४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.pewresearch.org/religion/2022/09/13/modeling-the-future-of-r...

अमेरिकेत सध्या साधारण ३०% लोक अधार्मिक आहेत (नास्तिक, आज्ञेयवादी किंवा 'नन' म्हणजे कोणत्याही धर्माशी स्वतःला न जोडून घेणारे.) खुद्द ३०% हा आकडा गेल्या ५०-६० वर्षांच्या आलेखावर पाहिला तरी खूप जोरदार वाढ आहे.

तर, प्यु रिसर्च च्या गणितानुसार, असेच चालू राहिले तर २०७० पर्यंत अधार्मिक लोक अमेरिकेत बहुसंख्य असतील.

इंटरेस्टिंग. ३० टक्के आकडा जास्त वाटतो. पण एथिस्ट लोक बरेच आहेत हे खरे. माझ्या ओळखीतही आहेत. अजूनही इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन्स हा सर्वात मोठा वोटर ब्लॉक (bloc) आहे अमेरिकेत असे साधारण समजले जाते. ट्रम्पच्या विजयात यांचाच वाटा होता. त्याने त्यांना दिलेले कॉन्झर्वेटिव्ह् न्यायाधीश नेमणे हे प्रमुख आश्वासन पाळले, असेही वाचले.

अजूनही इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन्स हा सर्वात मोठा वोटर ब्लॉक (bloc) आहे अमेरिकेत असे साधारण समजले जाते >> मोठा व्होटर बॉल्क असणे नि लोकसंख्येमधे अधिक असणे दोन्ही भिन्न असू शकते का ? मूळात व्होटींग कोण करू शकते ह्याबद्दलच एव्हढे वादंग आहेत नि त्यात प्रत्यक्षात व्होट करणे नि व्होटींग साठी एलिजिबल असणे ह्यातही जमिन अस्मानाचे अंतर आहे.

स्पेशल प्रॉसक्यूटर ने पहिल्याच फटक्यामधे धमाल उडवली आहे बाकी. बाकी इथल्या तात्याच्या टोप्या उडवणार्‍यांचे एकंदर मार -लागो प्रकरणाबद्दल काय मत आहे ?

मोठा व्होटर बॉल्क असणे नि लोकसंख्येमधे अधिक असणे दोन्ही भिन्न असू शकते का ? >>> मला तसेच वाटते. उदा: पूर्वी भारतात मुस्लिम मतदार हा एकगठ्ठा मते देणारा ब्लॉक समजला जात असे. त्यांना इग्नोर करून कोणीही निवडून येउ शकत नाही असा समज होता (याउलट लोकसंख्येने प्रचंड असलेला हिंदू मतदार पार उजव्या ते पार डाव्या विचारांमधल्या मोठ्या रेंजमधे विस्तारलेला होता). २०१४ पासून भाजपने तो समज बदलला, बहुसंख्यांना चुचकारून. इथेही ओबामाच्या निवडीनंतर इमिग्रण्ट लोकांना डावलून कोणी यापुढे निवडून येऊ शकणार नाही व रिपब्लिकन पार्टीला इमिग्रण्ट सपोर्ट कमी होत चालला होता असे चित्र होते - त्यामुळे त्यांच्यापुढे तो प्रश्न होता. पण या इव्हॅन्जेलिकल ब्लॉक ला चुचकारून तो त्यांनी सोडवला.

प्रत्यक्षात व्होट करणे नि व्होटींग साठी एलिजिबल असणे ह्यातही जमिन अस्मानाचे अंतर आहे >>> हो Happy आणि यावर आणखी म्हणजे सगळ्या जेरीमॅण्डरिंग व जाचक नियमांच्या कचाट्यात तुम्हाला प्रत्यक्ष वोटिंग करता येणे - यातही Happy

बाय द वे, आपल्या हिंदूराष्ट्रासारखी इकडे अमेरिका हा ख्रिश्चन देश करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. बहुतांश रिपब्लिकन्स समर्थनात आहेत म्हणे. अर्थात इथे कायमच ख्रिश्चन प्राबल्य आहेच. असणारच आहे. मला त्यात काही प्रॉब्लेम नाही. बहुसंख्य लोकांचा धर्म हा जनरल लाइफ मधे सतत दिसणारच.

मार-ला-गो केस म्हणजे ज्यांना लीगल बाबींमधे इंटरेस्ट आहे त्यांच्याकरता खूप एंगेजिंग आहे.

यात सध्या दोन वेगळ्या कोर्टांमधे केसेस उभ्या आहेतः

फ्लोरिडा डिस्ट्रिक्ट कोर्ट - इथे ट्रम्पच्या वकिलांनी जज आयलिन कॅनन यांच्यापुढे केस दाखल केली होती. या जज ट्रम्पनेच नेमलेल्या व ट्रम्प पराभूत झाल्यानंतरही हाउसने कन्फर्मेशन केलेल्या आहेत. केवळ ट्रम्पने नेमेलेले जज लगेच त्याच्याबाजूने निर्णय देतात असे नसते. गेल्या दोन वर्षांत अनेक अशा जजेस नी त्याच्या विरोधात निर्णय दिलेले आहेत. त्याची सबळ कारणे आहेत. त्यामुळे ट्रम्पविरोधी मीडीया जर हे ऑब्व्हियस असल्यासारखे सांगत असेल तर ते सोडून द्यायचे. ते ही त्यांच्या एको चेंबर मधेच असतात. पण या केस मधे या जजने नक्कीच ट्रम्प टीमला बेनिफिट ऑफ डाउट दिलेला आहे. या जजवर त्यामुळे प्रचंड टीका होत आहे.

त्याचे कारण हे - ट्रम्पने या केस मधे स्पेशल मास्टर नेमायची मागणी केली. ती या जजने मान्य केली. याचीच मुळात गरज नव्हती. कारण हे डीओजे व एफबीआय वर धडधडीत अविश्वास दाखवल्यासारखे आहे. मूळचे सर्च जे झाले ते ही एफबीआयच्या मनात आले आणि घुसले असे होत नाही - त्यावरही एका मॅजिस्ट्रेटची सही लागते, आणि अशा सर्चला मान्यता द्यायला एखाद्या मॅजिस्ट्रेटला जर स्वतःच्या करीयरची चिंता असेल तर त्यानेही किती रिव्यू केला असेल विचार करा.

तरीही इथपर्यंत ठीक आहे. मात्र ते करताना जी १०० टॉप सिक्रेट कागदपत्रे आहेत तीही डीओजेने वापरता कामा नयेत ही आडकाठी या जजने घातली. म्हणजे एक प्रकारे तुमचीच कागदपत्रे याने परवानगी शिवाय घेतली पण केस सुरू असेपर्यंत तुम्ही ती वापरू शकत नाही असे डीओजेला ती सांगत आहे. एखादे टॉप सिक्रेट कागदपत्र हे तसे का आहे हे सर्वस्वी सरकारच्या मर्जीवर असते - कोर्ट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. कारण त्याबद्दलची माहिती कोर्टाकडे असणे शक्य नसते. असा हस्तक्षेप करणे हा कोर्ट केसेसच्या दृष्टीने चुकीचा प्रीसीडण्ट होउ शकतो - वगैरे वगैरे. बहुधा वरच्या कोर्टात ते रद्द केले जाईल. पण मुळात या जजनेच ही कागदपत्रे या रिव्यूच्या बाहेर ठेवायला हवी होती.

आता या जजने नेमलेल्या स्पेशल मास्टरने पहिलाच प्रश्न ट्रम्प टीमलाच विचारला - की तुम्ही ही कागदपत्रे डि-क्लासिफाय केलेली आहेत का? ती त्यांनी केली असल्याचे पुरावे दाखवले तर डीओजे ला अगदी लगेच ती कागदपत्रे वापरता येणार नाहीत. पण ट्रम्प टीम ने त्याबद्दल काही बोलायलाच नकार दिला. बाहेर पब्लिक मधे त्यांनी अनेकदा तसा क्लेम केला आहे पण कोर्टात एकदाही ते म्हंटलेले नाही (२०२० च्या निवड्णुकींच्या क्लेम मधे हेच प्रकार ते करत). मग आता तुम्हीच दाखल केलेल्या केस मधे तुम्हीच जर ठाम सांगत नसाल, तर मूळ कागदपत्रांवर जे "टॉप सिक्रेट" मार्किंग आहे तेच ग्राह्य धरायला हवे - असा त्या स्पेशल मास्टरचा बहुधा अ‍ॅप्रोच असेल. "You can't have your cake, and eat it too" या वाक्याने त्याने तोच सिग्नल दिला आहे.

हा जज तात्या च्या टीमनेच मागितला होता. डीओजे ने तो मान्य केला होता. एकाच दिवसात आपली घोडचूक त्यांच्या लक्षात आली असेल.

हे वरचे डिस्ट्रिक्ट कोर्टबद्दल. त्यावरच्या "अपेलेट" कोर्ट मधे - म्हणजे ११ व्या सर्किट कोर्ट मधे डीओजे ने या १०० कागदपत्रांबद्दलच्या त्या जजच्या निर्णयाबद्दल अपील केले आहे. हे ११ वे अपील कोर्ट त्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वर आहे - त्यांचे निर्णय डिस्ट्रिक्ट कोर्ट नाकारू शकत नाही.

स्थानिक कोर्टाच्या निर्णयावर अपील करण्याकरता ही सर्किट कोर्ट्स आहेत. एकूण ११. कोणत्या भागात खटला आहे त्यावरून कोणते कोर्ट तो घेते हे ठरते. यांच्या निकालाविरूद्ध फक्त सुप्रीम कोर्टातच खटला येउ शकतो, तो ही त्यांनी घेतला तरच. वेस्ट कोस्टवरच्या लोकांनी 9th circuit court वगैरे बातम्यांतून अनेकदा ऐकले असेल. तसे हे जॉर्जिया, फ्लॉरिडा वगैरे करता ११ वे कोर्ट.
https://en.wikipedia.org/wiki/United_States_courts_of_appeals

तेथे डीओजे सांगत आहे की त्या सगळ्या रिव्यू मधून अमेरिकेच्या हितासंबंधी असणारी ही १०० कागदपत्रे वेगळी काढा व त्याबद्दल सगळी आडकाठी रद्द करा. त्याला आजच काहीतरी भोंगळ उत्तर ट्रम्प टीम ने दिलेले आहे. त्यावर आज बहुधा निर्णय येइल अपील कोर्टाकडून. या कोर्टाने ती १०० कागदपत्रे वेगळी काढली तर सरकारचा मार्ग मोकळा होईल. बाकी ती केस पुढे कितीही काळ चालू राहिली तरी सरकारला त्यात काही अडचण नसेल.

आज ट्रम्प टीमने या कोर्टाला सांगितले की हे सगळे फारच गोंधळाचे व अतिरंजित होत चालले आहे. Duh! यांनीच कारण नसताना सगळा कांगावा केला. त्या सर्चला यांनीच प्रसिद्धी दिली. त्यानंतरही निमूटपणे कागदपत्रे देउन टाकण्याऐवजी अडवणूक करत राहिले. फॉक्सवर फेकाफेकी करत राहिले.

त्यावरच्या "अपेलेट" कोर्ट मधे - म्हणजे ११ व्या सर्किट कोर्ट मधे डीओजे ने या १०० कागदपत्रांबद्दलच्या त्या जजच्या निर्णयाबद्दल अपील केले आहे = तेतसे करणार ह्याचे सूतोवाच केल्यावरही जज आयलिन कॅनन ने स्पेशल मास्टर चटाचटा नेमून गाडे पुढे ढकलले ह्याबद्दल लीगल कम्न्युनिटी जे म्हणते आहे ते मजेशीर आहे. त्यांछ्या मते जज आयलिन कॅनन ने आपण आपल्या आवाक्याबाहेर चा भाग हाताळला ह्याची जाणीव झाल्यामूळजास्पेशल मास्टर कडे ढकलले. आता उद्या सर्किट कोर्ट्ने ओव्हररूल केले तरी तात्याच्या डोळ्यांमधे जज आयलिन कॅनन सेफ राहणार.

आज ट्रम्प टीमने या कोर्टाला सांगितले की हे सगळे फारच गोंधळाचे व अतिरंजित होत चालले आहे. Duh! यांनीच कारण नसताना सगळा कांगावा केला. त्या सर्चला यांनीच प्रसिद्धी दिली. त्यानंतरही निमूटपणे कागदपत्रे देउन टाकण्याऐवजी अडवणूक करत राहिले. फॉक्सवर फेकाफेकी करत राहिले. >> तात्या फेक नि फेकू आहे हे काही नवीन ज्ञान नाही, पण एकंदर त्याचे वकिल जे युक्तीवाद करत आहेत तो कोर्टात उभा राहणार नाही हे न कळण्याएव्हढा माठ आहे हे पण ह्या केस मधे लक्षात येत आहे. ह्यासाठी त्याने जी अमाउंट दिली आहे वकिलांना ती बघता इसापनिती मधल्या माकड नि मांजरांची गोष्ट आठवते. Happy

नॉर्थ डाकोटा मध्ये एका डेमोरॅटाने एका अठरा वर्षांच्या मुलाला केवळ 'तो रिपब्लिकन आहे' म्हणून गाडीखाली चिरडून मारले.
आणि थेरडोबांच्या मते 'फॅसिस्ट' मागा रिपब्लिकन्स आर द ग्रेटेस्ट थ्रेट टू डेमोक्रसी.
#FJB

मला हा माणूस म्हणजे डेमोक्रॅटांचं आणि त्याची गाडी अमेरिकेचं प्रतीक वाटतं Lol Lol
व्हेन यू आर सो ब्लाईंडेड बाय हेट, यू डोन्ट नो व्हेर यू आर हेडेड!

द सन हे मुर्डॉक चे वर्तमानपत्र आहे. फॉक्स न्यूज सारखे. फेअर नि बॅलन्संड .
खर्‍या खोट्याचा पत्ता नाही. खरे असेल असे ते म्हणतच नाहीत.
विश्वास ठेवणारे कशावरहि विश्वास ठेवतील.
फॉक्स ने सांगितले की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो तर त्यावरहि विश्वास ठेवतील. त्याला काय अक्कल गहाण ठेवून द्वेष विकत घ्यायचा.

नि डेमोक्रॅट्स हि कमी नाहीत. एमेसेन्बीसी ने सांगितलेले सगळे खरेच!

एकूण उगीच कशावरहि विश्वास ठेवू नये - आपल्याला ज्याचे काही देणे घेणे नाही त्यावर भांडयचे कशाला?

नाही, नाही, सगळे व्हिडीओ खरेच असतात! सगळ्या बातम्या पण खर्‍याच असतात! विशेषतः फॉक्स न्यूजवरच्या नि मुर्डॉकच्या वर्तमानपत्रातल्या.
फक्त आपण विश्वास ठेवू नये. किंवा एका घटनेवरून सर्व डेमोक्रॅट्स तसेच असतात असे म्हणू नये.
आठवा बरे - There are some good people on both sides
कोण बरे म्हणाले होते?

काल अपेक्षेप्रमाणे ११ व्या सर्किट कोर्टाने त्या १०० कागदपत्रांवरचे खालच्या कोर्टाने घातलेले बंधन काढून टाकले. आता डीओजे ती चेक करू शकतात व पुढच्या इवेस्टिगेशनकरता वापरू शकतात. हे ट्रम्प आधीही देऊ शकला असता. बळंच वेळ काढला.

ती त्याने परवानगीशिवाय नेली वगैरे सगळे जरी एक मिनिट बाजूला ठेवले, तरी त्या कागदपत्रांमधे त्याला नक्की काय इंटरेस्ट आहे याचा पत्ता नाही. त्यानेच काहीतरी त्यावर खरडले असावे (हा ही एक अफलातून क्लेम त्याच्या टीमने केला होता - आम्ही त्यावर लिहीले आहे म्हणून ते कागद आमच्या मालकीचे आहेत. टॉप सिक्रेट डॉक्युमेन्ट्स!!!) व त्यामुळे इतर खटल्यांत तो गोत्यात येऊ शकतो अशीही शक्यता असावी.

न्यू यॉर्क अटर्नि जनरल लटीशिया जेम्सने ट्रम्प आणि त्याच्या मुलांविरुद्ध टॅक्स फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉडचा खटला भरला आहे.
https://www.google.com/amp/s/abc7ny.com/amp/donald-trump-letitia-james-t...

काल तात्याची फॉक्सवरची मुलाखत पाहिली. डि-क्लासिफिकेशन्वर अजूनही डबल डाउन करत आहे. त्यावर धमाल मीम्स आल्या आहेत

- जो बायडेन ने आज मनातल्या मनात ती सगळी कागदपत्रे पुन्हा रि-क्लासिफाय केली
- (तात्या लॉजिक ने प्रेसिडेण्टकडे सर्वाधित्कार असल्याने) जो बायडेन ने आज परस्पर हंटर बायडेन बद्दलची सर्व कागदपत्रे डि-क्लासिफाय करून हंटरकडेच सुपूर्द केली Happy

बॅक टू सिरीयसनेस - मग हे लोक कोर्टात का तसा दावा करत नाहीत? त्याचे कारण म्हणजे असले दावे यापूर्वीच अनेक कोर्टांत फेटाळले गेले आहेत. त्या प्रीसीडन्स मुळे हे ही मान्य होणार नाहीतच.

कालच्या मुलाखतीतील एक रत्न : "I declassified EVERYTHING" Happy

तरी त्या कागदपत्रांमधे त्याला नक्की काय इंटरेस्ट आहे याचा पत्ता नाही. त्यानेच काहीतरी त्यावर खरडले असावे (हा ही एक अफलातून क्लेम त्याच्या टीमने केला होता >> अरे त्याच मुलाखतीमधे त्याने 'मी मनात आणले' म्हणजे झाले , कळवायची गरज नाही ' असे काहीतरी बरळले आहे. त्याला मते देणार्‍यांना कसला उल्लू बनवलाय हे दाखवून द्यायचा विडाच उचललाय जणू त्याने Happy

मोरोबा, बेक्कार प्रकार आहे हा. फक्त हा मक्ता डेमोक्रॅट्स चा नाही हे तुला वेगळे सांगायची गरज नसावी. हिलरी बद्दल तात्याने सुरू केलेल्या प्रेमळ गर्जना आठवत असतीलच तुला म्हणा (ज्या अजूनही तात्या मधेच टआईममधे मागे गेल्यासारखा अधे मधे बरळत असतो) .

अरे त्याच मुलाखतीमधे त्याने 'मी मनात आणले' म्हणजे झाले , कळवायची गरज नाही ' असे काहीतरी बरळले आहे >>> Happy हो त्यावरच त्या मीम्स आल्या आहेत. की बायडेन ने काल मनात आणून ऑलरेडी रि-क्लासिफाय केली आहेत Happy किंवा पूर्ण सरकारात गोंधळ आहे की एखादे कागदपत्र समोर टॉप सिक्रेट दिसत असले, तरी ओळखायचे कसे की हे अजून क्लासिफाइड आहे की नाही. कारण तात्याच्या मनात चार वर्षात त्याबद्दल काय येउन गेले कोणास ठाउक Happy त्यात तो म्हंटला आहे की सगळीच कागदपत्रे डि-क्लासिफाय केलेली आहेत त्याने.

बाय द वे, वरती तू लिहीलेस तसे जज आयलिन ने स्वतःवर येउ नये म्हणून तो उद्योग केलेला दिसतो. वरच्या कोर्टात रद्द होईलच (आणि तसेच झाले). पण तात्यालोक आपल्याला शिव्या घालणार नाहीत असा स्टान्स असेल Happy "मैने अपना काम किया" टाइप.

बाकी समस्त तात्या लोकांना हिलरीची एव्हढी भिती अजूनही का वाटते देव जाणे ! हॅनिटि मुलाखतीमधेही 'एफ बी आय हिलरीची एमेल्स शोधायला मार लागो मधे गेले असू शकेल' असे एक शेंडा बुडखा नसलेले 'नरो वा कुंजरोवा' विधान तात्याने सोडून दिले आहेच. आता तात्या हिलरीची ईमेल्स घेऊन तब्बल चार वर्षे 'ह ला वेलांटी हि, र ला वेलांटी री - झाले हिलरी' असे वाचत होता कि काय ? आणी होती तर चार वर्षे काय ती डी -क्लासीफाय का केली नाहीत - किमान तिला बेनगाझी मधे परत अडकवता आले असते ना ? वगैरे फुटकळ प्रश्न विचारू नयेत. बुद्रुक मायबोलीचे हिलरी एक्स्पर्ट ह्यावर प्रकाश टाकतील काय ?

"मैने अपना काम किया" टाइप. >> Happy जज आयलिन वर अपिलेट कोर्टाने ' लेकी बोले सुने लागे' म्हणात जे ताशेरे मारले आहेत ते बघता तीला नक्कीच कुठे ह्या फंदामधे पडले असे झाले असेल.

आज या सर्व बातम्यांची दुसरी बाजू काय आहे हे ऐकायला मी उत्सुक आहे.
बहुधा हा त्रंपचा विनोद असावा. आम्हा पामरांना तो कळलाच नाही! एव्हढेच.

https://www.msn.com/en-us/autos/news/suv-misses-child-by-inches-as-it-ba...
हा व्हिडिओ बघा - आणखी एक पुरावा की डेमोक्रॅट्स सगळ्या रिपब्लिकनांच्या जिवावर उठले आहेत. कुणि तरी टकर कार्र्ल्सन हिंवा हॅनिटी ला कळवा, लागेच फॉक्स न्यूज तसेच म्हणतील, की झाले!! व्हिडिओ आहे, फॉक्स न्यूज म्हणतात म्हणजे खरेच असले पाहिजे.

मला निराशावादी म्हणा पण या सर्वातुन - न्यू यॉर्क चा खटला काय किंवा मार ए लागो काय, काहीहि निष्पन्न होणार नाही. काहीतरी प्रोसिजरल, टेक्निकल अडचण काढून खटला सतत लांबणीवर टाकल्या जाईल, नि २०२२ मधे जर रिपब्लिकनांनी काँग्रेस बळकावली नि २०२४ मधे रिपब्लिकन प्रेसिडेंट आला (दोन्ही शक्य आहे) तर सगळे प्रकरण खोल खड्ड्यात पुरून टाकतील.

बाकी खटल्यांबद्दल किती पुढे जाईल माहीत नाही पण मार-ला-गो चा खट्लाच मुळात उभा राहायची गरज नव्हती. वेळोवेळी सगळी कागदपत्रे देउन टाकली असती तरी सरकारने लावून धरले नसते. कारण गेली दीड वर्षे केवळ नेहमीच्या चॅनेल्स मधून पाठपुरावाच सुरू होता.

रिपब्लिकन बेस ने रॉन डिसॅण्टिस हा बॅकअप उमेदवार धरलेला दिसतोय. तोच एकटा ट्रम्पची तारीफ फारशी करताना, त्याला या खटल्यांवर डिफेण्ड करताना दिसत नाही. सध्या गेले काही दिवस मार्को रुबिओही चर्चेतून गायब आहे. त्याला सीएनएन व इतरांनी एस्क्पोज केला होता. पण हे लोक सत्य, कन्सिस्टन्सी वगैरेबद्दल आजकाल प्रसिद्ध नाहीत (रुबिओ वगैरे २०१६ साली जोपर्यंत स्वतः रेस मधे होते, तोपर्यंत निदान कन्सिस्टण्ट होते). टेड क्रूझ सध्या नक्की कोणत्या गटात आहे माहीत नाही.

तात्याला आता पूर्वीइतका इंटरेस्ट नाही पुन्हा लढण्यात असेही ऐकू येत आहे.

स्पेशल मास्टर डिअरीने काल दुसरा गुगली/कर्वबॉल काय म्हणाल ते दिला आहे. ट्रम्पसर्कल मधल्या सर्वांनी २०२० च्या निवडणुकीनंतर एक ठराविक पद्धत अवलंबली होती. बाहेर पब्लिक मधे लंबेचौडे क्लेम्स करायचे (काय ते क्रॅकेन ई). आमच्याकडे ढीगभर पुरावे आहेत पण कोर्ट्स ते पाहातच नाहीत वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात एकाही खटल्यात ते दावे कोर्टात करायचे नाहीत. स्वतःच्याच बेसला दीड दोन वर्षे येडे बनवून झाले त्याबद्दल. बहुतांश मागाफॅन्सना याचा गंधही नाही की बाहेर बकबक करतात त्यातील एकही दावा यांनी त्या २०-२५ केसेस मधे केलेलाच नाही. आणि यांचे सो कॉल्ड पुरावेही यांनीच नेमलेल्या जजेसनी निकालात काढले होते.

आता मार-ला-गो बद्दलही तोच गेम यांनी सुरू केला होता. अगदी सुरूवातीला ट्रम्प व त्याची लॉयर क्रिस्टिना बॉब यांनी "एफबीआयने ती कागदपत्रे प्लॅण्ट केली असतील" असा दावा केला होता. फॉक्स वगैरेंनी त्याला आणखी खतपाणी घातले. पण डिस्ट्रिक्ट कोर्ट मधल्या दाव्यात त्याचा उल्लेखच नाही. पण यावेळेस स्पेशल मास्टर डिअरीने यांना ज्या याद्या करायला सांगितल्या त्यात स्पेसिफिकली एक यादी मागितली आहे - अशा कागदपत्रांची, जी रेड च्या आधी मार-ला-गो मधे नव्हती. म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार एफबीआयने नंतर तेथे प्लॅण्ट केली. एकदम बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर टाइप प्रश्न विचारून अडचणीत टाकले आहे. त्याबद्दल यांचे उत्तर अजून आले नाही पण आता त्यांना हो किंवा नाही हे शपथेवर सांगावे लागेल. चान्सेस असे आहेत की त्यातून हे लोक काहीतरी माघार घेतील - आमच्याकडे सध्या ते नाही, देऊ शकत नाही ई. डिक्लासिफाय क्लेमवर जे केले तसेच काहीतरी.

पण डिअरीने हा स्पेसिफिक प्रश्न विचारून यांची गोची केली आहे हे नक्की. यांच्याकडे उत्तर नसणार आहे. कारण या बर्‍याचश्या फॉक्स, न्यूजमॅक्स वगैरे वर सोडलेल्या पुंगळ्या आहेत. "सगळी" कागदपत्रे डिक्लासिफाय केलेली होती, एफबीआय ने प्लॅण्ट केलेली होती, आम्ही सगळी आधीच दिली होती, मीच मार-ला-गो ला पाठवली म्हणजे आपोआपच डिक्लासिफाय झाली, हिलरीच्या मेल्सकरता एफबीआय तेथे आली वगैरे विविध बेसलेस क्लेम्स बाहेर केले आहेत पण यांनी प्रत्यक्षात कोणते कागदपत्र कोणत्या यादीत आहे वगैरे काही त्यावर संशोधन केले असण्याची अजिबात शक्यता नाही.

त्याहून गंमत म्हणजे जर पुढे स्पाइंग किंवा ऑब्स्ट्रक्शन वर त्याच्यावर सरकारने खटला भरला, तर कागदपत्रे क्लासिफाइड होती की नव्हती याने त्यात काहीच फरक पडत नाही.

अशीही शक्यता आहे की ट्रम्पचे वकील ही स्पेशल मास्टरची मागणीच मागे घेतील - कारण त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाहीये. उलट तो अडचणीचे प्रश्न विचारतोय.

फा, चांगला आढावा टाइप लिहितो आहेस. इथे न्युज मध्ये फार कवरेज नाही आणि हल्ली तिकडच्या न्यूज फार वाचल्या जात नाहीत.

भ्रमिष्ट म्हातारबांनी नुकतेच एका समारंभात जॅकी ( जॅकी वलोर्स्की नामक काँग्रेस सदस्य) कुठे आहे? असा प्रश्न विचारून खळबळ उडवून दिली. ह्याचे कारण सदर महिला काही महिन्यापूर्वीच ऑगस्टमधे एका अपघातात मरण पावली. त्या अपघातानंतर खुद्द म्हातारबांनी अधिकृतरित्या दु:ख, शोक इ. व्यक्त केले होते. म्हणजे त्या मयत आहेत हे त्यांना निदान तेव्हा तरी माहित असावे असा संशय घेता येतो!
कदाचित शरीराने नाही तरी मनाने म्हातारबा यमलोकात दाखल झाले असावेत म्हणून जॅकीबाईंना भेटायला आतुर असावेत. असो.

आता नसलेल्या व्यक्तीशी शेकहँडचा अनेक वेळा प्रयत्न करुन झाल्यावर हयात नसलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीविषयी पृच्छा ही प्रगती म्हणावी का अधोगती?
खरोखर असल्या डोके कामातून गेलेल्या व्यक्तीला जगातील एक अत्यंत जबाबदारीचे पद देणे योग्य आहे का?

व्हाईट हाऊस प्रवक्तीचा बहुतेक वेळ बायडनने केलेले थारोळे साफ करण्यात जातो. त्याला खरे म्हणजे अमुक म्हणायचे होते. अमेरिका चीनवर हल्ला करणार नाही, कोव्हिड महामारी संपली असे त्याला म्हणायचे नव्हते, आणि आता हे. बघू व्हाईट हाउसमधून काय स्पष्टीकरण येते ते.

तिकडे कमलाबाई दक्षिण कोरियात जाऊन उत्तर कोरियाचे गुण गात आहेत! कित्ती कित्ती बाई हुशार हो तुम्ही कमलाबाई!

शेंडे नक्षत्र,

"खरोखर असल्या डोके कामातून गेलेल्या व्यक्तीला जगातील एक अत्यंत जबाबदारीचे पद देणे योग्य आहे का?" आणि "व्हाईट हाऊस प्रवक्तीचा बहुतेक वेळ बायडनने केलेले थारोळे साफ करण्यात जातो. "

ह्या बद्दल काळजी कशासाठी, दोन्ही बाबतीत माजी राष्ट्रपतींनी किती जय्यत तयारी करून घेतली आहे व्हाइट हाऊस स्टाफ ची आणि आपली पण . करोना रुग्णांना ब्लीचची इंजेक्शन देऊन, ग्रीनलँड विकत घ्यायला निघाले होते ते. त्या सगळ्या अनुभवातुन गेलेल्यांना आता कशाचच काही वाटणार नाही.

व्हाईट हाऊस प्रवक्तीचा बहुतेक वेळ बायडनने केलेले थारोळे साफ करण्यात जातो. त्याला खरे म्हणजे अमुक म्हणायचे होते. >>> ट्रम्पच्या काळातही हेच चालायचे की. तो कायती बडबड करून टाकायचा, अगाध ट्विट करायचा आणि मग बाकी सगळे प्रवक्ते ते समजावून देत बसायचे.

ट्रंप द्वेषाची इतकी जळजळ असेल तर मग मृतांना जिवंत समजणारे, नसलेल्या व्यक्तीशी शेक हँड करणारे बुद्धीभ्रष्ट, म्हातारचळ लागलेले लोकच योग्य आहेत! बघू बहुसंख्य मतदारांना इतके हास्यास्पद ओढाताण करून दोन्ही राष्ट्रपती एकच कसे आहेत ते सांगणे पटते का ते.
ट्रंपने कधी एका महिन्यापूर्वी मेलेल्या महिलेला जिवंत समजण्याचा पराक्रम केलेला नाही माझ्या आठवणीत.
नुकतेच कुठलेसे भाषण करताना कुण्या एका स्त्रीला हाय म्हणताना मी कसा ३० वर्षाचा होतो आणि ती बाई १२ वर्षाची होती आणि आम्ही कसे खूप काही "काम केले" ह्याची फुशारक्या मारत होते म्हातारबा! विकृत, बुद्धीभ्रष्ट, भ्रष्ट माणूस. कमला बाई सारखी महाभयंकर चेटकी त्याची जागा घेईल ह्या भीतीने २५ वी घटना दुरुस्ती वापरण्याचा विचार करत नसावेत बहुधा!
व्हाईट हाऊसची प्रवक्ता बाई आहे ती पण एक दिव्य प्रकार आहे. निरर्थक उत्तरे देणे, उत्तरे न देणे, उत्तरे देण्याआधी कागदांची असंख्य भेंडोळी उलगडून त्यात डोके खुपसून नंतर निरर्थक उत्तरे देणे. कमलाबाई काय आणि ही करीनबाई काय. गुणवत्ता न बघता निव्वळ वंश, कातडीचा रंग आणि LGBTQABCDXYZ!@#$%%^^& पैकी कुठलातरी रकाना भरला असणे ह्यावर ह्यांच्या निवडी होत आहेत मग असलीच रत्ने मिळणार!
नोव्हेंबरच्या निवडणूकीत काय होते ह्याची उत्सुकता आहे.

ट्रंप द्वेषाची इतकी जळजळ असेल तर मग मृतांना जिवंत समजणारे, नसलेल्या व्यक्तीशी शेक हँड करणारे बुद्धीभ्रष्ट, म्हातारचळ लागलेले लोकच योग्य आहेत! बघू बहुसंख्य मतदारांना इतके हास्यास्पद ओढाताण करून दोन्ही राष्ट्रपती एकच कसे आहेत ते सांगणे पटते का ते. >>>

टोटल बकवास क्लेम. स्ट्रॉमॅन.

तुम्ही बायडेनचे उदाहरण दिलेत, मी ट्रम्पचे दिले. त्यानेही भाषणांमधून भरपूर गोंधळ घातलेले आहेत. बाकी जे प्रवक्त्यांबद्दल लिहीले आहे ते सगळे ट्रम्पच्या काळातही चालत होते. चार वर्षे काय नाटके चालली होती. त्यामानाने हे काहीच नाही.
ट्रम्पच्या फुशारक्या काय तारीफ करण्याच्या लायकीच्या होत्या का मग? "grab her by the..." आणि इतर बरेच काही.

त्या covfefe चे उत्तर प्रवक्त्यांनाही माहीत नव्हते. शॉन स्पेन्सर "ते सगळे ऑब्वियस आहे म्हणत होता. बाकी फ्रेडरिक ड्ग्लसबद्दलचे ट्रम्पचे मौलिक विचार माहीत असतीलच.

कॅलिफोर्नियाचे वोक गवर्नर श्री श्री न्युसमसाहेब(तेच ते हेअर जेल वाले) यांनी एक नवीन लॉ पास केला आहे. यापुढे एखादा रॅप मध्ये काय गायला, हे त्याला प्रोसिक्युट करण्यासाठी वापरू शकत नाही(खरंच... हा जोक नाही) यामुळे ब्लॅक लोकांवर होणारा अन्याय थांबेल असं त्यांचं म्हणणं आहे. ही सुविधा फक्त रॅप साठीच उपलब्ध आहे बरंका. म्हणजे कंट्री, पॉप, रॉक, कव्वाली अशा इतर संगीतप्रकारांसाठी ती अ‍ॅप्लिकेबल नाही.
मला पडलेला प्रश्न- समजा एखादा व्हाईट सुप्रिमसिस्ट लीडर कॅलिफोर्नियात आला आणि त्याने भाषण ठोकले की ब्लॅक लोकांना मारा, ठोका, जमल्यास बलात्कार वगैरे करा. पण हे सर्व तो रॅप मधून गायला, तर त्याला प्रोसिक्युट करता येईल का? Lol

Pages