्क चावडीवर टीप्स देतात.चावडी चक्क महत्वाची झाली आहे.
काल चक्क प्रसाद कमी दिसला, पण टीम जिंकल्याने आनंदात होता.पंगा घेतला नाही.
स्मार्टली खेळत आहे.
बघू आता कँप्टन कोण होत ते.ःपण काल यशश्रीने शेवंताबाईंशी थोडा का होईना पण पंगा घेतलाच.
तो अक्षय कळव्यातला आहे...
तो अक्षय कळव्यातला आहे... त्याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होताच... तो पण अर्धा चड्डीतला डॉन वाटतो.... उगाच शो ऑ....
यशश्री जरा ओके आहे
यशश्री जरा ओके आहे
ती दुसरी अमृता धोंगडे पहिल्या च दिवशी हुशार बनत होती ,आता दिसत च नाहीय.
बाकी पोरी बर्या आहेत
समृद्धी, यशश्री, मेघा, रुचिरा आवडतात... तेजस्विनी पण छान आहे...
शेवंताला नाही जिंकवणार,
शेवंताला नाही जिंकवणार, शेवटपर्यंत नेतील, निगेटिव्ह लोकं bb ना हवीच असतात. शेवटी आपटवतात. ती डॉनगिरीच करतेय.
समृद्धी, अमृता दे, रुचिरा, यशश्री आवडल्या. अमृता दे ला सर्वांनी नॉमीनेट केलं तरी सकारात्मक वागते सगळ्यांशी.
विरुद्ध ला एकही पॉईंट मिळाला नाही म्हणून रुचिरा, अमृताला वाईट वाटलं, मनाने चांगल्या असाव्यात.
बिग बॉस खेळतात मस्त, बदला घ्यायची संधी निखिलला दिली पण निखिल संचालक म्हणून zero होता, मला मान्य नाही, अनिर्णित ठेवा, पहिल्याच फेरीला म्हणू शकला असता.
माने बायसड.
अपूर्वा भयंकर बाई आहे...
अपूर्वा भयंकर बाई आहे... कोणाशीच म्हणजे कोणाशीच धड बोलत नाही. आवाज आणि चेहेर्यावरचे भाव बघुन वाटतं की कोणाच्या तरी अंगावर धावुन जाईल पुढच्या क्षणाला
प्रसाद कधी चांगला वाटतो कधी वैताग येतो. त्याने चांगलं वागलं तर पुढे जाईल.
रुचिरा आवडली. खूप पॉझिटीव्ह आहे वावर. ऱोहित दिसतच नाही कुठे, स्मार्ट नेस नाही अगदीच.
लोणारी ला अजुन समजत नाहिये कुठे जावं. कधी अपुर्वा च्या मागे जाते तर कधी रुचिरा.त्यामुळे ती चाचपडत आहे.शनिवारी ठरवेल बहुतेक
माने, योगेश आणि विकास ठीकठाक.
यशश्री, अमृता दे, अमृता तिघी ओके.
समृद्धी आवडतेय.
समृद्धी, रुचिरा यांची मैत्री बघायला आवडेल. दोघी कूल आहेत. विनाकारण वाकड्यात शिरत नाहीत.
निखिल मठ्ठ
मानेंनी काल भारी लपेटलं
मानेंनी काल भारी लपेटलं शब्दात त्या निखिलला

डिसिजन ऐकून अक्षय ,अपूर्वा आणि यशश्री चवताळल्या होत्या नुसत्या
काल प्रसाद नाही दिसला, माने जास्तं दिसले आणि यशश्री पण फुटेज घेत होती , नंतर अपूर्वाशीही भांडली !
कालच्या टास्कमध्ये मला सतत
कालच्या टास्कमध्ये मला सतत वाटत होत की कुणाच्यातरी डोक्यात त्या सोन्याच्या विटा चोरण्याची किंवा तसा प्रयत्न करण्याची आयडिया यावी.पण एकानेही तस केल नाही.
मागच्या सिझनचे असते तर त्या विटा जागेवर राहिल्याच नसत्या आणि त्या आधीच्या मेघा,सई, नेहाने वगैरे चोरल्या असत्या.
दुसर्या राउंडला तर दोघी कँप्टंन्सी उमेदवार सांगत आहेत की नोटा फाडायच्या नाहीत ,तू तुझ्या आणि मी माझ्या गोळा करणार.
अरे,अस असत का बिबॉस? तिथे राडाच करावा लागतो.
बिबॉसने कितीही सांगितल.की नियम पाळा,तरी ते पाळायचे नसतातच.बिबॉसलाच राडा हवा असतो.
हे रहिवासी म्हणजे अगदीच मॉंटेसरीत्ला सारखे," आई,मला लागल टाईप आहेत.काल ती सम्रुध्दी लागल.म्हणून केवढी रडत होती,एवढ काय लागल.होत,पहिल्या सिझनमध्ये रूतुजा अक्षरश:रोपट लावण्याच्या टास्कमध्ये घुसली होती.आणि हात मोडुन घेऊन बाहेर गेली होती.ःअगदी एवढ नाही,पण सम्रुध्दी ला काही फार लागल नव्हत.
ते वरन नोटा फेकणारे पण डोक लावत नव्हते.काही नोटा लपवून त्या गुपचुप उमेदवाराच्या हातात द्यायच्या.
डोक लावताना कोणी दिसलच नाही.
नो ढकलोफाईंग खिचोफाईंग
नो ढकलोफाईंग खिचोफाईंग मारोफाईंग इति- तेजु
हो ना नोटांचं टास्क बिनडोकपणे
हो ना नोटांचं टास्क बिनडोकपणे खेळले गेले अगदी. काहीच ट्विस्ट नाहीत.
अपुर्वा एखादी मालकीण असावी तसे तिचे काही चमचे तिच्याशी सतत बोलत असतात ते फार इरिर्टेटिंग वाटते बघायला. समृद्धी आवडेल असे वाटले होते पण सध्या नाही आवडत आहे. उगीच आपले रडणे काय. आणि मला लागले तेव्हा कोण बघायला आले अन मला चिअर का केले नाही यावरून भांडत अन रडत होती. काल जरा दिसले तरी माने अजून आपला प्रभाव पाडू शकले नाहीयेत. त्या मेघाने आवाज काढल्यावर शेपूटच घातले पार. ट्वीट करणे अन शो चा रेव्ह्यू लिहिणे जमले तरी तिथे अॅक्चुअल खेळताना इन्फ्लुअन्स करणे किती अवघड असते ते कळत असेल आता. मला आता यशश्री आणि अमृता आवडतायत. प्रसाद बरोबर चालला आहे पण त्याने टिकवला पाहिजे त्याचा टेम्पो. साइअडलाइन होता कामा नये. काल तिजोरीसाठी कुस्ती फनी होती. रुचिराला रोहित म्हणत होता तुला असे काही झाले तर मी ऐकून घेऊ शकणार नाही वगैरे. पण तो बॅकफूट ला आहे फारच. त्याने उलट अशी संधी शोधून तिला प्रोटेक्ट / डीफेन्ड वगैरे केले तर पब्लिक च्या नजरेत हिरो व्हायचा चान्स आहे त्याला.
>>कालच्या भागात किरण मानेंनी
>>कालच्या भागात किरण मानेंनी निखिलला चक्क मँनिप्यलेट केल ,
निखिलचे सोडा त्या विकासला अगदीच खिश्यात घालून ठेवलय.... त्याला वॉशरुममध्ये त्या दोघींनी जे पेटवले होते की वाटले आता हा जाउन फुटणार बाहेर मानेंवर पण कसचे काय!!
निखिलला माहित होते ते गुंडाळतायत पण त्याला त्याचे मुद्दे नीट मांडता येत नव्हते; तसेही चंद्रावरचे खड्डे आणि त्यात अडखळून पडणे वगैरे कुणालाही न कळलेली क्रिएटिव्हिटी वगैरे मुद्द्यांसमोर तो तरी बिचारा काय बोलणार
त्याला कळले होते की त्याने माती खाल्लीय आणि त्याने ते मान्यही केले पण त्याचा तिसऱ्या राउंडचा गुणही A ग्रूपला देऊन टाकण्याचा निर्णय योग्य होता असे मलातरी वाटले कारण तो एक गुण घेउन हे जिंकणार तर नक्कीच नव्हते पण त्यामुळे A वाल्यांना जिंकल्याचे समाधान फारसे मिळाले नाही हे मात्र अगदी जाणवले
माने, योगेश आणि विकास मध्ये मला insecurity triangle दिसला; म्हणजे बाकीच्या लोकांबरोबर (वेगवेगळ्या कारणांमुळे) यांचे सूर सहजी जुळणार नाहीत हे त्यांनी ओळखले आणि मग पुढे जायला एकतरी भिडू सोबत असावा म्हणून योगेशने पण "बडेमियां-छोटेमियां" करुन विकासला पटवण्याचा प्रयत्न केला आणि मानेंनी तर विकासवर फुल्ल जादूच केली.
अपूर्वा आणि प्रसादने किंवा फॉर दॅट मॅटर मानेंनी संचालकपद पण encash केले तसे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये चान्स असुनसुद्धा योगेशला करता आले नाही.
बाकी सगळी भांडणे म्हणजे अगदी 'मला लागलेले तर तू विचारलेस नाहीस' पासून 'तुम्ही आम्हाला चिअर का नाही केले' ते अगदी 'चोम्या-लोद्या पर्यंत' अगदीच वाढीव होती
बाकी ते सॅम (समृद्धी) टास्कमध्ये तिच्याबाजुने खेळण्यासाठी रुचिराला जे टोचन देत होती की मी मागच्या गेमध्ये तुला चान्स मिळावा म्हणून माघार घेतली; तेंव्हापासूनच माझ्या डोक्यात माझी टीम तयार होत होती वगैरे ऐकून काहीच्या काही हसलो
श्रेयसचा वावर (नेहमीप्रमाणेच) किती सहजसुंदर होता.... कुठेही स्टारडमचा बडेजाव नाही की काही नाही..... मस्त मजा आणली त्याने
अचानक youtube ला बिग बॉस
अचानक youtube ला बिग बॉस मराठी संबंधित बरेच फीड येऊ लागलेत..... आजकाल कुणीही उठतोय आणि रिव्ह्यू करतोय!!
बर आपल्यासारख्यांचा इथे लिहताना थोडाफार नावात गोंधळ झालेला एकवेळ समजू शकतो पण बिग बॉस मराठी च्या रिव्ह्यूसाठी फेमस असलेले एकेक नावाजलेले (म्हणे) यूट्यूबर्स पण नावात इतका गोंधळ घालतायत; बर अजुन पहिलाच आठवडा आहे त्यामुळे चेहरे अजुन पुरेसे ओळखीचे झालेले नसतील तसेच हे लोक online live वगैरे करतात त्यामुळे थोडाफार बोलण्याच्या ओघात गोंधळ होत असेल हे पण आपण समजू शकतो पण निदान नावांचे उच्चार तरी किमान नीट करा.... जवादे ला जावडे काय म्हणतात; नेमळेकर ला नेमलेकर काय म्हणतात; निम्मे लोक मेघा घाटगे म्हणतात तर निम्मे मेघा घाडगे म्हणतात!!
हे रोजच्या रोज रिव्हू देणारे; त्या रिव्ह्यूजचा एकूण दर्जा आणि त्यांचे व्ह्यूवर्स/फॉलोअर्स बघितले की गंमत वाटते
आजची चावडी तरी फारशी खास नाही
आजची चावडी तरी फारशी खास नाही वाटली.कंटाळा आला.बेजान वाटली.
ममांच पण आता तेच तेच बोलण होत आहे.
काल समृद्धी कॅप्टन झाली ते
काल समृद्धी कॅप्टन झाली ते आवडलं. तरी समृद्धी लागलं, मी रडले पण ह्याने माझी चौकशी केली नाही, त्याने केली नाही हे म्हणत बसली ते आवडलं नाही.
चावडी पूर्ण बघता आली नाही, मध्ये मध्ये बघितली. अपूर्वाच्या आवाज चढवण्याबद्दल झापले ते बरं झालं.
केळकरला follower म्हणाले अपूर्वाचा ते उत्तम झालं.
अ ने आणि तेजस्वीनी पैठणीत छान दिसत होत्या.
Pages