Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे ते गाणं! PS 1 म्हणजे
छान आहे ते गाणं! PS 1 म्हणजे काय? हिंदीत येणार आहे का हा?
प्ले स्टेशन 1 असेल असा अंदाज
प्ले स्टेशन 1 असेल असा अंदाज ट्रेलर वरून
मैत्रेयी,
मैत्रेयी,
PS म्हणजे पोन्नयिन सेल्वन चा शॉर्टफॉर्म आहे.
तामिळ भाषेतली खूप गाजलेली हिस्टोरिकल फिक्शन अशी पाच भागांची कादंबरी आहे,
गुडबायचा ट्रेलर आवडला पण
गुडबायचा ट्रेलर आवडला पण मुव्ही बराचसा रामप्रसाद कि तेरहवी सारखाच वाटतोय.
पुष्पा मधे अजिबात इम्प्रेसिव्ह न वाटलेली रश्मिका इथे बरि वाटली.
निना गुप्ता मस्त दिसतायत.
https://www.youtube.com/watch?v=n5gICDMQOcA&ab_channel=BalajiMotionPictures
गुडबाय ट्रेलर आवडला. फक्त
गुडबाय ट्रेलर आवडला. फक्त हल्ली ट्रेलर मध्येच सगळं दाखवतात आणि याहुन अधिक काहीच नसतं तसं नसूदे!
आयुषमान चा तो गायनॅकवाला
आयुषमान चा तो गायनॅकवाला मुव्ही ट्रेलर बोअर वाटला.
गुड बाय ची थीम रामप्रसाद की तेरहवी, पगालाईट सारखीच आहे. शिवाय मराठीत एक कैद्यांना शिक्षा म्हणून दाखविण्याच्या लायकीचा कारखानीसांची वारी नामक चित्रपट होता तसाच. एक थीम घेतली की तीच कॉपी करत सुटतात. पुष्पा फेम रश्मीकाला चष्मीष्ट आधुनिक रोल देणं म्हणजे जास्वंदाबाई जयसिंगपुरकरला चटणी वाटताना दाखवण्याटाईप वाटलं. पण बच्चन फॉर्ममध्ये वाटतोय आणि 'जयकाल महाकाल 'गाणं आवडलंय.
मजा मा- माधुरी दीक्षितच्या या मुव्हीत माधुरी गुजराती मध्यमवयीन स्त्री, तिचा नवरा, मुलगी, मुलगा, होणारी सून सुनेचे आईवडील असा संच पाहून काहितरी चांगलं असेल असं वाटलं. मग पुढे every family has secrets.
पण possible spoiler alert-
यात सिक्रेट काय तर म्हणे माधुरी लेस्बियन असते (असं सो मि वर वाचलं.) प्रत्येक मुव्हीत हे LGBT लटांबर कशाला आणतात कळत नाही. माधुरी ट्रेलरमध्ये गुजराती, लेस्बियन, नवऱ्या मुलाची आई यातलं काहीही वाटत नाही. ती माधुरी दिक्षितच वाटते आणि झलक दिखला जा च्या सेटवर वावरावं तसं तटस्थ वावरते.
आयुषमान चा तो गायनॅकवाला
आयुषमान चा तो गायनॅकवाला मुव्ही ट्रेलर बोअर वाटला.
>>>> +१
मलापण.
सोनाक्षी सिन्हा आणि हुमा
सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी चा 'डबल XL' ट्रेलर बघितला. फनी आहे. सई-प्रियाच्या 'वजनदार' सारखा असावा बहुतेक.
आयुषमान चा तो गायनॅकवाला
आयुषमान चा तो गायनॅकवाला मुव्ही ट्रेलर बोअर वाटला.
>>> + 1 होप मुव्ही चांगला असो...ओढून ताणून विनोद वाटले..
कपडा उपर करिये... तट्टी पेशाब... स्पेशली शेवटचा -इन्हे सही जगह पता नही है ये गलत जगह घुस जाते है... कायच्या काय ...
Zwigato ह्या कपिल शर्माच्या
Zwigato ह्या कपिल शर्माच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्याचा अभिनय ट्रेलरमध्ये तरी बरा वाटतोय.
https://youtu.be/GkOV2-q01Nc
https://youtu.be/GkOV2-q01Nc
दृश्यम २
टीजर आला लोकहो...
कडक... पहिल्या द्रिश्यम ची
कडक... पहिल्या द्रिश्यम ची फुल स्टोरीच दाखवलीय...
आदिपुरुष टीझरच्या खाली
आदिपुरुष टीझरच्या खाली (युट्यूबवर) जवळपास सर्वच प्रतिसाद वाचनीय आणि 'रोचक' आहेत
रामाचं वर्णान्तर आणि रावणाचं
रामाचं वर्णान्तर आणि रावणाचं धर्मान्तर
आणि वानरसेनेचं स्पिश्यांतर
आणि वानरसेनेचं स्पिशीजांतर
भीषण आहे तो आदीपुरुष
भीषण आहे तो आदीपुरुष
वानरसेनेचं स्पिशीजांतर>>>
एक चमचा प्लॅनेट ऑफ एप्स, थोडं गेम ऑफ थ्रोन्स, ज्यूरसिक पार्क, हॅरी पॉटर आणि बाहुबली ची फोडणी असा काला करून एक भयाण डिश सादर केलीये
बघितला कि मी सिनेमा द्रुश्यम
बघितला कि मी सिनेमा द्रुश्यम टु..
कसला भंपक ट्रेलर आहे
कसला भंपक ट्रेलर आहे आदिपुरुषचा.
जपानी ऍनिमेटेड रामायण कडून काहीतरी शिकायला हवे होते. नुसते सीजीआय आणि मारामारी दाखवून रामायण बनत नाय.
कसला भंपक ट्रेलर आहे
कसला भंपक ट्रेलर आहे आदिपुरुषचा.>>>>> +111000
रावण रावण न वाटता सैफ अली खान
रावण रावण न वाटता सैफ अली खान वाटतो
ठिके तानाजी हिट झाला
पण म्हणून सारखा तोच तोच गेटप, तीच माणसं वापरायची का?
अश्याने बायोपिक म्हणजे सुबोध भावे तसं पौराणिक नवा पिक्चर म्हणजे दाढी काजळ धारी सैफ अली खानच व्हिलन असं टाईप कास्ट होईल.
मला काही इतका वाईट वाटला नाही
मला काही इतका वाईट वाटला नाही.
रामानंद सागरांचं रामायण क्रिंजी होतं ते पब्लिकने डोक्यावर घेतलं होतं. त्यापेक्षा असं रामायण बघायला मला आवडेल.
रामानंद सागर यांचं रामायण
रामानंद सागर यांचं रामायण म्हणजे, चार नव्या हौशी विद्यार्थ्यांनी छोटंसं नाटक करून पहावं त्या ऐवजी एखाद्या नाटककाराची सगळी नाटके तालमीच्या भानगडीत वगैरे न पडता सलग करून टाकलीत असं वाटलं.
तर आदिपुरुष ट्रेलर म्हणजे एखादी भरपूर अँक्शन असलेल्या पिरियड फिल्मचा न जमलेला प्रयत्न वाटला.
रामायण वाटतच नाही ते.
सुबोध भावेच्या 'हर हर महादेव'
सुबोध भावेच्या 'हर हर महादेव' चा टीझर बघितलात का? राज ठाकरेंचा आवाज आहे background ला म्हणे. आणि शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आहे. सुबोध शिवाजी महाराज of course!
बालगंधर्व, टिळक, काशिनाथ
बालगंधर्व, टिळक, काशिनाथ घाणेकर ते शिवाजी महाराज! आता पुढची भूमिका कोणाची करेल?
एवढं वाचून शेवटी उत्सुकतेने
एवढं वाचून शेवटी उत्सुकतेने पाहिला टिजर आदिपुरूष चा
आदिपुरुष ट्रेलर म्हणजे एखादी भरपूर अँक्शन असलेल्या पिरियड फिल्मचा न जमलेला प्रयत्न वाटला.
रामायण वाटतच नाही ते. >>> मानवाशी एकदम सहमत
सुबोध भावे कोणत्याही अँगल ने
सुबोध भावे कोणत्याही अँगल ने महाराज दिसत नाही कारण त्याचं नाक च बाकदार नाही....
रामायण आदीपुरुष चा टिझर आवडला...
हल्ली बघितलेल्यात शरद केळकरच
हल्ली बघितलेल्यात शरद केळकरच महाराजांच्या रोलमध्ये परफेक्ट वाटतो.
मांजरेकर...
मांजरेकर...
आदिपुरुषच्या राम रावणात फार
आदिपुरुषच्या राम रावणात फार काही वावगे वाटले नाही.
बहुधा आपल्या डोक्यात राम रावण यांची मालिकेतली ईमेज फिट्ट बसली आहे त्यामुळे वेगळे काही आपण अॅक्सेप्ट करत नाही.
तान्हाजी मला रुचला नव्हता कारण त्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांशी छेडछाड करून त्यांना स्पेशलईफेक्टच्या मदतीने सुपरहिरो बनवणे पटले नव्हते.
पण ईथे राम रावण ही पौराणिक पात्रे असल्याने त्यांना प्रत्यक्षात कोणी पाहिले नाहीये. तो श्रद्देचा भाग आहे. जर कोणी श्रद्धा / भावना न दुखावता त्यांना जरा वेगळ्या स्वरुपात प्रेजेंट करत असेल तर यांच्याबाबत ही लिबर्टी अलाऊड असावी. बाकी लोकांचे काय, उद्या खरेखुरे राम रावण आले तर त्यांनाही तुम्ही काही बरोबर राम रावण वाटत नाही म्हणतील
असो, ट्रेलरवरून चित्रपट कसा असेल याचा फार अंदाज येत नाही.
आपण जी जे जुने लोक पहातो,
आपण जी जे जुने लोक पहातो, त्यांचा पेहराव, त्यांचे हावभाव, फार जुने नाही पण चलचीत्रे जेव्हापासून सुरू झाली तेव्हा पासून, पाहिलेले यावरूनही एक अंदाज येतो.
शिवाय काय त्या उंच उड्या, काय तो भल्या मोठ्या पक्ष्यांचा थवा इत्यादि.
रियलॅस्टिकते पासुन प्रचंड दूर वाटते.
रामानंद सागरचे सुद्धा जवळ वाटले नाही, वेगळ्या कारणाने.
कॅमेरा तुझ्यावर आला की तू नाक फेंदार, तू कॅमेरा दिसताच भयंकर राग आला आहे असा अभिनय कर, तू रड आणि तू हस अशा दिग्दर्शशनाततून बनल्या मुळे दोन तीन एपिसोड्सच्यावर पहाणे ते ही शक्य नव्हते.
श्रद्धा भावना वगैरे गोष्टी कधीच मानल्या नाहीत.
एक पिरीयड चित्रपट करायचा आहे जो अजिबात जमलेला वाटत नाही.
Pages