प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:53

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.

तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!

हे लक्षात ठेवा:-

१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही. 
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले

Screenshot_20220827-081859_WhatsApp.jpg

रंग - काळा

तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.

Screenshot_20220827-082209_WhatsApp.jpg

रंग - लाल

चला द्या बरं झब्बू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा झब्बू
पुढचा क्लु: काळा.
(या पाटीवरून घरात हमखास आचरट जोक्स झालेच: आता काय संxस च्या दारावर लावायला 'संxस' अशी सोनेरी पाटी बनवून घेणार का इत्यादी)
पाटीचे कर्ते: डिके कॅलिग्राफी, बोरिवली
IMG_20220906_102103.jpg

क्युट आहे नातीचा फ्रॉक. >> थॅंक्यु अनु , साडी ड्रेस तिचा तो, तिच्या आईने साडी नेसली कधी की ही हा फ्रॉक घालणार. Happy
कृष्णा , एका झब्बू द्या रंगाचा .

निळा
IMG-20220906-WA0009_1.jpg

20220723_184727.jpg
पुढचा क्लू व्हाॅयलेट

Pages

Back to top