दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह माय गॉड! कोविड डिटेक्ट झाला हे वाचले होते. पण असे अचानक काही होईल... असे वाटले नाही.
भावपुर्ण श्रद्धान्जली! __/\__

धक्कादायक बातमी. अजून विश्वास बसत नाही. परवाच त्यांची पोस्ट वाचली होती आणि यावेळीही ते छान बरे होतील असा विश्वास वाटत होता. अत्यंत अभ्यासू, हजरजबाबी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ब्लॅककॅट यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सोसण्याचे बळ मिळो!

मला एकदम सुन्न होईला झालं. असं काही होईल वाटलंच नव्हतं.
खोटं नाही बोलत पण आज सकाळीच मला त्यांची आठवण आलेली की कुठल्याच धाग्यावर नवा प्रतिसाद का दिसेना त्यांचा.
बापरे! श्रद्धांजली त्यांना __/\__

एखाद्या ठराविक भागातील हॉस्पिटलमध्ये किंवा स्वत:च्या दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरांना खूप वेगळे आणि धगधगीत अनुभव मिळत असतात. त्यातून त्यांचे विचार तयार होतात. समाजाला थेट भिडणे असते ते. माझ्या मित्राच्या आईचा दवाखाना धारावीत होता. पुढे तिथे सून बसू/चालवू लागली. धारावीसारख्या ठिकाणी १९७५- पासून महिला डॉक्टर म्हणजे खूप गर्दी आणि अनुभव. निराळ्या भाषेंत ( तमिळ,तेलगू,हिंदी,मराठी, गुजराती,मल्याळी) आजार सांगणारे पेशंट. डॉक्टरलाच सांगणार "सूई लावा, उद्या कामावर जायचेय."

तर गोवंडीलाही हाच प्रकार असणार. शिवाय एडस निवारण विभाग असेल तर कुठून काय होईल सांगता येत नाही. तिथे पेशंटला संभाळणारे म्हणजे दिव्यच.
शेवटच्या प्रतिसादातल्या "चारपर्यंत ओपीडी संभाळली" या वाक्यातला स्फोटकपणा जाणवू लागलाय.

Shocking news..
खूप वाईट वाटलं वाचून...
मनःपूर्वक श्रद्धांजली.

धक्कादायक बातमी आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याचे कळवल्यानंतरही त्यांच्या काही पोस्टस् इथे आत्ताआत्तापर्यंत वाचल्याचे आठवतेय. आणि आज एकदम ही बातमी. माबो वर मी इतर आयडींना प्रत्यक्षात ओळखत नसले तरीही काही जणांशी ऋणानुबंध जुळले असावेत असे वाटते.... त्यापैकी एक ब्लॅककॅट.
डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

वाचल्यापासून काय बोलावं कळत नाहीये. Shocking आहे.
हे डॉक्टर शेवटापर्यंत ड्युटी करून गेलेत. Respect!

कुटुंबाला हे सहन करायचे धैर्य लाभो हीच प्रार्थना.

श्रध्दांजली...

खूप वर्षांपूर्वी (बहुधा मायबोलीच्या जन्मापूर्वी) लोकसत्ताच्या हास्यरंगमध्ये विडंबन कविता स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील बक्षीसपात्र कविता प्रसिद्ध केल्या जात.
त्यामध्ये “सायंकाळ होता होता पुन्हा वीज गेली” ( उषकाल होता होता चे विडंबन) ही कविता छापलेली होती. त्याखाली डॉ. गजानन कागलकर, कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर असे लिहिलेले होते. मला ती खूप आवडल्याने मी कात्रण कापून ठेवले होते.

ही बहुदा BC यांचीच असणार…. सुंदर आहे !

यांच्या बद्दल वेगळा धागा काढायला हवा. इथले काही निवडक प्रतिसाद तिथे हलवून पुढे त्यांच्या बद्दल इतर माहिती , अनुभव लिहिता येतील.

वाईट बातमी .
भावपूर्ण श्रद्धांजली

अरेरे फार वाईट बातमी Sad . श्रद्धांजली.

इतके प्रतिसाद बघून घाबरतच हा धागा उघडला, काहीतरी शॉकींग असणार असं वाटलेलं, भीती खरी ठरली.

ब्लॅक कॅट ह्यांच्या जाण्याची बातमी वाचून खूप दुःख झाले.
सर्व विषयाच्या चर्चेत त्यांचा सहभाग असायचा.
कोणी किती ही अपशब्द वापरले तरी त्यांनी कोणालाच अपशब्द वापरले नाहीत.
पण विरुद्ध मात्र सडेतोड करायचे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

कोविडच्या धाग्यावर त्यांच्या आजरपणापणाबद्दल आणि ॲडमिट होण्याबद्दल वाचले होते तेंव्हा त्यांच्याबाबत एव्हढे गंभीर काही होईल असे वाटले नव्हते.
भावपूर्ण श्रध्दांजली!!

अत्यंत धक्कादायक बातमी गजाजन कागलकर ह्यांच्या विषयी.
एकदम लॉजिकल लिहीत असत.
पश्चिम महाराष्ट्र पार्श्वभूमी, आणि आमच्यापुढे 2 ते 4 वर्षे वयोगट असल्याने कधी भेटू तर मस्त गप्पा होतील असं वाटायचं. त्यांची काही टोकाची मतं पटत नव्हती,पण आमच्यात तरी वादविवाद झाला नाही.
शकुनावर विश्वास होता की नाही माहीत नाही त्यांचा, पण तसं लिहायचेच काही वाटले तर.
त्यांची एक शतशब्दकथा आठवतेय.
स्प्लेडर विकली आणि पाय मोडला ह्या संदर्भात.
आताही कुठेतरी पांढरे टेबल वै वरून पनवती बोलले होते.
असं लिंक लागणे हेच नकोसे वाटतंय.

फार फार शॉकिंग बातमी! बातमी वाचून तेच त्यांचे परवाचे पनवतीचे पोस्ट आठवले आणि चर्र झाले. नेहमीच पोस्ट वाचली आहेत त्यांची. बर्‍याचदा राजकारणाविषयी , धर्म,कर्मकांड याबद्दलची पोस्ट टोकाची लिहायचे तसे हे पोस्ट असावे, तेवढे गंभीर नसेल असे वाटले होते. चिनूक्स ने लिहिलेले वाचूनही हे ब्लॅककॅट नसू देत असेच मनात आले. पण Sad
वर कुणीतरी म्हटले तसे, माबोवर बर्‍याच आयडींना प्रत्यक्षात ओळखत नसलो तरीही वर्षानुवर्षे ओळखतोच असे वाटते. वाईट झाले.
जामोप्या/ब्लॅककॅट/ डॉ. कागलकर यांना श्रद्धांजली!!

आजची वाईट सकाळ या बातमीने सुरू झाली. एका माबो WhatsApp ग्रुप वर वाचलं, पण विश्वास ठेवावासा वाटत नव्हता. माबोवर येऊन 'दुःखद बातमी ' धागा दिसु नये अशी इच्छा होती, पण एवढे प्रतिसाद पाहुन कळालंच. Sad

किती उत्साही, हरहुन्नरी व्यक्ती होती. त्यांच्या पोस्ट्स आवर्जुन वाचायचे. मुद्द्यावर ठाम पण संयत भाषेत arguments असायची. मी अनेक वर्षापूर्वी लिहिलं होतं, जामोप्या मी तुमची फॅन आहे. कधीही न भेटता आणि ओळख नसतानाही अजुनही मला या व्यक्तीबद्दल आदर आहे.
त्यांच्या पोस्ट्स आणि काही धागे वाचुन कळलं होतं की ही व्यक्ती आतुन दुखावलेली आहे, पण डॉक्टर, तरीही तुम्ही कायम रसिक आणि हौशी होतात. मिश्कीलपणा कायम होता. तुमच्या मुलीवरच प्रेम काही पोस्ट्स वाचुन समजलं होतं. त्या छोट्या मुलीला चांगला आधार मिळुन मार्गी लागु दे, हीच प्रार्थना.
( शक्य होईल तोवर OPD केली हे वाचलं आणि वाटलं आता तरी तुम्हाला आराम मिळेल. ओम शांती ! )

मीरा फार छान श्रद्धांजली वाहीली आहेत.
त्यांची धार्मिकतेबद्दलची टोकाची मते सोडली तर, सहृदयी वाटत मला तरी.
त्यांना सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अत्यंत धक्कादायक! Sad
त्यांना कुठे काय काय चपखल आठवतं असे त्याचं मला फार अप्रूप वाटायचं. एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या पोस्टवरून फार छक्के पंजे नसलेलं जे मनाला वाटेल त्यात लपवाछपवी न करता बोलून टाकण्याची त्यांची सवय दिसायची. त्यामुळेच त्यांच्याशी कधी वाद झाला तर मजा यायची, कधी मिश्किल पणे धोतराला हात घालतील समजायचं नाही, आणि तरी जाम हसायला यायचं.
ही विल बी मिस्ड!

फारच धक्कादायक आहे हे. अखेरची पोस्ट अमानवी वरची काल की परवाच वाचली होती. पण त्यावरून इतके गंभीर काही असेलेसे वाटले नव्हते.

तसा थेट संवाद वा ओळख नव्हती पण प्रतिसाद आणि लिखाण यातून ओळखत होतो. कोव्हीड वरील चर्चेत माहितीपूर्ण मुद्दे मांडले होते त्यांनी.

वाईट झाले Sad

सुन्न व्हायला झाले आहे. मायबोलीवर बहुतांश वाचनमात्र असणार्या माझ्यासारख्यांना जामोप्या यांचे लेखन आणि प्रतिसाद खरोखर मौल्यवान होते. वाद, संवाद, प्रतिवाद कसे संयत, सभ्य आणि अभ्यासपूर्ण असावेत याचा अभ्यास त्यांचे लिखाण वाचून कुणीही करावा!

या कोविडने नक्की किती नी काय उध्वस्त करायचे अजून बाकी ठेवलेय कोण जाणे!

अर्रर, परवाच अमानवीय धाग्यावर आजारपणाविषयी पोस्ट वाचली. पण ते स्वतःच डॉ असल्याने हा गंभीर प्रकार नसेल असं वाटलं होतं.

त्यांचे प्रतिसाद नेहमी चारचौघांपेक्षा वेगळे असायचे. त्यामुळे कुठल्याही विषयाचा एक वेगळा दृष्टीकोन समजून यायचा.

ईश्वर मृतात्म्यास सद्गती आणि कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.

Pages

Back to top