प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:53

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.

तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!

हे लक्षात ठेवा:-

१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही. 
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले

Screenshot_20220827-081859_WhatsApp.jpg

रंग - काळा

तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.

Screenshot_20220827-082209_WhatsApp.jpg

रंग - लाल

चला द्या बरं झब्बू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

38922D00-B902-43A0-BB52-075DFA7E4B14.jpeg

IMG_2733_0.jpg

पुढचा - सोनेरी

अरे गुलाबी कमळं काय सुंदर दिसताहेत. इकडे सगळीकडे पांढरीच दिसतात नाहीतर नेहेमी. (छुसं म्हणू नका आता) Proud
खालचे मासे पण छान आहे लिलीपॉंड मधले. Happy

20220906_225148.jpg

शेवाळी रंग

सर्वच फोटो खूप छान!

जयू तुमच्या पहिल्या फोटोतील ती पिवळी काळ्या मध्यबिंदू ची फुले कसली आहेत?

FB_IMG_1662486560800.jpg

पुढचा रंग केशरी

IMG_2733_1.jpg

पुढचा - लाल

IMG-20220906-WA0038.jpg

केशरी म्हणून टाकला होता. लाल म्हणून चालवून घ्या.
Proud
पुढचा रंग - अबोली

IMG_20170511_073159.jpg

पुढचा - पोपटी

popati-color.jpg
पुढचा रंग : जांभळा

Pages