दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे! फार वाईट. खूप अभासू होते. धार्मिक वांगमयाचाही ( लिहिता येत नाही हा शब्द) बऱ्यापैकी अभ्यास असावा असे त्यांच्या प्रतिसादांतून जाणवे. विपुल संदर्भ हाताशी असणारा मायबोलीचा एक जुना जाणता सदस्य गेला आहे. दु:ख .
सद्गती.

अरेरे वाचुन वाईट वाटले. Sad
मुलगी लहान आहे, १० च्या आतली असावी. तिच्यासाठी खुप वाईट वाटतेय.

वाईट बातमी
जामोप्या यांना श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ _/\_

((हल्लीच त्यांनी इथे एका धाग्यावर आजारपणाबद्दल लिहिले होते का ?))..?

धक्कादायक!
कोव्हिड धाग्यावर त्यांनी आजारपणाबद्दल लिहिले होते, पण एवढे विकोपास जाईल असे वाटले नव्हते.
Sad

खूप धक्कादायक बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली.
... " जिससे डरते थे वो ही बात हो गई " असे त्यांनी आजार झाल्यावर पोस्ट केले होते.
त्यांचे प्रतिसाद वाचून खुदकन हसू यायचे, आता त्याला आपण कायमचे मुकलो.

ओह...! Blackcat...

कालपरवा पर्यंत लिहीत होते ते इथे...फारच धक्कादायक...!

कोविड च्या धाग्यावर त्यांनी वेगवेगळ्या लक्षणाबद्दल लिहिले होते...नेमके के झाले त्यांना? ...

Screenshot_20220905-104728_Chrome.jpg

मला वाटतं हा शेवटचा प्रतिसाद असावा त्यांचा, अमानवीय - २ ह्या धाग्यावर... ब्रेथलेसनेस वाढून त्रास झाल्यावर admit व्हायचा सल्ला दिला होता म्हणे डॉक्टरने त्यांना.

@जेम्स वांड

ही बातमी इथे वाचल्यावर तोच प्रतिसाद आठवला आणि त्याचा विचित्र संबंध लक्षात घेऊन मन चरकलं.

सुप्रिया जाधव आणि जामोप्या यांना श्रद्धांजली. या धाग्यावर सकाळी सकाळी एवढी प्रतिसाद संख्या बघून घाबरायला होतं.

त्यांना कसला त्रास होता तब्येतीचा ??

म्हणजे क्रॉनिक का तात्कालिक आजारपण निमित्त ठरले अश्या अनुषंगाने विचारतोय.

बाप रे! भयानक. मी त्यांना कधी भेटलो नव्हतो किंवा परिचयही नव्हता. पण इथे त्यांचा नियमित वावर असल्यामुळे जणू अगदी परिचयातले असल्यासारखे वाटले आहे, त्यामुळे जास्तच धक्का जाणवला.

त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असावी. चित्रपट संगीतातील सौंदर्यस्थळे आणि इतर तत्सम धाग्यांवर त्यांचे प्रतिसाद अचूक बारकावे टिपणारे असायचे. कधीतरी त्यांच्याशी ओळख वाढवून ह्या विषयावर गप्पा माराव्या असं मागे डोक्यात आलं होतं. पण गेले व्हायचे राहुनी Sad

Pages