Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, नाही. ती नव्हती त्यात. तेव्हा ती हिंदी सिरीयल्स करत होती.>> Ooh search केलं.. चंद्र आहे साक्षीला मध्ये ऋतुजा बागवे होती...स्वरदा आणि ऋतुजा किती सारख्या दिसतात

मी पण ओपनिन्ग सेरेमनी बघत नाही फार रेन्गाळवतात. तिसरा सिझन फारच गाजला होता आता बघु यात काय होतय, दुसरा सिझन महाबोर होता.

बिबॉचा धागा काढल्याबद्दल तुरुचे अभिनन्दन! मी काढणार होते खरतर, पण वेळ नाही मिळाला.>> हा हा ..धन्यवाद सुलू.. भरत यांनी सांगितलं तस केलं..मला माहित नव्हता कसा काढायचा ते.. सोप्पंय..तरीच काही मंडळी धडाधड धागे आधी काढत होती Lol नवीन आलेल्या प्रोमो मध्ये शेवंता दिसतेय... इला इला शेवंता हय इला वाटता.. पण इथे येऊन तीच असलेलं glamour जाणार..खऱ्या जीवनात ती साधीच रहात असावी..आणि सकाळची तोंड बघायला मिळाली की अजूनच.. please flying kiss वाली कोणी नसावी बाबा त्या सरांगे सारखी.. ती सारांगे हिंदी मध्ये एवढी कशी famous आहे माहित नाही . आणि दुसऱ्या प्रोमो मध्ये खलनायक साकारतो बऱ्याच मालिकांमध्ये तो प्रसाद जावडे

शेवंता ताराराणी मधे राणी चेन्नमा होती. अर्थात तिला शेवंताच्या रोलमुळेच बोलावत असतील, अण्णापण येणार आहेत असं मागे ऐकलेलं.

शिव ठाकरे खरच आहे का हिंदीमध्ये.जय होता अस ऐकल होत.जयच ठीक आहे पण शिव असेल तर कठीण आहे.
गेल्या वेळी हिंदीला मागे टाकल म्हणून यावेळीही अगदी हिंदीबरोबरच मराठी सिझन चालू करत आहेत.त्यासाठी अगदी मराठीची वेळ पण बदलली आहे.
पण मराठीला मराठी ऑडियन्स जास्त मिळेल .गँम्बलिंग आहे.

जय टीकेल हिंदीत, मारधाड करेल.

शिव डीफेन्सिव खेळेल बहुतेक. चांगलं वागून टीकतात का तिथे, एकदाच शिव मराठीत चुकलेला, आरोहला चावला तेव्हा.

हिंदी ओटीटी आहेना हे की मेन सिझन टीव्हीवरचा .

मेन सिझन आहे.कालपासून चालू झाला.
शिव आहे.
मराठीमध्ये वीणा होती,हिंदित कुठलीही वीणा याला भाव देईल अस वाटत नाही.मेघासारखी माती नको खायला.
बघू किती आठवडे टिकतो.

जय नाहीये, शिव ठाकरेच आहे, चक्क इतर डंब हिन्दी काँटेस्टन्ट्स पुढे उठून दिसला !
साजिद खान कॉन्टेस्टन्ट म्हणून आलाय हिन्दीत Uhoh , २ सिनेमे फ्लॉप झाल्यापासून गेले ४ वर्ष काम नाही म्हणे , अ‍ॅरोगन्स वाढला आणि रिअ‍ॅलिटी चेक फेस करायला इथे आलोय म्हंटला.. या लॉजिक नुसार लवकरच बॉलिवुडचे बरेध लोक सलमान खान सकट बिबी हाउस मधे कॉन्टेस्टन्ट बनून जातील Proud

एक नक्की. लोकांना आता अक्कल आली असणार. मायनॉरिटी ग्रुपमध्ये रहा. विशल्यासारखे वेडे चाळे करा. जिंका.
विकास- मिनल- सोनाली यांना मिस करणार.

पहिला कॉमनर मराठी बिबॉसमधला.त्रिशुल मराठे.
हा खरच चांगला खेळला तर जाईल पुढे.कॉमनर असल्याने पप्ब्लिक सपोर्टसाठी बिबॉसच ठेवेल घरात काही आठवडे.

यशश्री मसुरकर, ती घाऱ्या डोळ्यांची मुलगी आणि तो dude मुलगा यांना कुठे तरी पहिल्यासारखं वाटतंय, कुठे ते आठवत नाही

ओह किरण माने आलाय का ?
दर वर्षी तो बिबी क्रिटिक्स बनून फेसबुक पोस्ट्स लिहिल्तो, खूप काँट्रोव्हर्सी मधे होता इतक्य्सत !

मी बाहेर गेलेले, आले तेव्हा नवरा चक्क मराठी bb बघत होता. तो धिप्पाड, उंच माणूस आला, तेव्हापासून बघितलं.

कलर्स मराठी डायरेक्ट कोणीच नाही यंदा.

यशश्री मसूरकर आर जे कधी झाली, पूर्वी एका हिंदी सिरियलमध्ये बघितली होती, चेहेरा सोज्वळ आहे. अमृता देशमुख पण आर जे कधी झाली. या दोघी आवडतात.

अमृता धोंगडे >>> म्हणजे मिसेस मुख्यमंत्री का.

ओह किरण माने आलाय का ? >>> हो, तो दिसला.

तो कॉमन man, personality चांगली वाटली.

तो dude मुलगा यांना कुठे तरी पहिल्यासारखं वाटतंय, >>> हिंदी, मराठी सिरियलमध्ये बघितलं आहे, नाव लक्षात नाही. अक्षय केळकर नाव त्याचं (youtube वर बघितलं ). तो निखिल राजेशिर्के पण आहे का, परीचा बाबा म्हणून आलेला तो.

मेन सिझन आहे.कालपासून चालू झाला. >>> अच्छा, थॅंक यु.

विकास- मिनल- सोनाली यांना मिस करणार. >>> हो ना, मीनलला जास्त. तिच्यावर अन्याय झालाच.

ते कपल आहे, त्यांच्या फॅमिलीची ओळख नाही करून दिली.

त्यांच्यात फुट पडायचा bb नक्की प्रयत्न करणार.

नेहमीप्रमाणे हरीश दुधाडे, शर्वरी लोहकरे, समीर परांजपे, नेहा जोशी, सायली संजीव इत्यादी नावांची केवळ चर्चाच झाली, ह्यापैकी कुणीही बिग बॉस च्या घरात नाही. ह्याही हंगामात बरीचशी अशी मंडळी आहे ज्यांची करिअर कुठेतरी अडखळल्यासारखी झाली आहेत, नव्याने सुरुवात करायला कदाचित बिग बॉसची मदत होईल ह्या उद्देशाने आली असावीत असे माझे मत आहे.

बिग बॉस मध्ये कॉमन मॅन स्पर्धक कसा निवडतात? बऱ्याचश्या वृत्तपत्रांनी कुणीतरी त्रिशूळ मराठे कॉमन मॅन स्पर्धक असून त्याची एअरटेल लकी कॉलर माध्यमातून निवड झाल्याचे वृत्त दिले आहे. पण आंतरजालावर शोध घेतला असता तो मॉडेल व सोशल मीडिया स्टार असून काही चित्रपट व अल्बममध्ये छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये झळकला आहे. मग तो कॉमन मॅन कसा? कॉमन मॅन स्पर्धक तर सामान्य प्रेक्षकांतून निवडलेला असावा.

रच्याकने अंजूताई, 'गॉसिप आणि बरेच काही' ह्या सोनी मराठीवरील सेगमेंटमध्ये मनवा नाईक व मुग्धा गोडबोले - रानडे नुकत्याच येऊन गेल्या, त्यांनी केवळ आम्हा दोघीनांच 'किल्वर' माहीत असल्याचे सांगितले.

किरण माने सोडले तर कोणीही ओळखीचं नाही. अपूर्वा ऐकून माहीत आहे.
गेल्या वेळचा अनुभव पाहून बिग बॉसने कॅप्टन स्वतः:च् निवडला आणि कामाची वाटणीही आधीच केली.

मांजरेकर माझी बॅटवालं वाक्य फारच मिस करतं होते. ते जिला ऐकवलं तिनेही परतफेडीची छोटा चिमटा काढलाच. यंदाचेही काही जण मांजरेकरांना दबणार नाहीत असं वाटतं.

बिग बॉसच्या आवाजात अजिबात दम नाही.

शनिवारी आणि काल सकाळी थोडं हिंदी पाहिलं. तिथेही एक कमी उ़ंचीचा माणूस आहे.

रच्याकने अंजूताई, 'गॉसिप आणि बरेच काही' ह्या सोनी मराठीवरील सेगमेंटमध्ये मनवा नाईक व मुग्धा गोडबोले - रानडे नुकत्याच येऊन गेल्या, त्यांनी केवळ आम्हा दोघीनांच 'किल्वर' माहीत असल्याचे सांगितले. >>> सहीच. त्यांना तरी माहीतेय का, की सगळं सावरायला जमत नाहीये म्हणून फेकाफेकी.

समीर परांजपे सिरियलमध्येच स्मृती जाऊन परत असणार आहे. ह्याची किती वेळा स्मृती घालवतात, गोठमध्येही घालवलेली. त्यापेक्षा bb त आला असता तर बरं झालं असतं.

त्या हिंदी bb त पहिल्या एपिसोडला जास्त फुटेज त्या साजिद आणि तो टिल्लू कोण आहे त्यालाच दिलंय. बोअर वाटला. मी सोडून दिलं साजिदला जास्त बघून.

त्यात ती इमली आणि इच्छा दिसली. इमलीला म्हणून मारलं की काय सिरियलमध्ये. इमली फायनलला नक्की, इचकीचे पण चान्सेस आहेत, शिव जाईल फायनलला, साजिदला नेतील हे लोक्स. इमली, इचकी दोघी आवडत नाहीत.

Pages